मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भाजपचे दडपण

ते करू शकले नाहीत स्वतःच्या मुलाच्या नावाची घोषणा : महेश तपासे

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भाजपचे दडपण

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी भाजप नेते व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केली. यावरूनच दिसून येते की एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचा किती दबाव आहेत. स्वतःच्या मुलाची आणि स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराची मुख्यमंत्री शिंदे घोषणा करू शकले नाही किंबहुना भारतीय जनता पार्टीने त्यांना तसा अधिकार दिला नाही अशा शब्दात महेश तपासे मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) यांनी फडणवीस व शिंदे यांच्यावर टीका केली.

महेश तपासे म्हणाले की, भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र आता शिंदे शिवसेना गटाचे स्थानिक सर्व पदाधिकारी कपिल पाटील यांना विरोध करीत आहेत व त्यामुळे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांत महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे व पराभवाचे लक्षण दिसत आहेत असे महेश तपासे म्हणाले.

संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर ते आता शिंदे सेनेचे स्वयंघोषित प्रवक्ते झाले आहेत. काही कर्तुत्व शून्य नेत्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य आहे असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी घोषित होताच काही उमेदवारांवर शासकीय यंत्रणांची कारवाई सुरू झाली व हे सर्व राजकारणापोटी आहे असा हल्लाबोल तपासे यांनी केला.

राष्ट्रवादीचे भिवंडीचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांचे नाव घोषित होताच त्यांच्या व्यवसायाचे ठिकाण तालेबंद करण्याकरिता एमएमआरडीए चे पथक पोचले. योगायोगाने श्री बाळ्या मामा म्हात्रे यांच्याकडे उच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्यामुळे शिंदे सरकार म्हात्रेंच गोदाम ताळेबंद करू शकली नाही अशी माहिती तपासे यांनी दिली.

 भारतीय जनता पार्टी व त्याचे सहकारी मित्र पक्ष शासकीय बळाच्या जोरावर आमच्या उमेदवारांना मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत व त्यांचे सर्व प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा इशारा महेश तपासे यांनी दिला. भाजपला संविधान आणि लोकशाही मान्य नाही हेच या कृतीतून दिसून येत आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव मतदारसंघातील उमेदवार श्रीमती अर्चना पाटील यांनी पक्ष वाढीचे कार्य न करण्याचं घोषणा करून  अजित पवारांना घरचा आहेर दिला आहे. उमेदवाराला स्वतःच्या पक्षाच्या नेत्यापेक्षा प्रधानमंत्री मोदी मोठे वाटतात  यातूनच भारतीय जनता पार्टी श्री अजित पवारांची किती किंमत करते हे आता स्पष्ट झाले असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

देवाभाऊ" साठी ठाण्यात शिवप्रतिमेचा अवमान ! काँग्रेसने पोलखोल करीत केली कडक कारवाईची मागणी देवाभाऊ" साठी ठाण्यात शिवप्रतिमेचा अवमान ! काँग्रेसने पोलखोल करीत केली कडक कारवाईची मागणी
आधुनिक केसरी न्यूज ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रासोबत ‘देवाभाऊ’ असा उल्लेख आणि शिवमुद्रा...
किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
मीच तुमचा लाडका भाऊ म्हणत पैठणमधे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले बहीणीला  लखपती करण्याचे अश्वासन 
गाडगे बाबा चौकात फिल्मी स्टाईल दरोडा ; चाकूचा धाक,२० लाखांचा ऐवज लंपास
गडचिरोली जिल्ह्यात चार नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती
घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती
न.प निवडणूकीत आता २० डिसेंबर रोजी मतदान नि.आयोगाच्या आदेशानंतर निवडणूक प्रचाराला विश्रांती