21 मार्चचे राशिभविष्य  :  'या' राशीच्या लोकांना आज होईल अर्थप्राप्ती 

21 मार्चचे राशिभविष्य  :  'या' राशीच्या लोकांना आज होईल अर्थप्राप्ती 

आधुनिक केसरी 

मेष : शुभ रंगः भगवा, शुभ अंक : १

आपल्या वैवाहीक जिवनातील मतभेद दिवसभरात निवळतील. शब्द जपून वापरा. आज काही आरोग्याच्या तक्रारींचा थोडाफार त्रस्त जाणवेल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.तेलकड खाऊ नका.

वृषभ : शुभ रंगःराखाडी, शुभ अंक : ३

दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहीक जिवनात काही जुन्या आठवणी मनास आनंद देतील.उन्हात जाऊ नका.

मिथुन : शुभ रंगः स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ५

हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहीणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

कर्क : शुभ रंग: आकाशी, शुभ अंक : ३

वास्तू व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळलेत तर बरे होईल. विद्यार्थी आज आभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील. गृहीणींना आज माहेरची ओढ लागेल.
सिंह : शुभ रंग: पांढरा, शुभ अंक : ८

एखाद्या कामासाठी तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज काही दूरावलेली नाती जवळ येतील. आज तुम्ही गोड बोलून विरोधकांचीही मने जिंकू शकाल.

कन्या : शुभ रंग: आकाशी, शुभ अंक : ४

आज आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलल्याने नात्यात गैरसमज होतील. कुणाला मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका.

तूळ : शुभ रंगः गुलाबी, शुभ अंक : ५

काहीजणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. आज एखादी महत्वाची वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : शुभ रंगःमोतिया, शुभ अंक : ६

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदीही होईल. आज रात्रीच्या प्रवासात बेसावध राहू नका.
धनु : शुभ रंगःजांभळा, शुभ अंक : ९

आळस झटकून कामाला लागाल पण अती उत्साहात काही चूकीचे निर्णय घ्याल. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. आज हाती असलेला पैसा जपून वापरा.

मकर : शुभ रंग: चंदेरी, शुभ अंक : ७

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्वांना मुरड घालावी लागेल. महत्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

कुंभ : शुभ रंगःसोनेरी, शुभ अंक : २

कामाच्या ठीकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. वरीष्ठांचे काही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज जोडीदारास दिलेला शब्द पाळा.

मीन : शुभ रंग: पिस्ता, शुभ अंक : १

केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारु नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न आज करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु...
संविधान घ्या - संविधान द्या उपक्रम हळदी कुंकू समारंभात संविधानाचा जागर..!
शांत झोपेची कला आत्मसात करा..!
नागपूरचा निलेश जोगी ठरला आमदार श्रीचा मानकरी, मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव ठरला स्पर्धेतील आकर्षण
हवामानात होत असलेले बदल गांभीर्याने घेण्याची गरज   आंतरराष्ट्रीय परिषदेतील तिसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रातील सूर 
आई ही शिक्षण, मूल्य आणि शिस्त यांची पहिली शाळा :आ.किशोर जोरगेवार
पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या 10 संकल्पासह आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप