खुशखबर....१६२७३ दुध उत्पादकांचे २ कोटी ८६ लाख रुपयांचे अनुदान बॅंक खात्यात जमा
उर्वरीत अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरु
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : सहकारी व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दि.५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये इतके अनुदान ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीसाठी देण्यात येणार होते. त्यासाठी पात्र १७९६९ दुध उत्पादक शेतकऱ्यांपैकी १६२७३ शेतकऱ्यांचे ५९ लाख २० हजार ७१५ लिटर दुधाचे २कोटी ८६ लक्स्ह ७८ हजार ६८० रुपये इतके अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहे, उर्वरीत शेतकऱ्यांचे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे,अशी माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ मोरे यांनी दिली आहे.
राज्यातील सहकारी व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये इतके अनुदान देण्याबाबत शासन निर्णय दि.५ जानेवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला होता. ही योजना दि.११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधी पुरतीच होती. नंतर दि.२६ फेब्रुवारीच्या पत्रान्वये ही मुदत ११ फेब्रुवारी ते १० मार्च २०२४ पर्यंत वाढविण्यात आली. यासाठी दि.१ जून या कालावधीपर्यंत जिल्हा दुग्धव्यवसाय विकास कार्यालय व प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयाने अनुदान योजनेत सहभागी १२ प्रकल्पाअंतर्गत १७ हजार ९६९ लाभार्थ्यांचे ६८ लाख ८५ हजार ४१८ लिटर दुधासाठी ३ कोटी १४ लाख ६४ हजार ५ रुपये इतके अनुदान शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बॅंक खात्यात वर्ग करण्याची शिफारस करण्यात आली. त्यापैकी १६२७३ पात्र शेतकऱ्यांचे ५९ लाख २० हजार ७१५ लिटर दुधाचे २ कोटी ८६ लाख ७८ हजार ६८० रुपये इतके अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याट आले आहे, अशी माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ मोरे यांनी दिली आहे.
यासाठी पडताळणी प्रक्रिया प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी रितेश मते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. बी. झोड विस्तार अधिकारी एस.एन. अदमाने, पर्य्वेक्षक बी.एम. गलधर, वी.बी. पाटील आदी प्रक्रिया पूर्ण करीत असून उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदानही त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.
०००००
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List