मुखेड तालुक्यात दोन दुचाकीच्या धडकेत १ ठार, ४ जखमी 

मुखेड तालुक्यात दोन दुचाकीच्या धडकेत १ ठार, ४ जखमी 

आधुनिक केसरी न्यूज 

संजय कांबळे

मुखेड : तालुक्यातील मौजे शिकारा पाटीजवळ राज्य महामार्गावर झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात चार जण जखमी झाले तर एका कारचा झाल्याची घटना घडली. तसेच मुखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या कंधारफाटाजवळील राजेश धाब्यासमोर दोन दुचाकीची धडक झाल्याने या अपघातात एका २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान एकाच दिवशी घडलेल्या दोन अपघातात एक ठार तर चार जखमी झाल्याची घटना मुखेड तालुक्यात घडली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस (क्रमांक एम.एच.२० बी.एल. १२३२) शिरूर ताजवंदहुन मुखेडच्या दिशेने जात होती. तेव्हां शिकारापाटी येथे शाळेचे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बस त्याठिकाणी थांबली असता त्याचवेळी पाठीमागून येणारी शिफ्ट डिजायर कार (क्रमांक २६ बी.सी. ४५२२) ही गाडी बसच्या पाठीमागे आली तेव्हा शिफ्ट डिजायर कारच्या पाठीमागे, उदयगिरी ट्रॅव्हल्स (क्र. एम.एच.२४ एवी ७८७८) या ट्रॅव्हल्सने शिफ्ट डिजायरला जोराची धडक दिल्याने स्विफ्ट डिजायर कार बसच्या पाठीमागे घुसली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. बस व ट्रॅव्हल्सच्या मध्ये कार ही गाडी चिरडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये चार जण जखमी झाल्याची घडली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका घटनेत मुखेड ते लातूर राज्य महामार्गावर कंधारफाटा जवळील राजेश धाब्याजवळ एक दुचाकी दुसऱ्या दुचाकीवर धडकल्याने एक महिला
घटनास्थळी ठार झाली. सदरील महिला ही मुखेड तालुक्यातील मौजे होनवडज येथील रहिवासी आहे. मयत महिलेचे नाव उमा शिवकुमार तलवारे (वय २२) असे आहे. सदर महिला भावासोबत वाहन (क्रमांक एम. एच.२६ एन.१३०२) या दुचाकीवर बसून वसंतनगर येथील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात होती. तेव्हां लातूर रस्त्यावर घाव्याजवळ समोरील दुचाकी (क्रमांक एम. एच. २६ बी.एम.८५२४) दुचाकी अचानक थांबल्याने मागून येणारी दुचाकी घडकल्याने यात महिलेला जबर मार लागून जागीच ठार झाली आहे. यावेळी महिलेसोबत असलेला एक वर्षाचा मुलगा आईच्या अंगावर पडल्याने तो बचावला. सदरील महिलेस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले डॉ. शुभम झाडे यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पत्रकारांच्या आक्रमकतेमुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनास जाग पत्रकारांच्या आक्रमकतेमुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनास जाग
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे म्हसवड : राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी आणि ५४८ ई सातारा ते लातूर आणि सातारा ते...
माओवादाविरुद्ध  लढा दिलेल्या सी-60 जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-60 पदक’ देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावी वडाचे झाड कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला!
पोलीस प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत कीटकनाशकांचा 5 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ; मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत
राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी आमदार धोंडगे यांची शिवराज, दिलीप या पुत्रांसाठीची आजची  शेवटची धडपड