संपादकीय - Adhunik Kesari

"महाआघाडी सरकारचे भवितव्य ठरवणारी राज्यसभेची निवडणूक"
आधुनिक केसरी

प्रकाश महागांवकर, पुणे

सहा राज्यसभा जागांची निवडणूक दहा जूनला आहे. आणि लगेच वीस जूनला विधान परिषदेवर पाठवायच्या  जागांची निवडणूक आहे.

राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी सात उमेदवार उभे आहेत. ते कायम राहतील असे आत्ता तरी वाटत आहे. फॉर्म मागे घेण्यासाठी ची आजची दुपारी तीन वाजे पर्यंत ची वेळ आहे.

भाजपाचे महाडीक आणि शिवसेनेचे संजय पवार या पैकी कोण माघार घेतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

परंतू शेवटच्या क्षणी भाजपा उध्दव ठाकरेंना त्यांचेवर केलेल्या उपकाराची जाणिव करून देईल असे वाटते.

महा विकास आघाडीचे सरकार, उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सोनियाजींचे आदेशाने राष्ट्रीय कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन, राजकारणातील लबाड्यांचा अतिरेक करून, जनमताच्या स्पष्ट कौला विरोधात जाऊन, अभद्र आघाडी करून, स्थापन केलेले सरकार आहे.

त्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी सर्व जातीभेद, धर्मभेद, नाती गोती, बाजूला सारून काम करणारे प्रामाणिक सरकार निवडण्यासाठी स्पष्ट मतदान केले होते.

शिवसेना आणि भाजप युती म्हणून लढल्या मुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना मतदान करण्याचे उद्देशानेच मतदान झाले.

युती असल्यामुळे जिथे भाजपचा उमेदवार नव्हता तिथे मित्रपक्षाला मते दिली.

केवळ त्या मुळे शिवसेनेला 56 आमदारांची बेगमी मिळाली.

त्या लाटेत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमाणे स्वतंत्र लढली असती तर शिवसेनेचे फार तर दहा आमदार निवडून आले असते, असा तो कौल होता.

परंतू संभाजीराजे छत्रपती यांना जसे तोंडघशी पाडून शिवसेनेने स्वतः तर शब्द फिरवलाच  पण त्याच बरोबर शरद पवार साहेबांनाही शब्द फिरवायला भाग पाडले. दोन वर्षापूर्वी फौजीया खान ला निवडूण आणण्यासाठी केलेल्या मदतीची आठवण करून देऊन.

तसेच सहा महिन्यात उध्दव ठाकरेंना निवडून येणे गरजेचे असताना,

कोविड 19 मुळे निवडणूका घेणे अवघड असताना, उध्दव ठाकरेंच्या विनंतीला मान देवून त्यावेळी भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी समजूतदार पणा दाखवत निवडणूक होऊ दिली आणि तीही तडजोड करून बिनविरोध.

आता जर त्या भाजपच्या सर्वोच्च नेत्याने उध्दव ठाकरेंना एक उमेदवार मागे घ्या, शक्यतो संजय राऊत, तर उध्दव ठाकरे काय करतील ?

अशा वेळी भाजप तीन आणि महाआघाडीचे तिघांचे प्रत्येकी एक प्रमाणे तीन बिनविरोध निवडून येतील.

संजय पवार नवखा आणि सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून त्यांना माघार घ्यायला भाग पाडणे सोपे आहे परंतू तो सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्याचा अपमान ठरेल.

जनमानसातील कोणत्याच कप्यात संजय राऊतांना  स्थान नाही. केवळ आघाडीचे निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली म्हणून त्यांना पहील्या पसंतीचा उमेदवार करणे संजय पवार वर आन्याय करणारे ठरणार आहे,

आणि माघार न घेता निवडणूक लढवली तर  शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे.

कारण फक्त दहा मते भाजपला लागणार आहेत. ती मते सहयोगी पक्ष, सहयोगी अपक्ष आणि ईतर छोटे पक्ष भरून काढतील. उलट शिवसेनेला जवळपास एकोणवीस वीस मते लागणार आहेत.

त्यात आरोपपत्रे दाखल झालेली असल्यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाला मज्जाव केला तर गणिते अजून बिघडतील.

अशा परिस्थितीत सामान्य कार्यकर्त्यांचा मान राखून संजय राऊत या बेभरोशी, बेलगाम बडबड्या  करप्ट उमेदवाराला माघार घ्यायला लाऊन मावळ्यांचा यथोचित मान राखणे शिवसेनेच्या भवितव्यासाठी

चांगले ठरेल.

नाहीतर सच्चा आणि कट्टर बाळासाहेबांच्या मावळ्यांनी आयुष्यभर फक्त सतरंज्याच  उचलाव्यात असा मेसेज जाईल. तोंड चोपडे आणि जनतेत काडीची किंमत नसणारे, नेत्यांचे चमचेच निवडून येतात असा  मेसेज सामान्य कार्यकर्त्यांना जाईल.

त्यामुळे हट्ट सोडावा, दुराग्रह गुंडाळून ठेवावा आणि कठोर निर्णय घेऊन संजय राऊतांना बसवावे आणि शिवसेनेची गेलेली पत थोडी तरी सावरावी, ही उध्दवजींना उत्तम संधी आहे.

शिवाय ठाकरे कुटूंबाला अडचणीत आणणाऱ्या बोलघेवड्या, भ्रष्ट माणसाला धडा शिकवल्याचे  पूण्य उध्दवजींना मिळेल.

महाडीक हे मुरब्बी राजकारणी असून धनशक्तिचे मालक आहेत.

कुस्त्यांचे डावपेच माहीत असणारे पैलवान आहेत. जिद्द व पाठबळ आहे आणि हीच उत्तम संधी पण आहे निवडून येण्याची.

शिवाय एकदा राज्यसभेवर निवडून आले की विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण झोकून प्रचार पण करता येईल आणि सतेज पाटलांची गूर्मी पण शमवता येईल.

छत्रपती शाहू महाराजांनी मात्र अनावश्यक वेळी छत्रपती संभाजी राजेंच्या विरोधात बोलून, आणि भाजपला विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करून घरातले मतभेद अकारण चव्हाट्यावर आणले, आणि छत्रपती असूनही जातीयवादी विचारसरणी उघड केली.

असो, ज्याचा त्याचा हा प्रश्न आहे.

मी लिहीत असतांनाच शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले आहेत असे कळाले आणि आजच संध्याकाळी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी महाआघाडीची संयुक्त बैठक घेऊन आपले आघाडीचे चारही उमेदवार कसे निवडून आणायचे यावर विचारविनिमय करून आपले डावपेच आखण्यासाठी बैठक बोलावली आहे.

माझ्या मते ही चुरशीची निवडणूक म्हणजे दोन्ही बाजूंना आपली शक्ती आजमावण्याची एक संधी आहे.

यात भाजपा उमेदवाराचा पराभव झाला तर मात्र फडणवीस यांचा परतीचा प्रवास सुरू होईल.

जर तीनही उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी निवडून आणले तर पक्षांतर्गत विरोधक म्हणजे पंकजाताई मुंढे, विनोद तावडे यांची बोलती बंद होईल आणि त्यांना दोघांनाही भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत राहावे लागेल.

जर यदाकदाचित भाजपचा तीसरा उमेदवार आला,  आणि शिवसेनेचे दोन्ही तसेच कॉंग्रेस चे लादलेले सुमार उमेदवार इम्रान (खान)  प्रतापगढी  यापैकी कोण पराभूत होईल हे पाहावे लागेल.

भाजपने शिवसेनेला व्यवस्थित कात्रीत पकडले आहे.

संजय पवार हरले तर पक्षात प्रचंड नाराजी होईल.

शिवसेनेत उठाव होईल. आणि इम्रान प्रतापगढी हरले तर सोनियाजी  असहाय होतील. त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मते न दिल्याने आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करणे अवघड जाईल. सरकार कोसळेल.

संजय पवार हरले तरी सरकार धोक्यात येणार आहे.

भाजपचा प्रस्ताव ऐकायला हवा होता. राज्यसभेची  एक जादा जागा देऊन विधान परिषद ची एक आमदारकी वाढवून घेणेच झाकल्या मुठी सारखे झाले असते.

आता भाजप सर्व प्रकारचु पूर्ण ताकद  लावून मुन्ना महाडीक यांना निवडून आणणारच.

जर इम्रान प्रतापगढी यांना पक्षादेश शिरसावंद्य माणून कॉंग्रेस च्या सर्व 44 आमदारांनी मते दिली तर संजय राऊतांचा गेम व्हावा. बिचाऱ्या संजय पवार चा नव्हे.

कारण मनीध्यानी नसताना त्यांना गाजर दाखवण्यात आले आहे. संजय राऊत यांनी स्वतःच  आपणा स्वतःला एक क्रमांकाचा उमेदवार ठरवून संजय पवारला द्वितीय दर्जा दिला आहे. आता पक्षप्रमुख म्हणून उध्दवजी ठाकरे यांनी निवडून येण्याची जबाबदारी संजय राऊतांवर टाकून पक्षाचे पहीली 42 मते संजय पवारला द्यावीत आणि शिल्लक सेनेचे अधिक राष्ट्रवादीचे मतांसह इतर पक्षांची व अपक्षांची मते मिळवून निवडून येऊन दाखवावे असे आदेशच संजय राऊत यांना द्यावेत.

विशेष संपादकीय : आग लागली तेल ओतायला चला
– डॉ. प्रभू गोरे , संपादक , संपर्क : 9075716739

सध्या महाराष्ट्रात भोंगा हा जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे. तापमानाचा पारा जस-जसा वाढत आहे तस-तसा भोंग्याच्या राजकारणाचाही पारा वाढू लागला आहे. जसे मनसेचे पक्षप्रमुख बोलत आहेत तसे सत्ताधारी आणि विरोधक रोज नव-नवे आरोप-प्रत्यारोप करत मस्त प्रसिद्धीच्या झोतात स्वत: न्हाऊन घेत आहेत. जनता उन्हाच्या चटक्यांसोबत महागाईच्या चटक्यांनी बेहाल झाली आहे. वाहनांच्या आणि खाण्याच्याही तेलाचे भाव कधीचेच गगनाला जाऊन भिडले आहेत. आणखी थोड्या दिवसात ते गगन भेदून वर जातील. तरीही त्यावर कुणी बोलत नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही. जनतेचे वकील आणि कोतवाल असलेली माध्यमेही या ज्वलंत प्रश्नावर लिहीत -बोलत नाहीत. 2-4 रुपयांनी तेलाचे भाव वाढले त्या दिवशी फक्त नावाला बातमी झळकते. तेही कुठला राजकीय विषय नसला तरच. अन्यथा आता जनतेच्या हिताच्या बातम्यांपेक्षा पॅकेजच्या, टीआरपीच्या बातम्यांना जास्त प्रसिद्ध दिली जाते. टीआरपी आणि पॅकेजच्या नादात पत्रकारितेत काय-काय सुरू आहे आणि कसे-कसे सुरू आहे याचे एक संतापजनक उदाहरण पुढे आले आहे. महाराष्ट्रातील नामांकित काही दैनिकांत आलेली ही बातमी जशीच्या तशी खाली दिली आहे. ती वाचा…

बुलडाण्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याचं अनोखं दर्शन, मुस्लिम बांधवांना भोंगा भेट
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील केळवद येथे हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना भोंगा भेट दिल्याची घटना घडली आहे. येथील हिंदू बांधवांनी एकता आणि बंधुत्वाचं प्रतीक बनत मुस्लिम बांधवांना मशिदीवर भोंगे लावण्यासाठी भोंगाच भेट दिलाय.
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. भोंगे न उतरवल्यास मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे राज्यात भोंग्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. दोन धर्मात तणाव निर्माण होतो आहे. मशिदीवरून भोंगे काढण्यासाठी वातावरण निर्मिती होत आहे. याला अपवाद म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात घडलेलं हिंदू-मुस्लिम एकोप्याचं अनोखं दर्शन.
बुलडाणा तालुक्यातील केळवद गावात हिंदू बांधवांनी गावातील मशिदीला लाऊडस्पीकर म्हणजेच भोंगा भेट दिला आहे. विशेष म्हणजे या केळवद परिसरात एकही मशीद नाही. तरी, शेजारील किन्होळा मुस्लिम बांधवांना बोलावून ईदच्या शुभेच्छांसह हा भोंगा त्यांना भेट देण्यात आला.
वाचक मायबापहो आता तुम्हीच सांगा हा आगीत तेल ओतण्याचा प्रकार आहे की नाही. बुलडाणा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत हिंदू-मुस्लिम एकोप्याचे अनोखे दर्शन घडले, असे या वृत्तपत्राचे म्हणणे आहे. यात कसला आलाय ढेकळाचा एकोपा! हा तर निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट आहे किंवा यामागे कुठल्या तरी राजकीय पक्षाचा हात आहे. कारण कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाही पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते, ही व्याख्या आम्हा वृत्तपत्रात बातम्या लिहिणाऱ्यांपुरतीच मर्यादित होती. आता तिचा उपयोग सर्वसामान्य जनताही करू लागल्याचे पाहून अवघड वाटू लागले आहे. या गावातील महात्म्यांनी भोंगा भेट देण्याऐवजी शंभर-दोनशे झाडांची रोपे, पाण्यासाठी काही साधने असे बरेच काही त्यांच्यासाठी आणि इतरांसाठीही उपयोगी साहित्य द्यायला पाहिजे होते. पण असे केले तर ब्रेकिंग न्यूज झाली नसती. हिंदु-मुस्लिम एकोपाही झाला नसता ना…काय अवघड आहे राव…कुठे चाललोय आपण? कुठे ओढून नेतायत आपल्याला? याचा हल्ली कुणी विचारच करेनासे झालेय. ग्रामीण भागात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. औरंगाबादसारख्या महानगरात चक्क नऊ-दहा दिवसांनंतर पाणी सोडले जात आहे. शेतकऱ्यांना पेरणीच्या आणि सर्वसामान्यांना मुलांच्या शिक्षणाचे वेध लागून झोप उडाली आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडताना व्यापार -उद्योग करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि आपले पुढारी, सरकार, विरोधक भोंग्याच्या राजकारणाच्या आगीत पोळी भाजून घेत आहेत. काही सर्वसामान्य लोक भोंगे भेट देऊन आणि काही माध्यमं त्यांना प्रसिद्धी देऊन या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. पण एक लक्षात ठेवा आगीत तेल ओतणार्‍यांचे हात जळतात असे म्हणतात…अशा आगीत मात्र तेल ओतणारे जळून भस्मसात होतात. म्हणून एकच सल्ला आम्ही देऊ… वेळीच सावध व्हा!

पायाकडे हात जातील असे गुरू हवेत..
पायाकडे हात जातील असे गुरुजी आज हवे आहेत..तशी परिस्थिती आज राहिली नाही..शिक्षक विद्यार्थी नाते संपुष्टात येवू पाहत आहे..माझी शाळा,त्याकाळचे गुरुजी आज सगळे बदलले आहे..मला माझे लहानपण आजही लख्ख आठवते..धावपळ करत गाठलेली प्रतिज्ञा,हातावर खाल्लेले छडीचे मार..छताला दोरी बांधून घोड्यावर घालून खालून रुळाने मार..दोन बोटात पेन्सिल ठेऊन अभ्यास नाही झाल्यास गुरुजींनी केलेली शिक्षा..वर्गाच्या बाहेर केलेला कोंबडा,उजळणी पाठ नाही झाली तर बेंचवर उभा करून दिलेले फटके,आगाऊपणा केला तर शाळेत गुरुजींचा मार आणि घरी आल्यावर आईचे फटके..सगळे सगळे आज आठवत आहे.गुरू शिष्य परंपरा असायला हवी..एक बंधन असायला हवे..कुणाचा तरी धाक असल्याशिवाय आपल्यात बदल होत नाहीत..हल्ली छडी संपुष्टात आली..मारणारे शिक्षक संपले..जे मारतात त्यांनाच पालक भांडायला जातात आणि शाळेत धिंगाणा करतात..आम्ही डबल मार खायचो..
माझी शाळा ज्या शिक्षकाने बांधली,ते नणंदकर गुरुजी आजही गावकऱ्यांच्या लक्षात आहेत.उंचे पुरे,लोकमान्य टिळक यांच्यासारखे धिप्पाड आणि मिशाही तशाच..सगळे गाव विरोधात गेले सर थांबले नाहीत,त्यांनी डोक्यावर दगड आणून शाळेची इमारत बांधली,पुन्हा सगळे गाव कामाला लागले..इतका भूकंप झाला आजही माझी शाळा त्याच ताठ मानेने उभी आहे.असे शिक्षक आता राहिले नाही..गाव जवळ करणारे,शाळा सोडून शेताकडे लक्ष देणाऱ्या शिक्षकामुळे मूल्ये संपत चालली आहेत..माझे जोशी नावाचे शिक्षक असेच होते..हातात सापडेल ते घेवून गावभर फिरायचे,मुलगा बाहेर हुंदडताना दिसला की घरी मारत घेवून जायचे..माझी गावातली स्कॉलरशिप परीक्षा आजही आठवते.जोशी सरानी माझे कुलकर्णीचे जेवरीकर नामकरण केले..मी स्कॉलरशिपचा अभ्यास करत नव्हतो..एकेदिवशी बोलावून घेवून.विचारणा सुरू झाली..मी काही बोललो नाही,सर उद्यापासून अभ्यास करतो इतकेच म्हटले..तो दिवस आजही आठवतो.पंधरा मिनिटे घोड्यावर घालून खालून छडीने मारायला सुरुवात केली..मी पहिले ते दहावी वर्गात पहिला असणारा विद्यार्थी..मात्र खोडकर असल्याने मार खावा लागायचा..जोशी सर मला खूप वर्षांनी औरंगाबादला भेटले ..मी आणि मंजुषा दोघेही सत्कार करण्यासाठी गेलो,त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून मी कृतकृत झालो..अशी माणसे आज राहिली नाहीत..माझी समस्त शिक्षकांना विनंती आहे,आपल्या पायाकडे जेव्हा विद्यार्थ्याचे हात आपोआप वळतील त्यादिवशी तुम्ही धन्य झालात..ही जादू तयार करता आली पाहिजे..पगारापुरती नोकरी न करता वाहून घेऊन काम करणारी शिक्षकाची पिढी आज गरजेची आहे..आणि तसे पालकही..आम्ही झाडाखाली बसून शिकलो,आज सगळे जग विद्यार्थ्यांच्या हातात आहे..गुगल नावाच्या app ने तुम्हाला सगळी सारे उघडी करून दिली आहेत..फक्त गरज आहे संस्काराची..एका प्रामाणिक शिक्षकाची..विद्यार्थ्याला आपला विद्यार्थी समजून घडवण्याची..

जेव्हा आपल्या पायाकडे आमचे हात आपोआप जातील तेव्हाच तुम्ही आदर्श शिक्षक..स्पर्धेच्या जगात,वशिले लावून आदर्श शिक्षक पुरस्कार घेणारे अनेक शिक्षक मी पाहतो..ती लाचारी बंद व्हायला हवी..गुरुजीपेक्षा कोणीही मोठा नाही..गुरू शिवाय ज्ञान व्यर्थ..मात्र तसा एक तरी गुरू आयुष्यात यावा आणि आयुष्य आनंदी व्हावे…

समस्त गुरुजींना,ज्यांनी मला घडवलं,बिघडवल त्या सर्वांना आजच्या दिवशी मनपूर्वक शुभेच्छा…

@ संजय जेवरीकर
पत्रकार

इस्माइल : कालबाह्य शिक्षणपद्धतीचा बळी !
विशेष संपादकीय…!
डॉ. प्रभू गोरे, संपादक

एखादी गोष्ट आपण मनापासून केली तर ती मिळवून देण्यासाठी सर्व जग आपल्यासोबत असते, असे म्हणतात. तसेच उघड्या डोळ्यांनी पाहिलेली सारी स्वप्ने साकार होतात, असेही म्हणतात. पण इस्माइल या ध्येयवेड्या युवकाच्या बाबतीत कुठल्याही पुराणातल्या गोष्टी सत्यात उतरल्या नाहीत. दिल है छोटा सा। छोटी सी आशा। मस्ती भरे मन की। भोली सी आशा। चाँद तारों को। छूने की आशा। आसमानों में उड़ने की आशा।। असे म्हणत लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नाचा शेवट इस्माइलच्या मृत्यूने झाला आणि त्याचा तो शेवटचा लाइव्ह मृत्यूचा व्हिडीओ बघणाऱ्यांचे हृदय भरून आले. हा फक्त इस्माइलच्या आकाशस्वप्नांचा अंत नसून जे असे जगावेगळे करू शकतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन, साधनसामुग्री मिळत नाही त्या सर्वांच्याच स्वप्नांचा अंत होय. फक्त आठवीपर्यंत शिकलेल्या इस्माइलने अतिशय कल्पकतेने आणि स्वबळावर हेलिकॉप्टर तयार केले होते. उद्या १५ ऑगस्टला ते हेलिकॉप्टर आकाशात उडवून आपल्या स्वप्नांना गवसणी घालू, असा निर्धार त्याने केला होता. परंतु चाचणीदरम्यान हेलिकॉप्टरचा पंखा तुटला आणि इस्माईलच्या आयुष्याचा दोरही त्या पंख्यासोबत तुटला. शेख इस्माइल पत्रे कारागीर असल्याने तो अलमारी, कूलर अशी विविध उपकरणे बनवायचा. एक दिवस त्याला हेलिकॉप्टर बनवण्याची कल्पना सुचली. आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तरी त्याची स्वप्ने मोठी होती आणि ही स्वप्ने त्याला झोपू देत नव्हती. आपल्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्याने हेलिकॉप्टर तयार करण्यास सुरुवात केली. हेलिकॉप्टरसाठी लागणारा एक एक सुटा भाग तो तयार करीत होता. दोन वर्षांच्या कठोर मेहनतीतून अखेर हेलिकॉप्टर तयार झाले. मंगळवारी रात्री त्याने हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले. इंजिन ७५० अ‍ॅम्पियरचे होते. चाचणी व्यवस्थित सुरू असताना अचानक हेलिकॉप्टरचा मागचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर धडकला आणि आकाशाला गवसणी घालण्याआधीच शेख इस्माइलचे डोळे मिटले. स्वदेशी हेलिकॉप्टर बनवण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या इस्माइलचे ग्रामस्थांकडून कौतुक होत होते. त्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गावाचे नावही जगासमोर येईल, असे स्वप्न फुलसावंगीसह आजूबाजूच्या गावकऱ्यांचेही होते. इस्माइल प्रचंड ध्येयवेडा होता. पण त्याने जरा जास्तच घाई केली. उड्डाणाचे प्रात्यक्षिक घेण्यापूर्वी त्याने तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता. आता माहितीक्रांतीच्या युगात अशा गोष्टींसाठी घरबसल्या मार्गदर्शन मिळू शकले असते. एवढा हुशार इस्माइल इथं कसा काय चुकला, हा न सुटणारा गुंता आहे. इस्माइलसारखे लाखो युवक ग्रामीण भागात राहून अशी वेगवेगळी स्वप्ने साकार करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांच्याकडे प्रचंड कल्पकता आहे आणि ही कल्पकता सत्यात उतरवण्याची ऊर्जाही आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन व पाठबळाची गरज आहे. शहरातच शिक्षणावर पाण्यासारखा पैसा खर्च करणाऱ्या सरकारने आणि इमारतीचे मजल्यावर मजले चढवणाऱ्या शिक्षणसम्राटांनी ग्रामीण भागाकडे थोडे लक्ष द्यावे. परंपरागत शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचा कल ओळखून शिक्षण देण्याची खरी गरज आहे. फिनलँडमध्ये म्हणे मुलाला खुल्या शाळेत घातल्यावर वर्ष-दोन वर्षं काहीच शिकवत नाहीत. त्याला मोकळे खेळू-बागडू देतात आणि शिक्षक फक्त त्याचे निरीक्षण करतात. तो काय करतो? कुठल्या गोष्टीत त्याला जास्त आवड आहे. सतत सतत तो कुठल्या वस्तू हाताळतो. याचा अतिशय बारकाईने अभ्यास करून मग त्याला ज्या विषयात जास्त आवड आहे त्या विषयाचे शिक्षण दिले जाते. इस्माइल जर त्या देशात जन्मला असता तर आज त्याच्या घरी मातम नसून ईद असती आणि आम्ही त्याच्या मृत्यूवर नव्हे तर पराक्रमावर विशेष संपादकीय लिहिले असते. महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्यांनी आता तरी याचा विचार करावा. इस्माइलचा मृत्यू अपघाती नसून तो आपल्या कालबाह्य शिक्षणपद्धतीने घेतलेला बळी आहे.

नाम में क्या है?
माजी पंतप्रधान राजीव गांधी

विशेष संपादकीय
डॉ. प्रभू गोरे,संपादक

सूड, अपमान, धोका, बदला, आरोप-प्रत्यारोप, गद्दारी हे राजकारणाच्या डिजिटल डायरीतले शब्द अलीकडे क्षणाक्षणाला लाखो राजकारणी सर्च करत आहेत. सत्ता, खुर्ची आली की जनतेचे काम कमी आणि विरोधकांचेच काम तमाम करण्याचा अजेंडा काही अपवाद वगळता जवळपास सर्वच राजकीय पक्ष राबवत आहेत. तिकडे टोकीओत ऑलम्पिकमध्ये आपले खेळाडू देशासाठी जीव तोडून खेळत असताना इकडे देशात राजकीय ऑलम्पिक सुरू झाले आहे. आपले बदलवीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलरत्न पुरस्कारावरून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव काढून टाकले व मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी काय बदलतील याचा कोणालाही अंदाज घेता येत नाही. नोटाबंदीच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ते बदलण्यात किती माहीर आहेत, याचा साक्षात्कार संपूर्ण जगाला आला आहे. यामुळे कालच्या बदलाचा फारसा परिणाम काँग्रेस वगळता इतर कोणावरही झाला नाही आणि होण्याचे तसे काही कारणही नाही. खेळांच्या संबंधित पुरस्काराला खेळाडूचेच नाव शोभून दिसते. नामांतराचे स्पष्टीकरण देताना पंतप्रधान म्हणाले की, देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावे देणे योग्य आहे. देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. १९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, पुलेला गोपिचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम आणि राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. असा देशातला सर्वोच्च पुरस्कार सध्या नामांतरामुळे बदनाम होऊ लागला आहे. राजीव गांधी पंतप्रधान म्हणून देशासाठी वंदनीय आहेत. पण खेळाच्या पुरस्काराला त्यांचे नाव तेव्हा का दिले गेले हे त्या देणाऱ्यांनाच ठाऊक. एखाद्या गोष्टीला नाव देताना थोडा तरी मागचा पुढचा विचार करायला पाहिजे की नाही? का सत्ता आहे म्हणून मनाला येईल ते करायचे. देशात अशा अनेक गोष्टी आहेत. त्यांचा आणि त्यांना देण्यात आलेल्या नावांचा काहीही संबंध नाही. मंत्रिमंडळाचे खातेवाटप करताना जसे मागासवर्गीय नेत्याला समाज कल्याण, महिलेला महिला व बालकल्याण, आदिवासी पुढाऱ्याला आदिवासी विकास खाते देता तसा विचार पुरस्काराला, वास्तूला, योजनेला नाव देतानाही का करत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलरत्नचे नामांतर केले. ते करताना का केले, याचे स्पष्टीकरणही दिले. आता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून स्टेडियमला जे त्याचे नाव देण्यात आले आहे तेही बदलून टाकावे. अन्यथा आज त्यांनी जे पेरले आहे ते उद्या सरकार बदलल्यावर उगवल्याशिवाय राहणार नाही. शेवटी सर्वच नामांतरवीरांना एक सल्ला आहे, “देना ही है तो काम देख के नाम दो। वरना ऐसे नाम मे क्या रखा है ।”

आम्हाला घाबरू नका ! आम्ही वाघ नाही !
विशेष संपादकीय
डॉ.प्रभू गोरे , संपादक

राज्यपाल, त्यांचे कार्य, व्यवस्थेला त्यांचा होणारा फायदा (तोटा), त्यांचा राजेशाही थाट, सत्तेतली अनावश्यक ढवळाढवळ, ज्या पक्षात आयुष्य घातले त्या पक्षाला गैरमार्गाने झुकते माप देणे. या व आणखी कितीतरी आपल्याला माहीत नसलेल्या इतर गोष्टी (भानगडी) हा अतिशय महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी अनेकांनी या विषयाचे संशोधन केले. त्यावर राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे झाली. अनेकांनी शोधपेपरही (इकडून तिकडून शोधाशोध करून, चोरून नव्हे) वाचले. पण राज्यपाल ज्या विद्यापीठाचे कुलपती असतात (कुणाचे नाही, कुलाचे पती) त्या विद्यापीठात जशी संशोधने आणि चर्चासत्रे होतात व लाखोंचा खर्च होतो. पण पेपरात बातम्या येण्यापलीकडे त्यांचा काडीचाही उपयोग होत नाही. तसेच राज्यपाल आणि त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या संशोधनाचे आणि चर्चांचेही झाले आहे. मागे कुणीतरी राज्यपालांना राजकीय पेन्शनर्स आणि राज्यपाल भवनाला वृद्धाश्रम अशी मार्मिक (धार्मिक नव्हे) उपमा दिली होती.ती खरी का खोटी हे तुम्हाला आम्ही कसे सांगणार ? असो..! राज्यपाल हा विषयच या पदासारखा मोठा (खोटा नव्हे). त्यावर किती लिहावे आणि किती लिहू नये. हा विद्यापीठातल्या संशोधनासारखा विषय आहे. आज राज्यपाल चालिसा पठनामागे काल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलेली भीती हे कारण आहे. सध्या ते राज्यस्तरीय वादळी (वादग्रस्त वाचले तर हरकत नाही) दौऱ्यावर आहेत. सत्तेवर आल्यापासून (भाजपला झटका देऊन) कायम शिवसेनेचा वाघ राज्यपाल भवनाला घेरून बसला आहे. त्यांनी नुसते खोकलले तरी पठ्ठ्या डरकाळ्या (कोरड्या) देत आहे. आपण बघतो त्या सर्कसमध्ये वाघ पिंजऱ्यात आणि त्याचा मालक बाहेर असतो. या सर्कशीत उलटे आहे. वाघ बाहेर आणि मालक पिंजऱ्यात आहे. या वाघामुळे राज्यपालांना सध्या कशाचीही भीती वाटू लागली आहे. म्हणूनच त्यांनी ‘मुझे दुनिया में सबसे ज्यादा डर लगता है, ताे वाे मीडियासे!’ असे वक्तव्य केले की काय ? असा प्रश्न आमच्यासह तमाम महाराष्ट्राला (यात जय महाराष्ट्रवालेही आले) पडला आहे. वाघाला (खऱ्या) घाबरणे आम्ही समजू शकतो, पण माध्यमांना ते का घाबरत असतील बरे? याचे संशोधन ते ज्या विद्यापीठाचे कुलपती आहेत, तिथल्या एखाद्या कुलगुरूने (प्राध्यापकांच्या आवाक्याबाहेरचा विषय असल्याने) केले तर अपेक्षित तथ्य सापडेल. तूर्त आमचे महामहीम राज्यपाल महोदयांना एकच सांगणे आहे की, आम्हाला घाबरू नका, आम्ही वाघ नाही !

गोष्ट छोटी डोंगराएवढी
विशेष संपादकीय !
डॉ. प्रभू गोरे, संपादक

राजकारणातल्या टीकेला आणि प्रेमातल्या आणाभाकांना जास्त महत्त्व द्यायचे नसते म्हणतात. अलीकडचे सत्तापिसाट राजकारण आणि सोशल मीडियावरील बेगडी प्रेम बघून वरचे वाक्य शंभर टक्के खरे वाटू लागले आहे. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए, असे म्हणून निवडणुका लढलेले आणि त्याच रामाच्या नावावर निवडून आलेल्यांनी सत्तेसाठी कशा रात्री जागवल्या आणि कशी तत्वे वेशीला टांगली हे जगाने पाहिले. आता हे सारे आम्ही किती धुतल्या तांदळासारखे आहोत ते तोंडाला फेस येईपर्यंत सांगत सुटले आहेत. मराठी माणसांचे कोणी आणि कसे वाटोळे केले याचाही नव्याने विचार मांडला जात आहे. शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री आणि दोन, तीन पक्षांत पर्यटन करून सध्या भाजपवासी झालेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नीतेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. मराठी माणसाचा व नव्या शिवसेनेचा संबंध काय? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना असल्याचाही आरोप केला. नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय? आधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला. बाळासाहेब यांची सेना आहे कुठे? मराठी माणसाची संघटना म्हणे.. मग.. बेस्टच्या जागा – बीएमसी काँट्रॅक्ट – दिनो, रात्रीच्या पार्ट्या – पटानी.. कपूर.. जॅकलीन, इथे कुठे शाखाप्रमुख दिसत नाहीत ? मराठी माणूस दिसत नाही ? महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण.. त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा. तसेच, शिवसेनेतील बाटग्यांचे… महामंडळाची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहितीसाठी.. – सचिन अहीर – बीकेएसची जबाबदारी, राहुल कनाल – शिर्डी संस्था, आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था, उदय सामंत – कॅबिनेट मंत्री, अब्दुल सत्तार – मंत्री, प्रियांका चतुर्वेदी – खासदार यादी मोठी आहे.. इथे कुठेही डाके.. रावते.. रामदास कदम.. शिवतारे.. राजन साळवी, सुनील शिंदे यासारखे जुने सैनिक दिसणार नाहीत. स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषणे द्यायची!! असा थेट हल्ला चिरंजीव राणेंनी केला. ही टीका करताना छोटे सरकार हे विसरले की त्यांचे वडील कोण होते? कुठे होते? काय करत होते? ते म्हणतात ना दुसऱ्याकडे एक बोट दाखवले की आपल्याकडे चार असतात. राणे पिता- पुत्रांकडे तर नऊ बोटे आहेत. त्यामुळे मराठी माणसांनी चिरंजीव राणे यांच्या टीकेकडे कोरोनाच्या आकडेवारीसारखे दुर्लक्षच केलेले बरे. असो ! ही गोष्ट तशी छोटी आहे पण शिवसेनेसाठी डोंगराएवढी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बदल झाले आहेत. त्यामुळे कट्टर शिवसैनिकांच्या मनात काय सुरू आहे, याचा विचार पक्षप्रमुखांनी करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे.

राजकारणातल्या टीकेला आणि प्रेमातल्या आणाभाकांना जास्त महत्त्व द्यायचे नसते म्हणतात. अलीकडचे सत्तापिसाट राजकारण आणि सोशल मीडियावरील बेगडी प्रेम बघून वरचे वाक्य शंभर टक्के खरे वाटू लागले आहे. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए, असे म्हणून निवडणुका लढलेले आणि त्याच रामाच्या नावावर निवडून आलेल्यांनी सत्तेसाठी कशा रात्री जागवल्या आणि कशी तत्वे वेशीला टांगली हे जगाने पाहिले. आता हे सारे आम्ही किती धुतल्या तांदळासारखे आहोत ते तोंडाला फेस येईपर्यंत सांगत सुटले आहेत. मराठी माणसांचे कोणी आणि कसे वाटोळे केले याचाही नव्याने विचार मांडला जात आहे. शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री आणि दोन, तीन पक्षांत पर्यटन करून सध्या भाजपवासी झालेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नीतेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. मराठी माणसाचा व नव्या शिवसेनेचा संबंध काय? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना असल्याचाही आरोप केला. नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय? आधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला. बाळासाहेब यांची सेना आहे कुठे? मराठी माणसाची संघटना म्हणे.. मग.. बेस्टच्या जागा – बीएमसी काँट्रॅक्ट – दिनो, रात्रीच्या पार्ट्या – पटानी.. कपूर.. जॅकलीन, इथे कुठे शाखाप्रमुख दिसत नाहीत ? मराठी माणूस दिसत नाही ? महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण.. त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा. तसेच, शिवसेनेतील बाटग्यांचे… महामंडळाची यादी तशी लांब आहे.. पण थोडी माहितीसाठी.. – सचिन अहीर – बीकेएसची जबाबदारी, राहुल कनाल – शिर्डी संस्था, आदेश बांदेकर – सिद्धिविनायक संस्था, उदय सामंत – कॅबिनेट मंत्री, अब्दुल सत्तार – मंत्री, प्रियांका चतुर्वेदी – खासदार यादी मोठी आहे.. इथे कुठेही डाके.. रावते.. रामदास कदम.. शिवतारे.. राजन साळवी, सुनील शिंदे यासारखे जुने सैनिक दिसणार नाहीत. स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषणे द्यायची!! असा थेट हल्ला चिरंजीव राणेंनी केला. ही टीका करताना छोटे सरकार हे विसरले की त्यांचे वडील कोण होते? कुठे होते? काय करत होते? ते म्हणतात ना दुसऱ्याकडे एक बोट दाखवले की आपल्याकडे चार असतात. राणे पिता- पुत्रांकडे तर नऊ बोटे आहेत. त्यामुळे मराठी माणसांनी चिरंजीव राणे यांच्या टीकेकडे कोरोनाच्या आकडेवारीसारखे दुर्लक्षच केलेले बरे. असो ! ही गोष्ट तशी छोटी आहे पण शिवसेनेसाठी डोंगराएवढी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बदल झाले आहेत. त्यामुळे कट्टर शिवसैनिकांच्या मनात काय सुरू आहे, याचा विचार पक्षप्रमुखांनी करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे.