बँकांनी लाभार्थ्यांची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत.: नरेंद्र पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा राज्यभरात ९२ हजार जणांना लाभ

बँकांनी लाभार्थ्यांची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत.: नरेंद्र पाटील

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर ; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून राज्यात ९२ हजार १४४ लाभार्थ्यांना उद्योगासाठी ७ हजार ३३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८६०३ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला असून  महामंडळामार्फत स्वयंरोजगारासाठी  राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी बँकांनी पात्र लाभार्थ्यांची कर्ज मंजुरीची प्रकरणे कालमर्यादेत मार्गी लावावेत, अशी सूचना महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री) नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आज येथे केली. 
    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज महामंडळाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, महामंडळाचे विभागीय समन्वयक प्रवीण पाटील, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे, महामंडळाचे जिल्हा समन्वयक समाधान सूर्यवंशी यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६०३ लाभार्थ्यांना कर्ज मंजूरी झाली आहे. बॅंकांनी आतापर्यंत ६५० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून महामंडळाचे ७३ कोटी रुपये व्याज परतावा केला आहे. व्याज परतावा सुरु झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ७२२० इतकी आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील माहिती मंगेश केदार यांनी सादरीकरण केले. 
    श्री. पाटील म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळमार्फत तरुणांना उद्योग सुरु करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प व्याज परतावा योजना राबविण्यात येते.  शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. बँकांनी या योजना समजून घ्याव्यात लाभार्थ्यांपर्यंत या योजना वेळेत पोहोचवाव्या. प्रस्तावातील त्रुटींचे तात्काळ निराकरण करुन घ्यावे आणि प्रलंबित व नवीन प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत. 

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जालना जिल्ह्यातील युवकाचा खून : चौघा संशयतांना पोलिसांनी घेतले ताब्यात  जालना जिल्ह्यातील युवकाचा खून : चौघा संशयतांना पोलिसांनी घेतले ताब्यात 
नआधुनिक केसरी न्यूज देऊळगाव राजा : जालना जिल्ह्यातील एका युवकाचा मृतदेह देऊळगाव राजा जालना मार्गावरील एका शेतात मिळाल्याने खळबळ उडाली...
ओडिशा राज्यातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची चंद्रपूर वन अकादमीला भेट
चंद्रपूरात 'संडे ऑन सायकल' अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत क्रुझर पर्यटकांकरिता चंद्रपूर ते मोहर्ली बससेवा उद्घाटन सोहळा संपन्न..!
पुणश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र,गोंडवाना गडचिरोली उद्घाटन सोहळा संपन्न
पिशोर पोलिसांची धडक कारवाई.१२,७०,००० रुपये किमतीच्या चोरी गेलेल्या १४ मोटरसायकल केल्या जप्त. दोन आरोपी जेरबंद..!
चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा यांची नियुक्ती..!