नाशिक जिल्हा मविप्र माजी विद्यार्थ्यांकडून "जिजामाता नर्सिंग शिष्यवृत्ती "

नाशिक जिल्हा मविप्र माजी विद्यार्थ्यांकडून

आधुनिक केसरी न्यूज 
 बाजीराव सोनवणे 
नाशिक  : मराठा विद्या प्रसारक समाज माजी विद्यार्थ्यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या मविप्र माजी विद्यार्थी संघटनेने 'जिजामाता नर्सिंग शिष्यवृत्ती' जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात १५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु १०,००० देण्यात येणार आहेत. याच शिष्यवृत्तीचे प्रमाणपत्र वितरण सोहळा मराठा विद्या प्रसारक समाजाचे नर्सिंग विद्यालयात पार पडला.  

यावेळी मविप्रचे सरचिटणीस अँड. नितीनजी ठाकरे सर, मविप्र माजी विद्यार्थी संघटनेचे संचालक विवेकजी भामरे, मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, वैद्यकीय महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे डॉ रायते, शिक्षण अधिकारी डॉ ज्ञानेश्वरजी लोखंडे, मविप्र नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या पौर्णिमा नाईक व इतर मान्यवर उपस्थित  होते. 

जिजामाता नर्सिंग शिष्यवृत्ती मविप्र माजी विद्यार्थी संघटनेतर्फे देण्यात येत आहे. आर्थिक स्थिती, शैक्षणिक निकष व मुलाखत ह्या आधारावर ह्या मुला-मुलींची निवड करण्यात येते. नर्सिंग हा वैद्यकीय सेवांचा आत्मा आहे. येत्या काळात ह्या व्यवसायाला मागणी वाढत जाणार आहे. रोजगाराच्या संधी इतरत्र कमी होत असल्या तरी ह्या क्षेत्रात मात्र त्या वाढतच आहे. त्यामुळे अधिकाधिक गुणवत्ताधारक मुला-मुलींना नर्सिगकडे आकर्षित करणे हा जिजामाता शिष्यवृत्तीचा हेतू
आहे. पहिल्या टप्प्यात पंधरा विद्यार्थ्यांना रू. १०,००० प्रदान करण्यात येत आहेत. काहींना ही मदत वाढवून रू. २०,००० करण्यात येणार आहे. 

माजी विद्यार्थी संघटनेच्या योजनांनविषयी माहिती देतांना संस्थेचे संचालक विवेकजी भामरे यांनी सांगितले कि, "सध्या बारावी सायन्समध्ये अभ्यास करणाऱ्या मुला-मुलींनाही पुढे नर्सिंगच्या अभ्यासासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. पुढे इतरही अनेक विशिष्ट क्षेत्रात टप्प्याटप्प्याने गरजू विद्यार्थांना मदत करण्याचा संघटनेचा हेतू आहे. ह्यात क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य दाखवणाऱ्या मुला-मुलींनाही मदत होईल. त्याच बरोबर जगभरातील माजी विद्यार्थ्याना एकत्र करून प्रोफेशनल चॅप्टर्स, मेंटॉरशिप प्रोग्राम सुरु करण्यात येणार आहे." यावेळी त्यांनी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी  MVPalumni.com या संकेत स्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे व या चळवळीला बळ देण्यासाठी हातभार लावण्यास सांगितले आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मदनवाडी येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली युवक ठार मदनवाडी येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली युवक ठार
आधुनिक केसरी न्यूज  निलेश मोरे भिगवण : दि.५ ऊस हंगाम सुरू होताच ऊस वाहतुकीमुळे पहिला बळी गेल्याची दुर्दैवी घटना इंदापूर...
निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?, आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला : हर्षवर्धन सपकाळ
हदगाव येथील दत्तबर्डी येथे श्री दत्तप्रभू मुर्तीचा जीर्णोध्दार सोहळा!
कार्तिक एकादशी...श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा, १ लाखांहूनअधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन
गोवंशाची अनधिकृत कत्तल करणाऱ्यांवर बदनापूर पोलिसांची मोठी कारवाई
मराठी भाषा जपणं हे आपले धर्म कर्तव्य आहे : पानिपतकार विश्वास पाटील
खुंदलापूर परिसरात आढळला वाघोबाचा अधिवास; चांदोली मध्ये वाघोबाची डरकाळी