राजकीय कविता : कुणी फुकावी तुतारी...

राजकीय कविता : कुणी फुकावी तुतारी...

आधुनिक केसरी

संजय जेवरीकर ,पत्रकार

कुणी फुंकावी तुतारी
कुणी घड्याळ बघावे..
कुणी घ्यावे मशाल हाती
कुणी धनुष्य बाण ताणावे..

कुणी मुतावे धरणात
कुणी धरण गिळावे..
कुणी सत्तेसाठी आपले
इमान गिरवी ठेवावे...

कुणी काकासाठी झुरले
कुणी पुतण्याला बाजू केले..
सत्तेसाठी ज्यांनी त्यांनी
आपले प्यादे सरकावले..

कुणी पोरीला पुढे केले
कुणी पोरगा डावी लावला..
कुणी घराणेशाहीसाठी
पक्ष डावावर लावला..

कुणी कमळ फुलवावे
कुणी हाती कमळ घ्यावे..
कुणी ईडीच्या भीतीने 
स्वतःला गिरवी टाकावे..

महाराष्ट्री देशा आता
मतदार मूर्खात निघाले..
सत्तेसाठी सगळ्यांनी आपले 
कमरेचे डोक्याला गुंडाळले...

कुणी तुतारी मिळताच
दर्शना रायगडी पोचले..
हाती घड्याळ असता
कुणी कमळ कुरवाळले..

बस करा आता तुम्ही
महाराष्ट्र डावावर लावणे..
हाकलून लाव सत्तेवरूनी
आता हे सगळे शहाणे..

ताठ मानेने उभी राहू दे 
पुन्हा शान महाराष्ट्राची...
दाखव जागा महाभागांना
अन् ताकद मतदारांची....!

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मारतळा येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन लुटले  मारतळा येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन लुटले 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : लोहा तालुक्यातील मारतळा येथे दिवसाढवळ्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन एका व्यापाऱ्याला चोरट्यांनी जबर मारहाण करुन...
“रांगांना पूर्णविराम! पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण; घरपोच सेवा व OTPमुळे काळाबाजारावर आळा”
शिळवणी येथे वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
विधानभवनात पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नांवर बैठक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश
आडगाव येथे जखमी अवस्थेत हरणास दिले जीवनदान
चंद्रपूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी मनस्वी गिऱ्हे यांची निवड.
वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त