हटके - Adhunik Kesari

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना गुलाबपुष्प
आधुनिक केसरी न्यूज

पुणे : शहराच्या मध्य वस्तीत वाहनचालकांडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, 'नो एंट्री'चे फलक लावलेले असतानाही दुचाकी व चारचाकी चालक बिनधास्त गाड्या दामटत असतात. बेदरकारपणे 'नो एंट्री'तून वाहने चालवणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) क्रीडा सेलच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील चित्रशाळा चौकात गुलाबपुष्प देऊन वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.

'राष्ट्रवादी'चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व क्रीडा सेलचे अध्यक्ष मदन कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्षा राहुल देखणे यांच्या नेतृत्वात हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहर पदाधिकारी सचिन यादव, दीपक पोकळे, उदय निगडे, गणेश ठोंबरे, शामराव घोरपडे, हृषिकेश देखणे, अश्वदीप भोसले यांनी यामध्ये सहभाग घेतला. दरम्यान, उद्या बुधवारपासून (दि. १०) नो एंट्रीमधून येणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

राहुल देखणे म्हणाले, "शहराच्या मध्यवस्तीत कसबा, सदाशिव, नारायण, शनिवार, बुधवार, शुक्रवार, नवी पेठ या भागांत दुचाकी, तसेच अनेक चारचाकी वाहनचालक कोणातही नियम पाळताना दिसत नाहीत. 'नो एंट्री'चे फलक लावलेल्या भागातही बिनधास्त गाड्या घालतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप केला, तर त्यांना अरेरावीची भाषा वापरली जाते. पोलिसांकडूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यासंदर्भात विश्रामबाग व फरासखाना या दोन्ही पोलीस स्थानकांत निवेदन दिले आहे.

चित्रशाळा ते भानुविलास टॉकीज, प्रभात प्रेस ते विजय टॉकीज, हत्ती गणपती ते दुर्वांकुर यासह इतर अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतूक आहे. मात्र, अनेकजण उलट दिशेने वाहने चालवितात. पेठांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. नियम मोडणाऱ्यांत या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून, लक्ष्मी रस्ता व कुमठेकर रस्त्यावर खरेदीसाठी येणाऱ्या वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. परिणामी, वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण वाढत आहे. स्थानिकांना याचा त्रास होत असून, पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात," असे देखणे यांनी नमूद केले.

चक्क येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ परिषदेचे आयोजन
आधुनिक केसरी न्यूज

पुणे : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) व इंडीयन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे द्वितीय ‘चेस फॉर फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे 19 ते 21 जून या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील प्रत्येक कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करण्यासह महिला बंदिवानांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केले.

या प्रसंगी कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, इंडियन ऑईलच्या संचालक (मानव संसाधन) रश्मी गोविल, फिडेच्या सामाजिक आयोगाचे अध्यक्ष आंद्रे वोगेटलिन, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नितीन नारंग व फिडे प्राधिकृत परदेशी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

‘परिवर्तन प्रिझन टू प्राईड-नई दिशा’ या उपक्रमांतर्गत येरवडा कारागृहाच्या बंदिवानांच्या संघाने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याचा आनंद व्यक्त करुन श्री.गुप्ता म्हणाले, कारागृहातील बंदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुढे येत आहेत. सुवर्णपदक प्राप्त बंदीवानांना शिक्षेत विशेष माफी देवून प्रोत्साहन देण्यात आले आहे.

मागील वर्षी एक प्रयत्न म्हणून येरवडा कारागृहात बंदिवानांसाठी बुद्धिबळ खेळास सुरूवात केल्यानंतर एका वर्षातच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बंदिवानांनी चांगली तयारी करून मागच्या वर्षी सुवर्णपदक मिळविलेल. बाहेर सर्व सुविधा असणाऱ्या खेळाडूंना जे जमणार नाही ते या कारागृहातील बंदीवान खेळाडूंनी करून दाखविले. सध्या येरवडा कारागृहात महिला व पुरूष असे 200 बंदी बुद्धिबळ शिकत आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती गोविल म्हणाल्या, बुद्धिबळामुळे बुद्धीला चांगली चालना मिळते व परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाण्याचे कौशल्य निर्माण होते. त्यामुळे बंदिवानांना भविष्यात याचा लाभ होईल.

विविध देशांतील कारागृहांतील बंदिवानांना बुद्धिबळ या खेळामध्ये प्रशिक्षण देवून विविध देशांतील तुरुंगातील बंदीवानांची स्पर्धा आयोजित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून बंदीवानांमध्ये तुरूंगातून सुटका झाल्यानंतर समाजामध्ये गेल्यानंतर आपल्यातही काही कौशल्ये आहेत ज्याआधारे आपण समाजामध्ये आत्मसन्मानाने जगू शकू असा आत्मविश्वासही निर्माण होऊ शकणार आहे, अशी माहिती उद्घाटनप्रसंगी देण्यात आली.
0000

विशेष कविता : बाप नावाची एकतारी !
जागतिक पितृदिना निमित्य या दुनियेतील समस्त वडिलांना ( बापांना ) कवी प्रा.विजय पोहनेरकर यांचा साष्टांग दंडवत !

बाप नावाची एकतारी

आधुनिक केसरी

कवी : प्रा.विजय पोहनेरकर

*अव्यक्त प्रेमाचा*
*बाप असतो झरा*
*हितचिंतक , मार्गदर्शक*
*खराखुरा हिरा !*

*संकटकाळी बाहेर पडण्याचा*
*बाप असतो मार्ग*
*त्याला वाटतं मुलांसाठी*
*निर्माण करावा स्वर्ग !*

*ठरवल्या सारखं होतच असतं*
*असं काहीच नाही*
*तरीही बाप कधीही*
*हिंमत हारत नाही !*

*मला नको मला नको*
*बाप म्हणत रहातो*
*लेकरांचं कसं होईल*
*हेच भजन गातो  !*

*तो भजन गात असता*
*कुणाचीही साथ नसते*
*बाप नावाची एकतारी*
*आर्त स्वरात गात असते*

*बापाच्या अंतर्मनातला*
*अभंग कुणाला कळतो का ?*
*चालता बोलता देव पण*
*घरात कुणाला कळतो का ?*

*कधीही तो कुणाकडूनच*
*अपेक्षा करत नाही*
*कोणी कसंही वागलं तरी*
*मनात राग धरत नाही*

*दया क्षमा शांती हेच*
*त्याच्या जगण्याचं सूत्र*
*जणूकाही घरासाठी*
*बाप म्हणजे " गोमूत्र "*

*वाकडं तिकडं बोललं तरी*
*बाप उत्तर देत नाही*
*कितीही दुखावला तरी*
*कुणाला शाप देत नाही*

*शर्ट फाटका चप्पल तुटकी*
*तरीही तो नकोच म्हणतो*
*बनियनच्या छिद्रालाच तो*
*एखाद्या वेळेस दुःख सांगतो*

*जिवंत असेपर्यंत त्याला*
*कुणीही मिठी मारत नसतं*
*तरीही बापाचं काळीज*
*फक्त प्रेम करत असतं*

*तुम्ही आमच्यासाठी काय केलं ?*
*प्रश्न जेंव्हा विचारल्या जातो*
*सरणावरती जाण्या आधीच*
*बाप एकदा मरून जातो*

*कथा कविता गाण्यांमधून*
*बाप कळतोच असं नाही*
*स्वतः बाप झाल्याशिवाय*
*विराट दर्शन मिळत नाही*

*या दुनियेतून गेल्या नंतर*
*बाप थोडा कळायला लागतो*
*आठवणीतून गालावरून*
*पुन्हा पुन्हा ओघळायला लागतो*

*प्रा.विजय पोहनेरकर*
*94 20 92 93 89*
*छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद )*
*दि.16 जून 2024*
( पितृदिन )

तहसीलदार तेजनकर निराश्रीताचा आधार
आधुनिक केसरी न्यूज

विनोद पाटील बोडखे

रिसोड :आईवडीलांचे छत्र हरविलेली श्रुती ज्ञानेश्वर खाबलकर ही 12 वर्षीय चिमुकली बिबखेड येथील रहिवासी असून ती एक वर्षाची असतानाच कर्करोगाने बालपणीच मातृछत्र हिरावले तसेच  गतवर्षी वडिलांचा देखील कर्करोगाने मृत्यू झाल्याने श्रुती चे मातृ पितृ छत्र हरवले तेव्हा पासून तिचा सांभाळ आजी करीत असून आजी श्रुती ला निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी तिची आजी आणि श्रुती तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारून कंटाळल्या होत्या.
प्रशासकीय कामात लेटलतीफशाही हा काही नविन विषय नाही.त्याचा अनुभव श्रुती आणि तिच्या आजीना  आला. त्यातही महसूली कामासाठी भल्या भल्यांना उंबरठे झिजवावे लागत असल्याचे सर्वश्रुत आहे. असाच काहीसा अनुभव बिबखेडा येथील श्रृती खांबलकर या चिमुकलीला आला.  ती शासनाच्या निराधार योजनेच्या लाभासाठी प्रयत्न करीत असताना त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी वयोवृध्द आजीसह ती तलाठी, वैद्यकीय अधिकारी, तहसील कार्यालय आदी विभागाचे उंबरठे झिजवू लागली. मात्र, कागदपत्रांची पुर्तता व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेळकाढू धोरणमुळे श्रुती व तिची आजी वैतागले होत्या.शेवटी दोघींनी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची भेट घेण्याचा चंग बांधला आणि कर्तव्य दक्ष तहसीलदार तेजनकर यांची भेट घेतली, तेजनकर यांनी श्रुती आणि आजीचे समस्या जाणून घेऊन निराधार योजनेसाठी पायपिट करुन हताश झालेल्या श्रृतीसाठी दस्तुरखुद्द तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर आधार बनल्या. श्रृतीला निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावत श्रृतीला निराधार योजनेचा तात्काळ लाभ मिळवून दिला.त्यामुळे चिमुकल्या श्रृतीच्या चेहऱ्यावर हास्य तरळल्याचे दिसून आले. यावेळी कर्तव्य तत्पर, अधिकारी ही ओळख असलेल्या तहसीलदार तेजनकर यांचे आभार मानले.

ऐकावं ते नवलंच..! महाराष्ट्रातील 'हे' गाव ग्रामस्थांनीच काढले विक्रीला! कारण काय? वाचा....
आधुनिक केसरी न्यूज

बीड : भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी अनेक समाजिक उपक्रम राबवले जातात हे आपण नेहमी  ऐकतो, वाचतो पण भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी बीड मधील एका गावातील गावाकऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा विषय  मांडला आहे याच तुम्हला नवलं वाटल्या शिवाय राहणार नाही. बीड जिल्ह्यातील एक गाव ग्रामस्थांनी थेट विक्रीला काढले आहे.

गावकऱ्यांनी मंत्रालयापासून पाचशे किलोमीटर अंतरावर असणारे एक गाव विक्रीसाठी काढले आहे. कारणही भ्रष्टाचार आहे. यासंदर्भात बॅनर गावात लावले गेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून बॅनर लावण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या विषयाची मांडणी करणारा मराठी चित्रपट  ‘जाऊ तिथे खाऊ’ मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा हा चित्रपट 8 फेब्रुवारी 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटातून करण्यात आली होती. या चित्रपटात विहीर चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हे प्रकरण गेले होते. आता चित्रपटातील कथानकापेक्षा वेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा विषय ग्रामस्थांनी मांडला आहे.
कोणत्या गावात घडला हा प्रकार
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गाव विक्रीसाठी काढले आहे. या गावात 1800 ग्रामस्थ राहतात.  ज्या प्रमाणे ‘जाऊ तिथे खाऊ’ चित्रपटात विहीर केवळ कागदावरच झाली होती, त्या प्रमाणे गावाचा विकास कागदावर करण्यात आला आहे. विकासासाठी आलेला निधीतून गावातील प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांनी आपले खिसे भरल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला.
काय म्हणाले गावकरी...
गाव विक्रीचे बॅनर गावकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लावले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, आपण अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणल्या आहेत. राज्याला आपण विकासाकडे नेत आहात. मात्र आमचे खडकवाडी गाव विकासापासून कोसो दूर आहे. शासनाने सुरू केलेल्या सर्व विकास योजना आणि प्रकल्प गावात केवळ कागदावरच आहेत. गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीतून कोणतेही काम झाले नाही. यासंदर्भात तक्रारी केल्यावर त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे आम्हाला हे गाव विकायचे आहे, त्यासाठी तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. बीड जिल्ह्यातील गावकऱ्यांनी उचललेल्या या पावलाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रालयातील अधिकारी काय दखल घेतात? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करत स्मशानभूमीत साजरी केली दिवाळी...
आधुनिक केसरी न्यूज

किरणकुमार आवारे

निफाड :- स्मशानभूमी म्हटलं की, खूप जणांना भीती वाटते. मात्र जिथे जन्म होतो ते रूग्णालय आणि जिथे या जगाचा निरोप घेतला जातो ते स्मशान भूमी. मात्र काल दि.१३ नोव्हें रोजी सगळे घरी आनंदात दिवाळी साजरी करत असतांना वाकदच्या शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत दिवाळी साजरी करून अनोख्या पद्दतीने सरकारचा निषेध केला.
सगळीकडे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मात्र ज्या ठिकाणी सहसा कोणी जात नाही आणि गेलं तरी आनंद व्यक्त केला जात नाही ते ठिकाण म्हणजे स्मशानभूमी.
स्मशानभूमी हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य अंग असली तरीही स्मशान भूमीत प्रवेश करणारं प्रत्येक मन हे थोडंतरी बिथरतंच. कारण या ठिकाणी कोणी आनंद व्यक्त करण्यासाठी जात नाही. गेल्या दोन तीन वर्षांपासून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अवकाळी पाऊस, त्यातच शेतीमालाला भाव नाही. सरकार सातत्याने निर्यात धोरणात हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव पाडत आहे. पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. पीकविमा मिळाला नाही. यावर्षी खरीप हंगाम तर वाया गेलाच मात्र रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट आहे. तत्कालीन सरकारने सन २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा केला त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील हक्काचे पाणी जायकवाडीला नेले जात आहे. त्यामुळे गोदावरी खोरे वाळवंट बनले आहे. यावर्षीही जायकवाडीला पाणी नेण्याचा घाट घातला जात आहे. पाणी गेले तर यावर्षी गोदावरी खोऱ्यात पिके सोडाच पिण्याला देखील पाणी राहणार नाही. मात्र शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करत सरकार त्यांच्याच मस्तीत मश्गुल आहे. सत्ताधारी आनंदाने दिवाळी साजरी करत असले तर ग्रामीण जनतेची दिवाळी यावर्षी निरुत्साहात आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वाकद येथील ग्रा.प.सदस्य अरुण पाटील, अंबादास वाघ, बाळासाहेब शिंदे, बारकु  वाघचौरे, संजय खैरनार, दत्तू रौंदळ, शिवाजी बडवर, रमेश पवार, संदीप पाटील आदी ग्रामस्थांनी शेकडो दिव्यांची आरास करत स्मशानभूमीत दिवाळी साजरी केली.

"केंद्र व राज्य सरकारचे धोरण हे नेहमीच शेतकरी विरोधी राहिले. सध्या कोणत्याही शेतीमालाला भाव नाही, खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामही वाया गेला आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे राज्यसरकारने घोषित केलेली अपूर्ण कर्जमाफी राबवावी तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना तातडीने अनुदान जमा करावे".
- अरुण पाटील,
माजी चेअरमन, ग्रा.प.सदस्य

चमत्कार सिद्ध करा अन्यथा दिव्य दरबार बंद करा; बागेश्वरच्या धीरेंद्र शास्त्रींना अंनिसचे 30 लाखांचे आव्हान
आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर:छत्रपती संभाजीनगर येथे सध्या बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री श्रीराम कथा प्रवचनासाठी आलेले असून कथा प्रवचन करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण ते प्रवचनाच्या नावाखाली दिव्य दरबार भरवितात त्यात दिव्यशक्ती असते, चमत्कार होतात, आपण कुणाचेही नाव, वय, आजार आणि मनातील ओळखू शकतो, मोबाईल नंबर सांगू शकतो, असा दिव्य दावा करतात. आजवर त्यांनी त्यांच्या दिव्य व प्रेत दरबारात केलेले चमत्कार फसवणूक मुक्त स्थितीत सिद्ध करा आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रुपये तीस लाखाचे बक्षीस जिंका अन्यथा राम कथेच्या नावावर दिव्य चमत्कार करून लोकांची फसवणूक करून दिशाभूल करणारा दिव्य दरबार थांबवा, असे आवाहन. अ. भा. अंनिस चे मराठवाडा संघटक किशोर वाघ यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेत  धीरेंद्र शास्त्रींनी सांगितले अंनिसवाल्यांनी मला कधीही आव्हान दिलेले नसून मी सध्या महाराष्ट्रात आहे. त्यांनी दरबारात चर्चेसाठी, या असे  सांगितल्यावर अ. भा. अंनिस वतीने पत्रकार परिषद घेऊन त्यांना पुन्हा तीस लाखाचे आव्हान देण्यात आले आहे. यापूर्वीच समितीने  त्यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा आणि द इग्स अँड मॅजिक रेमेडीज कायद्यानुसार कार्यवाही करण्याची मागणी नागपूर मुंबई ई. ठिकाणी रीतसर तक्रार करून आणि वकीला मार्फत नोटीस पाठवून केलेली आहे.

या मागणीमध्ये असे म्हंटले आहे की,  जर धीरेंद्र शास्त्रींनी फसवणूक मुक्त स्थितीमध्ये 10 लोकांचे नाव वय मोबाईल नंबर सांगितल्यास त्यांना तीस लाख रुपये बक्षीस देऊ. गेल्या41 वर्षापासून देवाधर्माला विरोध न करता जनसामान्यांची लुबाडणूक आणि फसवणूक करणाऱ्या विरुद्ध जनजागरण करण्याचे संत आणि समाज सुधारकांचे प्रबोधन कार्य करणारी आपली अंनिस चळवळ बंद करून बाबाच्या पायावर डोके टेकवू . अन्यथा देवाधर्माच्या आणि कथेच्या नावावर जनसामान्याची फसवणूक लुबाडणूक करणाऱ्यांना जनतेसमोर उघडे केल्याशिवाय आणि जनजागरण केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. असा इशारा ही अंनिस संघटनेने दिला आहे.
या वेळी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे अ.भा. अंनिसचे पंकज देशमुख जिल्हा संघटक, वनिता दयारे, महिला संघटक रविंद्र वाकोडे जिल्हाध्यक्ष रावसाहेब जारे, जिल्हा सचिव यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवाजी महाराजांच्या आरतीने होणार दिवसाची सुरुवात;गोळेगावकरांनी केला संकल्प!
आधुनिक केसरी न्यूज

सुलतानपूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरती नतंरच दिवसभरातील कामाची सुरुवात करणार  असल्याचा संकल्प खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथील ग्रामस्थांनी  चार नव्हेबंर पासुन केला. या संकल्पनेचा संपूर्ण तालुक्यातुन गावकऱ्यांचे कौतुक होत आहे. गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयानुसार रोज सकाळी नऊ वाजता गावातील एका दापत्याच्या हस्ते आरती होईल व त्या नंतर दिवसभराच्या कामाला सुरुवात होईल.शनिवारी पहिला  आरतीचा मान गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन करून  याची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमासाठी  परिसरातील राजकीय. तसेच प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शंकरकाका अधाने हरियाली फाऊंडेशन चे अध्यक्ष सतिश शुल्का,जगननाथ बापु खोसरे,सुरेश सोनवणे,राजु चव्हाण, संदिप निकम,प्रकाश चव्हाण, प्रविण इंगळे,संजय मोरे आदिसह  मोठ्या संख्येने महिला पुरुषाची उपस्थिती होती.

अशी सूचली संकल्पना

मराठा आरक्षणासाठी काटशेवरी येथे साखळी उपोषणात गोळेगावातून रोज पाच जोड्या (पती-पत्नी) सहभागी होत होते. तेथे जाण्यापूर्वी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात येत असे, यावरूनच उपसरपंच संतोष जोशींसह गोळेगावकरांना ही संकल्पना सूचली आणि याला ग्रामस्थांनीही सकारात्मकता दर्शवली.

व्यसन सोडण्याचा संकल्प

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील राजे शिवाजी ग्रामस्वराज्य कल्याण निधी असे लिहिलेल्या एका पेटीत दान आणि राजे शिवाजी संस्कारक्षम स्वराज्य मावळा हुंडी असे लिहिलेल्या दुसऱ्या पेटीत आरती करणाऱ्या प्रत्येकाने आपल्यातील दुर्गुण किंवा व्यसन सोडल्याचा केलेला संकल्प नावानिशी कागदावर लिहून टाकावा.

स्वर्गाच्या झाडावर भानामती !,महामार्गावरील राज्य मार्गावरील झाडांवर भानामती, तरीही पोलीस प्रशासनाकडून बघ्याची भूमिका...!
आधुनिक केसरी न्यूज
सचिन कोरडे
धाराशिव  जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही भूतबाधा, भानामती, जादूटोणा,यासारखे प्रकार सुरूच आहेत. बुध्दीहिन अश्या अशिक्षित,अज्ञानी लोकांमुळे रस्त्यालगत व शासकीय वनपरिक्षेत्रातील अनेक वृक्ष जादूटोण्याच्या या प्रकाराला बळी पडत आहेत. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला तरीहि असे प्रकार होत असतील तर त्याविरुद्ध थेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला जातो. पण जिल्ह्यातील वाशी शहरातील पोलीस प्रशासन मात्र या भानामती,जादूटोना याबाबत बघ्याचीच भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. जगाच्या पाठीवर भारताची वाढती लोकसंख्या या वाढत्या लोकसंख्येमुळे,वाढत चाललेली वृक्षतोड वृक्षतोडीमुळे पावसाचे पर्जन्यमान प्रमाण कमी होणे.

याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून "झाडे लावा,झाडे जगवा"असा नारा देत दरवर्षी जास्तीत जास्त वृक्ष लागवड उद्दिष्ट ठेवून वर्षाला वृक्ष लागवडीसाठी व जाहिरातीवर अमाप खर्च केला जातो. तर इकडे धाराशिव जिल्ह्यात परिस्थिती मात्र वेगळीच आहे.बुवाबाजी करणाऱ्या विकृत वृत्तीच्या लोकांमुळे महामार्गावरील राज्य मार्गावरील वन क्षेत्रामधील ठराविक वृक्षांचे जीव धोक्यात आले आहेत.

रस्त्याच्या कडेने संबंधित विभाग किंवा एखाद्या सामाजिक संस्था कडून लावलेली वृक्षाची झाडे यातील एक वृक्ष म्हणजे "आयलान्थस एक्सेलसा" सामान्यतः स्वर्गाचे झाड म्हणून
ओळखले जाणारे आणि भारत आणि श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारे एक पर्णपाती वृक्ष आहे. तमिळमध्ये याला त्याच्या अप्रिय गंधामुळे "पीनारीमारम" असेही म्हणतात.या वृक्षाचा उपयोग सीमा चिन्हांकित करण्यासाठी आणि मातीची धूप रोखण्यासाठी शेतात आणि नद्यांच्या काठावर होतो.

या स्वर्गाच्या झाडाचे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे.डिंक आणि कडू, सुगंधी पानांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने झाडाचे औषधात अनेक उपयोग आहेत. झाडाची साल एक ज्वर आहे आणि दमा, ब्राँकायटिस आणि आमांश वर उपचार म्हणून वापरली जाऊ शकते .प्रसूतीनंतर वापरल्या जाणाऱ्या शक्तिवर्धक म्हणून पाने आणि साल देखील चांगली प्रसिद्ध आहेत. पानांचा रस आणि ताज्या सालाचा वापर नंतरच्या वेदनांवर उपाय म्हणून केला जातो.

निसर्गात एवढे विशेष महत्त्व असणाऱ्या या झाडाला सडलेल्या बुद्धीच्या,भोंदूगिरी करणाऱ्या व्यक्तीकडून टार्गेट करत झाडांवर हजारोंच्या संख्येने मोठे-मोठे खिळे मारून त्यावर लिंबू, बिबा हे लटकवले जात आहे.विशेष म्हणजे शहरातील प्रमुख असणारा व रदळीचा रस्ता असून त्यात रस्त्यावर अगदी भले मोठे असणारे हे स्वर्गाचे झाड आणि त्यावर हजारो खिळे,मोठया सुया ठराविक दिवस वार वेळ ठरवून मारल्या जातात,तरीही पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही ही खूप मोठी खंत आहे.

जादूटोणा विरोधी कायदा काय आहे?

राज्यात जादूटोणा विरोधी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू झाला आहे, या कायद्यानुसार मांत्रिक किंवा अन्य एखाद्या व्यक्तीमार्फत अघोरी उपचार करणे, भानामती करणे, काळी जादू करणे असे प्रकार निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध गुन्हा नोंद होत होतो.

"आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त असणाऱ्या तसेच शेतीसाठी व नदीकाठी ही त्याची योग्य भूमिका साकारणाऱ्या या वृक्षाचे जतन होणे गरजेचे आहे"
डॉ.श्याम डोके, वरिष्ठ प्राध्यापक, वनस्पती शास्त्र विभाग.

खामगावात अचानक प्रगटले गजानन महाराज? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी
आधुनिक केसरी न्यूज

खामगाव  : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एक अजब प्रकार घडला. सुटाळ पुरा गावात राहणाऱ्या अशोक सातव यांच्या घरात रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक एक व्यक्ती आली. या व्यक्तीची वेशभूषा पूर्णत: गजानन महाराज यांच्यासारखीच होती. त्यामुळे साक्षात गजानन महाराजच प्रकटले, अशी बातमी संपूर्ण खामगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली. गजानन महाराजांसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीला पाहण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली. सातव यांच्या घराभोवती भक्तांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली. बघता-बघता या परिसराला यात्रेचा स्वरूप प्राप्त झालं. शेवटी पोलिसांना ही पाचारण करावे लागलं.मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील सुटाळपुरा परिसरातील अशोक सातव यांचं घर आहे. रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर गजानन महाराजांची वेशभूषा करून अचानक एक व्यक्ती आली. मला तुमच्या घरी जेवण करायचं, असं या व्यक्तीने सातव कुटुंबियांना म्हटलं.

त्यानुसार, सातव कुटुंबियांनी या व्यक्तीच्या जेवणाची सोय केली. दरम्यान, या व्यक्तीला शेजारच्यांनी जेवताना बघितलं. सातव यांच्या घरात गजानन महाराज प्रगटले, असं त्यांना वाटलं. बघता-बघता ही बातमी संपूर्ण खामगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली परिसरातील नागरिकांनी वाटेल ते वाहन पकडत सुटाळपुरा गावाकडे धाव घेतली. गजानन महाराज अवतरले असं म्हणत सातव यांच्या घरासमोर भाविकांनी तुफान गर्दी केली. संत गजानन महाराजांचा जयघोष करत शेकडो लोक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत होती.
बघता-बघता या गर्दीला यात्रेचं स्वरुप आलं. दरम्यान, ही घटना कळताच खामगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी भाविकांची गर्दी हटवली. मात्र ही व्यक्ती कोण आहे..? कुठून आली..? याबाबत अद्यापही कुणाला माहिती नाही. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Video : चंद्रपूरातील खड्ड्यांना एकनाथ शिंदे यांचे नाव
आधुनिक केसरी न्यूज

धनंजय साखरकर

चंद्रपूर : राज्यातील मार्गांवरील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. खड्ड्यामुळे अपघाताचा संख्येत मोठी वाढ झालेली आहे. विकासाची उंच उंच भरारी घेणाऱ्या चंद्रपूरलाही खड्ड्यानी सोडले नाही. मात्र या जीवाघेण्या खड्ड्याकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे लक्ष काही गेले नाही.आम आदमी पार्टीने अनोखे आंदोलन करीत या खड्ड्याकडे लक्ष वेधले आहे. खड्ड्याना चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले.

शहरातील अविकसित रस्त्यावरील खड्ड्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव देत खड्ड्यात वृक्षारोपण रोपण करण्यात आले.आम आदमी पार्टीने केलेले हे अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले.चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गात खड्डेच खड्डे आहे.या मार्गांवरून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. असे असले तरी या महत्वाचा प्रश्नाकडे राजकीय नेत्यांचे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.खड्ड्याचा या प्रशांनावर आम आदमी पक्षाने आगळे वेगळे आंदोलन करीत लक्ष वेधले.शहरातील विविध भागात असणाऱ्या खड्ड्यात वृक्षारोपण करन्यात आले. विशेष म्हणजे या खड्ड्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव खड्ड्याना देऊन संताप व्यक्त करण्यात आला.यावेळी आपचे नेते मयूर राईकवार,महानगर अध्यक्ष  योगेश गोखरे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष दिपक बेरशेट्टीवर, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर उपस्थित होते.

आईने किडनी देऊन वाचविले मुलाचे प्राण
आधुनिक केसरी न्यूज

चारठाणा : आजच्या काळात आपण आपल्या जवळच्या लोका कडून जास्त धोका पत्करण्याच्या घटना ऐकून धक्का बसतो. आशा वेळी चारठाणा ता.जिंतूर येथील एका ६० वर्षीय आईने आपल्या विवाहित ३७ वर्षाच्या मुलाला स्वतःची किडणी दान करून त्यांच्या विना कुटुंब पोरके होण्यापासून वाचवून इतरांन पुढे एक आदर्श निर्माण केला म्हणावं लागेल.
येथील शेतकरी कुटुंबात असलेल्या राधाबाई पंडितराव गडदे यांचा ३७ वर्षीय विवाहित असलेला एक मुलगा सुन व एक नातू हे पाच जनांचे कुटुंब आनंदाने राहतं आसत परंतु मागील काही दिवसांपासून मुलगा हा आजारी होता . परंतु काही दिवस त्यानें औषध उपचार सुरू ठेवत चार वर्षे काढली परंतु मागील फेब्रुवारी महिन्यात अचानक त्याला चक्कर आल्याने परभणी येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले .
तेथे उपचार दरम्यान दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. व डायलिसिस करण्याची गरज पडली त्यानें डायलिसिस करून लगेच दोन दिवसांनी संभाजीनगर नगर गाठले आणि तेथे प्रसिद्ध किडनी तज्ञ डॉ. श्रीगणेश बर्नेला यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. तेव्हा डॉ यांनी आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती किडनी देण्यात तयार असतील तर आपण किडणी ट्रान्सप्लांट करू शकतो. त्या वेळी क्षणाचाही विचार न करता रंगनाथ गडदे यांचा तिन्ही सदस्य किडनी देण्यात होकार दर्शवला त्याच वेळी आईने एक पाऊल पुढे टाकत परिस्थितीचें गांभीर्य ओळखून किडनी देण्यासाठी सरसावली आणि तपासणी सुरू केले सर्व रिपोर्ट पाहून डाँक्टर ने होकार दर्शवला आणि किडनी दाता व घेणार यासाठी लागणार्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या. ओरिओन सिटीकेयर चे प्रसिद्ध किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉ. बर्नेला, डॉ. शरद सोमानी ,डॉ.प्रशांत दरख ,अमोल मुदलियार यांनी अथक प्रयत्न करून (दि.०७ जुलै  )रोजी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
आता या दोघांचीही प्रकृती चांगली असुन दोघांना ही रुग्णालयातुन सुट्टी मिळाली आहे. मुलांसाठी स्वतः हा चा जीव धोक्यात घालून राधाबाई पंडितराव गडदे यांनी डॉ.तात्याराव लहाने यांच्या आईच्या रांगेत बसवण्याचा बहुमान पटकावला आहे. त्यांच्या वयाच्या विचार करून या धाडस निर्णयाबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. या सहा महिन्यांच्या आजारात रंगनाथ गडदे यांना आपल्या कुटुंबातील सदस्य प्रमाणे समजून शस्त्रक्रिया यशस्वी होईपर्यंत राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांनी व नातेवाईक जिजाभाऊ काचगुंडे , पत्नी अर्चना गडदे त्याचे कुटुंबीय व भाचे यांनी अथक परिश्रम घेतले.केले.