आगमी विधानसभा निवडणूक सर्व ताकतिनिशी लढवणार ; सौ.आशाताई शिंदे

कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी जोमाने कामाला लागावे...!

आगमी विधानसभा निवडणूक सर्व ताकतिनिशी लढवणार ; सौ.आशाताई शिंदे

 आधुनिक केसरी न्यूज

धोंडीबा मुंडे

 कंधार : तालुक्यातील फुलवळ सर्कल मधील शेकापुर येथे काल दि.२३ जून रविवारी जनसंवाद बैठकीचे आयोजन शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद बैठक संपन्न झाली, यावेळी उपस्थित हजारो कार्यकर्ते,पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच,पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना सौ. आशाताई शिंदे यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले की, आगामी विधानसभा निवडणूक आपल्याला संपुर्ण ताकतीनिशी लढवायची असून महाविकास आघाडीचे उमेदवारी आपल्यालाच फायनल असून लोहा-कंधार मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी कोणत्याही भूल थापावर विश्वास न ठेवता येणारी विधानसभेची निवडणूक आपण आजपर्यंत केलेल्या विकास कामाच्या बळावर लाखोंच्या मताधिक्याने जिंकणार असून मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना विनंती केली की, गेल्या ७० वर्षाच्या काळात लोहा-कंधार मतदारसंघात आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून अनेक मूलभूत विकास कामावर कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केला आहे. याअगोदर गेल्या ७० वर्षात लोहा कंधार मतदारसंघात कोणत्याही लोकप्रतिनिधीने या पद्धतीने विकास केला नाही हे कार्यकर्त्यांनी सर्व मतदारसंघातील जनतेस निदर्शनास आणून द्यावे.आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या कार्यकाळात लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात आमदार शिंदे यांनी अनेक प्रलंबित कामे व अनेक विकासकामे व नवीन विकास कामे तळमळीने मंजूर करून ही विकास कामे मतदारसंघात दर्जेदारपणे झाली असून या विकास कामाच्या जोरावरच लोहा-कंधार मतदारसंघातील मायबाप जनता या विधानसभा निवडणुकीत आपल्याला लाखोंच्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास  आशाताई शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. लोहा कंधार मतदार संघातील सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी येणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले. यावेळी या जनसंवाद बैठकीचे अध्यक्ष नामदेवराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव केंद्रे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शेरूभाई,  शेकाप लोहा तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल , कंधार तालुका समन्वय समितीचे सदस्य राम पाटील गोरे , लोहा खरेदी विक्री संघाचे संचालक सुधाकर सातपुते,लोहा समन्वय समिती सदस्य सिद्धू पा. वडजे, खांबेगावचे सरपंच संदीप पाटील पौळ ,कंधार समन्वय समिती सदस्य नवनाथ बनसोडे ,बंजारा समाजाची नेते देविदासराव राठोड, शिवाजीराव केंद्रे,कंधारेवाडीचे सरपंच शंकरराव डिगोळे, संगमवाडीचे सरपंच चक्रधर घुगे, फुलवळ सर्कल प्रमुख वसंत मंगनाळे, माधव वाघमारे, शिवाजी सोमासे, बाळू मंगनाळे, एजाज भाई पानभोसीकर गंगाधर पवळे चिखलीकर, ज्ञानेश्वर कामटे, सद्दाम भाई कंधारी सह फुलवळ सर्कल मधील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच ,उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस  पाटील, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सह गावकरी मंडळी व महिला भगिनी हजारोंच्या संख्येने या जनसंवाद बैठकीस उपस्थित होते.

     या जनसंवाद बैठकीदरम्यान लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे,शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शामसुंदर शिंदे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा  शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सरचिटणीस विक्रांत पाटील शिंदे यांच्या खंबीर विकासाभिमुख कार्यावर विश्वास ठेवून काल फुलवळ सर्कलमधील हजारो युवकांनी शेतकरी कामगार पक्षांमध्ये जाहीर ‌ प्रवेश केला,शेकापमध्ये  जाहीर प्रवेश केलेल्या हजारो   कार्यकर्त्यांचे  शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी जाहीर प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पुष्पहार घालून शेतकरी कामगार पक्षामध्ये स्वागत केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..! साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..!
आधुनिक केसरी न्यूज  नागपूर, दि. २१/१०/२०२४ इंद्रायणीच्या काठावर बसलेले तुकोबा, गावकऱ्यांनी केलेल्या टिंगल टवाळीमुळे थेट आपल्या विठ्ठला सोबतच संवाद साधत...
Braking News : काँग्रेसची 96 जागांवरची चर्चा पूर्ण
पैठणच्या नाथसागराचे 18 दरवाजे उघडले
संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी घेतले राजुरेश्वरचे दर्शन;  आठवडी बाजार संकष्टी एकत्र आल्याने वाहनांची तोबा गर्दी
अम्मा का टिफिनच्या प्रणेत्या, निराधारांचा आधार कायमचा हरपला : अजय जयस्वाल
रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीचा ४२ वा वर्धापन दिवस आणि आयआयडीएल 8 वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मांचे 80 व्या वर्षी निधन