मराठा व ओबीसी आरक्षणावर नाना पटोलेंचे मोठे भाष्य ... स्वतःचे पाप लपवण्यासाठी....

मराठा व ओबीसी आरक्षणावर नाना पटोलेंचे मोठे भाष्य ... स्वतःचे पाप लपवण्यासाठी....

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे, त्यांची इच्छाशक्ती असती तर त्यांनी आरक्षण दिले असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर मराठा आरक्षण प्रश्नावर गुलाल उधळला तो कशासाठी, असा सवाल उपस्थित करून सरकारचा एक मंत्री ओबीसी आंदोलनात जाऊन जाहीरपणे विरोधी भूमिका घेतो. सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावर एकमत नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

आरक्षण प्रश्नावर विधिमंडळ परिसरात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षाचे नेते गेले नाहीत म्हणून आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत. याआधीही आरक्षणप्रश्नावर सर्वपक्षीय बैठक झालेली आहे, सरकारला फक्त निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा. वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते म्हणून जरांगे पाटील व ओबीसी आंदोलकांना भेटले व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले त्यात चुकीचे काय, विरोधी पक्ष नेत्याचे कर्तव्य त्यांनी पार पाडले. सरकारमध्ये आरक्षण प्रश्नावर एकमत आहे का त्याचे उत्तर सरकारने द्यावे. स्वतःचे पाप लपवण्यासाठी सरकार राजकारण करत आहे, असेही पटोले म्हणाले.

सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत असताना सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार कसा?
कृषी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. महाराष्ट्र कृषी क्षेत्रात पिछाडीवर आहे हे परवाच जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातही स्पष्ट सांगितले आहे मग महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार कशाच्या आधारावर दिला आहे. केंद्रातील भाजपा सरकारने या पुरस्कारासाठीचे निकष बदलले आहेत का, असा सवाल विचारून ज्या राज्यात जास्त शेतकरी आत्महत्या त्या राज्याला कृषी पुरस्कार दिला असावा, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता येणार, महापौर काँग्रेसचा होणार,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता येणार, महापौर काँग्रेसचा होणार,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
आधुनिक केसरी न्यूज नागपूर : दि.२० चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठीचे आवश्यक संख्याबळ जमवल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय...
अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार
बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन