पॅकींग अन्नधान्यावर छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मारक ! धुळे व्यापारी महासंघाची निदर्शने
आधुनिक केसरी न्यूज
धुळे : पॅकींग अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटी आकारणी केली जाणार असून केंद्राचा हा निर्णय छोटया व्यापाऱ्यांना मारक ठरणार आहे, त्यामुळे हा जीएसटी रद्द करावा,अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात धुळे व्यापारी महासंघाने म्हटले आहे की, सतत वाढत असलेल्या महागाईच्या वाढत्या आलेखात आता अजून भर पडणार आहे . सर्वसाधारण नागरीकांच्या दैनंदिन वापराच्या धान्यावर केंद्र शासन आता ५ टक्के जीएसटीची आकारणी करणार आहे , असे नुकतेच जाहीर झाले आहे . पूर्वी ब्रॅण्डेड पॅकींगच्या अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटीची आकारणी केली जात होती . पण आता सर्वच पॅकींगच्या अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटीची आकारणी केली जाणार आहे केंद्राचा हा निर्णय छोटया व्यापाऱ्यांना मारक ठरणार आहे . व्यापारी वर्गाला अजून नवीन कराचा भार सहन करावा लागणार आहे . यासाठी नव्याने कर सल्लागार , अकाउंटंट व संगणकाचा खर्च वाढणार आहे . त्याबरोबरच सर्वसामान्य नागरीकांनाही ज्यादा पैसे मोजावे लागणार आहे यावाढीव करामुळे सामान्यांचे बजेट चुकणार आहे . अन्नवस्त्र निवारा या मुलभुत गरजांना किमान व्यापारी वर्गाच्यावतीने महासंघाचे करकक्षातून दुर ठेवावे अशी मागणी अध्यक्ष नितीन बंग , अजय बरडीया , अनिल रुणवाल , झुल्फीखार अब्बास बोहरी , नंदु सोनार यांनी केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List