आध्यात्म - Adhunik Kesari

पैठण : नाथवाड्यातील रांजणाच्या पूजेने श्रीएकनाथ षष्ठीला आजपासून औपचारिक प्रारंभ !
आधुनिक केसरी

दादासाहेब घोडके

पैठण : फाल्गुन कृष्ण द्वितीयेला तुकाराम महाराज यांच्या  बिजेपासून नाथांच्या षष्ठी  सोहळा उत्सव  सुरू होतो. मग या दिवशी नाथ वंशज राजंणाची पूजाकरून पैठणातील ब्रम्हवृंद, नाथवंशज, नाथांवर श्रद्धा असणारे देशातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व यात सामील होतात तुकाराम बीजेच्या दिवशी नाथ  वंशजातील सुवासिनी  पहिल्यांदा त्या रांजणात पाणी भरते आणि पुढे हा रांजण भरण्याचा कार्यक्रम चालू होतो.
कधी पहिल्या दिवशी तर कधी चौथ्या  दिवशी हा श्रीखंड्या ने पाणी भरलेला राजंन भरतो.
संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवान श्रीकृष्णाने १२ वर्षे श्रीखंड्या हे नाव धारणकरुन ज्या रांजणात पाणी भरले त्या रांजणाची पूजा आज गावातील नाथमंदिर येथे उत्साहात संपन्न झाली. संस्थान व सालक-यांच्या वतीने नाथवंशज श्री वेणीमाधव ऊर्फ सरदार महाराज गोसावी, छैय्या महाराज, हरिपंडीत महाराज, मेघशाम महाराज यांनी नागेशगुरु उपाध्ये, सौरभगुरु पोहेकर यांसह ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात पवित्र अशा रांजणाची पूजा केली. या प्रसंगी सालकरी श्री योगिराज महाराज, ज्ञानराज महाराज यांसह विनित महाराज,विठ्ठलबुवा, भगवानबुवा,, श्रीरंगबुवा, मिथिलबुवा, शुभमबुवा, चैतन्यभाऊ, आदींसह शेकडो भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता. नाथवंशीय सौ. भाग्यश्री वेणीमाधव गोसावी यांच्या हस्ते प्रथम घागर रांजणात ओतुन पवित्र रांजण भरण्यास प्रारंभ करण्यात आल्याने  रविवार दि,१६ रोजी संत तुकाराम महाराज बिजेच्या दिवशी  पैठण येथे संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ झाला.

आपेगावी भाविकांनी अनुभवली अध्यात्म आणि वास्तुशास्त्राची अनुभुती ; पहील्याच दिवशी झाले माऊलींच्या मुखावर सुर्य दर्शन
आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण : दि,२६  मंगळवार आज  सुर्य कीरणोत्सवा निमित्त  श्रीक्षेत्र आपेगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमीत संत ज्ञानेश्वर माऊलीच्या मुखावर कार्तिकी एकादशीच्या शुभ पर्वावर मंगळवारी दुपारी १२ वाजुन ५२  मिनिटाने सुर्ये दर्शन झाले.
किरणोत्सवाचा आज पहिला दिवस असल्याने सुर्याची किरणे काही प्रमाणात आल्यावर भाविकांनी माऊलीच्या नावाचा जयघोष केला.
दरम्यान उद्या बुधवार,तसेच संत ज्ञानेश्वर महाराज समाधी प्रसंगी गुरुवारी दुपारी १२ वाजुन ५२ मिनिटाने माऊलींच्या मुखावर संपूर्ण सुर्ये दर्शन होणार असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान अध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी दिली.

आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज येथील माऊलींच्या जन्मभुमी असलेल्या मंंदिरातील मुर्तीवर गेल्या तीन वर्षापासून समाधी सोहळ्यात किरणोत्सव,सुर्य दर्शन होत असल्याने हा वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचा सुंदर अविष्काराची अनुभुती  पाहण्यासाठी भाविक आपेगावात दाखल होत आहेत.

जगातील सर्वाधिक वयोवृद्ध पद्मश्री शिवानंदगिरी बाबा यांनी घेतले साईंचे दर्शन
आधुनिक केसरी न्यूज

शिर्डी : जगातील सगळ्यात वयोवृद्ध  असलेले   काशी येथे राहत असलेले १२९  वर्षाचे  पश्चिम बंगाल मध्ये जन्म झालेले पद्मश्री शिवानंदगिरी बाबा यांनी रविवार दिनांक २५  ऑगस्ट रोजी साईबाबांचे दर्शन घेऊन आरती देखील घेतली.
त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ मध्ये बांगलादेशात झाला होता घरची अत्यंत गरिबी होती वयाच्या चार वर्षापर्यंत फक्त भाताची पेज खाऊन अन्नग्रहण केले होते कारण गरिबी हे मागचे कारण होते अगोदर बहिणीचे  व नंतर सहाव्या वर्षी एकाच दिवशी आई-वडिलांचे निधन झाले   नंतर पश्चिम बंगालमधील ओकारानंद  गोस्वामी यांच्या आश्रमात ते दाखल झाले आयुष्यभर त्यांनी ब्रह्मचर्य वृत्त धारण केले सध्या ते जगातले सगळ्यात वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहे सकाळी तीन वाजता उठणे एक तास जप करणे एक तास योगा करणे एक तास गीता नामस्मरण करणे नंतर गरिबांची व कुष्ठरोग यांच्या सेवेत दिवसभर कार्य करणे अशी दिनचर्या असून त्यांनी दूध मिठाई फळ साखर याचा देखील त्याग  केलेला आहे निस्वार्थ सेवा व योगासाठी केलेल्या कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन दोन वर्षांपूर्वी सन्मानित करण्यात आले होते या अगोदर साठ वर्षांपूर्वी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते साईबाबांवर त्यांची मोठी नेतांत श्रद्धा असल्याची देखील त्यांनी सांगितले त्याचा साईबाबा संस्थान च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर उप कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे मंदिर प्रमुख विष्णूपंत थोरात यांच्या हस्ते साई  प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

दिर्घ आयुष्याचे कारण!
ब्रह्मचर्य वृत्त , पहाटे उठणे ध्यान जप करणे  , एक तास योगा, एक तास  गितापाठ, दुध मिठाई
साखर याचा त्याग मोह मायेचा त्याग व निस्वार्थ कुष्ठरोगी व गरिबांची सेवा
पद्मश्री शिवानंदगिरी

साईभक्ताच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या साईबाबांना ४३लाखाचा सोन्याचा मुकुट दान
आधुनिक केसरी न्यूज

शिर्डी : भारतात बालाजी नंतर दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व मोठा नावलौकिक असलेल्या व साईभक्त भाविकांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या  श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज एका साईभक्ताने  ४३ लाख रुपये किंमतीचा साईचरणी ६४८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
या सोनेरी मुकूटाची किंमत ४२ लाख ८० हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षिकाम असलेला आकर्षक  व मनमोहक दिसणारा सुवर्णजडीत मुकुट साईबाबांच्या मुर्तीवर चढवण्यात आला. मुर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशुर साईभक्‍ताने संस्थानला दान स्वरूपात  दिला असून आपले  नाव जाहीर न करण्याची विनंती करत हे गुप्त दान असल्याचे सांगितले आहे  दिवसेंदिवस दानराशी वाढत असताना सुवर्ण अलंकार दागदागिने हिरे हार मुकुट अशा प्रकारचे सुवर्ण अलंकार असलेले दागदागिने दान स्वरूपात येत असून यात अनेक दानशूर दान करताना दान गुप्त दान स्वरूपात दान देताना नाव गुप्त ठेवण्याची काळजी देखील साईभक्त घेत आहेत साईबाबा संस्थान येणाऱ्या दानातुन मोफत भोजनालय  हजारो साईभक्त भाविकांना निवास सुविधा त्या बरोबरच शैक्षणिक सुविधा तसेच हजारो रुग्णांना साईबाबा संस्थान व साईनाथ रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देत असुन वर्षाकाठी काही कोटी भाविक साईबाबा मंदिराला भेट देत असुन त्याच्या सेवेसाठी हजारो हात २४तास अविरत सेवा देण्यासाठी योगदान देत आहे  त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष यार्लागड्डा जिल्हा अधिकारी सिध्दाराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

शिर्डीचा इतिहास संसद भवनाच्या लायब्ररीत
आधुनिक केसरी न्यूज

शिर्डी : पत्रकार प्रमोद आहे लिखित शिर्डी गॅझेटिअर हा इंग्रजी भाषेतील संदर्भ ग्रंथ संसदेच्या लायब्ररीत समाविष्ट करण्यात आला आहे नुकतेच पद्मश्री पद्मभूषण सुधा मूर्ती यांच्या हस्ते व राज्यसभा उपसभापती हरिवंश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे प्रकाशक शिर्डीत संपन्न झाले होते
साईंच्या इतिहासाची माहिती करून घेण्यासाठी लाखो साई भक्त प्रयत्न करीत आहे त्यासाठी साई संस्थांनने साई सच्चारित्र या पवित्र ग्रंथाची अनेक भाषेत निर्मिती करून प्रकाशित केले आहे मात्र साईबाबांच्या जीवनातील अनेक घटना तसेच  त्यांच्या सानिध्यात प्रत्यक्ष संबंध आलेल्या  व्यक्ती घराणे याबाबत अनेकांना माहिती नव्हती प्रमोद आहेर यांनी या कुटुंबातील सदस्यांची बारीक-सारीक माहिती करून गोळा केली जी माहिती गोळा केली ती आतापर्यंत कोणालाही नव्हती  तो इतिहास त्यांनी आपल्या भाषेत लेखणीतून सर्वप्रथम मराठी भाषेत शिर्डी गॅझेटिअर (अटोल्ड स्टोरी) या त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुस्तकातून लोकांसमोर मांडल्या  हिंदी आवृत्तीचे प्रकाशन झाल्यानंतर शिर्डीत एक दिवस राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह हे साई दर्शनासाठी आले होते  त्यांची मायबोली इंग्रजी असल्याने साईबाबांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली त्यानंतर त्यांनी मराठी व हिंदी यांची प्रत त्यांना भेट दिली हे पुस्तक नसून ग्रंथ असल्याने त्याचे इंग्रजीत अनुवादित करा असं त्यांनी सांगितलं  अथक प्रयत्न केल्यानंतर साईभक्त जाजु यांनी प्रमोद आहेर यांना मदत केली खासदार सुधा मूर्ती यांनीही हे पुस्तक मागवुन घेऊन सर्व काही उत्तम अनुवादित केली व प्रकाशन करण्यास काही हरकत नाही असा सल्लाही दिला

साईभक्त भाविकांसाठी भोजणालयात तीन टन आंब्याचा रस
आधुनिक केसरी न्यूज

किशोर पाटणी

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या माध्यमातून साई प्रसाद भोजणालयात निःशुल्क प्रतिदिन  साईभक्त भाविकांच्या  आलेल्या दान राशीतुन वर्षाकाठी कोट्यवधी साईभक्त भाविकांना दिवसभर भोजन दिले. जाते  त्यात दिवसभरात किमान ५०हजार लोक लाभ घेतात
साईभक्त  पुणे जिल्ह्यातील   शिरूर तालुक्यातील चव्हाण वाडी येथील  रवि नारायण करगळ, यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी ३ टन केशर आंबे श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले होते  अशी माहिती श्री साईबाबा  संस्‍थानचे मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. गुरूवार ६ जुन  रोजी संस्‍थानच्‍या साई प्रसादालयात साईभक्‍तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्‍यांच्‍या रसाचा समावेश करण्यात आला होता हजारो साईभक्त भाविकांनी आंबा रसाच्या जेवनाचा आस्वाद घेतला साईबाबा संस्थानच्या माध्यमातून रोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत महाराष्ट्र सहपरिराज्यातून येणाऱ्या साई भक्तांना चांगल्या पद्धतीने शुद्ध  रुचकर स्वादिष्ट असे भोजन दिले जाते त्यात वरण-भात पोळी दोन भाज्या व एक गोड पदार्थ अशा मेनुचा समावेश असतो त्याबरोबरच  शिरा देखील. दिला जातो त्याबरोबरच सकाळच्या वेळी शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना विविध ठिकाणी अवघ्या पाच रुपयात नाष्टा पाकीट विविध ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात त्यात पाचपुऱ्या एक गोड पदार्थ व मटकी उसळ याचा समावेश असतो साईबाबा संस्थान च्या माध्यमातून जवळपास मुख्य प्रसाद भोजनालयासह जवळपास चार-पाच ठिकाणी भोजन प्रसादाची व्यवस्था देखील साईबाबा संस्थानने केलेली   आहे तसेच साईबाबा संस्थान साई सुपर हॉस्पिटल या ठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाना व त्यांच्या नातेवाईकांना देखील मोफत प्रसाद भोजन दिले जाते माफक दरात  भव्य अशी निवास व्यवस्था मोफत वैद्यकीय उपचार व मोफत प्रसाद भोजन  आधी सह विविध संस्था साईबाबा संस्थानच्या माध्यमातून देशभरातून येणाऱ्या साई भक्तांना दिल्या जात असल्यामुळे दिवसेंदिवस साईभक्तांची जशी गर्दी वाढत आहे त्याबरोबर साई संस्थांनच्या दानराशित देखील  देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याची दिसून येत आहे

उन्हाचा दाह टाळण्यासाठी नाथांच्या समाधीस चंदनलेप
आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण : उन्हाचा दाह कमी व्हावा म्हणून पैठण येथील नाथमंदिरातील विजयी पांडुरंग व नाथ महाराज समाधीला चंदनउटीचा लेप लावण्यास सुरवात झाली आहे . मृग नक्षत्र संपेपर्यंत दररोज चंदन उटी लावण्यात येते . मार्चपासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागला . देव , संतांच्या मूर्तीना उन्हाचा त्रास कमी व्हावा , यासाठी  पूजाही केली जाते . भाविक चंदनउटी पूजेची आवर्जून प्रतीक्षा करतात . वसंत ऋतूमधील पहिली दशमी गुरुवारी  दि,१८  रोजी  होती . या तिथीला हा धार्मिक विधी करण्यात आला . शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या राहत्या वाड्यात म्हणजेच गावातील नाथमंदिरातील मूर्तीची  विधिवत पूजा करण्यात आली . अभिषेक झाल्यावर मूर्तीला चंदनलेप लावण्यात आला .
श्रीखंडं चंदनं दिव्यं
गन्धद्यं सुमनोहरम् ।
विलेपनं सुरश्रेष्ठ
चंदनं प्रतिगृह्यताम् ॥
या श्लोकाप्रमाणे भगवंताला व नाथ महाराजांना गावातील व बाहेरील नाथ मंदिरात वसंत ऋतूनिमित्त परंपरेने चंदन उटी वसंत पूजा संपन्न झाली.मराठवाड्याचे वैभव असणारा विजय पांडुरंग भगवान व शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज यांची समाधी या दोन्हीही मंदिरात चैत्र शुद्ध दशमी अर्थात वसंत ऋतुनिमित्त दर दशमीला गावातील नाथ मंदिरात म्हणजेच भगवान श्री विजय पांडुरंगाच्या मूर्तीस व शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या समाधीला उन्हाळ्यापासून उष्णतेपासून थंडावा मिळावा यासाठी उगाळलेला चंदनलेप लावून व उन्हाळ्यातील शीत वस्तू शीत पदार्थ अर्थात टरबूज खरबूज कैरीचे पन्हे , मोगऱ्याचे हार , गुलाबाचे हार , या पद्धतीने आकर्षक सजावट करून व या पदार्थांचा नैवेद्य दाखवून ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषांमध्ये शांतीपाठ होऊन या नैवेद्याचा ब्रह्मवृंदांना प्रसाद व दक्षिणा आणि सर्व नाथभक्तांना हा प्रसाद वाटण्यात येतो , यामध्ये प्रामुख्याने श्री विजय पांडुरंगास व समाधीस लावलेल्या चंदनाचा गंधप्रसाद सुद्धा सर्व नाथभक्तांना त्यांच्या कपाळी लावण्यात येतो आणि सर्वांना कैरीचे पन्हे, टरबूज ,खरबूज , आंबा अशा पद्धतीचा प्रसाद वाटप करण्यात येतो. यावर्षीची साल करी संस्थानाधिपती गुरुवर्य रावसाहेब महाराज यांनी व वेदमूर्ती सर्वश्री परीक्षेत देवा वैद्य , विशाल शास्त्री दाणी , सुधीर शास्त्री पैठणकर , नागेश शास्त्री उपाध्ये या सर्वांनी मिळून उटी चंदन उटी भगवंताला लावली व विधिवत पूजा करून सर्व नाथभक्तांना याद्वारे प्रसाद वाटप करण्यात आला. यानंतर 3 मे , 18 मे 2 जून या दिवशी सुद्धा ही वसंत चंदन उटी पूजा संपन्न होणार असल्याचे नाथवंशज डॉ. पुष्कर महाराज गोसावी यांनी ही माहिती दिली.

जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याच्या कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात
आधुनिक केसरी न्यूज

किरणकुमार आवारे

निफाड :- जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याच्या कार्यक्रमास उत्साह पूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. कार्यक्रमास सुरवातीला प्रतिदिन २५ हजार भाविकांनी भेट दिली असून कार्यक्रम सांगतादिनी तब्बल एक लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
मंगळवार दि.२ एप्रिल रोजी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा सकाळी १० ते १२ ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झली. दुपारी ३ ते ५ गुरुवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटी माऊली) यांनी आपल्या मधुर वाणीतून तुकोबारायांचे चरित्र वाचन केले. सायंकाळी ६ ते ८ हरिभक्त परायण गाथामूर्ती ज्ञानेश्वर माऊली कदम (मोठे माऊली) यांचे किर्तन संपन्न झाले. दि.४ एप्रिल बुधवार दि.३ एप्रिल सायं ६ ते ८ आचार्य अर्जुन गुरुजी लाड यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. पहिल्या दोन दिवसात नाशिक व नगर जिल्ह्यातून हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. यामुळे कार्यक्रम परिसराला देहूचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सोहळ्यात भव्य कृषी प्रदर्शन, आरोग्य, सर्व रोगनिदान व उपचार शिबिरासह रक्तदान शिबिराचे उदघाटन संत शिरोमणी तुकोबारायांचे वंशज व देहू संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प माणिक महाराज मोरे, ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) व उपस्थित संत महात्म्यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कृषी, यंत्रसामुग्री, बचत गट उत्पादने, खाद्यपदार्थ, आरोग्य औषधी, रोपवाटीका आदी क्षेत्रात काम करणाऱ्या उत्पादकांनी सहभाग नोंदविलेला आहे. त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरात नाशिक जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटल सेवा देत आहेत. समता ब्लड बँक नाशिक यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे तर लासलगाव येथील कृष्णाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्ररोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तुकोबारायांच्या देहू येथून आलेल्या पादुकांच्या दर्शनासाठी मोठा शामियाना उभारण्यात येऊन त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. परिसरात नेमून दिलेले टाळकरी व विणेकरी ''तुकाराम - तुकाराम" नाम घोषाचा जप रात्रंदिवस करत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याची जय्यत तयारी चालू होती. नियोजन समितीने अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केल्यामुळे कार्यक्रम स्थळाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या सोहळ्यासाठी नाशिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, लासलगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि.भास्करराव शिंदे यांच्या देखरेखीखाली मुख्यालय नाशिक, निफाड उपविभाग व लासलगाव पोलीस स्टेशन येथून ५० पोलिसांची फौज गर्दी नियंत्रण व वाहतूक व्यवस्थापन यासाठी सप्ताह काळात कार्यरत असणार आहे. निफाड नगरपंचायतीच्या माध्यमातून अग्निशामक दलाची गाडीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सप्ताह काळात तालुक्यातून हजारो स्वयंसेवक स्वेच्छेने सहभागी होऊन सेवा देत आहेत. नियोजन समितीच्या वतीने मुक्कामासाठी असलेल्या भाविकांसाठी यथोचित व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी जवळपास १०० एकराच्या वर जागेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच हा सोहळा होत असल्याने दररोज २५ हजाराहून अधिक भाविक येथे येत आहेत. या भाविकांच्या जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी दररोज सकाळी व सायंकाळी एका तालुक्यातील १० गावांतून सुमारे १५००० भाकरीची व्यवस्था केली जात असून भाविकांना आमटी, लापशी व भाताचा महाप्रसाद दिला जात आहे. पुढील दोन दिवसांत भाविकांची संख्या वाढून ५० हजारावर जाणार असल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. सकाळच्या सत्रात भाविकांना बाजरीची भाकर, उसळ, भात, व लापशी तर सायंकाळी बाजरीची भाकर, आमटी, भात व लापशीचा महाप्रसाद दिला जात आहे. पहिल्या दोन दिवसानंतर गोड पदार्थांमध्ये बुंदीचा समावेश केला जाणार आहे. सकाळी नाश्त्यासाठी उपमा किंवा पोहे अशी व्यवस्था आयोजकांनी केली आहे. यासाठी आचारी ३५, महिला कामगार :४०, वाढण्यासाठी स्वयंसेवक ७००, गॅस शेगडी २०, चूल शेगडी २०, मोठे पातेले १००, बादली ७००, घमेले ७००, भांडी नेण्यासाठी छोटे ट्रॅक्टर ४० असे दिवसभराच्या स्वयंपाकाचे नियोजन केले आहे. कार्यक्रमाच्या काळात पाडव्याच्या शुभपर्वकाळात तब्बल एक लाख भाविकांना मांडे जेवणाचे नियोजन आहे. स्वयंसेवकांची जेवण वाढण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. लासलगाव व परिसरातील गावातील सामाजिक मंडळे यामध्ये सहभाग घेत आहेत. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठगमन सोहळा समिती प्रयत्नशील असून भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्याचा लाभ घ्यावा :- गुरुवर्य ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम
आधुनिक केसरी न्यूज

किरणकुमार आवारे

निफाड :- नाशिक - संभाजीनगर महामार्गावरील भरवसफाटा येथे दि.२ एप्रिल पासून सुरु होत असलेल्या जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्ताने आज दि.१ एप्रिल रोजी हॅलिकॉप्टरमधून पादुका आणण्यात आल्या असून या सोहळ्याचा महाराष्ट्रातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुवर्य ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी केले आहे.
मंगळवार दि.२ एप्रिल पासून श्री जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्याचा शुभारंभ होत आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी धर्म ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. गोंदेगाव, भरवस, वाहेगाव, दहेगाव, देवगाव, देशमाने, मुखेड, सत्यगाव, मरळगोई व परिसरातील गावातील तरुण श्रीक्षेत्र भरवस फाटा येथून बुधवार दि. २६ मार्च रोजी देहू येथे प्रस्थान केले.
तुकोबांचे वंशज ह.भ.प.माणिक महाराज मोरे यांचे हस्ते तुकाराम बीजेच्या दिवशी ज्योत प्रज्वलीत करण्यात येऊन सेवेकरी निवृत्ती जगताप व युवकांनी अनवाणी पायांनी अवघ्या बावीस तासात सव्वा दोनशे किलोमीटर अंतर पार करत भरवस फाट्यावर ज्योतीचे आगमन झाले. पवित्र ज्योतीचे लासलगाव पोलिस ठाण्याचे स.पो.नि.भास्कर शिंदे यांनी पुजन केले.
कार्यक्रमासाठी कीर्तन, पारायण, आदींसाठी भव्य अशा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. भाविकांना राहण्यासाठी प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमानिमित्त भारतातील प्रमुख चार पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, श्री जगद्गुरू तुकोबाराय भव्यदिव्य आठ दिवशीय कृषी प्रदर्शन,
प्रतिदिन ५० मृदंगवादक, नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १ आदर्श कीर्तनकारास पुरस्कार, ३७५ युवकांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकोबाराय दिव्यज्योत आगमन, ५०० टाळकरी प्रतिदिन, नियमित ५००० गाथा वाचक, २४ तास तुकाराम नावाचा अखंड भजन पहारा गजर, दररोज ५० हजार भाविकांचे अन्नदान करण्याचे उद्दिष्ट, गुढीपाडव्याच्या शुभ पर्व काळात १ लक्ष भाविकांना मांडे जेवण असे नियोजन असून सोहळ्यास भारतातील जगद्गुरु व महाराष्ट्रातील संतांचे वंशजही प्रतिदिन देणार सदिच्छा भेट देणार आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठगमन सोहळ्याचे मार्गदर्शक गुरुवर्य  ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली)आळंदी देवाची यांनी दिली आहे.

● ' आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा ’ असे म्हणत संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठागमन केले. त्यास ३७५ वर्ष पूर्ण होत आहे. जगतगुरु तुकाराम महाराजांनी अन्याय, समाजातल्या अनिष्ट रुढी, परंपरा यांच्यावर आपल्या साहित्याच्या माध्यमातून जहरी टीका केली होती. मात्र तुकोबांच्या भक्तीने विठ्ठलालाही त्यांना दर्शन देण्यास भाग पाडलं होतं. तेव्हा तुकोबांनी विठ्ठलाला तुझ्या पायाशी सेवा घडावी असा आग्रह केला होता. त्यानंतर विठ्ठलानेही आपला रथ असणारा गरुड तुकोबारांयांसाठी पाठवला होता आणि तुकोबा अमुचा रामराम घ्यावा असं म्हणत सदेह वैकुंठाला गेले होते. तुकोबा ज्या ठिकाणाहून वैकुंठाला गेले त्याच ठिकाणी असलेला नांदुरकी वृक्ष थरारतो अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे

संतश्रेष्ठ तुकोबांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याचे भरवसफाटा येथे दि. २ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत आयोजन
आधुनिक केसरी न्यूज

किरणकुमार आवारे

निफाड :- संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला सन २०२४ - २५ दरम्यान ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने निफाड तालुक्यातील भरवसफाटा येथे मंगळवार दि.२ एप्रिल ते मंगळवार दि. ९ एप्रिल २०२४ या कालावधीत जगद्‌गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, साधू, संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत व भक्तिमय वातावरणात धर्म ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
दि.२ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या सोहळ्यात नियमित पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ८ तुकोबाराय पादुका पंचमान अभिषेक व विष्णू सहस्रनाम, ७ ते १२ संगीतमय पारायण, दुपारी ३ ते ५ तुकोबाराय जीवनचरित्र गाथा, सायं ५ ते ६ हरिपाठ, नियमित रात्रौ ६ ते ८ जाहीर हरिकीर्तन, रात्रौ ८ ते १० महाप्रसाद, रात्रौ १० ते ४ भजन असे कार्यक्रमाचे नियोजन आहे. मंगळवार दि. २ एप्रिल सकाळी १० ते १२ नर्मदामैया सेवक ज्ञानेश्वर माउली शिंदे यांचे कीर्तन, सायं ६ ते ८ ज्ञानेश्वर माउली कदम यांचे कीर्तन, बुधवार दि.३ एप्रिल सायं ६ ते ८ आचार्य अर्जुन गुरुजी लाड, गुरुवार दि.४ एप्रिल सायं ६ ते ८ बंडातात्या कराडकर, शुक्रवार दि.५ बापूसाहेब महाराज देहूकर, शनिवार दि ६  चैतन्य महाराज देगलूरकर, रविवार दि ७ जयवंत महाराज बोधले, सोमवार दि. ८ एप्रिल ज्ञानेश्वर माउली कदम, मंगळवार दि ९ सकाळी १० ते १२ एकनाथ महाराज सदगीर यांचे पूजेचे कीर्तन, सायं ४ ते ६ ज्ञानेश्वर माउली कदम यांचे जाहीर हरी कीर्तन होणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री जगद्गुरु  तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठगमन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

● अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्ये :-
भारतातील प्रमुख चार पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित,
श्री जगद्गुरू तुकोबाराय भव्यदिव्य आठ दिवशीय कृषी प्रदर्शन,
प्रतिदिन ५० मृदंगवादक,
नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १ आदर्श कीर्तनकारास पुरस्कार,
३७५ युवकांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकोबाराय दिव्यज्योत आगमन,
५०० टाळकरी प्रतिदिन,
नियमित ५००० गाथा वाचक,
संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पादुका हेलिकॉप्टरने जिल्ह्यात,
२४ तास तुकाराम नावाचा अखंड भजन पहारा गजर,
दररोज ५० हजार भाविकांचे अन्नदान करण्याचे उद्दिष्ट,
गुढीपाडव्याच्या शुभ पर्व काळात १ लक्ष भाविकांना मांडे जेवण

अस्वछता, अनारोग्य, अज्ञान दूर करूया : चंद्रकांतदादा मोरे
आधुनिक केसरी न्यूज

बाजीराव सोनवणे

नाशिक  : "राष्ट्रसंत तुकडोजी,संत गाडगे बाबां, सद्गुरू मोरेदादा यांनी आपलं आयुष्य समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी खर्ची घातले.स्वच्छता आणि आरोग्याचा मंत्र निरक्षर, अडाणी, अज्ञानी जनतेला देण्यासाठी आयुष्यभर या महात्म्यांनी अखंडीत पायपीट  करून जनजागृती केली. अत्यंत साध्यासोप्या, सामान्य माणसाला समजेल अश्या भाषेत जनप्रबोधन केले. आज खऱ्या अर्थाने हा वारसा पुढे घेऊन जाऊया. महत्वाची बाब अशी की त्र्यंबक आणि नाशिक तीर्थक्षेत्राना आगळे वेगळे महत्व आहे. सिंहस्थ पावन भूमी म्हणून जगभर नाशिक, त्र्यंबकची ओळख असल्यामुळे आणि लवकरच येथे हा महामेळा भरणार असल्याने स्वच्छतेचे अधिकच महत्व आहे ", असे उदगार चंद्रकांत दादा मोरे यांनी काढले
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत  आरोग्य अभियानाच्या अंतर्गत नाशिक शनिवारी   त्र्यंबकेश्वर कुशावर्त परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानानिमित्त ते बोलत होते .
2022 च्या गुरुपौर्णिमेपासून स्वच्छता अभियान , गरजूना वस्त्रदान, आरोग्य तपासणी आणि मोफत औषधधोपचाराचा संयुक्त कार्यक्रम हाती घेण्यात आला . दीड वर्ष  अखंडितपणे हा उपक्रम चालू आहे.
या अभियानात नाशिक जिल्ह्यातील व गुरुपीठ मासिक सभेसाठी आलेल्या राज्यभरातील 300महिला- पुरुष सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदवला.  याला जोडूनच गरीब, गरजूना वस्त्रदान, व गुरुपीठात 290 गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधं वाटप असा संयुक्त कार्यक्रम राबविण्यात आला.
गोदावरी जेथे उगम पावते ते तीर्थ त्र्यंबकेश्वर पासून ती समुद्रास मिळते तेथे म्हणजे राजमहेंद्री, आंध्र प्रदेश पर्यंत हे स्वछता अभियान गुरुमाऊलींच्या आदेशानुसार दीड वर्ष सातत्याने महिन्यातून तिसऱ्या एकदा राबविण्यात येत असल्याची माहिती चंद्रकांतदादा मोरे यांनी दिली.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि समर्थ गुरुपीठाच्या वतीने अष्टविनायक, सर्व ज्योतिर्लिंग, शक्तिपीठे, दत्तपीठे यासह गावागावातील ग्रामदेवता व इतर मंदिरे याठिकाणी स्वच्छता, आरोग्यशिबीरे, अन्नदान, वस्त्रदान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यासह विविध अध्यात्मिक सेवेचे आयोजन मोठया प्रमाणात करण्यात येते आहे, अशी माहीतीही चंद्रकांतदादा मोरे यांनी दिली.
सहभागी सेवेकऱ्यांना केशव घोडेराव, सुनीता काकड यांनी आवश्यक सूचना करून मार्गदर्शन केले.

सकाळची सकारात्मक बातमी : आध्यात्म हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे- ह.भ.प. जयवंत महाराज बोधले
आधुनिक केसरी न्यूज

श्रीक्षेत्र राजुर : येथे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहात  पाचव्या दिवशी ह.भ.प.जयवंत महाराज बोधले यांनी कीर्तनरुपी सेवेचे पुष्प गुंफले. त्यांनी कीर्तन चांग किर्तन चांग ।होय अंग हरी रूप।।या अभंगावर गोड असे निरूपण केले.ह.भ.प.बोधले महाराज यांनी कीर्तनातून वेद, पुराणशास्त्र, संत वाङ्मय इत्यादीचे पुरावे देत श्रोत्यांचे प्रबोधन केले . समाजांना वेगवेगळ्या विषयाचे संघटन, ज्ञान,अध्यात्म, समाज आणि संस्कृती यांना जीवनामध्ये मोलाचे स्थान आहे. अखंड हरीनाम सप्ताहाच्या माध्यमातून हजारो भक्त गणरायाच्या दरबारात हरिनामाशी एकरूप झाला आहे.

कीर्तन ही जीवनामध्ये आनंद आणि समाधान प्राप्त करून देणारी परंपरा आहे. या परंपरेची जोपासना राजूरकरगेल्या  57 वर्षापासून करत आहे. ज्ञानोबांचीची ज्ञानेश्वरी,जगद्गुरु तुकोबांची गाथा,नाथांचे भागवत हे वारकरी संप्रदायांचे तीन बलस्थाने आहोत.संत वाङ्मय प्रत्येक कुटुंबात पोहोचले  पाहिजे. कारण ते जीवनामध्ये योग्य रस्ता दाखवण्याचे कार्य करते.  छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरु तुकोबाराया यांच्या जीवनचरित्रातून भक्तीचा आणि शक्तीचा  एकत्रित संगम दिसून येतो.तरुणांनी निर्व्यसनी जीवनाचा अंगीकार करून अध्यात्माची कास धरावी. थोर संत व राष्ट्र पुरुषांचे आचार,विचार यांचा अंगिकार करावा  असेही जयवंत महाराज बोधले म्हणाले.सप्ताह संयोजन समितीच्या वतीने  विष्णु महाराज सास्ते यांनी ह भ प जयवंत महाराज बोधले यांचे स्वागत केले.