आजचे राशीभविष्य: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा राहील तुमचा आजचा दिवस?
आधुनिक केसरी न्यूज
जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी....
मेष : शुभरंग: पिस्ता, शुभ अंक : ८
आज महत्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका.कार्यक्षेत्रात तुमचे महत्व वाढेल. वरीष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.
वृषभ : शुभरंगः मोतिया, शुभ अंक : ३
दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही. आज घरात वडीलधाऱ्यांची मने सांभाळावी लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत.
मिथुन : शुभरंगः मोरपंखी, शुभ अंक : ७
प्रिय मित्रमैत्रीणींच्या सहवासात आज दिवस अानंदात जाईल. आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठीकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.
कर्क : शुभरंगः राखाडी, शुभ अंक : १
कामाच्या व्यापात आज कुटुंबियांना वेळ देणे अवघड होईल. नोकरीच्या ठीकाणी सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा.
सिंह : शुभरंग:क्रिम, शुभ अंक : ९
ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये. नविन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली करा. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत ठरेल.
कन्या : शुभरंग:डाळिंबी, शुभ अंक : ७
व्यवसायात भगिदारांशी मतभेद संभवतात. वैवाहीक जिवनांत भांड्याला भांडे लागेल. कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही.
तूळ : शुभरंगः स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ३
वैवाहीक जोडीदाराशी आज चांगले सूर जुळतील.आज तुमचा कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावीत होतील. वरीष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील.
वृश्चिक : शुभरंग:जांभळा, शुभ अंक : १
प्रवासात सावध रहा. आज तब्येत थोडी नरमच राहील. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. येणी असतील तर अनपेक्षितपणे वसूल होतील.
धनु : शुभरंगः राखाडी, शुभ अंक : २
कलेच्या क्षेत्रात नवोदीतांना उत्तम संधी चालून येतील. एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल.
मकर : शुभरंग: भगवा, शुभ अंक : ४
गृहीणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही. शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना यश सोपे नाही, स्ट्रगल वाढवावी लागणार आहे.
कुंभ : शुभरंगःनिळा, शुभ अंक : ५
आज आईच्या शब्दाचा मान राखा. वादविवाद टाळाच. कार्यालयिन कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
मीन : शुभरंगः केशरी, शुभ अंक : २
आज आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल. खिशात पैसा खेळता असल्याने तुमचा मूड छान असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List