वाकद ग्राम पंचायतला सरपंचासह सदस्यांनी लावले कुलूप
मासिक सभा,ग्राम सभाना हरताळ ; तीन महिन्यापासून ग्रामविकास अधिकारीच नसल्याने कामे खोळंबली ; जिल्हाधिकाऱ्यांसह,सीईओ ना दिले निवेदने
आधुनिक केसरी न्यूज
विनोद पाटील बोडखे
रिसोड : तालुक्यातील बोटावर मोजण्या इतक्या मोठ्या असलेल्या ग्राम पंचायती पैकी एक मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्राम वाकद येथे मागील तीन महिन्यांपासून ग्रामविकास अधिकारी नसल्याने मासिक सभा, ग्राम सभा देखील घेण्यात आल्या नसल्याने विविध ग्राम विकासाची कामे जसे प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची समस्या, पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्या साफ करने,घरकुल लाभार्थ्यांची कामे,जन्म मृत्यू नोंदी दाखले तसेच विविध कामांसाठी लागणारी कागदपत्रे, शैक्षणिक दाखले गावात ग्राम विकास अधिकारी नसल्याने खोळंबली आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सरपंच , सदस्य कसे तोंड देणार त्याला कंटाळून जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनाक 18 जून रोजी निवेदन देण्यात आले होते.तसेच निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री,ग्राम विकास मंत्री मंत्रालय मुंबई यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.निवेदन दिल्या नंतर प्रशासन प्रश्न मार्गी लावेल या आशेने तीन दिवस वाट पाहिली मात्र काहीच हालचाल होत नसल्याने वाकद येथील सरपंच्यासह सदस्य देखील आक्रमक झाले असून ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन वारंवार याकडे दुर्लक्ष करीत आहे. जोपर्यंत गावातील प्रत्येक प्रश्न सुटत नाही व ग्राम विकास अधिकारी गावामध्ये हजर राहत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक 22 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता कुलूप लावले आहे.आमच्या मागणीची दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
वाकद ग्राम पंचायत ही मोठी ग्राम पंचायत असून आमच्या ग्राम पंचायत ला कायम स्वरुपी ग्राम विकास अधिकारी नसल्याने मासिक सभा, ग्राम सभा देखील होत नाहीत. प्रभारी ग्राम विकास अधिकारी गावात येत नसल्याने अनेक विकास कामे तसेच शैक्षणिक दाखले इत्यादी नागरिकांची कामे खोळंबली आहेत.त्यातच पिण्याच्या पाण्याची समस्या आ वासून उभी आहे. मागील तीन महिन्यापासून ग्राम विकास अधिकारी गावात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन आज दिनाक 22 जून पासून वाकद ग्राम पंचायतला कुलूप लावण्यात आले आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून,तात्काळ प्रश्न मार्गी लावावा अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल.
अमोल देशमुख सरपंच वाकद
ग्राम पंचायत वाकद सरपंच आणि सदस्यांचे ग्राम पंचायत लास कुलूप लावण्या बाबतचे निवेदन प्राप्त झाले असून निवेदनात ग्रामविकास अधिकारी हे गावात येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु वाकद ग्राम पंचायतला रवींद्र खिराडे हे प्रभारी ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.सरपंच यांच्या निवेदना प्रमाणे ते गावामधे येतात किंवा नाही या बाबत पूर्ण माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल
प्रमोद बदरखे गट विकास अधिकारी प.स.रिसोड
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List