महाराष्ट्र - Adhunik Kesari

हाणेगाव आश्रमशाळेत चिकन भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; तहसीलदार आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव.
आधुनिक केसरी न्यूज

माणिक सुर्यवंशी

देगलूर : उडी हाणेगाव येथील वसंतराव चालवली आश्रम जमवून दि.९ ऑगस्ट रोजी सातच्या दरम्यान एका झटक्याने धोका दिला आहे. आश्रमशाळेत . आणि स्वत:हून काही मळचातच २८ मुले आणि ४ मुलीचा उलटा उलटा पोट दुखत आहे. पेटीची तब खालाव होणे त्यांना देगलूर येथील राज्य सरकार उपजिल्हात शनिवार ०९:३० वा. जीवनात आले असून, सध्या उपचार सुरू आहेत.

या कायमची गांभीर्य लक्षात घेईल देगलूरचे तहसीलदार भारत सूर्यवंशी यांनी देगलूर येथील उपजिल्हाला भेट दिली आणि मुलांच्या प्रकृतीची महिला केली. तसेच नांदेड येथील समाज कल्याण विभागाचे अधिकारी मोरे साहेब यांनी उपस्थित राहून बाधित परीक्षा व पालकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या प्रदेशाच त्यांनी आश्रमशाळेतील नैसर्गिक चर्चा करून सुरुवातीची माहिती जाणून घेतली.

एकीकडे वरिष्ठ अधिकारी अन्न भेसळी ठिकठिकाणी छापे टाकून पोलीस करत असताना, राज्यी निवासी आश्रमशाळेतच असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पेटीच्या सुरक्षेची पूर्ण शाळा प्रशासकाची असताना गुणवत्तेकडे भोजन कसे केले, असा प्रश्न आता विचारला जात आहे. या गटात संपूर्ण आता संपूर्ण देगलूर तालुका आणि पालक वर्गाचे लक्ष "प्रशासन याजबाबाचे आश्रम व हलर्जीपणा पाठिंब्याने स्वत:चे नियंत्रण तपासाब करणार काय? सैनिक आश्रमशाळ सदस्य आहाराच्या मोठा मोठा दिला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल महिला करून भारांवर कठोर क्षमता जोर धरत आहे. प्रथम महिला न आश्रमशाळेचे अधीक्षक, मुख्याध्यापक आणि भोजनालयातील संबंधितांमध्ये आपण निश्चितपणे, तसेच त्यांच्या निलंबनासह फौजदारी मिटवावे, अशी भूमिका पालकांनी उचलली आहे.

भोकरदनमध्ये आदिवासी एकजुटीचा हुंकार; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले
आधुनिक केसरी न्यूज

अमोल शिंदे

भोकरदन : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा,आदिवासी नृत्याचा ठेका आणि हातात फडकणारे झेंडे... अशा उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी (९ ऑगस्ट) भोकरदन शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने अवघे भोकरदन आदिवासी संस्कृतीच्या रंगात रंगून गेले. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रेरणेने आणि आमदार संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली साजित तडवी यांच्या नियोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मिरवणुकीत समाजबांधवांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.ढोल-ताशांच्या निनादासह आदिवासी नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.पारंपरिक कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या मिरवणुकीमुळे शहरातील वातावरणात उत्साह संचारला.मिरवणुकीनंतर सांस्कृतिक कार्यक्रम व जनजागृती मेळावा घेण्यात आला.यावेळी आदिवासी समाजाचे हक्क, शिक्षण, परंपरा आणि सामाजिक प्रगती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. समाजाने आपल्या संस्कृतीचे जतन करत शिक्षण आणि विकासाच्या प्रवाहात पुढे जाण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.कार्यक्रमाला आमदार संतोष दानवे यांनी उपस्थित राहून आदिवासी समाजबांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उत्साह आला.यावेळी तडवी परिवार आणि समाजबांधवांच्या वतीने आमदार दानवे यांचा आभार व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर घनवट सर यांनी केले. सलीम तडवी सर यांनी आभार मानले, तर सचिन तडवी यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.यावेळी नगरसेवक, रामदास पाथरे, नानासाहेब वानखेडे, माजी सरपंच राजेश राजपूत, अली बाबा तडवी, हुसेन तडवी, अमित तडवी, अमोल हिंगे यांच्यासह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या शेजारी बिअर बार अन् देशी दारूचे दुकान; पिढी घडविणाऱ्या परिसराचे नियोजन नेमके कोणाचे
आधुनिक केसरी न्यूज

अमोल शिंदे

भोकरदन  : एका बाजूला विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचे मंदिर उभे राहतेय...नवीन पिढी घडविण्याचे स्वप्न पाहिले जातेय; आणि दुसऱ्या बाजूला याच महाविद्यालयाच्या अगदी शेजारी गेल्या चार-पाच वर्षांपासून बिअर बार आणि देशी दारूचे अधिकृत दुकान आहे.यामुळे शिक्षण आणि व्यसनाच्या या विरोधाभासी चित्राने आता परिसर नियोजन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.महाविद्यालय म्हणजे केवळ चार भिंतींची इमारत नव्हे; ते विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारे आणि भवितव्य घडविणारे केंद्र असते.मग अशा शिक्षणसंस्थेच्या शेजारीच मद्यविक्रीची दुकाने असतील,तर या परिसराच्या नियोजनाचा विचार नेमका कोणी केला.दारूची दुकाने अधिकृत असतील... मग नियम काय सांगतात.शेजारील बिअर बार आणि देशी दारूचे दुकान अधिकृत असल्याचे सांगितले जात असेल,तर त्यांना परवानगी देताना शैक्षणिक संस्थांपासूनचे अंतर,स्थानिक परिस्थिती आणि उत्पादन शुल्क विभागाचे लागू नियम तपासले गेले होते का,हा प्रश्न उपस्थित होत आहे. परवानगी दिली असेल तर कोणत्या नियमांच्या आधारे व अंतराची अट असेल तर तिचे पालन झाले आहे का,परिसराची पाहणी कोणी केली,आणि शैक्षणिक संस्था सुरू झाल्यानंतरही ही व्यवस्था कायम ठेवण्यास कोणाची मंजुरी आहे.या प्रश्नांची उत्तरे संबंधित विभागांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे.

पिढी घडवायची का व्यसनाच्या सावलीत...

पालक आपल्या मुलींना चांगले शिक्षण,संस्कार आणि सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून महाविद्यालयात पाठवतात.अशा वेळी महाविद्यालयाच्या परिसरातच मद्यविक्रीची दुकाने असणे हा केवळ परवानगीचा विषय राहत नाही; तो विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरणाचाही प्रश्न बनतो.शिक्षणसंस्था उभी करताना तिच्या आजूबाजूच्या सामाजिक वातावरणाचा विचार होणे अपेक्षित आहे.एकीकडे ‘नवीन पिढी घडविण्याची’ भाषा आणि दुसरीकडे त्याच पिढीच्या शिक्षणस्थळाच्या शेजारी मद्यविक्री हा विरोधाभास प्रशासनाच्या लक्षात का नाही आला.असा प्रश्न सर्वसामान्य पडला आहे.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जागे होणार कधी?

या प्रकरणात कोणतेही दुकान नियमबाह्य असल्याचा निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित परवानग्या,अंतराच्या अटी आणि लागू शासन नियमांची अधिकृत तपासणी झाली पाहिजे.उत्पादन शुल्क विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नियमांची पूर्तता झाली आहे का,हे स्पष्ट करावे.स्थानिक प्रशासनानेही महाविद्यालयाच्या परिसरातील नियोजनाबाबत भूमिका स्पष्ट करावी.कारण प्रश्न दारूच्या दुकानाचा एवढाच नाही.प्रश्न आहे शिक्षणाच्या मंदिराभोवतीचे वातावरण कसे असावे,याचा निर्णय कोण घेणार.

ज्ञानाच्या मंदिराभोवती व्यसनाची सावली नको...

महाविद्यालय उभे राहणे ही निश्चितच चांगली बाब आहे.मात्र विद्यार्थिनींच्या शिक्षणासोबत त्यांना सुरक्षित,सकारात्मक आणि शैक्षणिक वातावरण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.म्हणूनच प्रशासनाने कागदपत्रे तपासावीत,नियम स्पष्ट करावेत आणि जर कुठे नियमभंग आढळला तर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.नवीन पिढी घडविणाऱ्या शिक्षणसंस्थेच्या दाराशी व्यसनाची सावली किती योग्य हा प्रश्न आता केवळ पालकांचा नाही..तो प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनीही स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

माजी मंत्री राजेश टोपे यांचा ‘साखर उद्योग गौरव’ पुरस्काराने सन्मान
आधुनिक केसरी न्यूज

त्रिसिंग जायभाये

अंकुशनगर : पुणे येथे ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया’ (DSTA) तर्फे साखर उद्योग, तंत्रज्ञान आणि औद्योगिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री राजेश टोपे यांना माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साखर उद्योगाच्या माध्यमातून मिळालेल्या या मानाच्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. साखर उद्योगात अभ्यासपूर्ण नेतृत्व करत कारखान्याच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहिल्याबद्दल राजेश टोपे यांचा हा सन्मान करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल कारखान्याचे सभासद, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, खाते-विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड वाहतूक कंत्राटदार, मजूर व हितचिंतकांनी राजेश टोपे यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी ‘साखर उद्योग गौरव’ पुरस्कार प्राप्त मान्यवरांसह साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक दर्शन घेतले
आधुनिक केसरी न्यूज

हनुमंत मस्तुद

माढा : महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पंढरपूर दौऱ्यादरम्यान चंद्रभागा नदी घाट तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी त्यांचे स्वागत केले.

मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी प्रथम चंद्रभागा घाट परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी नदीपात्र स्वच्छता, भाविकांसाठी स्नान सुविधा, प्रकाश व्यवस्था तसेच घाटावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. आषाढी-कार्तिकी वारीतील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उपाययोजनाबाबत सूचना दिल्या. तसेच यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन भाविक, वारकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिल्या. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्यातील शेतकरी व भाविकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांचा सत्कार केला.

यावेळी नगराध्यक्षा प्रणिता भालके, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांत अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुंटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण घम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आठवडी बाजारात पोलिसांचा कडक पहारा; चोरट्यांचा डाव फसला!
आधुनिक केसरी न्यूज

अमोल शिंदे

भोकरदन : गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांवर नजर आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई करत भोकरदनच्या शनिवारीच्या आठवडी बाजारात पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे मोबाईल चोरीची एकही तक्रार दाखल झाली नाही.त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.गेल्या काही आठवड्यांपासून बाजारात मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. याची दखल घेत प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या पथकाने बाजार परिसरात कडक बंदोबस्त ठेवत गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त घातली.दरम्यान, वाहतूक नियमभंग करणाऱ्या ४० वाहनचालकांवर कारवाई करून ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात ट्रिपल सीट ८, विनाहेल्मेट १२, नो-पार्किंग १२, मोबाईलवर बोलणे ५, अवैध प्रवासी वाहतूक १, तुटलेली नंबर प्लेट १ आणि लायसन्स नसलेले १ प्रकरणाचा समावेश आहे.

पोलिसांच्या धडक कारवाईमुळे बाजारातील वाहतूक सुरळीत राहिली आणि ‘गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांची खैर नाही’ असा स्पष्ट संदेश चोरट्यांना मिळाला.नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी मोबाईल,पाकीट व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी,तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले.

नळणी खुर्दच्या विकासाला ‘दानवे’ बूस्टर..!
आधुनिक केसरी न्यूज

अमोल शिंदे

भोकरदन : गावाच्या विकासाचा वेग आता थांबणार नाही,विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,अशी ग्वाही आमदार संतोष  दानवे यांनी नळणी खुर्द येथे दिली. ग्रामपंचायत कार्यालय व महिला बचत भवन,चौफुली ते जुने गाव सिमेंट रस्ता, पंचवीस-पंधरा योजनेअंतर्गत सभागृह तसेच समर्थ काळू महाराज देवस्थान परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना आमदार दानवे यांनी गावोगावी मूलभूत सुविधा मजबूत करण्याला आपले प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. रस्ते,सभागृह,ग्रामपंचायत कार्यालय, महिला बचत भवन यांसारख्या कामांमुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ सुरू; उर्वरितांनाही लवकरच दिलासा’

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरही आमदार दानवे यांनी महत्त्वाचे भाष्य केले. कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली असून,उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच त्याचा लाभ मिळेल,असे त्यांनी सांगितले.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे आणि गजानन वराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान देठे सर यांनी केले, तर आभार रामेश्वर देठे यांनी मानले.यावेळी कमलाकर साबळे, मधुकर तांबडे, कृष्णा ठोंबरे, पप्पू ठोंबरे, रमेश वराडे, समर्थ काळू महाराज संस्थानचे सुदाम वराडे, पुरुषोत्तम वराडे, श्रीराम चोरमारे, गणेश देठे, विजय गिरणारे, विजय वराडे, गुलाब वराडे, कल्याण साबळे, अवचित देठे, संजीव वराडे, बालू वराडे, संतोष वराडे, विष्णू वराडे, रामेश्वर वराडे, रामकिसन देठे, दिलीप वराडे, श्रीराम देठे तसेच ग्रामसेवक दानवे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.विकासकामांच्या भूमिपूजनामुळे नळणी खुर्दच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

‘रघुपती राघव’च्या तालावर सरकारला सवाल..!
आधुनिक केसरी न्यूज

अमोल शिंदे

भोकरदन : भजन-कीर्तनाचा सूर हातात जनतेचे प्रश्न... आणि सरकारच्या धोरणांविरोधात संतप्त घोषणा! भोकरदन येथे शनिवारी काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘रघुपती राघव राजाराम’ आंदोलनाने शहराचे लक्ष वेधून घेतले. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारत काँग्रेसने जनआक्रोशाचा आवाज बुलंद केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दक्षिणमुखी मारुती मंदिर परिसर, पोस्ट ऑफिसजवळ आंदोलन व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्याचे खासदार कल्याणरावजी काळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर तालुकाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

कार्यक्रमाची सुरुवात भजन-कीर्तनाने झाली. त्यानंतर श्रीरामाची आरती करण्यात आली. मात्र धार्मिक वातावरणातूनच काँग्रेसने जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला.

‘यादीत नाव असूनही कर्जमाफी कुठे?’

शेतकरी कर्जमाफीच्या यादीतील त्रुटींमुळे अनेक शेतकरी अडचणीत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. पीककर्ज मिळविताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून बँकिंग यंत्रणेला स्पष्ट निर्देश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली.

लाडकी बहीण योजनेवरही प्रश्नचिन्ह

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची चौकशी करून पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, अशी भूमिका काँग्रेसने मांडली. योजनेच्या नावावर पात्र महिलांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

NEET पेपरफुटीचा मुद्दा तापला

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित NEET-UG पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही आंदोलनातून करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळ करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला पाठीशी घालू नये, असा सूर कार्यकर्त्यांच्या घोषणांमधून उमटला.

आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारने केवळ आश्वासनांवर न थांबता ठोस आणि तातडीचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे, तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बदर चाऊस, रऊफ परसुवाले, रहीम तांबोळी, सुरेश गवळी, राजाभाऊ कुलकर्णी, अशोक उबाळे, शांतीलाल बनसोडे, अनिल देशपांडे, भाऊसाहेब सोळंके, त्रिंबक आप्पा पाबळे, अब्दुल सत्तार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जनतेचा आवाज दाबता येणार नाही; शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील,’ असा निर्धार यावेळी करण्यात आला

क्रेटा थेट खोल विहिरीत; १२–१३ तास मृत्यूशी झुंज; स्कुबा डायव्हर्सने कार बाहेर काढली, दोघींचा दुर्दैवी मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज

अमोल शिंदे

भोकरदन : एका क्षणात दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न... आणि पुढच्याच क्षणी क्रेटा कार खोल विहिरीत.. पारध–पद्मावती मार्गावर शुक्रवारी रात्री घडलेल्या या भीषण दुर्घटनेने परिसर हादरला.रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळलेली क्रेटा कार तब्बल १२ ते १३ तासांच्या अथक बचावकार्यानंतर अखेर बाहेर काढण्यात आली. मात्र,या बचावकार्याचा शेवट दोन महिलांच्या मृत्यूच्या काळजाला चटका लावणाऱ्या बातमीने झाला.या दुर्घटनेत अक्तर बेगम अमन उल्ला खान यांचा कारमध्येच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी सुलताना बी. बेगम यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला.त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला.

धडक कारला वाचविण्याचा प्रयत्न अन् थेट विहिरीत.

मिळालेल्या माहितीनुसार,भरधाव दुचाकीस्वाराने क्रेटा कारला धडक दिली आणि अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला.दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने कार रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र, त्याचवेळी वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार क्षणार्धात रस्त्यालगतच्या खोल विहिरीत जाऊन कोसळली.

अंधार, खोल पाणी अन् विहिरीत अडकलेली कार..

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, रात्रीचा काळोख, विहिरीतील मोठ्या प्रमाणातील पाणी आणि उपलब्ध बचावसाहित्याची मर्यादा यामुळे कारपर्यंत पोहोचणेच मोठे आव्हान ठरले.कार विहिरीत नेमकी कुठे अडकली आहे, याचा शोध घेणेही कठीण जात होते. स्थानिक नागरिकांनी उपलब्ध साधनांच्या मदतीने रात्रभर बचावकार्य सुरू ठेवले.

१२–१३ तासांची झुंज; अखेर स्कुबा डायव्हर्स पाण्यात उतरले..

बचावकार्याला वेग देण्यासाठी अखेर स्कुबा डायव्हर्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पाण्यात उतरून कारचा ठाव घेण्यात आला.त्यानंतर कार बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.तासन्‌तास चाललेल्या या थरारक बचावकार्यानंतर अखेर १२ ते १३ तासांनी क्रेटा कार विहिरीबाहेर काढण्यात यश आले.कार बाहेर आल्यानंतर त्यामध्ये अडकलेल्या अक्तर बेगम अमन उल्ला खान यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, गंभीर जखमी सुलताना बी. बेगम यांना बुलढाणा येथे उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

प्रशासन-पोलीस आणि नागरिकांची रात्रभर धावपळ..

पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू,उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर,पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष माने तसेच तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य राबविण्यात आले. पोलीस कर्मचारी, महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक आणि स्कुबा डायव्हर्सच्या पथकाने कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

‘बचावयंत्रणा’ कुठे? विलंबावर नागरिकांचा संताप

दरम्यान, अत्याधुनिक बचाव साधने आणि प्रशिक्षित पथक वेळेत उपलब्ध झाले असते तर बचावकार्य आणखी जलद होऊ शकले असते, अशी भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी अशा दुर्घटनेत तातडीने वापरता येईल अशी. वाचविण्याच्या प्रयत्नात कार विहिरीत कोसळली; रात्रभर सुरू राहिलेली मदतीची धडपड, १२–१३ तासांची प्रतीक्षा आणि अखेर दोन जीवांचा अंत... पारध–पद्मावती मार्गावरील ही दुर्घटना परिसराच्या .काळजात कायमची
जखम करून गेली.

कर्ज फेडतोय, व्याज परताव्याची वाट पाहतोय!
आधुनिक केसरी न्यूज

अमोल शिंदे

भोकरदन : व्यवसाय उभारण्याचे स्वप्न घेऊन कर्ज घेतले;कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी धडपड सुरू आहे... मात्र शासनाकडून मिळणारा व्याज परतावाच रखडल्याने लाभार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत कर्ज घेतलेल्या हजारो लाभार्थ्यांना प्रलंबित व्याज परतावा तात्काळ देण्यात यावा,यासाठी आता लाभार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.याबाबत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना विकास जाधव,नारायण लोखंडे, गोकुळ सपकाळ आणि राहुल साबळे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.प्रलंबित व्याज परताव्यासाठी तातडीने पुरेसा निधी उपलब्ध करून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी,अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

कर्ज घेतले उद्योगासाठी;परताव्यासाठी करावी लागतेय कसरत..!

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.या योजनेच्या आधारावर अनेक तरुणांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला असून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र,कर्जाचे हप्ते, व्यवसायाचा खर्च आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळताना व्याज परतावा वेळेवर न मिळाल्याने लाभार्थ्यांवरील आर्थिक ताण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शासनाकडून मिळणारा व्याज परतावा हा लाभार्थ्यांसाठी मोठा आधार ठरतो. त्यामुळे हा परतावा रखडल्यास कर्जाचा प्रत्यक्ष आर्थिक भार वाढतो.यामुळे व्यवसाय उभा करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना तरुणांची आर्थिक कोंडी होत असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

LOI आहे... तरी लाभापासून वंचित का?

निवेदनात 2024-25 या कालावधीतील LOI पात्रता पत्र मिळालेल्या लाभार्थ्यांचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पात्रता असूनही अनेक लाभार्थ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.काही पात्र लाभार्थ्यांचे LOI प्रमाणपत्र डिलीट झाल्याने त्यांच्यासमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे LOI प्रमाणपत्र असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे तपासून त्यांना योजनेचा लाभ तातडीने देण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली.

योजना कागदावर नाही, तरुणांच्या हातात उद्योग हवा!

तरुणांना कर्जाच्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे हा महामंडळाच्या योजनेचा उद्देश आहे. मात्र, कर्ज मिळाल्यानंतर व्याज परताव्यासाठी लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असेल, तर योजनेच्या अंमलबजावणीचा अपेक्षित फायदा लाभार्थ्यांना पूर्णपणे मिळणार कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.त्यामुळे शासन व महामंडळाने प्रलंबित व्याज परताव्याचा तातडीने निपटारा करावा,आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि LOI पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे मार्गी लावावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.तरुणांना उद्योगासाठी कर्ज मिळते; मात्र व्याज परतावा वेळेवर मिळाला नाही तर कर्जाचा आर्थिक ताण वाढतो.शासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन लाभार्थ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी विकास जाधव, नारायण लोखंडे, गोकुळ सपकाळ, राहुल साबळे आदी उपस्थित होते.

पक्ष वाढवा;अन्याय होऊ देणार नाही..!
आधुनिक केसरी न्यूज

अमोल शिंदे

भोकरदन : पक्ष संघटना बळकट करा,पक्ष तुमच्या कार्याची निश्चित दखल घेईल. यापुढे कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही.असा खणखणीत शब्द राज्यमंत्री तथा जालना जिल्हा पक्ष निरीक्षक आशिष जयस्वाल यांनी भोकरदन येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.६ ऑगस्ट रोजी रत्नमाला लॉन्स येथे मतदार यादी पुनरावलोकन व SIR आढावा बैठक तसेच शिवसेना संघटनात्मक मेळावा पार पडला.यावेळी जयस्वाल म्हणाले की, ज्या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार नाही, तेथील संघटना मजबूत करण्याची जबाबदारी पक्षनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवून पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम केले जाईल.पक्षाच्या कामात जो सक्रिय राहील, त्याला न्याय देण्याचे काम आम्ही करू. तुम्ही संघटना वाढवा, पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी भोकरदन शहरातील उत्कृष्ट काम करणाऱ्या BLO शिक्षक-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण फुके, भूषण शर्मा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत
आधुनिक केसरी न्यूज

दिपक सुरोसे

खामगाव :  दि.8 आज देशभरात आपण ज्यांना भटके-विमुक्त म्हणतो, तो समाज एकेकाळी ज्ञानी समाज होता. हा समाज आपले ज्ञान निरपेक्षपणे समाजाला वाटण्यासाठी घराबाहेर पडला आणि काळाच्या ओघात हा समाज भटका आणि वंचित बनत गेला. ब्रिटिशांच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून संपूर्ण पारधी-आदिवासी समाजावर गुन्हेगार जमातीचा शिक्का लावण्यात आला, त्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात मागास राहिला. परंतु श्री सद्गुरू धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्टच्या या शाळेत अमनोरा येस फाउंडेशनच्या पुढाकाराने पारधी मुलांसाठी अत्याधुनिक सुविधा तयार झाल्याचे पाहून अत्यधिक आनंदाची आत्मानुभूती होत आहे. देशाला ख-या अर्थाने विश्वगुरू बनवायचे असेल, तर अशा वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डा. सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
खामगाव येथे स्व. भय्यूजी महाराज यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या पारधी-आदिवासींच्या आश्रम शाळेत अमनोरा येस फाउंडेशन द्वारे तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक तीन क्रीडा संकुलांचे व विविध प्रकारच्या सुविधांचे उद्घाटन डाॅ. मोहन भागवत यांच्या हस्ते शुक्रवार ८ आॅगस्ट रोजी करण्यात आले. या वेळी मोहन भागवत बोलत होते. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री  डाॅ. अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर,  सिटी कार्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिरुद्ध देशपांडे, श्री सद्गुरू धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदौरच्या विश्वस्त डा. आयुषी देशमुख  आदि उपस्थित होते.
सर्वप्रथम मोहन भागवत यांनी अमनोरा येस फाउंडेशनच्या सहकार्याने आश्रम शाळेत करण्यात आलेले विविध विकासकार्याची पाहणी केली. शाळेतील अत्याधुनिक खेळाची मैदाने, मुलांसाठी स्वयंपाक तयार करणारी भोजनशाळा, विद्यार्थ्यांनी तयार केलेली परसबाग आणि वसतिगृहाची डाॅ. भागवत यांनी पाहणी केली. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी डाॅ. मोहन भागवत यांचे सहर्ष स्वागत केले.

मोहन भागवत पुढे म्हणाले की, एकेकाळी भारताचा समाज हा पूर्णपणे संघटित होता, परंतु परकीय आक्रमणामुळे समाज गुलाम बनत गेला व नंतर विघटित झाला. त्यातूनच मग समाजात वंचित घटकांची संख्या वाढत गेली. असे असले तरी समाजातील वंचित घटकांनी कधीही पारतंत्र्य स्वीकारले नाही. ते स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत राहिले. इंग्रजांच्या काळात पारधी-आदिवासींना गुन्हेगार ठरवले गेले, त्यामुळे त्यांचा विकास खुंटला. पारध्यांच्या विकासासाठी संघ अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. या स्थितीत भय्यूजी महाराजांनी जी शाळा उभारली, त्या शाळेला नवे रूप देण्याचे तसेच येथील मुलांना स्वयंपूर्ण बनवण्याचे कार्य अमनोरा येस फाउंडेशन करीत आहे. हे कार्य नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.
प्रस्तावना करताना सिटी कार्पोरेशनचे एमडी अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले की, डा. मोहन भागवत यांच्या सूचनेनुसारच अमनोरा येस फाउंडेशन या शाळेच्या उत्थानासाठी कार्याला लागली आणि पाहता-पाहता पारधी आदिवासींच्या समाजातील मुले-मुली आज प्रगती आणि स्वयंपूर्णतेच्या आकाशात उंच भरारी घेत आहेत. हा आमच्यासाठी अत्यंत कृतज्ञतेचा क्षण आहे. वंचितांच्या विकासासाठी अमनोरा येस फाउंडेशन शैक्षणिक, वैद्यकीय यासह अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून समाजपरिवर्तनाच्या दिशेने कार्य करीत आहे आणि आगामी काळातही हे कार्य अव्याहतपणे सुरू राहील, अशी ग्वाही अनिरुद्ध देशपांडे यांनी दिली.

आदिवासी मंत्री डा. अशोक उईके यांनी पारधी व आदिवासींच्या विकासासाठी शासन सातत्याने प्रयत्न असून, त्यानुसार विविध योजना राबवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आकाश फुंडकर म्हणाले की, ही आश्रमशाळा खामगावची शान असून, या ठिकाणी वंचित मुलांच्या विकासासाठी होणारे कार्य नक्कीच प्रशंसेस पात्र आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक कुलकर्णी यांनी केले, तर आश्रमशाळचे मुख्याध्यापक राठोड यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमात डा. मोहन भागवत यांच्या हस्ते १६ पारधी आदिवासी मुलींना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या चेकचे वितरण करण्यात आले, तसेच विविध क्षेत्रात कार्य करणा-या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचाही डा. भागवत यांनी सन्मानित केले. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.