राजकारण - Adhunik Kesari

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ;भुजबळ व शरद पवार यांची भेट
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवास्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. काल बारामतीच्या सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. आणि आज पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, मी आज शरद पवारांकडे सकाळीच गेलो होतो. अर्थात त्यांची अपॉइंटमेंट घेतली नव्हती. फक्त ते तिथे आहेत तेवढं कळलं होतं. त्यामुळे साडेदहा वाजता मी तिथे गेलो होतो. मात्र, प्रकृती बरी नसल्याने ते झोपलेले होते. त्यामुळे मी एक-दीड तास बाहेरच थांबलो. त्यानंतर ते उठले आणि त्यांनी मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपले होते. प्रकृती बरी नसल्याने ते उठले आणि बाजूला खूर्ची ठेवून आम्ही दीड तास चर्चा केली, असं छगन भुजबळ म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले, राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मला ना राजकारण करायचं, ना मंत्रीपदाची आशा आहे. राज्य शांत राहावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठीच मी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राजकारणाबाबत कोणताही मुद्दा नव्हता. आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी मी कोणालाही भेटायला तयार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

मराठा आरक्षण, ओबीसी वादावर तोडगा निघावा यासाठी चर्चा झाली. मराठा, ओबीसी धनगर यांच्या मागण्या काय आहेत? त्या मी शरद पवार यांच्यासमोर मांडल्या आहेत. शरद पवार यांनीही याबाबत पुढाकार घेणार असल्याचे सांगितलं आहे. मी दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे, असं शरद पवार मला म्हणाले, असं छगन भुजबळ यांनी सांगितले.

बारामतीत १४ जुलैला काय होणार ? ; अजित पवार गटाची विधानसभा प्रचाराची 'ही' रणनिती ठरली
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : विकासाचा दृष्टीकोन अन विकसित महाराष्ट्र ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेसमोर घेवून जायची आहे. आगामी विधानसभा निवडणूक आपल्या लोककल्याणकारी योजनांवरच आपण लढणार आहोत अशा स्पष्ट सूचना करतानाच अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या महिला, युवा, शेतकरी, वारकरी, दुर्बल, आदिवासी, मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजासाठीच्या क्रांतिकारी योजना लोकांपर्यंत घेवून जा. असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  आज पक्षाच्या बैठकीत दिले.

महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात आजी-माजी आमदारांसह प्रदेश स्तरावरील विशेष निमंत्रितांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

आगामी निवडणूकांमध्ये आपण जी रणनीती आखली आहे. जे काम हाती घेतलेय त्यावरच आपण जनतेच्या समोर जाणार आणि जिंकणार आहोत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दिनांक १४ जुलै रोजी बारामती येथे पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची घोषणाही अजितदादा यांनी यावेळी केली.

आता आपण इतर बाबींकडे लक्ष देण्याऐवजी पहिल्यांदा लग्न निवडणूकीचे हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून लढूया. असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

आपण अर्थसंकल्पात कृषीपंपाच्या वीजबिल माफीचा निर्णय घेतला. तो अनेकांना आवडला आहे. महिलांसाठी दरमहा दीड हजार रूपये या योजनेचे राज्यभरात स्वागत होत आहे. बळीराजाला कायम मोफत वीज मिळेल यासाठी मागेल त्याला सौर कृषीपंप अशी योजना आपण आणली आहे.  सौरऊर्जेचे हे धोरण शेतकर्‍यांनी आनंदाने स्विकारले आहे. बहिणींसोबत भावंडांनापण या विविध योजनांचा लाभ होणार आहे हे सत्य जनतेच्या समोर मांडा. असे आवाहन अजितदादा पवार यांनी यावेळी केले.

आपण आपल्या या योजनांचा प्रचार, प्रसार विधानसभा निवडणूकीच्या मतदानापर्यंत लावून धरायचा आहे. विरोधकांच्या कोणत्याही नकारात्मक प्रचाराला बळी न पडता आपण आपल्या सकारात्मक निर्णयावर जनतेच्या समोर जायचे आहे. असेही अजित पवार यांनी सांगितले.

मनुस्मृती कदापि मान्य नाही..!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायमच लोकशाहीवादी आणि समतेची भूमिका जपणारा पक्ष आहे. असे सांगताना अजितदादा पवार यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होणार असेल तर तो आपल्या पक्षाला कदापि मान्य नाही. आपण कायमच मनुस्मृतीच्या विरोधात आहोत... आणि राहणार आहोत. शालेय शिक्षणमंत्री यांनी काही श्लोकांचा दाखला देत समर्थन केले असले तरी आपला पक्ष कधीही मनुस्मृतीला स्विकारणार नाही. असेही अजितदादा पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

अर्थसंकल्पाने जनतेचा आत्मविश्वास वाढला -  सुनिल तटकरे

यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक या शब्दाला समर्पक असून आपले नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या या अर्थसंकल्पाने जनतेच्या मनात महायुती सरकारबाबतचा आत्मविश्वास वाढला आहे. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणूकांमध्ये आपला पक्ष केवळ चार जागेवर लढला. त्यामधे एक जागा आपण जिंकली. मात्र अजितदादांच्या सोबत असलेल्या आपल्या आमदारांच्या विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य दिले. लोकसभेत जे काही झाले ते झाले, असे सांगताना सुनिल तटकरे यांनी अजितदादा पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून विरोधकांना 'एकही मारा लेकीन साॅलिड मारा' अशी टिप्पणी करत उपस्थितांची दाद मिळवली. यंदाचा अर्थसंकल्प हा आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे लोककल्याणकारी ध्येय आहे. जनसामान्यांच्या प्रती असलेली ही भावना प्रत्यक्ष अर्थसंकल्पात धोरणांच्या रूपाने जाहीर करून राजकारणाच्या पलीकडील विकास आणि समाजकारण कसे असते याचे हे उदाहरण आहे. अशा शब्दात खासदार सुनिल तटकरे यांनी अर्थसंकल्पाचा गौरव करत अजितदादा पवार यांचे आभार मानले.

महायुती सरकारने आपले कर्तव्य पार पाडले असून, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिलेदार म्हणून आपण अर्थसंकल्पातील सर्व योजनांचा सामान्य आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत लाभ मिळेल यासाठी पुढील दोन महिने रात्रंदिवस कार्यरत रहा. असे आवाहन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.

डोणगाव सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर
आधुनिक केसरी न्यूज

ज़ैनुल आबेद्दीन

मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व मेहकर तालुक्याची आर्थिक बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेली ग्रामपंचायत ही डोणगावची आहे
नेहमीच चर्चेत असणारी ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी ग्रामपंचायत डोणगाव.
डोणगावच्या सरपंच रेखा रवी पांडव यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव १३ विरुद्ध ४ मतांनी मंजूर झाला आहे. रेखा पांडव यांच्या विरोधात ३ जुलै रोजी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेणे, मनमानी पद्धतीने कारभार करणे या कारणांवरून मेहकर तालुक्याचे तहसीलदार निलेश मडके यांच्याकडे अविश्वास ठरावासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर निर्णय घेण्यासाठी दिनांक ८जुलै रोजी तहसीलदार निलेश मडके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली होती. यासाठी डोणगाव ग्रामपंचायतचे सर्व १७ सदस्य उपस्थित होते.

डोणगाव ग्रामपंचायतच्या १७ सदस्यांपैकी १३ सदस्यांनी विद्यमान सरपंच रेखा पांडव यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची मागणी मेहकर तहसीलदार निलेश मडके यांच्याकडे केली होती. त्यानुसार तहसिलदार मडके यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार दि . 8 जुलै रोजी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी म एकूण १७ सदस्य उपस्थित होते. यापैकी १३ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने, तर सरपंच रेखा पांडव व इतर ३ सदस्यांनी यांनी ठरावाच्या विरोध केला.
यावेळी भगवान  वामनराव बाजड, शिवचरण विजय आखाडे, श्याम प्रल्हाद इंगळे,संजु निवृत्ती जमदाडे,सलमाबी सैय्यद नूर अत्तार, जोईप खाँ बिस्मिला खाँ, नंदा मुरलीधर लांभाडे, शेख मदन शेख दाऊत, फरजाना बी सत्तार शाह, पूजा सचिन साखळकर,जयश्री भूषण आखाडे, संदीप नागोराव टाले, सिंधू राजू खोडके, निर्मला प्रकाश बाजड, मीना रमेश काळे, शे कय्युम शे उस्मान  आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच रेखा पांडव यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने आता पुढील सरपंच कोण होणार ? सरपंच पद कोणाचे चरण स्पर्श करणार याबाबत विविध तर्क लढवले जात आहेत.

लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील माजी पोलीस अधिकारी सुधाकर कुंडलिक अंबोरे आणि सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक राहुल निरंजनराव तायडे यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन, दादर येथे आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यावेळी उपस्थित होते. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस परिवारात स्वागत करुन काँग्रेस विचार घरोघरी पोहचवा असे आवाहन केले.

काँग्रेस पक्षाची विचारधारा हीच शाश्वत असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष विजयाचे एक एक शिखर पार करत आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने  काँग्रेस पक्षाला कौल दिला. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातून सर्वात जास्त जागा जिंकत राज्यात दैदिप्यमान कामगिरी करत काँग्रेस हाच पर्याय असल्याचे दाखवून दिले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सर्वात जास्त जागा जिंकून विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकवू”, असा विश्वास प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा : 'या' तारखेपर्यंत....
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी केले आहे.

उमेदवारी अर्ज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर मुंबई येथे व सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज पक्ष निधीसह टिळक भवन दादर, मुंबई येथे सादर करावा. सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी २० हजार रुपये तसेच अनुसूचित जाती, जमाती व महिला इच्छुक उमेदवारांना १० हजार रुपये पक्षनिधी अर्जासोबत भरावा लागणार आहे. जे इच्छुक उमेदवार जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अर्ज सादर करतील त्या जिल्हा काँग्रेस कार्यालयाने १० ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे जमा झालेले अर्ज प्रदेश कार्यालयाला सादर करावेत.

मतदार याद्या अद्ययावत करण्यावर भर द्या..
मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून २५ जून ते २४ जुलै २०२४ या कालावधीत मतदारयाद्यांचे पुनरिक्षण करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदारांची नावे यादीत आहेत का? ते पहावे. नसल्यास ती नावे पुन्हा यादीत सामाविष्ठ करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच नाव, पत्ता यात काही बदल करावयाचा असल्यास ती सर्व कामे करून मतदार यादीत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया करून घ्यावी. ज्या युवक, युवतींनी वयाची १८ वर्षे पुर्ण केलेली आहेत, त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यावरही भर द्यावा. अशी सूचना प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रातांध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली आहे.

काँग्रेसने घेतला कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 'हा' मोठा निर्णय
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. यातील कोकण पदवीधर मतदारंघातून महाविकास आघाडीचे रमेश कीर हे उमेदवार आहे. कोकण विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने एक समन्वय समिती गठीत केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने गठीत करण्यात आलेल्या या समितीच्या प्रमुखपदी माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांची नियुक्ती करण्यात आली असून उद्या दिनांक १५ जून रोजी काँग्रेस मुख्यालय टिळकभवन येथे या समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या समितीत राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे हे नवी मुंबईचे समन्वय आहेत तर सहसमन्वयक निखील कविश्वर आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वयक माजी मंत्री सतेज बंटी पाटील तर सहसमन्वयक शशांक बावचकर आहेत. ठाणे शहर , ग्रामीण व कल्याण शहरसाठी माजी मंत्री विश्वजित कदम हे समन्वयक तर राजेंद्र शेलार सहसमन्वयक आहेत. भिवंडी उल्हासनगरसाठी माजी खासदार हुसेन दलवाई हे समन्वयक तर प्रदीप राव हे सहसमन्वयक आहेत. पालघर, वसई विरार, मीरा भाईंदर साठी माजी आमदार मुझफ्फर हुसेन समन्वयक तर सुरेश दळवी हे सहसमन्वयक आहेत. रायगड व पनवेल शहर साठी प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड समन्वयक तर संजय बालगुडे सहसमन्वयक आहेत आणि शहापुरसाठी माजी खासदार सुरेश टावरे समन्वयक तर सहसमन्वयक आकाश छाजेड आहेत. प्रदेश समन्वयकपदी सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश कंट्रोल रुम प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम तर प्रदेश कंट्रोल रुम सदस्यपदी गजानन देसाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना बहुमताने विजयी करण्यासाठी ही समिती जिल्हा व ब्लॉक स्तरावर बैठका घेऊन निवडणुकीसाठी काम करेल. तसेच काँग्रेस पक्षाबरोबरच मविआतील घटक पक्षांबरोबरही बैठक घेऊन कोकण विभागात विजयाची पताका फडकवण्यासाठी प्रयत्न करेल.

शरद पवारांनी घेतली 'ही' भीष्म प्रतिज्ञा ! काहीही झालं तरी.....
आधुनिक केसरी न्यूज

पुणे  : आपल्या बारामतीत बदल होतोय तो आणखी चांगला करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका सर्वजण मिळून करू.  तुमची एकजूट कायम ठेवा. तीन- चार महिन्यांनी महाराष्ट्राची निवडणूक येणार आहे. माझा प्रयत्न हा आहे की, काहीही झालं तरी महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचं ते घ्यायचं असेल तर विधानसभा जिंकावी लागेल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी बारामती येथील शिर्सुफळ गावच्या गावकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे.

शरद पवार साहेब म्हणाले की,राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरु, तरीदेखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर चार महिन्यानंतर बघू ४ महिन्यानंतर राज्यात विधानसभेचे निवडणुका होणार आहे. निवडणुकीनंतर सत्ता बदलणार आहे असे शरद पवार साहेब म्हणाले.

शरद पवार साहेब म्हणाले की, काही लोकांना वाटते की बारामतीत चमत्कार झाला. परंतु एवढी चर्चा व्हायचे कारण नाही, बारामतीच्या निवडणुकीची चर्चा होण्याचे खरे कारण म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. कारण त्यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते, निवडणुकीत ज्या गोष्टी मांडायच्या नसतात, बोलायच्या नसतात त्या त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवल्या. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींची अधिक चर्चा झाली असे शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.

पुढे शरद पवार साहेब म्हणाले की, बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी लोक फार काही बोलत नव्हते. त्यांनी नको त्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले. पण मतदानाच्या वेळी इथले एकही गाव मागे राहिले नाही. त्यांनी शांतपणे बटण दाबले. तरुण मंडळींनी व वडीलधाऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली व त्यांनीच हा निकाल दिला, त्यामध्ये तुम्हा सगळ्यांचे योगदान हे मोठे आहे. असेही पवार साहेब म्हणाले.

शरद पवार साहेब म्हणाले की, आता जी निवेदनं मला दिली, त्यातील प्रत्येकजण हेच सांगत होता की, याचा मी नातू, त्याचा मी नातू म्हणजे आमच्या आजूबाजूची पिढी संपलेली आहे असं दिसतं, नवी पिढी आली, राहणीमानात बदल झाला आहे. बारामती तालुक्यातील जिन्हाईत भागाचा गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या संबंधित आहे. जुन्या लोकांना आठवत असेल, आम्ही १९६६-६७ च्या वेळेला एका संस्थेकडून गहू घेतला होता आणि लोकांना गहू द्यायचो मजुरी म्हणून आणि लोक काम करायचे. त्यामुळे छोटे- मोठे तलाव या भागात झाले. बारामतीत अनेक कंपन्या आणल्या, एकाचं नाव डायनॅमिक्स, दुसरीचं नाव फरेरो. तिथे दुधाच्या पावडरपासून चॉकलेट तयार करतात. या कंपन्या जगातील मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या दुधाची गरज १२ लाख लिटर आहे. आता १२ लाख लिटर बारामती तालुका, इंदापूर तालुका, दौंड तालुका आणि करमाळा या भागातून आपण गोळा करतो, त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि कारखानदारी चालवतो. मी आता येताना बघत होतो प्रत्येकाच्या घराबाहेर गाय दिसली म्हणजे दुधाचा धंदा हा दोन पैसे वाढवणारा दिसतोय. असे शरद पवार साहेब  यांनी सांगितले.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, साधारणतः ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या केल्या. शिक्षणाचं काम सांगितलं, इथेही शिक्षण संस्था आली याची कल्पना आहे, बारामतीला शिक्षण देण्याची व्यवस्था केली. मी पहिल्यांदा आमदार झालो, त्यावेळेला बारामतीला कॉलेज नव्हतं, इथल्या लोकांना पुण्याला जावं लागायचं. माझं स्वतःचं शिक्षण पुण्याला झालं. नंतर त्याच्यात लक्ष घातलं आणि आज विद्या प्रतिष्ठान असो ज्यात ३१ हजार मुलं-मुली शिकतात. माळेगावची शिक्षण संस्था असो तिथे काही हजार शिकतात. आज बारामतीमध्ये वरचं शिक्षण घेणारे ४८ हजार मुलं-मुली आहेत. असे शरद पवार साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

शरद पवार साहेब म्हणाले की, चांगले लोक आपण महाराष्ट्रात आणू आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्य हातामध्ये आणू. हे काही अशक्य नाही तुम्ही लोकांनी मला चार वेळा निवडून दिलं चार वेळा मुख्यमंत्री ,दहा वेळा शेती मंत्री, दोन वेळा संरक्षण खात्याचा मंत्री या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांच्या सामूहिक शक्तीने घडू शकतात. मी आजवर अनेक निवडणुका लढलो आहे. खरंतर मी किती निवडणुका लढलो हे मला आठवतही नाही. सुरुवातीच्या काळात मी मते मागण्यासाठी तुमच्याकडे आलो. मात्र नंतरच्या काळात मी फक्त कामातून तुमच्या संपर्कात राहिलो. मी मते मागायला आलो नाही. परंतु, तुम्ही मतदान कधी चुकवले नाही. तुम्ही तुमचे काम चोख करत आला आहात. अजूनही करत आहात. परंतु, या वेळच्या निवडणुकीत परिस्थिती थोडी वेगळी होती. त्या परिस्थितीही तुम्ही माझ्या अपेक्षेप्रमाणे मतदान केले. असेही शरद पवार साहेब म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, देशाच्या दृष्टीने महत्त्वाची निवडणूक होती. आम्ही आघाडी म्हणून लढलो. राज्यात ४८ जागांपैकी ३० जागा जिंकल्या. एनसीपीने मुद्दाम कमी जागा लढण्याचा निर्णय घेतला. १० जागा घेतल्या ८ जिंकल्या. त्यात तुमचा वाटा होता. बारामती निवडणूक देशात गाजली. निवडणूक काळात सगळे लोकं काम करत होते. पण काही गावातील लोकं दडपण असल्यासारखे वागत होते ते पुढे येत नव्हते. काही लोकं सुरुवातीला सोबत आले आणि परत गायब झाले. या निवडणूकीत अनेक जण दिसले नाहीय. लोक मनात असेल ते करतात, दाखवत नाहीत. शांतपणे तुम्ही बटण दाबले. बारामती तालुक्याने सर्वात जास्त मतदान दिलं. त्यामुळे तुमचे आभार. असेही शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, जगभरातील अनेकांचे लक्ष बारामतीकडे लागले होते. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातला एक भाग आहे, जिथे जगभर काय काय चालले आहे त्याचे पोस्टर किंवा बोर्ड लावले जातात. तिथल्या एका बोर्डवर बारामतीच्या निवडणुकीची माहिती होती. म्हणजे बघा बारामती कुठपर्यंत पोहोचली आहे. अगदी न्यूयॉर्कपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. याचा अर्थ लोकांचे निवडणुकीकडे लक्ष होते आणि त्याचा परिणाम निकालातून दिसून आला. असेही पवार साहेब म्हणाले.

मोठी बातमी : अजित पवार म्हणतात....भविष्यात हे चित्र बदलण्याची.
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावे व राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केले जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ट्वीट करत व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे अजितदादा पवार यांनी आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’ने बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचे अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्याने परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनींना अजितदादा पवार यांनी धन्यवाद दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांचे अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे. याशिवाय अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचेही अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे.

देशात लवकरच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारे ‘एनडीए’चे सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, अशी खात्रीही अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.

लोकसभा विश्लेषण : भाजप 'फ्रंट फुटवर' तर काँग्रेस 'नेट प्रॅक्टिसमध्येच' दंग !
आधुनिक केसरी न्यूज

शाम हेडाऊ

लोकसभेच्या मैदानावर आता भारतातल्या सगळ्या टीम उतरल्या असून हा सामना कोण जिंकेल याकडे आता न केवळ भारत तर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे . भाजप टीमला लोकसभेचा चषक जिंकण्याची आशा असून त्यादृष्टीने त्यांनी विरोधी टीमला चारशे पार च आव्हान देण्याचं ठरवलेलं आहे.  महाराष्ट्राच्या टीमने ओपनिंग बॅट्समन म्हणून चंद्रपूरातील सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दायित्व दिलं असून , सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा  महाराष्ट्रातील लोकसभेच्या मैदानावर उतरत थेट चौकार , षटकार आणि चोरट्या धावा घेत 400 पार च्या टारगेटमध्ये आपले शतक असावं यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत . त्यासाठी त्यांनी आखलेली रणनीती ही अवाक करण्यासारखी आहे . ओपनिंग बॅट्समन म्हणून ग्राउंड वर उतरताच त्यांनी सगळ्यांना भ्रमणध्वनीवरून चारसो पार च टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण मला आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले . तर लगेच विविध ठिकाणी छोट्या-मोठ्या मॅचेसचे आयोजन करत त्यांनी आपल्या धावा जमवणे सुरू केले आहे . एका बाजूला लोकसभा चषकातील भाजपाच्या टीमने चंद्रपुरातून चारसोपारचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी थेट मैदानावर उतरून फटकेबाजी सुरू केली असली तरी काँग्रेस टीमची मात्र अजूनही नेट प्रॅक्टिसच सुरू असल्याचे दिसत आहे . सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजाच्या समोर तुल्यबळ असा गोलंदाज उभा करण्यास काँग्रेस अजूनही चाचणीच करत आहे.
काँग्रेस टीमचे सर्वेसर्वा असलेल्या हायकामंड ने खेळाडूची निवड करण्यासाठी  व्यवस्थापक,  कोच , सल्लागार अशा सगळ्यांची बैठक थेट दिल्ली दरबारी आयोजित केली . यात मैदानात उतरण्यासाठी इच्छुक असलेले चंद्रपुरातील धानोरकर आणि वडेट्टीवार या दोन्ही खेळाडू यांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे . या लॉबिंग मध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या सहकारी टीमने थेट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांची भेट घेऊन धानोरकर या सर्वोत्तम खेळाडू असल्यामुळे त्यांच्याकडे सुधीर मुनगंटीवार या फलंदाजाला रोखण्याचे कौशल्य व क्षेत्ररक्षणाची मजबूत टीम असल्याचे सांगत त्यांच्या निवडीसाठी प्रयत्न चालवले आहेत.
दुसऱ्या बाजूला सुधीर मुनगंटीवार यांची फटकेबाजी रोखण्यासाठी धानोरकर यांना क्षेत्ररक्षणात मदत करणाऱ्या सकल कुणबी समाजाने वडेट्टीवार नावाचा खेळाडू मैदानात उतरल्यास आम्ही क्षेत्ररक्षण करणार नाही . अशी थेट भूमिका हायकमांड कडे एका पत्रकाद्वारे केलेली आहे . तसे पत्रक थेट समाज माध्यमावर प्रसारित करून वडेट्टीवर नामक खेळाडूसमोर निवडीबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे . गेल्या आठवड्याभरापासून दिल्ली दरबारी हाय कमांड च्या मार्गदर्शनात तुल्यबळ खेळाडूची निवड व्हावी यासाठी धमासान अशा वातावरणात बैठकांचे सत्र सुरू असून अजूनही योग्य खेळाडूची निवड न झाल्यामुळे भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेच्या मैदानावर फ्रंट फूट वर येत धडाकेबाज फलंदाजीला सुरुवात केली आहे . परंतु विरोधी टीम असलेल्या काँग्रेसच्या खेळाडूची निवड होत नसल्यामुळे संपूर्ण टीम नेट प्रॅक्टिस मध्येच दंग असल्याचे चित्र आहे .
भारतीय लोकशाहीचा चषक उंचावण्यासाठी भाजपचे ओपनिंग बॅट्समन  सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासूनच तडाखे बंद फलंदाजीला सुरुवात केली असून त्यांच्या या फलंदाजीला आवर घालण्यासाठी योग्य असा गोलंदाजच काँग्रेस टीमला सापडू नये व आपल्या फटकेबाजीला क्षेत्ररक्षणाचा अडथळा येऊ नये अशी लॉबीग सुधीर मुनगंटीवार सुद्धा करत असल्याचे दबक्या आवाजात सर्वत्र बोलल्या जात आहे . आपले शतक निर्विघ्नपणे पार पाडावे व लोकशाही चषक उंचविण्यामध्ये आपण अग्रेसर राहावे या दृष्टीने मुनगंटीवार हे सर्वतोपरी प्रयत्न करत असून याच प्रयत्नातला एक भाग म्हणून काँग्रेस खेळाडूंना नेट प्रॅक्टिस मध्येच दंग ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलल्या जात आहे .
संपूर्ण देशासाठी आवश्यक असलेला लोकशाहीचा चषक कोण उंचावेल ? आणि कोण या शतकाच्या उंचावण्यामध्ये आपला हातभार लावेल ? या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये मात्र अजूनही विरोधी टीम असलेल्या काँग्रेसने साधा खेळाडू सुद्धा निवडू नये याबाबत सर्वत्र कमालीचे आश्चर्य व्यक्त केले जात असून , क्षेत्ररक्षणासाठी उत्सुक असलेल्या समाजामध्ये मात्र प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे .

चंद्रपूर लोकसभा विश्लेषण : सुधीर मुनगंटीवार यांनी फोडला प्रचाराचा नारळ तर धानोरकर वडेट्टीवार वादात देवतळे व बांगडे यांची उडी
आधुनिक केसरी न्यूज

शाम हेडाऊ

चंद्रपूर : 13 मार्च रोजी सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर करून भारतीय जनता पार्टीने पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या दृष्टीने आपले पहिले पाऊल टाकले व काल दिनांक १८  मार्च रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक गांधी चौक येथे आयोजित आशीर्वचन सभेमध्ये आपल्या प्रचाराचा नारळ फोडला . तर काँग्रेसमध्ये मात्र अजूनही उमेदवार निश्चितीची प्रक्रिया गोंधळात गोंधळ घालणारी ठरलेली आहे .
चंद्रपूर वणी आर्णी  लोकसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवार निश्चिती व प्रचाराचा नारळ फोडण्यात आघाडी घेतली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर नगरीत प्रथम आगमना प्रित्यर्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आशीर्वचन सभेचे आयोजन करण्यात आले होते . कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रचंड उत्साह , ठिकठिकाणी झालेले भव्य स्वागत आणि या स्वागताला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी विकास कामातूनच जनतेच्या प्रेमाच व्याज फेडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल व राज्याप्रमाणेच केंद्रातील विविध योजनांचा उपयोग आपल्या लोकसभा क्षेत्रातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असा विश्वास देत विविध समाजातील धर्मगुरूंच्या साक्षीने मतपेरणी करण्यास त्यांनी सुरुवात केली . तर दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षामध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या वादात आता तेली समाजातील विनायक बांगडे आणि प्रकाश देवतळे या दोन नेत्यांनी उडी घेतल्याने दिल्लीतील गोंधळ आणखीन वाढलेला आहे .
दोन दिवसात पक्षाने आपला उमेदवार जाहीर करावा अन्यथा आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा विषय घेऊन तेली समाजातील विनायक बांगडे व प्रकाश देवतळे यांनी आपल्या समाज बांधवांची सभा घेत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे . 2019 मध्ये काँग्रेस पक्षातर्फे तेली समाजातील ज्येष्ठ नेते विनायक बांगडे यांना उमेदवारी निश्चित झालेली होती . परंतु , ऐनवेळी सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश करत काँग्रेसची उमेदवारी मिळवून आपला विजय संपादन केलेला होता . त्यामुळे तेव्हा पासूनच तेली समाज हा काँग्रेस पासून दुखावल्या गेला होता . तेव्हापासून असलेली ही दुखरी नस प्रकाश दळतळे यांच्या नेतृत्वात आता पुन्हा एकदा नव्याने काँग्रेस समोर डोकेदुखी ठरू लागलेली आहे .
काँग्रेसच्या नैसर्गिक नियमाप्रमाणे काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांना ही जागा मिळावी यासाठी संपूर्ण काँग्रेस आपल्या पाठीशी उभी करण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.  शिवानी वडेट्टीवार यांचे नाव पुढे करून वडेट्टीवार यांनी धानोरकरांच्या उमेदवारी मध्ये खीळ टाकली. धानोरकर वडेट्टीवार हा वाद सर्वश्रुत असतानाच उमेदवारीच्या नावामध्ये ओबीसी चेहरा म्हणून  सुभाष धोटे यांचे नाव समोर यायला लागले . सुभाष धोटे यांचे नाव समोर येताच प्रकाश देवतळे यांना तेली बांधवांवर झालेल्या अन्यायाची आठवण झाली . आणि त्यांनी थेट आपल्या समाज बांधवांची सभा घेत या बैठकीमध्ये काँग्रेसने दोन दिवसात उमेदवार जाहीर करावा अथवा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा काँग्रेसला दिलेला आहे . तर दुसऱ्या बाजूला चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष रितेश तिवारी यांनी त्यांच्या समाज माध्यमावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आधी जिल्हा परिषद , नगर परिषद , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवाव्यात व नंतरच लोकसभेची उमेदवारी मागावी असे म्हणत थेट शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदविल्याचे दिसते आहे . अशा पद्धतीने काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत लथाळ्यांमुळे अजूनही दिल्ली दरबारी हाय कमांड द्वारे चंद्रपूरच्या लोकसभेच्या उमेदवारी बाबत कुठलाच निर्णय अजून पर्यंत घेण्यात आलेला नाही . तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने मात्र कालच्या आशीर्वचन सभेमध्ये आपल्या प्रचाराचा नारळ फोडत सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयी वाटचालीच्या दिशेने जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे .

मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षण विरोध भोवला ; निकटवर्तीय जयदत्त होळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा
आधुनिक केसरी न्यूज

किरणकुमार आवारे

निफाड :- मंत्री छगन भुजबळ हे सातत्याने मराठा समाजविरोधात बेताल वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदार संघात नाराजी निर्माण झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच लासलगाव कृ.ऊ.बा. समिती संचालक, लासलगाव ग्रा.पं.सरपंच जयदत्त होळकर यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.
येवला लासलगाव मतदार संघातील राजकीय वर्तुळात मराठा समाजाचा एकमेव चेहरा म्हणून जयदत्त होळकर यांच्याकडे पहिले जाते. त्यामुळे पंचक्रोशीतून जयदत्त होळकर यांच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविण्यात येत आहे. यापूर्वी हनुमाननगर ग्रामपंचयतीने भुजबळ यांचा आमदार निधी न घेण्याचा ठराव केला तर ब्राम्हणगाव या गावाने त्यांना किंवा त्यांच्या स्वीय सहाय्यकास गावबंदी करत असल्याच्या पोस्ट सामाजिक माध्यमात व्हायरल झाल्या. आशिया खंडात नंबर एक समजल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मंत्री भुजबळ यांच्या समर्थक पॅनलचा सभापती विराजमान आहे. मात्र याच बाजार समितीतील संचालक राजेंद्र बोरगुडे यांनी होर्डिंग अथवा वर्तमानपत्रातील जाहिरातीत भुजबळ यांच्यासोबत आपला फोटो लावण्यात येऊ नये असे बाजार समितीला पत्र लिहून कळवले आहे. त्यातच भुजबळ यांचे समर्थक व निकटवर्तीय जयदत्त होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रांतिक सरचिटणीस पदाचा व ४२ गाव अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जयदत्त होळकर यांचे वडील सीताराम आप्पा होळकर हे भुजबळ यांना येवला मतदार संघात आणनारे पहिल्या फळीतील नेते होते. त्यानंतर जयदत्त होळकर यांनी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली काम केले. जयदत्त होळकर हे मुंबई बाजार समिती संचालक आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ते भुजबळ समर्थक पॅनलमधून निवडून आले आहेत. आज ते येवला लासलगाव मतदार संघातील सर्वात मोठ्या अशा लासलगाव सारख्या गावचे ते सरपंच आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय वजनही मोठे आहे. त्यामुळे त्यांची नाराजी भुजबळ यांना नक्कीच परवडणारी नाही.

● मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी
आपण कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहोत. जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण संदर्भात मागण्या अतिशय रास्त आहेत. त्यांना पाठिंबा देतांना त्यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप नको असल्याने मी मराठा बांधवांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे.
जयदत्त होळकर
प्रांतिक सरचिटणीस,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सत्तर वर्षे काँग्रेसने झोपा काढल्या का?, आठवलेंचा सवाल
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस झोपा काढत होती का? असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही, अशा शब्दांत रामदास आठवलेंनी सुनावले आहे. ते  माध्यमांशी बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, राहुल गांधींना भारत जोडो यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे काँग्रेस झोपा काढत होती का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला जोडण्याचं काम केले आहे. हिंदू-मुस्लीम, हिंदू-दलित वाद होत असले, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवले की, जात-धर्म-भाषेपेक्षा देश महत्वाचा आहे. देशावर संकट आल्यानंतर सर्वांनी लढले पाहिजे.

महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत जोडण्याचे काम केले. कायद्याने जातीव्यवस्था संपवण्यात आली आहे. त्यामुळे भारत जोडलेलाच आहे. पण, जोडला नसेल, तर काँग्रेसने का जोडला नाही? सगळ्या राज्यांत काँग्रेसची सत्ता असताना काय केलं? ही भारत जोडो नाहीतर भारत तोडो यात्रा होती,” असे टीकास्र रामदास आठवलेंनी सोडले.
राहुल गांधींना ‘भारत जोडो’ यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही. राहुल गांधींच्या यात्रेचा फारसा परिणाण होईल, असे वाटत नाही,” असं रामदास आठवलेंनी म्हटले.
इंडिया हे आपल्या देशाचे नाव आहे. देशाच्या नावावर निवडणूक लढणे ठिक नाही. आम्ही याचा विरोध केला, तर इंडियाला विरोध करतायत असे म्हणतील, असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.