राजमाता जिजाऊ सामजिक फाऊंडेशन व डोणगांव अर्बनच्या संयुक्त विद्यमानाने शिबीर संपन्न
आधुनिक केसरी न्यूज
ज़ैनुल आबेद्दीन
मेहकर : राजमाता जिजाऊ सामाजिक फाउंडेशन व डोणगाव अर्बन परिवाराच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेसाठी ५ टेबल लावत मोफत निशुल्क मार्गदर्शन व योजनेबाबतचे संपूर्ण अर्ज भरणे व मार्गदर्शन करणे व लाभार्थ्यांना सदर योजनेसाठी मोफत अर्ज व त्याची संपुर्ण प्रक्रिया करून देण्यासाठी आज निशुल्क शिबिर घाटबोरी येथे आयोजित केले होते. सामाजिक जाणीव म्हणून राजमाता जिजाऊ सामाजिक फाउंडेशन व डोणगाव अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी कार्यक्रमाला डोणगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण हे अध्यक्ष म्हणुन लाभले होते व प्रमुख उपस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्री ज्ञानेश्वर टाले तसेच घाटबोरी येथिल सरपंच राजूभाऊ पाखरे ,रामेश्वर खोडके,बाळु डोंगरे,सचिन जाधव,अंकुश राठोड,राजू कुसळकर ,ज्ञानेश्वर दांडदे , शंकर गिरी ,भास्कर पाटील चोपडे,संदीप बोंदार्डे ,गावामधिल काही नवयुकांनी,स्वयसेवक यांनी सर्व पाञ महिला भगिनींनी या योजनेचा लाभ मिळावा म्हणुन पुढाकार घेतला व सहकार्य केले.सदर योजनेतुन लाभ घेण्यासाठी संपूर्णपणे निशुल्क व मोफत सहकार्य करण्यासाठी घाटबोरी जि.प.शाळा या ठिकाणी राजमाता जिजाऊ फाउंडेशन आणि डोणगांव अर्बन च्या वतीने संपुर्ण सहकार्य करण्यात आले. घाटबोरी येथिल परिसरातील शेकडो महिला भगिनींनी या निशुल्क शिबीराचा लाभ घेतला.महिलांनी हे अजुन चार दिवस चालु ठेवावे असी विनंती केली.त्यामुळे शेवटच्या सर्व पाञ महिला भगिनीचा अर्ज भरुन घेईपर्यत हे शिबीर चालु ठेऊ असा शब्द ऋषांक चव्हाण यांनी दिला.
Comment List