18 फेब्रुवारी : आजचे राशीभविष्य:  कसा राहील तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीनुसार,जाणून घ्या..!

18 फेब्रुवारी : आजचे राशीभविष्य:  कसा राहील तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीनुसार,जाणून घ्या..!

आधुनिक केसरी न्यूज

जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी....

मेष : शुभ रंगः भगवा, शुभ अंक : १
केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारु नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न आज करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे.

वृषभ : शुभ रंगःराखाडी, शुभ अंक : ३
एखाद्या कामासाठी तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज काही दूरावलेली नाती जवळ येतील. आज तुम्ही गोड बोलून विरोधकांचीही मने जिंकू शकाल.

मिथुन : शुभ रंगः स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ५
वास्तू व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळलेत तर बरे होईल. विद्यार्थी आज आभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील. गृहीणींना आज माहेरची ओढ लागेल.

कर्क : शुभ रंग: आकाशी, शुभ अंक : ३
आज आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलल्याने नात्यात गैरसमज होतील. कुणाला मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका.

सिंह : शुभ रंग: पांढरा, शुभ अंक : ८
कामाच्या ठीकाणी विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. वरीष्ठांचे काही केले तरी समाधान होणे शक्य नाही. आज जोडीदारास दिलेला शब्द पाळा.

कन्या : शुभ रंग: आकाशी, शुभ अंक : ४
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहीणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

तूळ : शुभ रंगः गुलाबी, शुभ अंक : ५
आळस झटकून कामाला लागाल पण अती उत्साहात काही चूकीचे निर्णय घ्याल. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका. आज हाती असलेला पैसा जपून वापरा.

वृश्चिक : शुभ रंगःमोतिया, शुभ अंक : ६
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्वांना मुरड घालावी लागेल. महत्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

धनु : शुभ रंगःजांभळा, शुभ अंक : ९
काहीजणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. आज एखादी महत्वाची वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

मकर : शुभ रंग: चंदेरी, शुभ अंक : ७
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदीही होईल. आज रात्रीच्या प्रवासात बेसावध राहू नका.

कुंभ : शुभ रंगःसोनेरी, शुभ अंक : २
दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहीक जिवनात काही जुन्या आठवणी मनास आनंद देतील.

मीन : शुभ रंग: पिस्ता, शुभ अंक : १
आज वैवाहीक जिवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. शब्द जपून वापरा. आज काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Latest News

मालगाडी रुळावरून घसरली ; मोठा अपघात टळला ; बल्लारशा रेल्वे स्टेशन येथील घटना  मालगाडी रुळावरून घसरली ; मोठा अपघात टळला ; बल्लारशा रेल्वे स्टेशन येथील घटना 
आधुनिक केसरी न्यूज  प्रेम गहलोत  बल्लारपूर : बल्लारपूर येथे अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यातून सिमेंट घेऊन जाणारी मालगाडी आज दुपारी १२.१५ वाजता...
"विद्यापीठ आपल्या गावात' : गोंडवाना विद्यापीठ देणार गावातच शिक्षण आणि पदवी
‘फेकूनामा’ , ‘चुनावी जुमलेबाजी’....भाजपाच्या जाहीरनाम्याचा नाना पटोले यांनी 'असा' घेतला समाचार 
Breaking News : विदर्भात पावसाचे उन्हाळी अधिवेशन सुरू 
जालना लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून कल्याण काळेंची उमेदवारी जाहीर,पैठणमध्ये फोडले फटाके...!
आनंदवन सकारात्मक ऊर्जेचे केंद्रबिंदू : सुधीर मुनगंटीवार   
नाना पटोले यांच्यावरील हल्ल्यामागे कोणाचा हात ?