चंद्रपूर मनपा महापौर निवडणूक गुंडगिरीच्या दिशेने 

समृद्धी महामार्गावर नगरसेवकांना अडवत शिवीगाळ व धमक्या, राजेश अडूर व इतरांची वर्धा पोलीस स्टेशनला तक्रार.

चंद्रपूर मनपा महापौर निवडणूक गुंडगिरीच्या दिशेने 

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : महानगरपालिका महापौर निवडणुकी ची तारीख जाहीर झाली असून महापौर पदाची निवडणूक येत्या 10 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. परंतु चंद्रपूर महापौर पदाच्या निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट आला असून चंद्रपूर मनपा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढलेले व पराभूत झालेले सौरभ ठोंबरे यांनी काँग्रेसचेच नुकतेच निवडून आलेले नगरसेवक राजेश अडूर यांच्यासह असलेल्या काही नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ व धमकी दिल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. 

निवडणुकीनंतर निवडणुकीचा क्षीण घालविण्यासाठी राजेश अडूर हे आपल्या पत्नीसह इतर काही नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांच्या सोबत फिरायला गेले होते. पुण्यावरून चंद्रपूरला परत येत असताना समृद्धी महामार्गावर चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी काँग्रेस कडून उभे असलेले परंतु पराभूत झालेले सौरभ ठोंबरे यांनी याच निवडणुकीत काँग्रेस कडून निवडून आलेल्या राजेश अडूर व इतर नगरसेवक ज्या खाजगी बस ने चंद्रपूरला परत येत होते ती बस अडवून त्यातील वडेट्टीवार गटाच्या नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांना आमच्या सोबत चला म्हणून समृद्धी महामार्गावर चांगलाच राडा घातला. यावेळी नगरसेवकांसह सगळ्यांनीच चांगला आरडाओरड करत त्यांना चोप देण्याचा प्रयत्न केला असता सौरभ ठोंबरे व त्यांच्या सह आलेले इतर काही आपआपल्या गाड्यांमध्ये बसून पळून गेले. या संपूर्ण प्रकरणाची वर्धा पोलीस स्टेशनला
 रीतसर  पोलीस तक्रार करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

चंद्रपूर निवडणूक जाहीर होताच वडेट्टीवार व धानोरकर गटामध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असून याच वर्चस्वाच्या लढाईमध्ये आता थेट गुंडगिरी स्टाईलने नगरसेवकांच्या पळवापळवी चे प्रकार सुरू झाल्याने चंद्रपूर महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच गुंडगिरी प्रवृत्तीचा प्रवेश झाल्याचे दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे चंद्रपूर सह महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली असून या प्रकारामुळे आता चंद्रपूर महापौर पदाची निवडणूक कोणते वळण घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर मनपा महापौर निवडणूक गुंडगिरीच्या दिशेने  चंद्रपूर मनपा महापौर निवडणूक गुंडगिरीच्या दिशेने 
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : महानगरपालिका महापौर निवडणुकी ची तारीख जाहीर झाली असून महापौर पदाची निवडणूक येत्या 10 फेब्रुवारी 2026...
जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके
अजित पवार यांचे विमान उडवणारे कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचेही दुःखद निधन 
महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद 
जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना
संवेदनशील नेतृत्वाचा अस्त : आ.किशोर जोरगेवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन