गुन्हेगारी - Adhunik Kesari

टाकरखेडा येथील एकाच कुटुंबातील चौघंनी रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज

अमळनेर : तालुक्यातील टाकरखेडा येथील एकाच कुटुंबातील चौघांनी आज गुरूवारी पहाटे ४ ते ५ वाजेच्या दरम्यान धावत्या रेल्वेखाली झाोकून देत आत्महत्या केली . यात पतीपत्नी व दोन लहान मुलांचा समावेश आहे .या घटनेचे वञत्त कळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी सकाळी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार,अमळनेर  तालुक्यातील टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल , त्याची पत्नी पार्वती सुनील भिल हे  आपल्यासोबत दुसरीत असलेला मुलगा सनी , व अंगणवाडीत असलेला राज याना सोबत घेऊन पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातून गेले. त्यांनी धावत्या रेल्वेखाली  झोकून दिल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे. पहाटे ४:४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसाना या घटनेबाबत कळवले .  घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे  एपीआय गणेश अहिरे , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील , विजय भोई ,योगेश बागुल , राहुल पाटील  पंचनाम्यासाठी दाखल झााले . एकाच कुटुंबातील चौघे जण मृत झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. आत्महत्येचे कारण अदयाप समजू शकले नसले तरी कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा सुरू आहे.या बाबत पोलिस तपास सुरू आहे . या घटनेने अमळनेर तालुका हादरला आहे .

लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
आधुनिक केसरी न्यूज

गोंदिया : नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे थकीत बिल (एरियस) काढून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आणि ती स्वीकारणाऱ्या जिल्हा हिवताप कार्यालय, गोंदिया येथील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली.
मारुती यादव दिपेवाड (वय ३९, आरोग्य सेवक, रा. हरफड, जि. नांदेड, ह.मु. गोंदिया) आणि नीरजकुमार नरेश अग्रवाल (वय ४०, वरिष्ठ लिपिक, रा. गोंदिया) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

तक्रारदाराचे वडील हे जिल्हा हिवताप विभागात आरोग्य सेवक म्हणून २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले होते व फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांचे निधन झाले. तक्रारदार मार्च २०२६ मध्ये त्यांच्या आईच्या कुटुंब निवृत्तीवेतनाबाबत माहिती घेण्यासाठी कार्यालयात गेले असता, वरिष्ठ लिपिक नीरजकुमार अग्रवाल यांनी तक्रारदाराच्या वडिलांचे नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढून देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यानंतर जून २०२६ मध्ये तक्रारदार पुन्हा गेले असता अग्रवाल यांनी त्यांना आरोग्य सेवक मारुती दिपेवाड यांना भेटण्यास सांगितले. दिपेवाड यांनी बिल मंजूर करण्यासाठी ७ हजार रुपयांची मागणी केली. २१ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा विचारणा केली असता दिपेवाड यांनी ७ हजारांच्या लाचेचा पुनरुच्चार केला. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार नोंदवली. गोंदियास्थानिक बातमी सापळा कारवाई व अटक: तक्रारीच्या अनुषंगाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान आरोपी क्र. १ मारुती दिपेवाड यांनी ७ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली, तर आरोपी क्र. २ नीरजकुमार अग्रवाल यांनी त्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर रचलेल्या सापळ्यात दिपेवाड यांनी तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच कार्यालयात हजर असलेल्या अग्रवाल यांनाही तात्काळ ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्हा नोंदवताच त्यांना औपचारिक अटक करण्यात येईल.

कारवाई करणारे पथक:

ही कारवाई ला.प्र.वि. नागपूरच्या पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, उमाकांत उगले, तसेच अंमलदार करपे, बोहरे, कहालकर, शेंडे, बोपचे, कापसे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले व डांगे यांच्या पथकाने केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन

कोणत्याही लोकसेवकाने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न न घाबरता एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.

गावच्या चर्चेने पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर;सिडीआरने पत्नीचाही ‘मुखवटा’ उतरवला..!
आधुनिक केसरी न्यूज

अमोल शिंदे

भोकरदन : पतीचा मृत्यू... गावात उलटसुलट चर्चांना उधाण... संशयाची बोटे पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडे... त्यानंतर पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर फोडत पत्नीनेच पोलिसांत तक्रार दाखल केली.मात्र, तपासाची चक्रे फिरली आणि प्रकरणाचे चित्रच पालटले सीडीआर  तपास नातेवाईकांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयाची सुई तक्रारदार पत्नीपर्यंत पोहोचली.अखेर अनिता कैलास मिरकर हिलाच पोलिसांनी सहआरोपी करत अटक केली.अलापूर येथील कैलास विश्वनाथ मिरकर (४५) यांनी दि. ३० ते ३१ जुलैदरम्यान शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.घटनेनंतर अनिता मिरकर आणि साबेर शाह सादिक शाह यांच्याबाबत गावात चर्चा सुरू झाली.त्यानंतर अनिता हिने साबेर शाह याच्याविरुद्ध पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.मात्र, तपास पुढे सरकताच संशयाची दिशा बदलली आणि तक्रारदारच पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली.

सीडीआर  तपासला अन् तपासाची दिशाच बदलली...

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.मृत कैलास यांच्या आई वत्सलाबाई मिरकर यांच्यासह नातेवाईकांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर अनिता मिरकर आणि साबेर शाह यांच्या मोबाईलचा CDR तपासण्यात आला.तपासादरम्यान दोघांमध्ये जवळचे संबंध असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. कैलास यांना दोघांकडून मानसिक त्रास होत असल्याची बाबही तपासातून पुढे आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या मानसिक छळाला कंटाळूनच कैलास यांनी जीवन संपविल्याचा पोलिसांचा निष्कर्ष असल्याचे सांगण्यात आले.

‘फिर्यादी’च झाली सहआरोपी...

तपासातील पुरावे आणि नातेवाईकांच्या जबाबांनंतर प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली. दि. २० ऑगस्ट रोजी कैलास यांच्या मृत्यूप्रकरणी तक्रारदार अनिता मिरकर हिलाच पोलिसांनी सहआरोपी केले.तिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

मुख्य संशयित फरार; अटकेची मागणी...

या प्रकरणातील मुख्य संशयित साबेर शाह सादिक शाह अद्याप फरार असल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेऊन अटक करणे आता पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. त्याची चौकशी झाल्यानंतर या प्रकरणामागे नेमकी काय पार्श्वभूमी होती, आणखी कोणी सहभागी आहे का, याबाबत तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळून त्याची सखोल चौकशी करावी,अशी मागणी मृत कैलास यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे मुख्य संशयिताच्या अटकेनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

तक्रारीपासून अटकेपर्यंत...तपासाने बदलले संपूर्ण चित्र...

पतीच्या मृत्यूनंतर प्रियकराविरुद्ध तक्रार करणारी पत्नीच अखेर सहआरोपी ठरल्याने अलापूरसह भोकरदन तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता फरार मुख्य संशयित कधी पोलिसांच्या हाती लागतो आणि त्याच्या चौकशीतून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या प्रकरणातील आरोप व तपासातील निष्कर्ष हे पोलिसांच्या तपासावर आधारित असून,दोष सिद्ध होणे अथवा अंतिम जबाबदारी निश्चित होणे हे न्यायालयीन प्रक्रियेतच ठरेल.

विद्यार्थिनीचा पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी; जामोद येथे तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा
आधुनिक केसरी न्यूज

जळगाव जा : जामोद येथील जनता विद्यालय परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा हात पकडत, बोलण्यास नकार दिल्यास तिचे फोटो फेसबुक व इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य जगन्नाथ ताडे (रा. जामोद) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 74, 75, 78, 351(3), 296 तसेच पॉक्सो कायद्यातील कलम 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 13 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजेपासून ते दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपीने संबंधित विद्यार्थिनीचा पाठलाग केला. तसेच कथितरित्या वाईट उद्देशाने तिचा हात पकडून, "माझ्यासोबत बोलली नाहीस तर तुझे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करेल," अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून दि. 19 ऑगस्ट रोजी रात्री 10.29 वाजता जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून, तपासाअंती पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

तलवारीचा धाक दाखवून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी ५० हजारांचा दंड
आधुनिक केसरी न्यूज

सांगली : तलवारीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला विटा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. अजित विजय जाधव (वय ३२, रा. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. व्ही. इंदापुरे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, २ सप्टेंबर २०२२ ते २७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आरोपीने पीडितेला तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर पीडिता आणि तिची आई अंगणात झोपलेली असताना आरोपीने पीडितेचे तोंड दाबून तिला उचलून नेले आणि पुन्हा तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिल्याचे समजल्यानंतर आरोपीने तिच्या औषध-पाण्यात गर्भपाताच्या गोळ्या मिसळून जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचेही तपासात समोर आले. याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष या खटल्यात अत्यंत महत्त्वाची ठरली. न्यायालयाने ती ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून विनायक देशपांडे यांनी काम पाहिले. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे व त्यांच्या पथकाने प्रकरणाचा सखोल तपास केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक झाडे यांनी खटल्याच्या सुनावणीदरम्यान वेळोवेळी मार्गदर्शन केले. कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मुदरस्सर शेख, पोलीस अंमलदार एस. बी. यादव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कवठेकर, म.पो.ना. एस. एस. जाधव तसेच कोर्ट मॉनिटरिंग सेलच्या कर्मचाऱ्यांचे या प्रकरणात विशेष सहकार्य लाभले.

जांभुळणीच्या डोंगरातील झाडीत अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला
आधुनिक केसरी न्यूज

सचिन सरतापे

म्हसवड : माण तालुक्यातील जांभुळणी गावच्या हद्दीत भोजलिंग मंदिराच्या पाठीमागील डोंगर परिसरात एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर महिला अंदाजे ३० ते ३५ वर्षांची असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळणी गावच्या हद्दीत भोजलिंग मंदिराच्या पाठीमागे नंदीच्या नाळव्याजवळील डोंगरातील वनराईच्या झाडीत हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत कुजलेली असून त्यावर अळ्या पडलेल्या अवस्थेत तो आढळला. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत महिलेची ओळख पटविण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे.
याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २१/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस फौजदार एस. एच. वाघमारे हे या प्रकरणाचा तपास करीत असून, म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मृतदेहाची ओळख आणि मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर या घटनेमागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी अनोळखी महिला बेपत्ता असल्याची माहिती असल्यास म्हसवड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अत्याचार, जबरी चोरी प्रकरणातील आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी
आधुनिक केसरी न्यूज

सांगली : जत तालुक्यातील एका महिलेला बसस्थानकावर सोडण्याचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करून दागिने लुटणाऱ्या आरोपी मुनीर खुतबुद्दीन नदाफ (वय ५१, रा. जत) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी हा निकाल दिला.

या खटल्याची अधिक माहिती अशी की, २६ सप्टेंबर २०१९ रोजी पीडित महिला जत तालुक्यातील एका गावातून जत येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत होती. त्यावेळी आरोपीने आपल्या मोटारीतून तिला बसस्थानकावर सोडण्याचे सांगून विश्वास संपादन केला. मात्र, निगडी गावाच्या हद्दीतील पवनचक्कीकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर नेऊन चाकूचा धाक दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत तिचे दागिने व मोबाईल हिसकावून आरोपी फरार झाला.

घटनेनंतर पीडित महिलेने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास अधिकारी एस. जी. मोहिते व दिलीप जगदाळे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता उज्वला करवते यांनी काम पाहिले. न्यायालयात सरकार पक्षाने एकूण १८ साक्षीदार तपासले. पीडित महिला व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्यात २० वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, तर जबरी चोरीच्या गुन्ह्यात सात वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती पीडित महिलेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या खटल्याच्या न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी उपनिरीक्षक संजय कापूरकर, महिला पोलिस कर्मचारी रेखा खोत, सुनिता आवळे, सुप्रिया भोसले आणि तुकाराम बंडगर यांनी सहकार्य केले.

भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज

गोंदिया :  गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर भरदिवसा प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरनी लूट करून फरार होण्यापूर्वी व्यक्तीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हद्दीतील सूर्याटोला येथील बांध तलावाच्या परिसरात नेहमीप्रमाणे आज २३ जुलै गुरुवारी सकाळी 7 वाजता प्रदीप अपाले वय 68 वर्ष हे मॉर्निंग वॉक करून घरी परत होते. याच वेळी मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोराने प्रदीप अपाले यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने दोन वार केले. जखमी अवस्थेत खाली पडलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि बोटातील सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रदीप अपाले यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तपास करत आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत.

नागरिकांमध्ये भीती
सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसाठी बांध तलाव परिसर सुरक्षित समजला जातो. मात्र भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा
आधुनिक केसरी न्यूज

सचिन सरतापे

म्हसवड : माण तालुक्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून, तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, २४ जून २०२६ ते १३ जुलै २०२६ या कालावधीत माण तालुक्यातील परांती गावातील फिर्यादीच्या राहत्या घरी तसेच पुणे–जेजुरी मार्गावर एका मारुती स्विफ्ट (MH-53-B-0546) कारमध्ये ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश महादेव खांडेकर (रा. खडकी, ता. माण, जि. सातारा) याने फिर्यादीशी गोड बोलून लग्नाचे आमिष दाखवले. तसेच जेजुरी येथे दोघांचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, योगेश कर्चे (पूर्ण नाव व पत्ता अद्याप निष्पन्न नाही) यांच्या मदतीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. कोणास ही बाब सांगितल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे 64, 64(2)(m), 65(1), 96, 351(2)(3), 3(5) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8, 12 आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमन हे करीत असून, संशयित आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वेदांत बंडगर खुनातील संशयितांना 'मोक्का' एका अल्पवयीन मुलासह ९ जणांचा समावेश
आधुनिक केसरी न्यूज

सांगली : शहरातील १४ वर्षीय वेदांत मारुती बंडगर खूनप्रकरणातील संशयित असलेल्या 'एन. जी. ग्रुप' या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून, टोळीप्रमुख निलेश गडदे याच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह एकूण नऊ संशयितांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

निलेश विठोबा गडदे (टोळीप्रमुख, रा. कुपवाड), किरण शंकर लोखंडे, विशाल बिरुदेव चौगुले, सागर ऊर्फ नानासो माणिक चौगुले, अतुल दादासो वायदंडे, संदेश ऊर्फ सँडी रामचंद्र घागरे, एक विधीसंघर्षग्रस्त बालक, मलिक सलीम शेख व कुख्यात गुंड महमंद जमाल नदाफ अशी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. या टोळीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, विनयभंग, बेकायदेशीर अंमली पदार्थांची लागवड, घातक शस्त्रे बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सांगली, मिरज, कुपवाड, जत, मिरज ग्रामीण, कवठेमहांकाळ या पोलीस ठाण्यांच्या हद्दींसह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कागवाड आणि बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी परिसरातही या टोळीचे जाळे पसरले असल्याचे तपासात समोर आले आहे.

टोळीची वाढती गुन्हेगारी आणि दहशत लक्षात घेऊन मोक्का लागू करण्यासाठी सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता श्रीमती ज्योती डाके यांचा कायदेशीर अभिप्राय घेण्यात आला. त्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे सादर केला. पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावाची छाननी करून अंतिम मंजुरीसाठी तो विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे पाठविला. शर्मा यांनी प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

चौकट :

उजव्या डोळ्यात गोळी झाडून वेदांतचा खून

संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वेदांत बंडगर खूनप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक संजीव झाडे करत होते. १४ वर्षीय वेदांतचा उजव्या डोळ्यात गोळी झाडून निर्दयीपणे खून करण्यात आला होता. पोलिस तपासादरम्यान निलेश विठोबा गडदे (रा. वाघमोडे नगर, कुपवाड) याने आपल्या साथीदारांसह 'एन. जी. ग्रुप' नावाची संघटित गुन्हेगारी टोळी स्थापन करून आर्थिक फायद्यासाठी आणि दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. वेदांतच्या खुनानंतर सांगलीतील राजकारण तापले होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संशयितांना मोक्का अंतर्गत कारवाई करू अशी ग्वाही दिली होती.

चारित्र्यावर संशय घेत, लोह्यात पतीचा पत्नीवर गोळीबार; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा..!
आधुनिक केसरी न्यूज

लोहा : शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात पत्नीवर कथितरित्या गावठी कट्ट्यातून गोळीबार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि शस्त्र अधिनियमातील गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, कथित गावठी कट्टा आरोपीकडे आला कुठून? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

फिर्यादी अर्चना विशाल जाधव (वय १९, रा. शिक्षक कॉलनी, लोहा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ६ जुलै २०२६ रोजी रात्री १०.३० ते ११.०० वाजण्याच्या सुमारास आरोपी विशाल सुरेश जाधव (वय २२) याने चारित्र्यावर संशय घेत वाद घालत तिला थापडा, लाथा व बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील कथित गावठी कट्ट्यातून तिच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना दूरध्वनी करून, 'तुझ्या पोरीला गोळी घातली, आता तुझ्याकडे येतो,' अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या वैद्यकीय तपासणी (एमएलसी) अहवाल व जबाबाच्या आधारे लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चारित्र्याच्या संशयावरून घटना घडल्याचा आरोप

प्राथमिक माहितीनुसार आरोपी विशाल जाधव हा मूळ गांधीनगर येथील रहिवासी असून लोह्यातील एका मद्यविक्री दुकानात माल पुरवठ्याचे काम करतो. त्याच्याविरुद्ध यापूर्वी चोरीसंदर्भातील काही गुन्हे नोंद असल्याची प्राथमिक माहिती असून त्याची अधिकृत पडताळणी सुरू आहे. या प्रकरणातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपीकडे कथित गावठी कट्टा आला कुठून ? तो कोणी पुरविला ? त्यामागे आणखी कोणाचे जाळे आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळावरील फॉरेन्सिक पुरावे, न्यायवैद्यकीय अहवाल आणि शस्त्राच्या तपासणीनंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नुरशाहद पठाण करीत आहेत. तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

देगलूर पोलिसांची मोठी कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त, २०.४९ लाखांचा मुद्येमाल हस्तगत
आधुनिक केसरी न्यूज

देगलूर माणिक सुर्यवंशी

नांदेड : जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून देगलूर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परवर धडक कारवाई केली असून, एकूण २० लाख ४९ हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा ६ जुलै २०२६ रोजी देगलूर पोलिसांना एका गुप्त माहितीदाराकडून अवैध रेती वाहतुकीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी देगलूर शहराजवळील खानापूर फाटा परिसरात तात्काळ सापळा रचला. संशयास्पद वाटणारा एक लाल रंगाचा हायवा टिप्पर (क्रमांक: TS-36-T-3865) या परिसरात आला असता पोलिसांनी तो अडवला.
२० लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी वाहनाची बारकाईने तपासणी केली असता, त्यात कोणतीही वैध पावती किंवा परवाना नसताना अवैध रित्या लाल रेतीची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्येमाल जप्त केला:
७ ब्रास लाल रेती(अंदाजे किंमत: ₹४९,०००/-)
हायवा टिप्पर (अंदाजे किंमत: ₹२०,००,०००/-)
एकूण जप्त मुद्देमाल: ₹२०,४९,०००/- (वीस लाख एकोणपन्नास हजार रुपये).

चालकावर गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी हायवा चालक दीपक हणमंत लोणे (वय ४४ वर्षे, रा. मडगी, ता. देगलूर, जि. नांदेड) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देगलूर पोलीस करत आहेत. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई ही यशस्वी कारवाई नांदेडचे मा. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, पोलीस उपनिरीक्षक हणमंत शिंदे आणि पोलीस अंमलदार बळीराम धुळे यांच्या पथकाने पार पाडली. नांदेड पोलिसांचे आवाहन जिल्ह्यातील जनतेला आवाहन करण्यात येते की, कुठेही अवैध गौण खनिज वाहतूक, साठवणूक किंवा बेकायदेशीर उत्खनन होत असल्याचे आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. अशा अवैध कृत्यांमध्ये सामील असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.