नीटच्या परीक्षांमधील गोंधळावरून जयंत पाटलांंनी थेट मोदींना लगावला 'हा' टोला....सत्तेवर येताच क्रांतिकारी

नीटच्या परीक्षांमधील गोंधळावरून जयंत पाटलांंनी थेट मोदींना लगावला 'हा' टोला....सत्तेवर येताच क्रांतिकारी

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : देशभरात नीट परीक्षांवरून जबरदस्त गोंधळ सुरू असून या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी घडत आहेत. याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा घेरले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 

आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही आहेत. 

पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे अशी गंभीर आरोप त्यांनी केला. 

अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? असा सवाल उपस्थित करत असताना प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी, मात्र केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत असे त्यांनी सांगितले. 

या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल असा इशाराही शेवटी त्यांनी दिला.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या धक्कादायक अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत केली युवकाची हत्या
आधुनिक केसरी न्यूज  राजुरा : दि,२३/७/२०२४ नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील  राजुरा तालुक्यातील पंचायत समिती जवळ असलेल्या बॅक ऑफ...
22 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये बंद ; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
लोंबकळलेल्या विजतारांनी घेतला शेतकऱ्याचा जीव.; दोंदवाडे येथील दुर्घटना
जन्मदात्या वडिलांना नराधम मुलाने जिवंत जाळले ;बाळापूर येथील धक्कादायक घटना...
गुरूविना कोण दाखवील वाट..!
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर
लाचखोर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली पाच हजाराची लाच...