पोलीस - नक्षल चकमकित तीन नक्षल्यांचा खात्मा 

पोलीस - नक्षल चकमकित तीन नक्षल्यांचा खात्मा 

 आधुनिक केसरी न्यूज 

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परीसरात झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात सध्या सुरू असलेल्या TCOC कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती १३ मे रोजी सकाळी पोलिस विभागाला मिळाली.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या दोन तुकड्या तातडीने परीसरात शोधासाठी दाखल करण्यात आल्या. पथके परीसरात शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षल्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर १ पुरुष आणि २ महिला नक्षलवाद्याचे मृतदेह आढळले आहेत. गोळीबाराच्या ठिकाणाहून तीन १ एके ४७, १ कार्बाइन आणि १ इन्सास रायफल, अशी तीन स्वयंचलित शस्त्रे तसेच नक्षल साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

यातील एका मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह पेरिमिली दलमचा प्रभारी आणि डीव्हीसीएम कमांडर वासू याचा असल्याचे पोलिस विभागाने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात
आधुनिक केसरी न्यूज  वैजापूर : नवीन वीज जोडणी देण्यासाठी शेतकऱ्याकडून ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमनविरुद्ध लाचलुचपत...
कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मामा-भाचीचा जागीच दुर्दैवी मृत्यू!
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मध्यरात्रीपासून उपचार सुरू
गोंदिया - बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू, 7 गंभीर
कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ करा : न्यायमूर्ती संदीप शिंदे
पळसवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; शेळीवर हल्ला करून ठार
श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाख रुपयांची मदत