पत्रकार - Adhunik Kesari

प्रिती संगमहून नवी ऊर्जा मिळाली : वसंत मुंडे
आधुनिक केसरी न्यूज

कराड : शुर विरांची ऐतिहासिक भूमी असलेल्या कराड नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व भारताचे उप पंतप्रधान तथा माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळास अभिवादन करून कृष्णा व कोयना नदीच्या प्रिती संगमावरून एक नवी ऊर्जा मिळाली असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या दीक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेचे शुक्रवारी दुपारी कराड येथे आगमन झाले. त्यावेळी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे, आरोग्य सेल चे अध्यक्ष डॉ. अमित खाडे, मा. आ. आनंदराव पाटील, पंचायत समिती सदस्य रमेश लवटे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस भरत नाना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पत्रकार संवाद यात्रेमागील भूमिका मांडताना वसंत मुंडे म्हणाले की, कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या संकटानंतर वृत्तपत्र व्यवसायाला अहोटी लागली. वृत्तपत्रांचा खप कमी झाला. अनेक वृत्तपत्रांच्या आवृत्या बंद झाल्या. त्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. कोरोना काळात १५० पत्रकारांचा मृत्यू झाला. तर अनेकांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्या. पत्रकार सेवा निवृत्तीचा लाभ वेळेत न मिळाल्यामुळे काही पत्रकारांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा राज्यातील पत्रकार संघ पुढे आला. व पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फुटली. अनेकजण व्यक्त होऊ लागले. आणि आमचे म्हणणे काही प्रमाणात सरकार पर्यंत पोहोचले.

येत्या २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील हजारो पत्रकार मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप समरंभास उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी राज्य सरकार समोर आपल्या व्यथा मांडल्या जाणार आहेत. त्यासाठी पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले. यावेळी अनेक सामाजिक संघटनांनी पत्रकारांच्या या संवाद यात्रेला पाठिंबा दर्शविला.

...नंतरच सरकाररूपी व्यवस्थेला जाब विचारा ; वसंत मुंडे यांचा पत्रकारांना सल्ला; एकच स्तंभ सोयी-सवलतींपासून वंचित का?
आधुनिक केसरी न्यूज

कोल्हापूर : सरकारच्या विविध सोयी-सवलतींचा लाभ आपल्याला का मिळत नाही, हे पत्रकारांनी आधी स्वतःला विचारावे. त्यानंतरच सरकाररूपी व्यवस्थेला जाब विचारावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे ह्यांनी आज केले. प्रसारमाध्यमांना सोयींपासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला त्यांनी धारेवर धरले.

पत्रकारांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दीक्षाभूमी (नागपूर) ते मंत्रालय (मुंबई) पत्रकार संवाद यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आज दक्षिण महाराष्ट्रात पोहोचली.

करवीरनगरीतील पत्रकारांशी श्री. मुंडे ह्यांनी संवाद साधला. पत्रकार बैठकीस संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा समन्वयक तानाजी पवार, तालुकाध्यक्ष आनंद वायदंडे (करवीर), उत्तम पाटील (शाहूवाडी), रूपेश डोंगरे, शिवाजी पाटील (राधानगरी), बाबासाहेब चिपडे आदी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी गृहे (संसद व विधिमंडळ), न्यायपालिका, प्रशासन आणि माध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत, असे नेहमी सांगितले जाते. त्यातील एकच स्तंभ सोयी-सवलतींपासून वंचित का, असा रोकडा सवाल विचारून श्री. मुंडे म्हणाले की, प्रसारमाध्यमांना काय सवलती आहेत, हे सरकारने सांगावेच.

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, पत्रकार सन्मान निधी योजना प्रभावीपणे ज्येष्ठ पत्रकारांपर्यंत पोहोचणे, पत्र आरोग्यविमा, अधिस्वीकृतीपत्रिका मिळण्यात अडथळे असे पत्रकारांचे असंख्य प्रश्न आहेत. समाजव्यवस्थेचे ओझे वाहून वाहून पत्रकारमंडळी विविध व्याधींनी जर्जर झाली आहेत. त्यांचे आयुष्यमानही कमी झाले आहे, अशी व्यथा व्यक्त करून श्री. मुंडे म्हणाले, ‘‘वयाची साठी ओलांडल्यावर कोणी काम देत नाही. सरकार ज्याला सन्माननिधी म्हणते, ते पेन्शन मिळत नाही. मग त्या पत्रकाराने आणि त्याच्या कुटुंबाने जगायचे कसे?’’

आपल्या अडचणी आणि आपल्यासमोरच प्रश्न ह्यांबद्दल जागरूक झाले पाहिजे. त्या जाहीरपणे मांडल्या पाहिजते आणि हे प्रश्न का सुटत नाहीत, ह्याबद्दल सरकारला जाब विचारला पाहिजे. ते करण्यासाठीच महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी येत्या मंगळवारी (दि. २० ऑगस्ट) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार संवाद यात्रेच्या समारोपासाठी उपस्थित राहावे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सरकारचे लक्ष वेधावे, असे आवाहन श्री. मुंडे ह्यांनी केले.

वर्तमानपत्रांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये : शहाजीबापू पाटील ; संवाद यात्रा समारोपाला मुख्यमंत्री येतील
आधुनिक केसरी न्यूज

सांगोले (जि. सोलापूर) : वर्तमानपत्रं वाचल्यावर त्या बातम्यांमधील गांभीर्य, आशय आणि नेमकं काय सांगायचं आहे, हे लक्षात येतं. त्यामुळेच त्यांचा प्रभाव टिकून आहे. वर्तमानपत्रांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भावना आमदार ॲड. शहाजीबापू पाटील ह्यांनी गुरुवारी (दि. १५) व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पत्रकार संवाद यात्रा पंढरपूर येथून कोल्हापूरकडे जाताना काही काळ सांगोल्यात थांबली. संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे व अन्य पदाधिकाऱ्यांनी ॲड. शहाजीबापू ह्यांच्याशी त्यांच्या कार्यालयात चर्चा केली.

पदाधिकाऱ्यांशी बोलताना ॲड. शहाजीबापू म्हणाले, ‘‘तुमच्याशी संवाद साधल्यावर तुमच्या अडचणी किती महत्त्वाच्या आहेत, हे माझ्या ध्यानी आलं. मी छोटा माणूस असलो तर ‘मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार’ अशी प्रतिमा तुम्हीच केली आहे. यात्रेच्या समारोपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ह्यांनी यावे, ह्यासाठी प्रयत्न सुरू करतो. तसा शब्द देतो तुम्हाला.’’

मराठी माणसाला जागं करण्याचं काम वर्तमानपत्रं करतात. तुमच्या समस्या तेरा कोटी मराठी जनतेसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे, असं सांगून ॲड. शहाजीबापू म्हणाले, ‘‘समाजात नेमकं काय चाललंय, राजकारणी लोकांची दिशा कोणती आहे, हे सगळं वर्तमानपत्रांमुळेच जनतेपुढे येतं. तुम्ही जागृती करता. बुलडोझरशीच तुमची तुलना केली पाहिजे - आडवं येईल ते सगळं चिरडून पुढे जायचं! मतांचा विषय सोडून द्या. पण तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये, एवढंच मला लोकप्रतिनिधी म्हणून वाटतं.’’

लढतो आणि भिडतो तोच पत्रकार असतो : वसंत मुंडे
आधुनिक केसरी न्यूज

बीड / येरमाळा :  ‘लढण्याची आणि थेट भिडण्याची क्षमता असणारी व्यक्तीच पत्रकार होते,’ असे #महाराष्ट्र_राज्य_पत्रकार_संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी बुधवारी (दि. १४) बीड येथे स्पष्ट केले. ‘राज्यात पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांची किमान पाच लाखांची मतपेढी आहे. त्यांची मते फिरविण्याची क्षमताही लक्षात घ्या,’ असेही मुंडे यांनी सूचकपणे सांगितले.

महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दीक्षाभूमी (नागपूर) ते मंत्रालय (मुंबई) अशी चार हजार किलोमीटरची पत्रकार संवाद यात्रा सुरू आहे. #महाराष्ट्र_राज्य_पत्रकार_संघटनेच्या या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यात्रेत बुधवारी बीड व येरमाळा (जि. धाराशिव) येथे पत्रकारांशी संवाद साधण्यात आला.

बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमात श्री. वसंत मुंडे म्हणाले, ‘‘आम्ही ठरवले, तर काय करू शकतो हे दाखवून देण्याची वेळ सरकारने कृपया आणू नये. कोणत्या सरकारने कोणत्या अर्थसंकल्पामध्ये पत्रकारांसाठी एका नव्या पैशाची तरी तरतूद केली का, हे सांगावे. या क्षेत्रात चाललेली वेठबिगारी पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही.’’

अपघात विमा सुरक्षा कवच
वृत्तपत्रांमधील मशिन, संगणक आदी विभागांमध्ये काम करणाऱ्या २०० कर्मचाऱ्यांना ५ लाख रुपयांचे १ वर्ष मुदतीचे अपघात विमा सुरक्षा कवच आज वितरित करण्यात आले. बीड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार) बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या सौजन्याने हे वेगळे पाऊल उचलण्यात आले. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीची ही पॉलिसी आहे. या पॉलिसीचे पुढच्या वर्षी नूतनीकरण करण्याची जबाबदारी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी स्वीकारली.

वृत्तपत्र विक्रेता संघाचे सुदाम चव्हाण, परमेश्वर खरात, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कांकरिया, सुनील क्षिरसागर, दिलीप खिस्ती, मंगेश लोंढे, चंद्रकांत नवले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मगदूम काझी कार्यक्रमास उपस्थित होते.

ग्रामीण माध्यमवस्था सक्षम करण्यासाठीच यात्रा

येरमाळा येथे विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पत्रकार संवाद मेळावा झाला. श्री. वसंत मुंडे म्हणाले की, ग्रामीण भागात राहून माध्यमांसाठी काम करणाऱ्यांना कोणत्याच सोयी-सवलती मिळत नाहीत. ही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठीच पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली आहे.

न्याय मिळत नाही, म्हणून सर्वसामान्य माणूस पत्रकारांकडे येतो. त्यातील अनेक प्रश्न सुटतात. याच पत्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रश्न सुटणार नसतील तर पत्रकारांना मतांची ताकद दाखवावी लागेल असा इशाराही श्री. मुंडे यांनी दिला.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे कळंब तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, बाळासाहेब जाधवर, सचिन बारकुल, दत्ता बारकुल, दीपक बारकुल, सचिन पाटील, संतोष बारकुल, सुधीर लोमटे, तानाजी बारकुल आदी उपस्थित होते. येडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन पत्रकार संवाद यात्रा तुळजापूर येथे रवाना झाली.

अपघाती मृत्यू झालेल्या सचिन नाईक यांच्या कुटुंबियांना पत्रकार संघाचा मदतीचा हात
आधुनिक केसरी न्यूज

माजलगाव : येथील तरूण पत्रकार सचिन नाईक यांच्या अपघाती निधनामुळे माजलगावकर उमद्या पत्रकाराला मुकले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

बुधवार, १७ एप्रिल रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी नाईक यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाईक यांच्या कुटुंबियांना त्यांचे वडील व बंधू यांच्याकडे अर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. माजलगाव येथील तरूण पत्रकार सचिन नाईक यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. सचिन नाईक हा कुटुंबातील कर्ता होता. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. आई - वडील वयोवृद्ध आहेत. नाईक कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सहभागी आहे. मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या पुढाकारातून मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, राज्य कार्यकारिणी सदस्य बाबा देशमाने,
प्रा. सुदर्शन स्वामी, परमेश्वर सोळंके, किसन भदर्गे, रविकांत उघडे,संतोष जेथलिया यांनी सांत्वनपर भेट घेत आर्थिक मदत केली.

ज्येष्ठ पत्रकारांसाठी आनंदाची बातमी ; आता मिळणार महिन्याला वीस हजार रुपये
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यासंदर्भात गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विधानपरिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील यासंदर्भात चर्चा उपस्थित केली होती त्याचप्रमाणे  मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अर्थसहाय वाढविण्याची घोषणा केली होती.

ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि वृध्दावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून "आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेत अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सध्या ११ हजार रुपये सन्मान निधी दर महिन्याला मिळतो. आता नऊ हजार रुपयांनी ही रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील वयोवृद्ध पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही योजना राबविण्यात येत असून  निकष व कार्यपध्दतीनुसार प्रत्यक्ष पात्र अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.  ही  मासिक अर्थसहाय्याची रक्कम "शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी" मधील ५० कोटी इतक्या मुदत ठेवीच्या रकमेवरील व्याजाच्या रकमेतूनच देण्यात येईल. ही रक्कम डीबीटीने संबंधित पत्रकारांच्या खात्यात जमा होईल. गेल्या वर्षी मार्चमध्येच हा निधी ३५ कोटींवरून वाढवून ५० कोटी करण्यात आला आहे.

राज्यात अनेक वयोवृद्ध पत्रकार हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी देखील आर्थिक मदत नसते. या वाढीव निधीमुळे त्यांना चांगले अर्थसहाय मिळेल.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उमरी नगरपरिषद कार्यालयात पत्रकारांचा सन्मान
आधुनिक केसरी न्यूज

उमरी : नगरपरिषद कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उमरी नगरपरिषद कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मुख्याधिकारी निलम कांबळे यांच्या हस्ते पुजन करुन दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी उमरी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कार्यालय अधिक्षक अर्जुन गव्हाणे, लेखापाल ज्योतीराम जाधव, नगर अभियंता संतोष मुंढे, संगणक अभियंता विनोद सावंत, वरिष्ठ लिपीक गणेश मदने, सचिन गंगासागरे, शकीलखॉन पठाण, गायकवाड पि.एम, सुर्यकांत माळवतकर, रमाबाई करपे, शंकर पाटील, चंद्रकांत श्रीकांबळे, गंगाधर पवार, शंकर माने, अंकुश सवई, आकाश खंदारे, नरेंद्र खंदारे,चंद्रप्रकाश मदने, माधव जाधव, शुभम मुदीराज, सुभाष सिंगरवाड, सदानंद गायकवाड इ.कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश मदने यांनी केले तर आभार गंगाधर पवार यांनी मानले.

माध्यमे बदलतात, बातमीचे स्वरुप नाही: डॉ. मिलिंद दुसाने
आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : माध्यमे बदलतात मात्र बातमीचे स्वरूप कधीही बदलत नाही. कारण सत्य हा बातमीचा मुळ व मुख्य निकष आहे. बातमी ही सत्य असते, बातमीचा सोर्स मात्र पक्का असला पाहिजे. माध्यम कोणतेही असले तरी प्रेझेंटेशनमध्ये बदल होतो, बातमीत नाही. बातमीची भाषा त्या त्या माध्यमांप्रमाणे बदलत असते, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसवांद व वृत्तपत्र विद्या विभागात स्व. मोहनलालजी बियाणी (काकाजी) यांच्या स्मृतीप्रीत्यार्थ मासिक व्याख्यानमालेचे बुधवारी 'बातमीचे बदलते स्वरूप' या विषयावर सोळावे पुष्प गुंफताना डॉ. मिलिंद दुसाने बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नामदेव सानप तर व्यासपीठावर प्रा. डॉ. संजीवकुमार साळवे, माहिती अधिकारी डॉ.मीरा ढास, डॉ. प्रभू गोरे, प्रा. बसवेश्वर बिरादर, प्रा. रमेश वाघ, विलास शिंगी, मुकेश मुंदडा, संदीप घंटे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. दुसाने म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य आदोलनासाठी जनजागृती  करणे ही  पत्रकारितेची भुमिका होती. ती तत्कालिन सरकार विरोधी असायची. मात्र सरकार विरोध म्हणजे पत्रकारिता असे नाही. प्रिंट मीडियामध्ये जागेची, शब्दांची मर्यादा असते. कमी जागेत आशय व्यक्त करणारी बातमी द्यावी लागते. आकाशवाणीमध्ये ऑडिओ पाठवणे त्यावर एडिटिंग करणे ती बातमी किती वेळेची द्यायची हे महत्त्वाचे असते. दूरचित्रवाणीमध्ये काही बातम्या वेळ घालवण्यासाठी दाखवल्या जातात. प्रत्येक बातमी ही संपादकाच्या नजरे खालून जात असते. त्या बातमीची कोणावर तरी जबाबदारी असते. आता सोशल मीडियात पत्रकारिता करताना सर्वांनीच जबाबदारीचे भान ठेऊन काम केले पाहिजे, असे आवाहनही शेवटी डॉ. दुसाने यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ. नामदेव सानप यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. परळी येथे मोहनलालजी बियाणी यांनी मराठवाडा साथी हे वृत्तपत्र सुरू केले. आज हे वृत्तपत्र विभागीय स्तरावर नावलौकिक पावले आहे. पत्रकारिता करताना शब्दांचा खेळ खेळता आला पाहिजे व बातमी लिहीत असताना समाजभानही असले पाहिजे, असे  डॉ. सानप म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित भिंगारे, गायकवाड मॅडम आदींनी परिश्रम घेतले.

औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी डॉ. माधव सावरगावे
आधुनिक केसरी न्यूज

औरंगाबाद :  विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्ष निवडीची बैठक आज पार पडली. या बैठकीत साम टि. व्ही.चे डॉ. माधव गुणवंतराव सावरगावे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

विभागीय संचालक (माहिती) कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली, त्यात समितीचे सदस्य चक्रधर दळवी, अनिल महाजन, डॉ. माधव सावरगावे, विनोद काकडे, अरुण सुरडकर यांनी सहभाग घेतला.

डॉ.माधव सावरगावे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.  औरंगाबाद विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी काम पाहिले. यावेळी समिती सदस्यांसह माहिती अधिकारी डॉ मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे उपस्थित होते.

Video : राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्कार
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच पुढील वाटचालीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या सत्कार कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष यदु जोशी, दैनिक पुढारीचे पत्रकार उदय तानपाठक, दिलीप सपाटे, नवशक्तीचे संपादक संजय मलमे, नवाकाळच्या नेहा पुरव,  आयबीएन लोकमत गडचिरोलीचे महेश तिवारी आदी पत्रकार उपस्थित होते.

यदु जोशी आणि सदस्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पत्रकारांची निवृत्ती वेतनवाढ, निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्यसुविधा, बैठकांसाठी मानधन, प्रवासभत्तावाढ आदी प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पत्रकारांच्या मागण्यांबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यसरकार सकारात्मक विचार करेल. अर्थ विभागाचे त्याला सहकार्य असेल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार व राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांना दिले.

आज पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यासाठी 'व्हॉईस ऑफ मीडिया' चे राज्यभर आंदोलन
आधुनिक केसरी न्यूज

वसंत खडसे

वाशिम : खेड्यापाड्यातील वाडीवस्त्यापासून थेट महानगरापर्यंतच्या अनेक सामजिक समस्यांना वाचा फोडून शासन दरबारी पाठपुरावा करणारे पत्रकार आज विविध समस्यांचे शिकार बनले आहेत. त्यांच्या सहज मान्य होणाऱ्या मागण्या जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून, शासन व प्रशासन पत्रकारांना उपेक्षित ठेवत आहे. याबाबत अनेक वेळा आंदोलन,मोर्चे,निषेध करुन सुद्धा सरकारला जाग येत नाही. त्याचा जवाब विचारण्यासाठी पुन्हा एकदा ' व्हॉईस ऑफ मीडिया ' ने एल्गार पुकारला असून, त्याअनुषंगाने आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
राज्य सरकार आणि राज्याचे माहिती महासंचालनालय विभाग यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक मागण्यांसाठी आज राज्यभरात साडेचारशे ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज यांना भेटून निवेदन देत या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आग्रह धरण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांचे अनेक, सहज सुटणारे विषय तसेच प्रलंबित आहेत. या प्रश्नासंदर्भातल्या मागण्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ने वारंवार केल्या, आंदोलने केली, पण त्याला यश आले नाही. आता या मागण्या अजून लावून धरल्या जाणार आहेत. ‘व्हॉइस ऑफ मीडिया ’ राज्यभर आंदोलन करत ‘त्या’ मागण्या पुढे नेत आहे. आज दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ५ वेळेत हे आंदोलन होणार आहे. राज्यातल्या सर्व तालुका, जिल्ह्याच्या, तहसीलदार, जिल्हा अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकार आणि प्रशासन यांनी पत्रकारांच्या रास्त असणाऱ्या मागण्यांविषयी विचार करून, त्या मागण्या मान्य कराव्यात. त्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे.
राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. (जसे की बार कौन्सिल वकिलांना वकिली करण्याचा अधिकृत परवाना देते तसे पत्रकार असल्याचा अधिकृत परवाना मिळावा.)
राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे. तो प्रकार थांबून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात. सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत. तसा शासन निर्णय काढावा. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार, त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी. याबाबत सरकारने आपल्याकडे जी माहिती मागविली आहे ती तातडीने द्यावी.
माहिती महासंचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत, ते देण्यात यावे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये करू, अशी घोषणा केली होती. टीव्ही, रेडियो आणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली, या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा.
अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. त्याबाबत कमिटी नेमून ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत, ते मार्गी लावावेत.
सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातींबाबत पॉलिसी बनवावी. सोशल मीडियांनाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत, अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात. सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी.
या मागण्या प्रामुख्याने यामध्ये आहेत. या आंदोलनात सर्व पदाधिकारी, सदस्य, पत्रकार यांनी सहभागी व्हावे, असे आवहान राज्य कोर टीम, ‘व्हाईस ऑफ मीडिया ’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य उपाध्यक्ष संजय मालानी, राजेंद्र थोरात, अजितदादा कुंकूलोळ, विनोद बोरे, जयपाल गायकवाड, इरफान सय्यद, मुंबई  विभागीय अध्यक्ष  सुरेश ठमके, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडीया, विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक, उत्तर महाराष्ट्र   अध्यक्ष सुरेश उजेनवाल, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते,  कोकण अध्यक्ष प्रवीण कोळआपटे,  यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कराड यांचे दुःखद निधन
आधुनिक केसरी न्यूज

शेवगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, शेवगाव येथील ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कराड यांचे हृदयविकाराच्या तीव्र  झटक्याने निधन झाले.त्यांच्या दुःखद निधनामुळे पत्रकार बांधवांत शोककळा पसरली असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, डॉ. विश्वासराव आरोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.