शैक्षणिक - Adhunik Kesari

कायद्याचे उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रणितची लंडन वारी
आधुनिक केसरी न्यूज

राजरत्न भोजने

शेगांव : डॉ. बाबासाहेबांना आदर्श मानून शिक्षणाचे महत्व समजून प्रणित हिंमत भोजने एलएलएम कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आता लंडनला गेला आहे. २६ वर्षाचा प्रणित, बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातल्या वरुड ह्या छोट्याश्या खेड्यातला तरुण. दहावीपर्यंत जिल्हा परिषद मराठी माध्यमातूनच शिक्षण पूर्ण केलं, छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयातून बीएससी झाला, तर व्हीएन पाटील लॉ कॉलेजमधून एलएलबी पदवी यशस्वी संपादन केली. ज्ञानाच्या जोरावर प्रणितची जगात मानल्या जाणाऱ्या ब्रिस्टॉल युनिव्हरसिटी मध्ये एलएलएम, ह्यूमन राईट्स लॉ कायद्याचे उच्चशिक्षण घेण्यासाठी लंडनला निवड झाली आहे.

आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने प्रणितने हॉटेल मध्ये सहावर्षे रात्रपाळीत काम करत शिक्षण पूर्ण केले. तटपुंज्या पगारावर भावंडाचाही शिक्षणाचा पाया रोवला. प्रणित वयाच्या बाराव्या वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे, पुढे छत्रपती संभाजीनगर येथे बहुजन विद्यार्थी  आघाडी संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला, आंदोलने करून हजारो विद्यार्थांच्या समस्या सोडवत त्यांना न्याय मिळवून दिला.

प्रणित उच्चशिक्षणासाठी दि.२३ रोजी रवाना होणार असल्याची वार्ता पंचकृषीत पसरली, तेव्हा गावाचा आणि  परिवाराचा आनंद गगनात मावेनासा होता. प्रणित लंडन येथे रवाना होताना त्याला निरोप देण्यासाठी भोजने परिवाराच्या डोळ्यात आनंदाअश्रू होते. मोठ्या  हर्षउल्हासात गावाकऱ्यांनी मिरवणूक काढत प्रणितला निरोप दिला, व त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू
आधुनिक केसरी न्यूज

देऊळगाव राजा : शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात असताना तालुक्यातील शिनगाव जहागीर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या हातात झाडू देऊन त्यांच्याकडून शाळेची स्वच्छता करून घेण्याचा प्रताप समोर आला आहे. विशेष म्हणजे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेशोत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज २३ जुन रोजी विदर्भातील शाळांचा शैक्षणिक सत्र २०२५-२६ ची सुरुवात करण्यात आली. त्यानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत  देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथील जि.प प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभा द्वारे प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र दादा भुसे पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा परिसर स्वच्छता करणे, कचरा उचलणे या कामाला लावले.एवढेच नव्हे तर चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून पाणी बॉटल चे कॅरेट सुद्धा उचलून घेण्याचे काम करवून घेण्यात आले.एकीकडे विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणुन साजरा करावा, त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे असे आदेश शिक्षण विभागामार्फत देण्यात आले असताना सिनगाव जहागीर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण मंत्री यांच्या कार्यक्रमा च्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांकडूनच स्वच्छता करून घेण्या चा प्रताप जिल्हा परिषद शिक्षकांकडून  घडला आहे.
* गावातील एका शाळेतील विद्यार्थिनींना कार्यक्रमासाठी प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्याची विनंती जिल्हा परिषद शाळे मार्फत करण्यात आली होती. यादरम्यान रांगोळी काढण्यासाठी त्यांच्यातील एखाद्या मुलीने जि.प शाळेतील विद्यार्थ्यांना रांगोळी साठी आवश्यक तेवढी जागा स्वच्छ करण्याचे सांगितले असेल. विद्यार्थी स्वच्छता करीत असताना शाळेतील शिक्षक तिथे उपस्थित नव्हते.
* दादासाहेब मुसदवाले गटशिक्षणाधिकारी पं.स देऊळगाव राजा

दिक्षा वानखडे-शेगोकार यांना वाणिज्य विषयात पीएच.डी पदवी प्रदान
आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विषयात दिक्षा वानखडे-शेगोकार यांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली,दिक्षा वानखडे -शेगोकार यांनी महिला उद्योजकता आणि सक्षमीकरणाच्या विकासात जिल्हा औद्योगिक केंद्राचा अभ्यास:विशेष संदर्भ मराठवाडा आणि विदर्भ या विषयावर डॉ. सतीश ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला, दिक्षा वानखडे यांना पीएच.डी पदवी प्रदान झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे,याप्रसंगी दिक्षा वानखडे यांना प्राचार्य राजेश शेगोकार, डॉ. मिलिंद आठवले,ऍड. नोवेलकुमार हेलोडे,प्रा. शिलवंत गोपनारायण, डॉ.विनोद अंभोरे, डॉ. राहुल तायडे, विवेक वानखडे, प्राजक्ता आठवले, दिव्या हेलोडे, संजय गाडेकर व डॉ.अंकुश गवई यांनी शुभेच्छा दिल्या.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : वरिष्ठ सहायकपदी पदोन्नतीचा मार्ग मोकळा
आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : वरिष्ठ सहायक पदी पदोन्नती देण्यास सांगणारा विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण, औरंगाबाद यांच्या आदेशावर मा उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. कवयित्री संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वरिष्ठ सहायक संतोष बाबूलाल चव्हाण यांच्या पदोन्नतीचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला.

याबाबत हकीगत अशी की, सन 1991 साली संतोष चव्हाण यांची शिपाई पदावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नियुक्ती करण्यात आली. 1993 साली त्यांना सेवेत कायम करण्यात आले. 1998 साली सहायक व 2004 साली वरिष्ठ सहायक म्हणून चव्हाण यांना विशेष मागास प्रवर्गातून पदोन्नती प्रदान करण्यात आली. पदोन्नतीपश्चात चव्हाण यांनी विशेष मागास प्रवर्गाचे आपले जातपडताळणी प्रमाणपत्रही विद्यापीठास सादर केले.

चव्हाण हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने त्यांना विशेष मागास प्रवर्गात देण्यात आलेली वरिष्ठ सहायक पदावरील पदोन्नती चुकीची आहे, नियुक्तीसमयी सेवापुस्तिकेत व सेवाज्येष्ठता यादीत चव्हाण यांच्या नावापुढे जात प्रवर्गात ‘अनुसूचित जमाती’ असा उल्लेख आहे त्यामुळे चव्हाण यांना दिलेली पदोन्नती रद्द करण्यात यावी अशी तक्रार कनिष्ठ सहायक अरूण सपकाळे यांनी विद्यापीठ तक्रार निवारण समितीकडे सादर केली. समितीने चव्हाण यांची पदोन्नती रद्द ठरवली. समितीच्या निर्णयाच्या नाराजीने चव्हाण यांनी महाविद्यालय व विद्यापीठ न्यायाधिकरण यांच्यासमक्ष अपील सादर केले. न्यायाधिकरणाने चव्हाण यांचे अपील मंजूर करून त्यांना नव्वद दिवसात पूर्ववत पदोन्नती देण्याचा आदेश दिला. त्याविरूध्द मूळ तक्रारदार अरूण सपकाळे यांनी मा उच्च न्यायालयासमक्ष दाद मागितली. सपकाळे यांची याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाने महाविद्यालय व विद्यापीठ न्यायाधिकरणाचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला.

केवळ सेवापुस्तिका व सेवाज्येष्ठता यादीतील कार्यालयीन नोंद यावरून कर्मचार्‍याच्या नियुक्तीचा प्रवर्ग ठरवता येत नाही. विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या नोंदीवरून श्री चव्हाण हे अनुसूचित जमातीचे असल्याचे शाबीत होत नाही. उलटपक्षी चव्हाण यांना मिळालेल्या विशेष मागास प्रवर्गाच्या जातप्रमाणपत्रास अथवा पडताळणी समितीच्या वैधता प्रमाणपत्रास कोणत्याही सक्षम न्यायालयाने रद्द ठरवलेले नाही.  कोणत्याही कर्मचार्‍याच्या नियुक्तीचा मूळ प्रवर्ग दर्शवण्यासाठी बिंदूनामावली हा सर्वश्रेष्ठ पुरावा ठरतो. मात्र, विद्यापीठाकडून तो गुलदस्त्यात ठेवण्यात आला असे मुद्दे चव्हाण यांच्याकडून उपस्थित करण्यात आले. सुनावणीअंती न्या. आर. एम. जोशी यांनी सपकाळे यांची याचिका फेटाळून विद्यापीठ न्यायाधिकरणाचा निर्णय कायम केला. चव्हाण यांच्यावतीने ॲड चैतन्य धारूरकर व ॲड मयुर सुभेदार यांनी काम पाहिले.

... मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का?
आधुनिक केसरी

मुंबई  : राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? यामुळे दक्षिण भारतात भाषेसाठी जे होते, ते योग्य आहे की काय? असा प्रश्न मला पडत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, सीबीएसई बोर्ड राज्याच्या शाळांमध्ये सुरु होणार आहे. त्याबद्दल मला तीन प्रश्न विचारायचे आहे. सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये किती टक्के मराठी असणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास त्यात असणार का? महाराष्ट्राची किती माहिती त्यात असणार आहे. सीबीएसई बोर्ड करताना तुमची तयारी आहे का? तुमच्याकडे शिक्षक आहेत का? सीबीएसईतून शिक्षण दिल्यावर मग मराठी भाषेचे काय होणार याबद्दल मला चिंता आहे. राज्य शिक्षण मंडळ तुम्ही बंद करणार आहात का? असे प्रश्न सुप्रियाताई सुळे यांनी विचारले.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राज्यात क्राईम वाढत आहे. कधी चॅनल लावले की गुन्हेगारीच्या बातम्या दिसत आहेत. केंद्राच्या डेटातूनही राज्यात गुन्हेगारी वाढल्याचे दिसते. हा डेटा सरकारच पाठवते ना? महाराष्ट्रात इतकी अस्थिरता आणि इतकी गुन्हेगारी कधीच झाली नाही. ज्या व्यक्तीवर आरोप होतो, तो देश सोडून जातो.196 ईडीच्या केसेस दाखल झाल्या. त्यात दोनच जणांवर आरोपत्र सिद्ध झाले. हे केंद्र सरकारने लोकसभेत सांगितल्याचे सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राज्याचे अर्थमंत्री काल म्हणाले, सगळ्याचे सोंग घेता येते पण पैशांचे सोंग घेता येत नाही. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्याचे मी स्वागत करते. मी हेच चार महिन्यांपासून सांगत होते. या सरकारने आता आदिवासी विभागाचे पैसे आणि सामाजिक विभागाचे पैसे वळवले आहे. तीन ते चार लाख कोटी रुपये शेअर बाजारातून लोकांनी काढून घेतले आहे. देशातील गुंतवणूक बाहेर जात आहे. सामान्य माणसांचे पैसे शेअर बाजारात होते. आज काय परिस्थिती आहे. मला या गोष्टी कळत आहे तर सरकारला का कळत नाही. परंतु सरकारकडून धुळफेक होत आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे हे परवा अर्थमंत्र्यांनीच सभागृहात सांगितले आहे. त्यामुळे सरकारने औरंगजेबासारखे मुद्दे बाजूला करुन राज्यातून बाहेर जाणारी गुंतवणूक थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक लक्ष द्यावे असे आवाहन देखील सुप्रियाताई सुळे यांनी केले.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. असे गंभीर आरोप असलेला प्रशांत कोरटकर हा देश सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे.  हा माणूस देश सोडून गेलाच कसा, नागपूरवरुन दिल्लीला गेला आणि दिल्लीवरुन दुबईला गेला अशी माहिती मिळत आहे. राज्य सरकारला त्याला शोधता येत नसेल तर त्यांनी केंद्राची मदत घ्यायला पाहिजे, हे मी आधीही सांगितले होते आता पुन्हा सांगत आहे. एक माणूस नागपूरहून दिल्ली आणि दिल्लीतून बाहेर देशात निघून जातो तोपर्यंत राज्याचे पोलिस आणि गृहखातं काय करत होतं? असा सवाल सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित केला आहे.

यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, सर्वाधिक गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली आहे. त्याबदद्दल सरकार बोलत नाही. सुसंस्कृत नागपूरमध्ये दंगल घडते, आज सहा दिवस झाले तरी नागपूरमधील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू आहे. काय सुरु आहे या महाराष्ट्रात? या सरकारचे 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड पाहिले तर या सरकारने मागील 100 दिवसांत राज्यामध्ये फक्त क्राईम वाढवला, याशिवाय यांच्या रिपोर्टकार्डवर काहीही लिहिलेले नाही, असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,बीडमध्ये सरपंचाचे हत्याकांड झाले त्यानंतर परभणीमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा पोलिस ठाण्यातील मारहाणीत मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये सर्वप्रथम आदरणीय शरद पवार साहेब त्या पीडित कुटुंबियांच्या भेटीला गेले. हे डिसेंबर मध्ये बीडलाही गेले आणि परभणीलाही गेले होते. आदरणीय शरद पवार साहेब डिसेंबरमध्ये जे बोलले होते, ते आज साडे तीन महिन्यांनी खरं होताना दिसत आहे. सरकारचे किती लोक बीड आणि परभणीला गेले? महादेव मुंडेंच्या पत्नीला सरकारचे किती लोक जाऊन भेटले? हा राजकारणाचा विषयच नाही, हा माणुसकीचा विषय आहे. बीड हत्यांकांडानंतर मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा नाही, यासाठी यांना आरोपीच सापडत नाही. असा अन्याय महाराष्ट्रात चालला आहे. आम्ही बीड, परभणी येथील अन्यायग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी डिसेंबरपासून आहोत. तोच स्टँड आमचा आजही आहे, असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले.

तंत्रज्ञानामुळे मानसिक तणाव वाढला : प्रा.डाॅ.सुरेश मोनी
आधुनिक केसरी

पुणेः तंत्रज्ञानाने सध्या भारतासह जगाला भुरळ घातली आहे. सध्या जगात प्रत्येक महिन्यात नवीन बदल घडतो आहे. बदलाचा हा वेग प्रचंड असून त्याच्याशी जुळवून घेताना लोकांची दमछाक होताना दिसत आहे. एआय सारख्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे सातत्याने माहितीचा भडीमार मानवी मेंदूवर होत आहे. त्यामुळे, त्यातून काय घ्यावं? आणि काय सोडावं? आणि समोर येणाऱ्या मजकूराची विश्वासार्हता आणि सत्यता याबाबत साशंकता असल्याने परिणामी मानसिक तणावात वाढ होत आहे, असे मत बंगळुरू येथील नार्से मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे माजी संचालक प्रा. डाॅ.सुरेश मोनी यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर महाराज विश्व शांती डोम येथे 'इनोव्हेटिव्ह ग्लोबल टेक्नॉलॉजी ट्रेंड्स' या विषयावर आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. याप्रसंगी, अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डाॅ.एकनाथ खेडकर, 'एमआयटी एडीटी' विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे आदी उपस्थित होते.
डाॅ.खेडकर यावेळी म्हणाले की, पूर्वी पेटंट सादर करण्यात व त्याची नोंदणी होण्यावर चीन, अमेरिका आणि जर्मनी सारख्या राष्ट्रांचे एकतर्फी प्रभुत्व होते. परंतु, बदलत्या काळानुसार भारतीय संशोधकांच्या मेहनतीमुळे पेटंट नोंदणीत आता भारताने आपला दबदबा निर्माण केला आहे. यासह, चॅट जिपीटी, डीपसेक सारख्या तंत्रज्ञानामुळे मानवाचे वाचन कमी व्हायला नको, याची काळजी घ्यावयास हवी, असेही त्यांनी म्हटले.
यावेळी बोलताना प्रा.डाॅ.सुनीता कराड म्हणाल्या, एमआयटी एडीटी विद्यापीठ दरवर्षी ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करते. यंदा या परिषदेचे सातवे वर्ष असून त्यामाध्यमातून आत्तापर्यंत ६०+ स्टार्टअप्स व ३००० हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. यंदा २० हून अधिक विषय घेवून विद्यापीठात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला पुढील तीन दिवस ही परिषद पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजेद्वारे सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.सुनीता कराड यांनी तर आभार डाॅ.मोहित दुबे यांनी मानले. तर डाॅ.स्नेहा वाघटकर व डाॅ.स्वप्निल शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पसायदान द्वारा कार्यक्रमाची सांगता झाली.

तंत्रज्ञानाच्या धोक्यांपासून सावध रहा- प्रा.डाॅ.कराड

यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रा.डाॅ. मंगेश कराड म्हणाले की, सध्या जगासमोर अनेक आव्हाने आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने भौगोलिकदृष्टा अनेक गोष्टींमध्ये मोठा बदल घडविला आहे. त्यामुळे, जागतिक पातळीवरील या आव्हानांवर विचारमंथन व्हावं यासाठी दरवर्षी ही परिषद भरवली जाते. दिवसेंदिवस बदलणाऱ्या एआय सारख्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करत असताना त्यातील डिफेक सारख्या धोक्यांपासूनही आपण सावध रहायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला.

भारतीय शिक्षण संस्था अमृत मोहोत्सव 10 जानेवारी पासून प्रारंभ
आधुनिक केसरी न्यूज

नवरगाव : स्थानिक भारतीय शिक्षण संस्थेच्या स्थापनेला या वर्षी पंचाहत्तर वर्ष पूर्ण होतं आहेत, त्याचे औचीत्य साधून 2025 हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्याचे संस्थेचे ठरविले आहे.  सदर अमृत महोत्सवाचा उदघाट्न सोहळा तसेच संस्थापक अध्यक्ष स्व. बालाजी पाटील बोरकर यांचा स्मृती सोहळा येत्या 10 आणि 11 जानेवारी ला भारत विद्यालय नवरगावच्या  भव्य पटांगणावर संपन्न होणार असून शुक्रवार दिनांक 10 जानेवारी ला दुपारी 12 वाजता,  नागपूरचे जेष्ठ साहित्यिक तथा श्रेष्ठ वक्ते प्रा. डॉ. कुमार शास्त्री हे सदर सोहळ्याचे उदघाटन करतील तर जेष्ठ विधिज्ञ ऍड. मधुकरराव निकुरे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील. सदर कार्यक्रमात अमृत महोत्सवाच्या लोगोचे आणि नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन तसेच  स्व. बालाजी पाटील बोरकर स्मृती ' जीवन गौरव पुरस्कार ' प्रदान करण्यात येणार आहे. ह्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता अकोल्याचे जेष्ठ रंगकर्मी  डॉ. रमेश थोरात  यांचा एकपात्री प्रयोग ' यहा हसना मना है ' तसेच रात्री 8 वाजता अद्वैत अमरावती निर्मित आणि विशाल तराळ दिग्दर्शीत चित्रांगदा ही मराठी प्रायोगिक एकांकिका सादर केली जाणार आहे. शुक्रवार दिनांक 11 जानेवारी ला सकाळी 8 वाजता हजारो विद्यार्थ्यांसाठी  तारे जमी परं  ह्या बालचित्रकलेचं आयोजन तसेच 9 वाजता महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी *आत्मभान* ही स्पर्धा परीक्षा आणि दुपारी 12 वाजता सर्व घटक संस्थेतील विद्यार्थांचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.  त्याचं दिवशी सायंकाळी 7 वाजता सुप्रसिद्ध गायक गुणवंत घडवाई आणि मंजिरी वैद्य अय्यर यांचा नाट्यसंध्या हा नाट्यगीतांचा सुमधुर कार्यक्रम सादर होईल. सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे अशी विनंती भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत बोरकर, सचिव सदानंद बोरकर आणि संचालक मंडळाने केलेली आहे.

मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय होणार..!
आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर  : मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व्हावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी पाठपुरावा करून हा विषय लावून धरला. आता लवकरच हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार आहे. त्यामुळे आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.*

वाघांचा जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण घ्यावे. जिल्ह्याचा नावलौकिक देशात वाढवावा. यासाठी जिल्ह्यातील मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. यासंदर्भात मंगळवार, दि. ७ जानेवारीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे झालेल्या या बैठकीत तंत्रनिकेतन महाविद्यालयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुलच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडण्यासंदर्भात सूचना व निर्देश दिले. महाविद्यालयासंदर्भात वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आ. श्री. मुनगंटीवार यांनी विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी यांचे आभार मानले आहेत.चंद्रपूर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

*आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते निर्देश*
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांनी तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले होते, हे विशेष.

या विद्यार्थ्यांना होणार लाभ
या उपक्रमामुळे मूलसह पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लाभ होणार आहे. मुल येथे यापूर्वीच शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्याने शहराच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान मिळत आहे. शासकीय पॉलिटेक्निक सुरू झाल्यास मुल हे शिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

जय हो.....भारतातून २३ वे तर राज्यातून ३ रे ; CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास NCISM व QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकन
आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर  : कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली द्वारे  (NCISM, New Delhi) व भारतीय गुणवत्ता परिषद, नवी दिल्ली (QCI) संपूर्ण भारतातील मूल्यांकन झालेल्या २२१ आयुर्वेद महाविद्यालयातून 'ए' ग्रेड व २३ वे मानांकन मिळाले आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS, Nashik) संलग्नित मूल्यांकन झालेल्या ५४ आयुर्वेद महाविद्यालयातून महाराष्ट्रात ३ रे मूल्यांकन मिळाले आहे.
भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत ‘क्यूसीआय’ ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेचा उद्देश वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारणे हा आहे. भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषद, नवी दिल्ली यांच्या तपासणी पथकाने दिनांक २२ जुलै २०२४ ते २३ जुलै २०२४ या कालावधीत महाविद्यालय व रुग्णालयास निरीक्षणाला आलेल्या तीन सदस्यीय टीमने महाविद्यालय व रुग्णालयात मागील वर्षभरात रुग्णांचे उपचार, चाचण्यासह सर्व सोयी-सुविधांची माहिती घेतली. शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर महाविद्यालयास 'ए' ग्रेड दिला आहे. आयुर्वेद महाविद्यालयास यापूर्वी NAAC चे B++, ISO मानांकन तसेच रुग्णालयास NABH चे मानांकन प्राप्त झालेले आहे.
QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकन यामुळे महाविद्यालयाकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक दर्जावर शिक्कामोर्तब झाले आहे, आयुर्वेद  महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विश्वासार्ह सार्थ सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजीत मुळे यांनी दिली.
शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण केली असून ‘ QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकनामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिक वाढली असून सांघिक प्रयत्नातून ती निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास  प्राचार्य तथा  प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी दिली.
यावेळी कृषी महाविद्यालय संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, दंत महाविद्यालय आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉ. लता काळे, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य  डॉ. गणेश डोंगरे  , तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. शशिकांत डिकले, मानव संसाधन अधिकारी श्री. अशोक आहेर आणि  जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील आदी उपस्थित होते.

CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकन मिळाले  आहे, ही आमच्यासाठी भूषणावह आणि मान उंचावणारी घटना आहे. या मानांकनामुळे अनेक फायदे होणार असून राज्यातील या नामांकित  महाविद्यालयास पूर्वीपासूनच NAAC चे B++, ISO मानांकन तसेच रुग्णालयास NABH चे मानांकन प्राप्त झालेले असून विद्यार्थ्यांना करिअर आणि उच्च शिक्षणासाठी निश्चितचं फायदा होईल. CSMSS  आयुर्वेद महाविद्यालय  आणि रुग्णालयाच्या आमच्या अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक तसेच सचोटीने काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्न आणि परिश्रमाचे हे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. पद्माकरराव मुळे                                                 सचिव, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था

चंद्रपूर वन प्रबोधिनीला नागरी सेवा प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय थ्री स्टार मानांकन
आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : दि.18  राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांच्या (NSCSTI) मानकानुसार चंद्रपूर वन प्रबोधिनीला 19 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीकरीता उत्कृष्ट थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. चंद्रपूर वन प्रबोधिनीच्या नागरी सेवा प्रशिक्षणातील उत्कृष्टतेची दखल घेऊन क्षमता निर्माण आयोगाने ही मान्यता प्रदान केली आहे.  ज्यामुळे वन अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढविण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

ही मान्यता 12 ऑगस्ट 2024 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या नागरी सेवा प्रशिक्षण संस्था अधिवेशनादरम्यान केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून या संस्थेस गौरविण्यात आले आहे. भारतीय वन सेवा (IFS) अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या डेहराडूनमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी (IGNFA) सोबतच  चंद्रपूर वन प्रबोधिनीला आता भारतातील 14 वन प्रशिक्षण संस्थांपैकी "उत्कृष्ट" श्रेणीमध्ये मान्यता मिळाली आहे. नागरिक सेवा प्रशिक्षण संस्थासाठी राष्ट्रीय मानकांचे एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे भारतभर नागरिक सेवा प्रशिक्षणाची गुणवत्ता मानकीकरण आणि उन्नतीसाठी समर्पित आहे. हे मानक "मिशन कर्मयोगी" उपक्रमाचा एक भाग आहेत, ज्याचा उद्देश भविष्यातील नागरिक सेवेला योग्य मानसिकता, कौशल्य आणि ज्ञान विकसित करणे हे आहे. NSCSTI अंतर्गत मान्यता प्रक्रियेत अभ्यासक्रम डिझाइन, शिक्षक विकास, डिजिटलायझेशन, सहकार्य यासारख्या आठ मुख्य आधारांवर लक्ष केंद्रित केले जाते. कठोर मूल्यमापन प्रक्रियेमध्ये क्षमता निर्माण आयोग  आणि राष्ट्रीय मान्यता शिक्षण व प्रशिक्षण मंडळ कडून केलेले डेस्कटॉप मूल्यमापन आणि ऑन-साइट मूल्यांकन समाविष्ट आहे.

या यशाबद्दल आभार व्यक्त करताना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा चंद्रपूर वन प्रबोधिनीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री सुधीर मुंगंटीवार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला. वन प्रबोधिनीला या महत्त्वपुर्ण कामगिरीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरला आहे, असे ते म्हणाले.

वन प्रबोधिनी नवीनतम आव्हानांचा सामना करण्यासाठी सुसज्ज असलेल्या वन अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि विकास करण्याच्या आपल्या मिशनसाठी वचनबद्ध आहे. ही मान्यता अकादमीच्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये सतत सुधारणा आणि नावीन्यपूर्ण करण्याच्या समर्पणाला अधोरेखित करते. हे सु-संरचित आणि उच्च-गुणवत्तेच्या प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे भारतातील प्रशासनाची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्याच्या व्यापक उद्दिष्टांशी देखील अधोरेखित करते. वन प्रबोधिनी यापुढे या मान्यतेचा उपयोग करून वनविभाग आणि देशाच्या नागरी सेवेत आणखी योगदान देत राहील, असा विश्वासही श्री रेड्डी यांनी व्यक्त केला..

बी.एन.एन.महाविद्यालयाला तिसऱ्यांदा नॅकद्वारे 'ए' दर्जा प्राप्त
आधुनिक केसरी न्यूज

भिवंडी : दि. 29 जुलै. रोजी शहरातील सर्वात जुन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी. एन. एन. महाविद्यालयाला  नॅकद्वारे 'ए' दर्जा प्राप्त झाला आहे. नुकतीच नॅक समितीद्वारे महाविद्यालयाला भेट देण्यात आली होती. नॅक पीयर  समितीने महाविद्यालयाची पाहणी केली. यात महाविद्यालयाला तिसऱ्यांदा नॅक पाहणीत 3.11 गुणांसह 'ए' ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाच्या या यशा बद्ल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डाॅ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डाॅ. अजय भामरे, कुलसचिव डाॅ. बळीराम गायकवाड, संस्थाध्यक्ष डाॅ. विजय जाधव, कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे, सचिव ॲड. रोहित जाधव आदींनी प्राचार्य, उपप्राचार्य, आय. क्यु. ए. सी. समन्वयक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

या यशाबद्दल सोमवारी आभार सभा आयोजित  करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक वाघ म्हणाले की, बी.एन.एन. महाविद्यालयाने या उत्कृष्ट पुनर्मूल्यांकनासाठी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यासाठी संस्थाध्यक्ष डाॅ. विजय जाधव यांनी  लागणाऱ्या शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. कष्टकरी समाजातील मुंल उच्चशिक्षित झाले पाहिजे. हा वसा घेऊन अण्णासाहेब जाधव यांचे स्वप्न  साकार करण्यासाठी प्रत्येक संकटकाळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले. कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यासाठी नेहमी प्रेरणा देत राहीले.

ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण आणि पायाभूत सुविधा आमच्या महाविद्यालयात उपलब्ध आहे. विद्यार्थी-केंद्रित अध्यापन-शिकवण पद्धती, नाविन्यपूर्ण आणि आकर्षक अध्यापन पद्धतींमुळे आमच्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण आणि समृद्ध शैक्षणिक अनुभव मिळतो. आमचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, ज्यांना आम्ही 'कर्मयोगी' म्हणतो, त्यांनी नेहमीच अतुलनीय समर्पण आणि परिश्रम दर्शविले आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचा दर्जा टिकून आहे. असे संबोधित सर्वांचे आभार मानले.  आय,क्यु.ए.सी. समन्वयक  डाॅ. शशिकांत म्हाळूंकर यांनी पुढच्या सायकलसाठी देखील आम्ही सातत्याने प्रगती करत राहू असा विश्वास दर्शविला. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुधीर निकम, डाॅ. सुरेश भदरगे, डाॅ. निनाद जाधव, डाॅ. सुवर्णा रावळ, प्रबंधक नरेश शिरसाळे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार डाॅ. कुलदीप राठोड यांनी मानले.

सरकार झोपा काढत आहे का? नाना पटोलेंचा सरकारला सवाल ...परराज्यातील विद्यार्थ्यांनी बोगस...
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटच्या पेपर फुटीचे लोण महाराष्ट्रात आले असून याप्रकरणी लातूरमधून काही लोकांना अटक करण्यात आली आहे. पेपरफुटणे ही गंभीर बाब असून अशा पेपर फुटीमुळे शेकडो होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा घटनांना आळा बसावा म्हणून राज्य सरकार पेपर फुटीविरोधात कडक कायदा करणार आहे का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला.

विधिमंडळात पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, पेपरफुटीच्या विषयासंदर्भात आणखी एक गंभीर बाब समोर आली असून परराज्यातील काही मुलांनी नाशिकमध्ये येऊन अपंग असल्याची बनावट प्रमाणपत्रे काढून परीक्षा दिली आहे. एकीकडे पेपरफुटी तर दुसरीकडे असे बोगस विद्यार्थ्यी परीक्षाचा लाभ घेत आहेत हा प्रकार होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. यात प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तर पालकांचा पैसा बरबाद होत आहे. नांदेडसह राज्याच्या अनेक भागात हजारो लोकांनी रस्त्यावर येऊन पेपर फुटीविरोधात मोर्चे काढले. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे असे म्हणतो मग सरकार काय झोपा काढत होते का ? सरकारने याप्रश्नावर उत्तर द्यावे आणि भविष्यात असे प्रकार होणार नाहीत यासाठी काय खबरदारी घेणार हे स्पष्ट करावे, असे नाना पटोले म्हणाले.

*जयभीम नगरमधील ६५० बेघर कुटुंबांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा*.

पवई भागातील जय भीम नगरमधील झोपड्या तोडल्याचा प्रश्न उपस्थित करुन नाना पटोले म्हणाले की, जयभीम नगरमधील ६५० गरिब, मागासवर्गिय कुटुंबांवर ६ जूनच्या रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे, आज ही सर्व कुटुंबं रस्त्यावर आहेत. पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून चुकीची कारवाई करून या मागासवर्गीय लोकांना बेघर करण्यात आले.
२०११ पर्यतच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे आणि पावसाळ्यात झोपडपट्ट्यांवर कारवाई करु नये असे मा. न्यायालयाचे आदेश असतानाही पोलीस बंदोबस्तात ह्या झोपड्या का तोडल्या? पोलीसांनी लहान मुले, महिलांना मारहाण केली, याला जबाबदार कोण? हे सरकार बिल्डर हिरानंदानीला पाठीशी घालत आहे का? सरकारने त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करायची ती करावी पण ज्या ६५० कुटुंबांना रस्त्यावर आणले त्यांच्या राहण्याची व्यवस्था कुठे करणार हे सरकारने सांगावे.
विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यावर म्हणाले की, १ जूनपासून सप्टेंबरपर्यंत झोपडपट्यांवर अशी कारवाई करता येत नाही असे आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदशाचे उल्लंघन झाले असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मुंबई महानगर पालिकेने बेघरांशी शेल्टर बांधले आहेत, संबंधित वार्ड अधिकाऱ्यांनी या लोकांची तेथे राहण्याची सोय करावी, असे सांगितले.