धक्कादायक !मराठवाड्यात महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही ; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घणाघाती टीका

धक्कादायक !मराठवाड्यात महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई :- मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागात ४ सभा घेतल्या. तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं बारीक लक्ष होतं. मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली जाते. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा कमी करण्यासाठी का मागे पडलात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही म्हणून काळजी वाटते. महाराष्ट्रात एकही आत्महत्या घडू देणार नाही असा शब्द देऊन, शब्द पूर्ण न करणारे निवडणुकीच्या काळात दिलेले शब्द पूर्ण करतील याची काय गॅरंटी? असा टोला त्यांनी लगावला आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गोंदियात वेश्याव्यवसाय चालविणा-या दोघांना अटक..! गोंदियात वेश्याव्यवसाय चालविणा-या दोघांना अटक..!
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक...
अनुदान घोटाळ्यातील भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करुन फौजदारी गुन्हे दाखल करा
खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
रागाच्या भरात  पोटात खूपसला खंजीर; पोलीसांनी केला गुन्हा दाखल
अंगणवाडी भरती प्रकरणी आ.हिकमत उढाण यांची लक्षवेधी;सीडीपीओ तात्काळ निलंबित 
IMA, महाराष्ट्र राज्य च्या10 जुलै 2025 च्या संपाबाबत तातडीचा निर्णय
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी जन सुरक्षा विधेयक महत्वाचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस