संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वारकऱ्यांसाठी थेट बीड जिल्हा रुग्णालयात फोन
अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला धावले लोकनाथांचे आरोग्य सेवक
आधुनिक केसरी न्यूज
बीड : महाराष्ट्राचे संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सामाजिक बांधिलकीसाठी देशभर सुपरिचित आहेत. याची प्रचिती पुन्हा आली. जखमी वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री महोदय यांनी थेट बीड जिल्हा रुग्णालयाला फोन करून डॉक्टरांना निर्देश दिले. दरम्यान, मुख्यमंत्री सचिवालयाचे ओएसडी मंगेश चिवटे, आरोग्यदूत बाजीराव चव्हाण यांनी बीड जिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर राऊत यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूरहून दर्शन करून परतत असताना बीड बायपास, नामलगाव येथे ३१ वारकऱ्यांचा टेम्पो पलटी होऊन ९ वारकरी जखमी झाले. त्यांच्या मदतीला तातडीने बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आरोग्य सेवक धावले.
छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील दहेगाव ता. कन्नड येथील ३१ वारकऱ्यांचा टेम्पो आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूरहून दर्शन करून परतत असताना नामलगाव, बीड येथे बुधवारी सायंकाळी ७ वाजता टायर फुटल्याने टेम्पो पलटी झाला. यात ९ वारकरी जखमी झाले. यात १ वारकरी गंभीर जखमी आहे, त्यांच्यावर छञपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व वारकऱ्यांच्या मदतीला बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष धाऊन आला. कन्नड मतदार संघाचे आमदार उदयसिंह राजपूत, देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी अतुल राऊत यांनीही जिल्हा प्रमुख महादेव मातकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.
जखमींना फराळ, भोजनासह
सर्वोतोपरी मदत: महादेव मातकर
धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू बाजीराव दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात मोठे सामाजिक कार्य सुरू आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बीड जिल्हा प्रमुख महादेव मातकर आणि त्यांच्या टीमने वारकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली. ताततीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करून जखमी वारकऱ्यांवर प्राथमिक उपचार केले. रात्री जेवण आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली. जखमींना पुढील उपचारासाठी छञपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले तर किरकोळ जखमी वारकऱ्यांना गावाकडे जाण्याची व्यवस्था केली, अशी माहिती जिल्हा प्रमुख महादेव मातकर यांनी दिली. डॉ. सुधीर राऊत, आरोग्य सेवक संकेत पवार, नारायण पवार, पोलीस कर्मचारी विकास काकडे, अनंत गिरी यांनी सहकार्य केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List