काँग्रेसच्या 'गुहेत' काळापैसा? 

काँग्रेसच्या 'गुहेत' काळापैसा? 

आधुनिक केसरी न्यूज 


'अलिबाबा आणि चाळीस चोर' ही कथा ऐकत आलो आहोत! त्या गुहेत मौल्यवान हिरे,सोने दागिन्यांचा गुप्त खजीना पाहून आश्चर्यही वाटते! या कथेला साजेल अशी सत्य घटना भारतात झारखंड येथे घडली.काँग्रेसचे खा.धीरजप्रसाद साहू यांच्या गुहेत गुप्त खजीना आयकर विभागाला आढळून आला.यापूर्वी पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याकडे धाडीत नोटांचा ढीग सापडला होता.देशातील राजकीय नेते उद्योजक, धनदांडगे कर चुकवितात,तो पैसा,दागिने बँकेत ऐवजी घरात,गोदामात,  लपवून ठेवतात.मोदी सरकार त्यांचेवर धाडी टाकून हा काळापैसा बाहेर काढत आहे.तरीही विरोधी पक्ष मोदी सरकारला काळापैसा कोठे आहे? असा प्रश्न विचारत आहे,याचे आश्चर्य वाटते!
  महाराष्ट्रातील ज्षेष्ठ काँग्रेस व गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस काल,आज,उद्या हे पुस्तक लिहिले.त्यावेळी भाजपाने पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचा जोमाने प्रचार सुरु केला होता.त्यांनी त् पुस्तकात काँग्रेसबद्दल मत व्यक्त केले आहे.'काँग्रेस धर्मकारणात सर्वधर्मसमभाव, राजकारणात लोकशाही,अर्थकारणात सहकारी व समाजवाद,समाज- कारणात रचनात्मक सेवाकार्य, विश्वकारणात पंचशील व क्रांतिकारणात सत्याग्रह या तत्वाच्या आधारे समाज परिवर्तनाचे उद्दीष्ट होते.तसेच पक्षाची पूर्वीची ध्येयवादी,नि: स्वार्थ, सेवाभावी,अशी जी परंपरा होती,ती आता खंडित होऊ लागली आहे.'असा स्पष्ट म्हंटले.कांँग्रेसने या तत्वाला  तिलांजली दिली आहे.पक्षात गांधीवादी विचाराचे नेते राहिले नाहीत.मं गांधी विचारापेक्षा सद्याच्या गांधी परिवार व त्यांचे हित महत्वाचे वाटते. त्यामुळे पक्षाचा र्‍हास होत चाललेला आहे.या पक्षात भ्रष्टाचारी प्रवृत्ती वाढत चालली आहे.स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर  १९४८  पहिला जीप घोटाळा झाला.भारत सरकारने लंडनच्या कंपनीसोबत २ हजार जीपसाठी ८० लाख रू.चा करार केला.पण प्रत्यक्षात १५५ जीप प्राप्त आल्याच नाहीत.ब्रिटनचे तत्कालिन भारतीय उच्चायुक्त वी.के कृष्णमेननचा या घोटाळ्यात हात असल्याचे समोर आले.या घाटोळ्याची चौकशी १९५५ मध्ये बंद केली गेली.उलट तत्कालिन पंडित नेहरू यांनी मेनन यांचा मंत्रिमंडळात घेतले.या घोटाळ्यातील एक रुपयाही वसूल झालेला नाही.काँग्रेस सरकारने भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचा दर्जा दिला.या पक्षाने भ्रष्टाचाराला जन्म दिला.त्यानंतर१९५१ मध्ये सायकल घोटाळा झाला.तर मारोती घोटाळ्यात तर माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी संजय गांधी यांना परवाना देण्यास मदत केली होती.१९७६ तेल घोटाळ्यात भारताला १३ कोटीचा चूना लावले गेला.त्यानंतर १९८७ पानडूब्बी घोटाळा तर १९८७ बोफार्स ,१९९२ हर्षद मेहता शेअर्स,१९९२ मध्ये १३ हजार कोटी रूपये, लालू प्रसाद यांचा घाटोळा,तसेच काँग्रेस सरकारने टू.जी.व कोळसा खाण लिलाव भ्रष्टाचाराचे प्रकरण चांगले गाजले होते.२०१४ मध्ये काँग्रेस सरकार भ्रष्टाचाराच्या कारणावरुन गेले.तरी पक्षाला याची लाज वाटत नाही.पंतप्रधान मोदी यांनी सरकार 'ना खाऊंगा ना खाणे देऊंगा'.ज्यांनी प भ्रष्टाचाराच्या मार्गाने लोकांचा पैसा लुटला,त्यांना तो पैसा ना पैसा परत करावा लागेल,अशी ग्यारंटी मोदींनी दिली आहे.देशातील भ्रष्ट राजकीय नेत्यांवर ईडी व सी.बी.आय. व आयकर विभाग धाडी टाकत आहे.आतापर्यंत ईडीने २१ राजकीय पक्षाच्या १२२ नेत्यावर कारवाई केली.विरोधी पक्षावर कारवाई प्रमाण ९५ टक्के आहे.केवळ विरोधी पक्ष नेत्यांकडे नोटांचे भांडार कसे काय सापडत आहेत? ईडीने कारवाई केली त्यात! काँग्रेस पक्षाचे २४,तृणमूल काँग्रेस १९,राष्ट्रवादी काँग्रेस- ११, बसपा-४ आर जे.डी.- ५,डी.एम.के- ६ ,शिवसेना-४ सपा-५ व टी. डी. पी-५ ,आम आदमी-४ बी जे.डी- ६ व भाजपा ६ नेते आहेत.देशात ईडीने २०१४ ते२०१९ मध्ये ३३ हजार ८६२२० लाख संपत्ती जप्त केली आहे. २०१९ ते २०२३ पर्यत ६९ ०५४.८९ कोटी सपत्ती जप्त केली. यात उद्योजक नीरव मोदी,विजय माल्यांचा समावेश आहे.आयकर विभागाने बेनामी कर बुडव्यावर मोठ्या प्रमाणात कारवाया करत आहे. सी. बी. आय. ने भ्रष्टाचार्‍यांचा पर्दाफाश करत आहे.काँग्रेस सरकारने अशी कारवाई करण्याची हिंमत दाखवली का नाही? कारण 'कुंपण शेत खात असेल मग कारवाई तरी कोणावर करणार म्हणा! काँग्रेसचे सत्तर वर्षात दरोडे ७० टाकले.काँग्रेस पक्षाचे खा.धीरजप्रसाद साहू यांच्या गुहेत कोट्यवधी रुपये सापडतात,यावरुन सिध्द होते.'अरबी भाषेतील अलिबाबा आणि चाळीस चोर' लोककथा काँग्रेस पक्षाला शोभते!पक्षाच्या नेत्याच्या गुहेत कोट्यवधीचे छूपे धन सापडत आहे,हे नेते भ्रष्ट नाहीत काय? यांचेवर कारवाई केली जाऊ नये काय?जर देशातील घटनात्मक संस्था त्यांचेवर कारवाई असतील त्या विरोधात विरोधी पक्ष ओरड का करत आहे? 

IMG-20231223-WA0004(1)
देशात सामान्य माणसाच्या उत्पन्नाची मर्यादा सात लाख रुपये आहे. त्यापेक्षा अधिक वेतन असेल तर प्राध्यापक, शिक्षक,कर्मचार्‍यांना
 करप्रणालीनुसार आयकर भरावाच लागतो.आयकराचे विविध टप्पे आहेत.यात आयकर न भरणार्‍याला ३३ टक्यापासून दोनशे पट्ट दंड व कर आकारला जातो.मग राजकीय पक्षाचे नेत्यांना उत्पन्नाची मर्यादा नाही काय? अनेक राष्ट्रात नागरिकाला दरवर्षी स्वत: उत्पन्न व त्याचे स्त्रोत्र लेखी स्वरूपात देणे बंधनकारक आहे,पण भारतात तसा कायदा नाही.सर्वात अधिक भ्रष्टाचार राजकीय क्षेत्रात आहे.कांही नेते विकास कामात गैरकारभार करुन कोट्यवधी रुपये कमवितात.इतकेच नव्हे, गरीब योजनांचा पैसा लुटूतात,हा पैसा तो गुप्त ठिकाणी ठेवला जातो. २०१८ मध्ये प्रकाशित झालेला 'रेड' चित्रपट काँग्रेस नेत्यांच्या घरावर धाडीचा आहे.त्या नेत्याकडे प्रचंड पैसा सापडतो तो मोजण्यासाठी मोठा वजनकाटा आणला जातो.तो नेता आपल्या घरावरील धाड थांबवावी, यासाठी श्रीमती इंदिरा गांधीकडे जातो व हस्तक्षेप करावा, अशी विनंती करतो.झारखंड काँग्रेस खासदार साहू यांचे गुहेत साडे- ३५१ कोटीची रक्कम सापडली आहे.तेव्हा काँग्रेस पक्ष आमचा संबंध नाही,असे म्हणून हात झटकत आहे.वास्तविक भ्रष्ट साहू नेता काँग्रेसची राजकीय देण आहे.पण म.गांधी विचाराच्या पक्षाने या दारू व्यवसाय करणार्‍या या साहूला तीन वेळेस राज्यसभेवर घेतले गेले?.साहू हे झारखंड राज्यातील लोहरगावचे आहेत.त्यांचा केवळ दारूचा अनेक वर्षापासून व्यवसाय आहे.त्यांची यातून महिन्याला शंभर कोटीची कमाई आहे.या गावात महात्मा गांधी रस्त्याच्या बाजूला दारूची भट्टी आहे,त्या  रस्त्याला 'भट्टी गल्ली' असे म्हंटले जाते.यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे.त्याचा तेथे पांढरा अलिशान ( व्हाईट हाऊस) बंगला आहे.पण ते राहत नाहीत. त्यांचे कुटुंब ऐष करण्यासाठी येथे जात असतो या नेत्याने गावात तलाव,मंदिर स्टेडीयम,उभारले आहेत.तो समाजसेवक म्हणून वावरतो. दरोडेखोरांने रात्री दरोडे टाकायचे आणि दिवसा पुण्य व दानधर्म म्हणून गरिबाला मदत करत!असेल तर त्याला समाजसेवक म्हणायचे काय?याच प्रवृत्तीने काँग्रेसने देशाला लुटलेले आहे.या साहूने काँग्रेसला व नेत्यांना किती पैसा दिला? याची चौकशी केली पाहिजे. गांधी यांच्या 'भारत जोडो'चा खर्च साहू यांनी केल्याची माहीती आहे.साहू बेशरमपणे खुलासा करत आहेत!हा माझा दारूच्या कमाईचा पैसा आहे.त्याचा माझ्याकडे हिशोब आहे,मग त्यांनी हा पैसा बँकेत का ठेवला नाही तो लपवून का ठेवला? काँग्रेसने त्यांना भ्रष्ट नेत्याला पक्षातून काढले नाही. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस व सत्य घटना अनेक आहेत.पश्चिम बंगाल मध्ये२०१८ तत्कालीन शिक्षणमंत्री यांचे अर्पिता मुखर्जीकडे नोंटांचा ढीग सापडला.आम आदमी पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचारात जेलमध्ये आहेत.लालूप्रसादने नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी चालू आहे.उत्तर प्रदेशच्या धाडीत बाराशे कोटी रुपायांचा काळापैसा तर राजस्थानमध्ये एका छाप्यात तीनशे कोटीच्यावर पैसा सापडला.वीजचे वस्तु तयार करणार्‍या कंपनीकडे बेहिशोबी मालमत्ता आढळली.२०२१ मध्ये २१-३२ लाख करदात्यांना ४५ हजार ८९६ कोटी रुपये परतावा रक्कम देण्यात आली आहे.तरी आयकर भरणार्‍यांची संख्या कमी आहे.महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रसने नेत्यांनी सहकार क्षेत्र लुटून खाल्ले!सहकार संस्था,साखर कारखाने,सहकारी बँका भडार्‍याचा प्रसाद म्हणून सर्वांनी खाल्ला. नागपूर सहकारी बँकेतील दीडशे कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेस नेत्याला दोषी ठरविले आहे.आज भ्रष्टाचारात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
नांदेड शहराच्या परिसरात डाॅक्टर व व्यापारी व राजकीय नेत्यांनी जमीनी घेतल्या आहेत,या जमिनीत लाखो रुपायांचे उत्पन्न झाल्याचे दाखविले जाते.म्हणजे,ही मंडळी काळापैसा पांढरा करतात! अनेक सिमेंट लोखंड, व्यापारी पावत्या  देत नाहीत.ते उद्योजक, व्यापारी, डाॅक्टर वार्षिक उलाढाल कमी दाखवितात.अनेक व्यापारी चेक, डी.डी. ऑनलाईन पैसे  घेत नाहीत.ते "रोकडा' म्हणजे नगदी पैसे मागतात.
'इंडी' आघाडीतील प्रत्येक पक्ष घराणेशाही व भ्रष्टाचारात गुंतलेला आहे. काँग्रेसचा इतिहास पहाता,श्रीमती इंदिरा गांधी यांना तर निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंब केला प्रकरणात त्यांची निवड रद्द केली गेली.त् सद्याचे गांधी परिवार भ्रष्टाचार प्रकरणात जामीनावर आहे.नुकतेच,या गांधी परिवाराची नॅशनल हेराल्ड प्रकरणात ७५२ कोटीची संपत्ती जप्त केली गेली.मोदी सरकारने नोटांची छपाई  बंद करून डिझिटल पध्दतीने आर्थिक व्यवहार करण्याचे बंधन घालावे.किमान वेतना इतकी रक्कम व्यवहारास परवानगी द्यावी,असे केले तरच नोटांची साठवण करणे बंद होईल.यातून देशातअर्थिक क्रांती होईल.
                    कमलाकर जोशी,ज्येष्ठ पत्रकार नांदेड,

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Latest News

मालगाडी रुळावरून घसरली ; मोठा अपघात टळला ; बल्लारशा रेल्वे स्टेशन येथील घटना  मालगाडी रुळावरून घसरली ; मोठा अपघात टळला ; बल्लारशा रेल्वे स्टेशन येथील घटना 
आधुनिक केसरी न्यूज  प्रेम गहलोत  बल्लारपूर : बल्लारपूर येथे अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यातून सिमेंट घेऊन जाणारी मालगाडी आज दुपारी १२.१५ वाजता...
"विद्यापीठ आपल्या गावात' : गोंडवाना विद्यापीठ देणार गावातच शिक्षण आणि पदवी
‘फेकूनामा’ , ‘चुनावी जुमलेबाजी’....भाजपाच्या जाहीरनाम्याचा नाना पटोले यांनी 'असा' घेतला समाचार 
Breaking News : विदर्भात पावसाचे उन्हाळी अधिवेशन सुरू 
जालना लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून कल्याण काळेंची उमेदवारी जाहीर,पैठणमध्ये फोडले फटाके...!
आनंदवन सकारात्मक ऊर्जेचे केंद्रबिंदू : सुधीर मुनगंटीवार   
नाना पटोले यांच्यावरील हल्ल्यामागे कोणाचा हात ?