संभाजीनगरकर शिवसेनाप्रमुखांचा बालेकिल्ला अभेद्य ठेवतील !

शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांचा विश्वास ; लोकसभा निवडणुकीसंदर्भात शिवसैनिक - युवासैनिकांकडून घेतला आढावा

संभाजीनगरकर शिवसेनाप्रमुखांचा बालेकिल्ला अभेद्य ठेवतील !

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबई ठाण्यानंतर आवडतं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. त्यांनी भरभरून या शहरावर प्रेम केलं अन त्याबदल्यात येथील नागरिकांनी त्यांना लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकीत पाठबळ दिलं. मागील काही चुका विसरून आता छत्रपती संभाजीनगरकर शिवसेनाप्रमुखांचा बालेकिल्ला अभेद्य ठेवतील, असा विश्वास शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ ते दोन दिवस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मध्यवर्ती प्रचार कार्यालयात लोकसभा निवडणुकीसंदर्भात शिवसैनिक - युवासैनिकांकडून आढावा घेतला.
यावेळी अनेक संस्था संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. त्यांचा सत्कार वरुण सरदेसाई यांच्याहस्ते करण्यात आला. युवासैनिक हे खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत असून, मिळेल ती जबाबदारी पार पाडतील असे ते म्हणाले.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, शिवसैनिक आणि पदाधिकारी यांना निवडणुका नवीन नाही. बुथ, मतदानप्रक्रिया, राजकीय गणिते यामध्ये शिवसैनिक तरबेज आहेत. त्यामुळे आमची तयारी निवडणूक घोषित झाली की, तेव्हाच होत असते. ३०-३० ते ४०-४० वर्ष निवडणूका पाहिलेले लोक आमच्याकडे आहेत, त्यामुळे आता सर्वांनी आपआपले प्रभाग आणि गावे सांभाळावी. जास्तीत जास्त मतदान महाविकास आघाडीला कसेहोईल यासाठी प्रयत्न करावे असे दानवे म्हणाले.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सरदेसाई यांचे स्वागत करून वैजापूर तालुक्यातील प्रचार सभेला रवाना झाले. तसेच ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जनतेच्या विश्वासावर आपण निवडणूक जिंकू असे खैरे म्हणाले.
कार्यक्रमास शिवसेना मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, राज्य संघटक चेतन कांबळे, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे,  जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, महानगप्रमुख राजू वैद्य, वैजयंती खैरे, जिल्हा संघटक डॉ. शोएब हाश्मी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, अक्षय खेडकर, दिग्विजय शेरखाने, शहर संघटक सचिन तायडे, युवासेनेचे ऋषिकेश खैरे, धर्मराज दानवे,  विस्तारक बाळा लोकरे, विनायक चोथे, हनुमान शिंदे, मॅचिंद्र देवकर, बंटी सुरे, अजय चोपडे, योगेश पवार, रामराजे देशमुख, स्वप्नील डीडोरे, सागर खरगे, रामेश्वर कोरडे,  उपजिल्हाप्रमुख सुदर्शन अग्रवाल, दत्ता गोर्डे, अशोक शिंदे, चंद्रकांत गवई, शिवा लुंगारे, अनिल पोलकर, गिरिजाराम हलनोर, किशोर कच्छवाह, संतोष जेजुरकर, चंद्रकांत गवई, मारुती साळवे, बजरंग जाधव, अनिल जैस्वाल, सूर्यकांत जायभाये, विजय वाघमारे, रवी गायकवाड, वहाब हुसेन, विठ्ठल बदर,चंद्रकांत इंगळे पाटील, हरिभाऊ हिवाळे पाटील, नितीन झरे, मकरंद कुलकर्णी, संदेश कवडे, कृष्णा मेटे, समाधान बनकर, विशाल सानप, समीर कुरेशी, सोनू आहिले, नितीन पवार, अनिल लहाने, अफसर कुरेशी, संतोष खेडकें, योगेश शर्मा, नरेश मगर, सुरेश पवार, सुभाष शेजवळ, संजय पेहरकर, तुळशीराम बकले, बन्सी जाधव, संजय हरणे, मनोज मेठी, वसंत शर्मा, शेख राब्बानी, सुगंधकुमार गडवे, बंटी जैस्वाल, विनायक देशमुख, मंगेश भाले, विठ्ठल डमाले, लक्ष्मण बतडे, 
प्रमोद ठेंगडे, कान्हूलाल चक्रंनारायण, विभागप्रमुख बळीराम देशमाने, शाखाप्रमुख विकास लूटे, बापू कवळे, कमलाकर जगताप, हुसेन चारनिया, आकाश जैन, मोहित श्रीवास्तव, सागर खत्री, प्रतीक सालपे, वेद लोहिया, अक्षय चव्हाण, साहिल लहाने, मधुर चव्हाण, साई थोरवे, प्रतीक निनाळे, अमित लहाने, आकाश दानवे, शेख हनिफ, विकास सोळंके, अशोक खरात, दत्ता कणसे, प्रशांत कुर्हे, किरण लखनानी, हेमंत दांडगे, चेतन सिंगरे, सागर राऊत, प्रकाश धुर्वे, अतुल बिडकर, सोनू रंगमळी, संदीप तांबे, सुदीप तांबे, ऋषिकेश तोरणमळ,आदित्य दहिवाळ, अस्तिव देवतवाल, राम फुलंब्रीकर, किरण पडागळे, असफाक कुरेशी, नागेश थोरात, अक्षय दांडगे, नितेश वहाटूळे, देवीदास पवार, संतोष खोंडकर, सदाभाऊ वाघमारे, दिलीप तांगडे, सतीश शेगावकर, फरदिन खान, सोहब खान, नईम खान, कौतीक राठोड, 
राजू निकाळजे, वैजीनाथ मस्के, संजय जाटवे, संतोष जाटवे, किरण गणोरे, योगेश शिरसाठ, सुभाष आठवले, समाधान पाटील, बाबासाहेब आगळे पाटील, विशाल गायके,
युवती सेनेच्या सानिका देवराज, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, सुनीता देव, कला ओझा, प्रतिभा जगताप, सुनंदा खरात, अंजली मांडवकर, विद्या अग्निहोत्री, सुनीता सोनवणे, आशा दातार, भागूबाई शिरसाठ, जयश्री लुंगारे, नलिनी बाहेती, नलिनी महाजन, सीमा खरात, सीमा चक्रनारायण, मीरा देशपांडे, रुख्मिणी पवार, ज्योती पिंजरकर, राज्यश्री राणा, जयश्री पोफळे, रेणुका जोशी, सुचिता आंबेकर, रोहिणी काळे, संध्या कोल्हे, संगीता पवार, कविता सुरळे, वंदना कुलकर्णी, प्रतिभा राजपूत, प्रेमलता चंदन, अनिता खोंडकर, सुनीता औताडे, सविता निघूळे, कविता मठपती, सुषमा यादगिरे, पद्मा तुपे, रेखा फलके, सुनीता पाटील, देवयानी सिमंत, सुनीता पवार, नुसरत जहा, सीमा गवळी, शोभा बडे, अरुणा भाटी, अरुणा चव्हाण, शोभा साबळे, सरला औटी, मीना थोरवे, सुनीता कांबळे, पुष्पा नलावडे, अंजना गवई, सारिका शर्मा, नंदा शिंदे, सलमा बेगम, विजया त्रिभुवन, विजया पावर, रंजना कोलते, सविता इंगळे, मंगला बडगुजर आदींसह शिवसैनिक, युवसैनिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष..! देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष..!
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. याचे थेट प्रक्षेपण गांधी चौकातील...
सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना मसापचा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात  भूकंपाचे धक्के..!
Braking News : बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव...
आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.
लाडक्या बहीनीसह दाजीला बॅक खात्यात कधी पैसे पडणार याची चिंता 
शरद पवारांचा गंभीर आरोप....शेवटच्या तासात वाढलेली मतदानाची टक्केवारी धक्कादायक