अभिनेत्री - Adhunik Kesari

मीनाकुमारी : एक शोकांतिका
आधुनिक केसरी

बऱ्याचदा खुलताबादला जाण्याचा योग आला आणि जेंव्हा जेंव्हा खुलताबादला आलो तेव्हा तेव्हा मीनाकुमारी आणि पाकिजा चित्रपट समोर उभा ठाकायचा. कारण पाकिजाचे काही चित्रीकरण खुलताबादच्या कब्रस्थानाचे व गावातील काही भागाचे झालेले आहे. कब्रस्थानाच्या ज्या भागाचे चित्रीकरण झालेले आहे, तो अजूनही तसाच आहे, गाव मात्र बदलेलं आहे. कब्रस्थानाला लागून शासकीय विश्रामगृह आहे, निझामकालीन भव्य अशी वास्तू आहे. सांगितलं जातं की इथे मीनाकुमारी अधूनमधून राहायला येत असत. या परिसरात कमालीची शांतता आहे. इथं मन खूप रमतं. लेखनासाठी खूप सुंदर जागा आहे. म्हणूनच बहुतेक मीनाकुमारीला ही जागा आवडत असावी, आयुष्याच्या उत्तराधार्थ त्या एकाकी पडल्या होत्या आणि लेखणीशी त्यांची जवळीक निर्माण झाली होती. मी बरेच दिवस झाले यावर लिहावं म्हणत होतो पण वेळ मिळत नव्हता, पण १ ऑगस्ट मीनाकुमारीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द व्यक्त होत आहे.

चंदेरी दुनियेत प्रसिध्दीच्या शिखरावर असताना अवघ्या ३९ वर्षी जगाचा निरोप घ्यावा, ते ही अशा करुण अवस्थेत, हे मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. रील लाईफमध्ये आयुष्यभर त्यांनी ट्रजेडी क्वीनच्या भूमिका केल्या आणि रिअल लाईफ मध्येही ट्रजेडी क्वीन म्हणूनच जगल्या. म्हणून मीनाकुमारीला 'ट्रजेडी क्वीन' ही म्हंटलं जातं. इथं मला ऱ्होन्डा ब्रिनी यांच्या 'द सिक्रेट' मधली 'लॉ ऑफ अट्रक्शन' चा  सिद्धांत आठवतो.

बालपण

मीनाकुमारी ह्या रवींद्रनाथ टागोर कुटुंबातील होत्या, हे फार कमी लोकांना माहिती असेल. रवींद्रनाथ टागोर यांची भावजय ह्या बालविधवा होत्या. त्यांनी बालविधवा प्रथेस कडवा विरोध करून इसाई धर्म स्वीकारला आणि मेरठ येथे प्यारेलाल यांच्याशी विवाह केला. त्यांना प्रभावती नावाची गुणी मुलगी झाली. तिचा आवाज खूप गोड होता म्हणून तिने मुंबई गाठले तिथे तिची भेट संगीतकार अलिबक्षशी झाली. नंतर विवाहात रूपांतर झाले आणि प्रभावतीची इकबाल बानो झाली. या जोडप्याला तीन मुली झाल्या. पहिली खुर्शीद लग्नानंतर पाकिस्तानात गेली. दुसरी मधू हास्य कलाकार 'महेमुद' ची पत्नी आणि सगळ्यात लहान महजबी म्हणजेच मीनाकुमारी.

'अलिबक्ष'ची परिस्थिती कामं नसल्याने खूपच दयनीय होती.  ज्या दिवशी काम त्याच दिवशी पोटाला मिळायचं. दोन मुली नंतर तिसरी मुलगी असह्य होती म्हणून 'महजबी' ला 'मीनाकुमारी' ला अनाथ आश्रमात टाकावं लागलं पण कुठं तरी ममता जागृत झाली आणि परत तिला घरी आणण्यात आलं. घरची परिस्थिती खूपच वाईट होती. अली बक्ष आणि इकबाल बानो दोघे ही कामाकरिता बाहेर पडायचे. 'महजबी' ची शिक्षणात आवड होती पण घरच्या दरिद्रीमुळे तिन्ही मुलींनाही बाल कलाकार म्हणून कामाला लावले.  त्यामुळे सगळेच कामासाठी बाहेर पडल्याने स्वयंपाक एकदाच बनायचा कारण घरी येण्याची कुठलीच वेळ नियोजित नव्हती. त्यामुळे शिळ्या जेवणाची सवय नंतर आवड 'मीना कुमारी' ला  शेवटपर्यंत राहिली. शिळी भाकर, ठेचा आणि कांदा ती आवडीने खायची. घरच्या हालक्याच्या परिस्थिती मुळे घरात रोजच भांडणे व्हायची. त्यामुळे मीनाकुमारी मध्ये लहानपणापासूनच एकाकीपणा आला होता ती खडे गोळा करायची आणि ती खड्याशी गप्पा मारायची आणि ही सवय तिची शेवटपर्यंत राहिली. शिळी भाकर आणि एकांता मधले खडे. अवघ्या चौथ्या वर्षी 'महजबी' ला पोटासाठी कॅमेऱ्यासमोर उभं राहावं लागलं. तो चित्रपट होता विजय भट्ट दिग्दर्शित ' लेदर फेस' ( १९३९ ) या चित्रपटाच्या वेळी 'महजबी'चं वय फक्त चार वर्षे होतं. या चित्रपटासाठी 'महजबी' ला २५ रुपये भेटले होते आणि घरची चूल पेटली होती. आठव्या आणि नवव्या वर्षी तिला 'एक ही भूल' 'पूजा' चित्रपट भेटला. बाल कलाकार म्हणून भरपूर कामे मिळू लागली.  'महजबी' आवाज ही गोड होता यातून ही  तिला पैसे मिळाय लागले आणि घर चालायला लागले आता 'महजबी' बाल वयातच घर चालविणारी मशीन बनली होती. 'महजबी' मुळे घरात प्रसन्नता अली होती. 'महजबी' पैसा कमविणारी मशीन बनली होती, शिकलेली मशीन जास्त पैसा कामावेल म्हणून अली बक्ष ने 'महजबी' ला हिंदी, इंग्लिश आणि उर्दू ची शिकवणी लावली. टीचर घरी येऊन शिकवायचे. अशा वेळातच 'महजबी' च्या आई चं निधन झालं, हा खूप मोठा धक्का 'महजबी' ला होता. नवव्या वर्षी सर्व प्रथम संगीतकार अनिल बिस्वास यांनी 'महजबी' ला गायनाची संधी दिली 'बहेन' (१९४१ ) चित्रपटात. पुढे 'पिया घर आजा' चित्रपटात सगळेच 'मीनाकुमारी'नी गायली. १४ व्या वर्षी 'बच्चो का खेल' चित्रपटाने 'महजबी' चे नामकरण 'मीनाकुमारी' केलं आणि इथून 'मीनाकुमारी' नावाचा प्रवास सुरु झाला.

प्रेम आणि विवाह

१४ व्या वर्षी 'बच्चो का खेल' चित्रपटाने 'महजबी' चे नामकरण 'मीनाकुमारी' केलं आणि इथून 'मीनाकुमारी' नावाचा प्रवास सुरू झाला. मीनाकुमारीच्या अभिनयाची प्रशंसा व्हायची पण चित्रपट थर्ड ग्रेडचे असायचे. ह्या काळात होमी वाडिया च्या 'लक्ष्मी नारायण' पौराणिक चित्रपटात 'लक्ष्मी' ची भूमिका मिळाली. या चित्रपटामुळे ओळीने 'हनुमान पाताल विजय', 'गणेश महिती' असे पौराणिक चित्रपट मिळाले आणि मीनाकुमारीला लोकप्रियता मिळाली. होमी वाडीया सोबतच्या शेवटच्या चित्रपटात ' अल्लादिन का चिराग' ( १९५२ ) साठी मीनाकुमारीला मिळाले होते, दहा हजार रुपये. त्या पैशातून आलिशान सेकंड हँड कार खरेदी केली आणि ड्रायव्हिंग ही शिकली.

याच काळात देविका राणी सोबत हिट चित्रपट देणारे अशोक कुमार यांनी 'तमाशा' चित्रपटासाठी  मीनाकुमारी ला वेगळ्या प्रकारची भूमिका दिली. हा चित्रपट तर चालला नाही पण या चित्रपटाच्या सेट वर मीनाकुमारीच्या 'सपनाचा राजकुमार' 'कमाल अमरोही' शी भेट झाली. चित्रपट 'पुकार' च्या यशस्वी दिग्दर्शनानंतर आगामी फिल्मसाठी मीनाकुमारीला त्यांनी पसंद केलं होतं पण ते काही जुळून आलं नव्हतं, पण मीना कमाल अमरोहीच्या प्रेमात पडली. त्यावेळी मीनाकुमारी फक्त आठ वर्षाची होती. कमाल अमरोहीचं व्यक्तिमत्त्व रुबाबदार होतं तसेच त्याकाळातले सर्वात महागडे दिग्दर्शक होते. 'महल' चित्रपटासाठी त्यांनी त्याकाळी सर्वात जास्त एक लाख रुपये घेतले होते. सांगितलं जातं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर फिदा होऊन 'मधुबाला' ने सुद्धा स्वतः हुन लग्नाचं प्रपोजल दिलं होतं. मीनाकुमारी वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांच्या प्रेमात होती. घरात कमाल अमरोहीचे असंख्य फोटो मीनाकुमारी लावलेले होते. 'तमाशा' चित्रपटाच्या सेटवर दहा वर्षांनी मीनाकुमारीची कमाल अमरोही ची भेट झाली होती. दहा वर्षांपूर्वी मीना बाल तर आता ती तरुण होती. कमाल अमरोही मीनाकुमारी पेक्षा १५ वर्षांनी मोठे व विवाहित होते.

'मीनाकुमारी' ला अमरोही सोबत काम करण्याची आणि भेटायची इच्छा खूप असायची. ती मनातल्या मनात  अमरोही वर खूप प्रेम करायच्या. एकेदिवशी अचानक कमाल अमरोहीने सेक्रेटरी बाकर अली जवळ 'अनारकली' चित्रपटाचा प्रसाव पाठविला होता, हा प्रस्ताव ऐकून मीनाकुमारी खूप खुश झाली. 'अनारकली' चे निर्माते मखनलाल मीनाकुमारी ला तीन हजार देऊ इच्छित होते. मागची फिल्म 'अल्लादिन का चिराग' ला मीनाला दहा हजार मिळाले होते. त्यामुळे मिनाचे वडील अली बक्ष या प्रस्तावास तयार नव्हते शेवटी अमरोहीने मध्यस्थी करून पंधरा हजार रुपये ठरविले. यावेळेस अमरोही च्या मनात मिनाबद्दल  प्रेम नव्हतं. मीनाकुमारीचं एकतर्फी प्रेम होतं. 'अनारकली' साठी लोकशन पाहण्यासाठी अमरोही आग्र्याला गेले. इकडे मीनाकुमारी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला गेली होती, परतीच्या वेळी तिच्या मोटारीला मोठा अपघात झाला आणि तिला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही बातमी वृत्तपत्रात अमरोही यांनी वाचली त्यावेळी 'अनारकली' च्या लोकेशन साठी आलेल्या दिल्लीच्या हॉटेलमध्ये होते. ते तातडीने पुण्याला मीनाकुमारीला भेटायला पुण्याला आले. यावेळी मीनाकुमारीला खूप आनंद झाला. चार महिने हॉस्पिटलमध्ये होती. रोज दोघांच्या भेटी व्हायला लागल्या आता अमरोही ही मीनाच्या प्रेमात पडले होते. पण इकडे अनारकली चित्रपट डब्ब्यात गेला असला तरी याच काळात मीनाकुमारी ला 'बैजू बावरा (१९५३) व फुटपाथ (१९५३) हे ब्लॉकबस्टर मिळाले आणि मीना लोकप्रियेतेच्या शिखरावर पोहचली. इकडं अमरोही आणि मीना ने लग्न करायचं ठरवलं होतं पण अडचण मीनाचे वडील अली बक्ष होते कारण मीना सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती. त्यामुळे ते विरोध करणारे होते. तरीही या दोघांनी लपून लग्न केलं आणि काही नाही झाले अशा पद्धतीने घरी आपआपल्या घरी राहिले. मीनाने विचार केला की दोन लाख आले की वडिलांना द्यावं आणि लग्नाबद्दल सांगावं पण त्याआधीच तिच्या वडिलांना कळलं आणि मीनाला अमरोहीला तलाक दे म्हणून तकादा लावला. अमरोही सोबत काम करण्यास मज्जाव केला आणि ज्यादिवशी तू अमरोही सोबत काम करशील त्यादिवशी माझ्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी बंद होतील, अस अली बक्ष नी सुनावलं पण मिनाकडून हे शक्य नाही झाले आणि ते घर मिनासाठी बंद झाले. अमरोही नी पालिहिल ला घर घेतलं आणि दोघे सुखाने राहू लागले.

चित्रपट प्रवास व एक गुणी अभिनेत्री

बैजू बावरा व  नंतर फुटपाथ नंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 'बैजू बावरा' (१९५३) ला पहिला फिल्मफेअर पुरस्कार पटकाविला. लागलीच दुसऱ्या वर्षी ही  'परिणिता' साठी मीनाकुमारी ने फिल्मफेअर पुरस्कार पटकाविला. कमाल अमरोही ने दोघांच्या प्रेमकहाणी वर 'दायरा' चित्रपट निर्माण केला तो ही सुपर हिट ठरला.

आपल्या ३४ वर्षाच्या रजतपटीय आयुष्यात अभिनय सम्राट अशोककुमार पासून ते 'मेरे अपने' विनोद खन्ना पर्यंत कितीतरी अभिनेत्याशी जुगलबंदी तिला खेळावी लागली. पण मीनाकुमारी कुठेच कमी पडली नाही. मीनाकुमारीला आव्हानात्मक भूमिका मिळत गेल्या करण ती पेलविण्याची ताकत तिच्यात होती. म्हणून ती अजोड होती. मीनाकुमारीने अभिनयाचे कधीही अभिनयाची ट्रेनिंग घेतली नाही. ती स्वतः च अभिनयाची विद्यापीठ होती. 'साहेब बिवी और गुलाम' तिच्यातला 'अभिनय साम्राज्ञी' समोर आणते. अभिनयाचे सर्व आव्हाने तिने स्वीकारले. संवाद फेकीत ती अजोड होती. तिचे संवाद लेखकाच्या आत्म्याशी समरस व्हायची. तिचे डोळे कारुण्याचे गुलाम होते. निर्मलतेचे धनी होते. या डोळ्यांनी कधी ग्लिसरीन चा उपयोग ही केला नाही. अशी ही प्रगल्भ अभिनेत्री. भूमिकेच्या अंतरंगात शिरून तिचे सर्व पैलू पडद्यावर सादर करण्याची करण्याची क्षमता तिच्यात होती. क्षमते बरोबरच काही शिकण्याची ही तिची वृत्ती होती. मीनाकुमारीच्या अभिनयाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे तिचा पेहराव बोलत नसे, भूमिकेत शिरताना तिच्या सर्वांगावर परिणाम दिसत असे.

मीनाकुमारीला तिच्या छोट्याशा कारकिर्दीत चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाली आहेत. तिचा ' साहिब, बिवी और गुलाम' हा चित्रपट बर्लिन फेस्टिव्हल मध्ये नामांकित झाला होता. मीनाकुमारीने एकूण ९१ चित्रपटात भूमिका केल्या. यापैकी सर्वाधिक म्हणजे १४ चित्रपटात तिच्याबरोबर अशोक कुमार मुख्य भूमिकेत होता. ७ चित्रपटात धर्मेंद्र बरोबर. राज कुमार, राजकपूर, दिलीपकुमार, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना अशा दिगग्ज कलाकारांसोबत काम केलेलं आहे नव्हे उलट या दिगग्ज अभिनेत्री सोबत या कलाकारांनी काम केलेलं आहे.

मीनाकुमारी परीस होती, ज्याला ही तिने स्पर्श केलं ते सोनं झालं. धर्मेंद्रला मोठं बनविण्यात तिचा मोठा हात आहे. तिचे को -स्टार तिच्या प्रभावाने मोठी व्हायची. महेमुदला ही तिनेच हात दिला नाहीतर महेमुदचे 'पेइंग गेस्ट' असलेले अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा आज या ठिकाणी कदाचित नसते. कारण या दोघांना ब्रेक महेमुदने दिला होता.

वैवाहिक जीवन

तीन -चार वर्षांच्या सुखी संसारानंतर या सुखी संसाराला ग्रहण लागायला चालू झाले. एकिकडे चित्रपट हिट वर हिट होत असताना रिअल लाईफचा चित्रपट फ्लॉप होत होता. तिचे चित्रपट जरी हिट होत असले तरी ती सुखी नव्हती. अमरोही आणि तिचे खटके उडायला लागले होते. या नात्यात दुरावा येण्याचं कारण सांगितलं जातं की,  मीनाकुमारीची आपल्या को - स्टारशी जवळीक. दुसरं कारण अमरोहीचा पझेसिव्हनेसपणा. असं ही सांगितलं जातं की कमाल अमरोही बाबतीत तिचे को - स्टार मिसगाईड करायचे आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचे. यामुळे कमाल अमरोहीने तिच्यावर काही बंधने आणली. तीन अटी तिच्यावर लादल्या गेल्या म्हणजे आता अटीवर त्यांचा संसार चालू होता. त्या तीन अटी अशा होत्या.

१. मीनाकुमारीने बरोबर संध्याकाळी साडे सहा वाजता घरी यावे आणि दोघे एकमेकांना वेळ द्यावा.

२. आपल्या मेकअप रूम मध्ये आपल्या को - स्टारला किंवा इतर कुणालाही प्रवेश करू देता कामा नये. सांगितले जाते की यासाठी अमरोही ने पाळतीवर आपली माणसं ही ठेवली होती. या काळात मीनाकुमारीची गुलजार शी जवळीक वाढली होती आणि गुलजार आणि मीनाकुमारी मेकअप रूम मध्ये तासनतास बसायचे. म्हणून ही अट.

३. कुठं जायचं असेल तर आपल्याच गाडीतुन जायचं, दुसऱ्याच्या गाडीत बसायचं नाही. सांगितलं जातं की मीनाकुमारीने एकदा आपली गाडी असतानाही प्रदीप कुमारच्या गाडीत प्रवास केला होता.

एकीकडे मीनाकुमारी यशाच्या शिखरावर राज्य करीत होती तर एकीकडे तिची मानसिक घुसमट चालू होती. आणि ह्या अमरोहीच्या अटी तिला पाळणं जड झालं आणि वाद वाढतंच गेला. सांगितलं जात तिचे को - स्टार, मित्र किंवा नातेवाईक ह्या दोघांची समजूत न काढता उलट आगीत तेल ओतण्याचे काम केलं. जेव्हा कायमच घर सोडून मीनाकुमारी आपले जिजा महेमुद कडे आली तेव्हा अमरोही मीनाकुमारीची समजूत काढण्यासाठी घरी होते खरंतर महेमुद नी मीनाकुमारीची समजूत काढून अमरोही सोबत पाठवायला हवे होते पण त्यांनी तसं नाही केला कारण मीनाकुमारी ही परीस होती तिची सर्वानाच गरज होती. पण स्वतः मीनाकुमारीचं वाटोळं होत गेलं. त्यामुळे मीनाकुमारी कमाल अमरोही पासून दूर दूर होत गेली. सांगितलं जातं पाकिजा मध्ये आधी धर्मेंद्र होता पण धर्मेंद्रशी मीनाकुमारीशी जवळीक पाहून अमरोहीने धर्मेंद्रला पाकिजातून काढून टाकले आणि त्याचा परिणाम असा झाला की पाकिजा बंद पडला नंतर सुनील दत्तच्या हस्तक्षेपामुळे पाकिजाचे शूटिंग परत चालू झाले पण मीनाकुमारी व्यवस्थित सहकार्य करीत नव्हती. १९५४ ला सुरू केलेले पाकिजाचे शूटिंग १९७२ ला पूर्ण झाले.  आणि रिलीज झाला. पाकिजा हा चित्रपट कमाल अमरोही आणि मीनाकुमारीचा ड्रीम प्रोजेक्ट होता. हा चित्रपट मीनाकुमारीला पाहण्याची खूप इच्छा होती, चित्रपट रिलीज होऊनही ती पाकिजा चित्रपट पाहू शकली नाही कारण ती हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारी होती आणि तीन महिन्यांतच ती जगाला निरोप दिला.

अनेक कलाकारांशी संबंध

मीनाकुमारीचे तिच्या अनेक सहकलाकारशी नेहमी नाव जोडलं गेलं. अशोक कुमार, भारतभूषण, दिलीप कुमार, धर्मेंद्र, गुलजार. गुलजार सोबतचा एक किस्सा प्रचंड गाजला होता. कमाल अमरोहीने मीना कुमारी वर बऱ्याच अटी ठेवल्या होत्या. त्यातली एक अट म्हणजे मीनाकुमारीच्या मेकअप रूम मध्ये पुरुष कलाकारास बंदी होती. पण गुलजार आणि मीनाकुमारी तासान तास मेकअप रूम मध्ये बसायचे. बाकर ने कमाल अमरोहीला ही बातमी दिली. तेंव्हा गुलजार ला सेट वरच  मारण्याचा प्लॅन झाला पण गुलजार त्यातून निसटले.

माणूसकीची मीनाकुमारी

एक माणूस म्हणून मीनाकुमारी ग्रेटच होती. अमरोहीशी लग्न होताच तिने अमरोही च्या पत्नीला व त्यांच्या मुलांना आपलंसं केलं. होतं. मीनाकुमारीला लहान मुले खूप आवडायची. चित्रपटात लहान मुलांना मारायचा सीन असला की मारल्यानंतर ती त्यांना मायेने जवळ घ्यायची आणि रडायची तिने कुणाकडून काही घेतले नाहीत, देतच राहिली. अमरोही पासून वेगळं जरी राहत असली तरी अमरोही च्या पाहुण्यांचा मान सन्मान करीत असे.अमरोही पासून वेगळं झाल्यापासून ती दारूच्या आहारी खूप गेली होती. सांगितलं जातं की धर्मेंद्र सोबतचं प्रेमभंग झाल्याने ती खूपच अल्कोहोलिक होती. अमरोही नंतर धर्मेंद्र आपल्याला आधार देईल असं मीनाकुमारीला वाटलं होतं. सांगितलं जातं की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी ती धर्मेंद्रला पत्र पाठवायची की एकदा मला भेट पण धर्मेंद्र कडून तिला प्रतिसाद मिळाला नाही. मीनाकुमारीची आर्थिक परिस्थिती खूपच हालक्याची झाली होती. दारू साठी सुध्दा पैसा नसायचा. सांगितलं जातं की शेवटच्या क्षणी ती रात्र न दिवस  दारूच्या नशेत राहायची. तिचे नोकर तिला तिच्या दारू मध्ये देशी टाकून द्यायचे तरी तिला भान नसायचं, नोकर तिच्या शरीराशी खेळायचे पण तिला कसलं भान नाही असायचं. तिला जेव्हा कळलं की आपण आता जिवंत राहू शकत नाही तेंव्हा मुमताज कडून तीन लाख उसने घेतल्याची परतफेड म्हणून जुहूचा बंगला मुमताजला मरण्यापूर्वी  देऊन टाकला, कुणाचं कर्ज अंगावर घेऊन नाही गेली. तिच्या अंतविधी साठी पैसे नव्हते तेव्हा एका निर्मात्याकडे तिचा पैसा होता, त्या निर्मात्याने तो पैसा देऊ केला मग तिची अंतविधी झाली. अशाप्रकारे या अभिनय साम्राज्ञीचा ३१ मार्च १९७२ ला अंत झाला.

म्युझिक टीचर (Netflix)
आधुनिक केसरी

तो सिमल्याच्या निसर्गरम्य वातावरणात राहत असलेला संगीतशिक्षक असतो.  त्याचे वडील शास्त्रीय संगीतातले नामवंत व्यक्तिमत्त्व व गुरू होते. त्याच्या आयुष्यात निरनिराळ्या नात्यांनी पाच स्त्रिया येतात.

त्याची आई त्याला समजून घेणारी. त्याने सुखी, आनंदी असावे यासाठी आशेने डोळे लावून बसलेली. धाकटी बहीण मायाळू, साधी, मोजक्याच अपेक्षा/आकांक्षा असलेली.

दोघींच्या सहवासात शांतपणे जीवन जगणारा तो पोटापुरते इच्छिणारा, महत्त्वाकांक्षी नसणारा.

एके दिवशी त्याला मोठ्या घरचे बोलावणे येते. त्यांच्या तरुण मुलीला गाणे शिकवायचे असते. तरुण मुलीची आईच चौकशी करत असते, कमी पगारात ती गाण्याची शिकवणी ठरवून टाकते. शिकवणी सुरू होते, तरुण मुलगी आनंदाने शिकत असते.

गाणे शिकणारी आणि ते शिकवणारा - दोघे गाण्याची उत्फुल्ल मौज अनुभवतात .

निसर्गाच्या सान्निध्यात प्रफुल्लित मनांच्या सहवासाने आयुष्याला रंगत येत जाते.

एका संगीतस्पर्धेत तरुण मुलीला भाग घेण्यास शिक्षक प्रवृत्त करतो. तरुण मुलीचे ते स्वप्न नसते. तिला त्याच्याशी लग्न करून संसार थाटायचा असतो, त्याच्या प्रेमात न्हाऊन निघायचे असते.

त्याचे मत - तिने चांगली गायिका व्हावे , तिची प्रतिभा फुलवावी ... लग्न व संसार होईलच नंतर.

नियती वेगळेच घडवते . तरुण मुलगी गायनस्पर्धा जिंकते .

कालांतराने ती प्रसिद्ध गायिका होते . मुंबईला उच्च वर्तुळात वावरायला लागते .

तो पुलावर तिची वाट पाहत असतो . त्यांची भेट होत नाही . तिची आई त्यांना भेटू देत नाही.

दरम्यान तो रियाज करत रात्रीच्या नीरव एकांतात निसर्गाच्या जवळिकीत समाधान शोधत असतो . त्याचा रियाज त्याच्या नकळत आसुसून ऐकत राहणारी एक समवयस्क परित्यक्ता त्याला नकळत अचानक त्याला सामोरी येते. त्याचे कौतुक करते. ती दोघांचे प्रेम जाणून असते. त्याच्या मनात उचंबळून आलेली प्रीती तिच्यातल्या अभिसारिकेला भिडते. दोघे एकमेकांचे दुःख वाटून घेताना जवळचे सुख देऊ करतात. परंतु हा क्षणिक आनंद टिकणारा नाही, आपण हतबल आहोत हे त्यांना कळून चुकते.

आठेक वर्षांनी बहिणीचे लग्न ठरवायचे असते. त्याच सुमारास तिचा कार्यक्रम गावात ठरवला जातो. मित्रांकडून कार्यक्रमाची तपशीलवार माहिती मिळते. तिच्या भेटीची आशा त्याच्या मनातून मावळत जाते. जाणूनबुजून कार्यक्रमाचीच तारीख तो बहिणीच्या लग्नासाठी ठरवून टाकतो. लग्नविधी पार पडतात. त्याच मध्यरात्री तो निकराच्या आवेगाने तिला भेटायला कार्यक्रमस्थळी जाऊन पोचतो. ती गाणे संपता संपता त्याला पाहते. दोघे एका ठरावीक अंतरावरूनच भेटतात. अश्रुभरल्या डोळ्यांनी एकमेकांना पाहत राहतात. पण घट्ट मिठीत जवळ घेऊ शकत नाहीत. तो अपराधी मनाने बोलत असतो. ती फक्त ऐकत राहते. आता वेळ गेली, एकत्र येऊ शकत नाही, एवढेच ती म्हणते.

तो घरी परततो. आई ओळखून घेते. बहिणीची पाठवणी होते. तो आतल्या आत उन्मळून पडलेला असतो ! परंतु भवतालची हिरवाई , डोंगरदऱ्या, उतरणीवरची कौलारू घरे, दाट वनराजी, त्यातून झिरपणारा सूर्यप्रकाश, पाऊस, गाणे आणि तिच्या आठवणी यांचे त्याच्या आयुष्याशी असलेले अतूट नाते मात्र कधीही संपणार नसते !! ती कितीही दूर गेली तरीही!

“मस्त आँखों में शरारत...”
आधुनिक केसरी

पन्नासच्या दशकात एका चित्रपटासाठी सर्वाधिक, रुपये एक लाख एवढं मानधन घेणारी सुरैय्या ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री होती. देव-दिलीप-राज या त्रिमूर्तीच्याही ती एक पाऊल पुढे होती. १९५३ला आलेल्या ‘माशूका’मध्ये तिचा नायक मुकेश (गायक) होता. तर १९५४च्या ‘वारिस’ मध्ये गायक तलत मेहमूदने तिच्यासोबत काम केलं होतं.

तिचा मोहनी मुखडा पाहिल्यावरच वाटलं, की ती या भूलोकीची नसावी आणि नाहीच्चय! तिचं ते सालस, अभिजात, नितळ सौंदर्य पुन्हा कधी कुण्या अभिनेत्रींच्या चेहऱ्यात मला  गवसलं नाही. माझ्या पाहाण्यात आलेला तिचा पहिला चित्रपट म्हणजे देव आनंद सोबतचा ‘विद्या’! तोही मी उल्हासनगरच्या ‘म्युझीक प्लॅनेट’ मधून आणलेल्या सी.डी.वर पाहिलेला! तिला मोठ्या पडद्यावर पाहणं हे माझ्या नशिबातच नव्हतं मुळी! कारण, १९६३ला ऐन यशाच्या शिखरावर असतानाच तिने चित्रपटसृष्टीतून सन्यास घेतलेला, त्यावेळी मी जेमतेम दोन वर्षांचा असेन.

देवचं गाणं ऐकता ऐकता नेटवर आज तिचा चेहरा पुन्हा डोळ्यांसमोर आला, आणि तिच्यावर लिहायला माझी लेखणी जणू उत्सुक झाली. मग काय, तीही माझ्या डायरीच्या पानांवर कशी झरझर उतरू लागली. कधी फारसं कुणाशी न बोललेली ती, डायरीच्या पानांवरुन हळूहळू माझ्या काळजावरही पसरु लागली. हो, तीच ती, हिंदी सिनेसृष्टीतील ‘मलिका-ए-हुस्न’ आणि लोकप्रिय पार्श्वगायिका, अभिनेत्री सुरैय्या! लाहोर मध्ये १५जून १९२९ला जन्म झालेल्या या  ‘मलिका-ए-अदाकारा’चं संपूर्ण नाव सुरैय्या जमाल शेख़! अजीज जमाल तिचे वडील आणि आई मुमताज. सुरैय्या एक वर्षाची असतानाच तिचे कुटुंब मुंबईच्या मरिन-ड्राईव्ह येथील ‘कृष्णा महल’ येथे राहावयास आलेलं. १९३०च्या दशकातले हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक एम. जहूर हे सुरैय्याचे मामा. मुंबईतील आझाद मैदान परिसरात असलेल्या मुलींच्या न्यू हायस्कूल मध्ये (जे.बी. पेटिट) तिचं शिक्षण झालं होतं.

‘मैडम फॅशन’ या १९३६ साली आलेल्या चित्रपटात वयाच्या सातव्या वर्षीच सुरैय्या बाल कलाकार म्हणून चमकली. १९४२च्या ‘नई दुनिया’तलं, ‘बूट करो ना पॉलिश बाबू...’ हे तिचं पहिलं गाणं. सुरैय्याच्या बालमित्रांमध्ये राज कपूर आणि मदन मोहन यांचा समावेश होता. ‘ऑल इंडिया रेडिओ’वर मुलांसाठी झालेल्या एका कार्यक्रमातल्या भेटीनंतर त्या दोघांनीच ‘ऑल इंडिया रेडिओ’वर गायची तिला जिद्द केली होती. पुढे तिचं गाणं ऐकून नौशादजींनी तिला ‘शारदा’ चित्रपटात गायची संधी दिली, आणि इथूनच खऱ्या अर्थानं सुरैय्याच्या रसभऱ्या गीतांचा प्रवास सुरु झाला.

सुरैय्याची बहरणारी कारकीर्द बघून बॉम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या देविका राणी यांनी रुपये ५००/- महिना यानुसार पाच वर्षांसाठी सुरैय्यासोबत करार केला होता. पण हा करार पुढे सुरैय्याच्या विनंतीवरुन रद्द देखील केला. कारण, दिग्दर्शक के. आसिफ यांनी रुपये चाळीस हज्जार एवढं मानधन देवून ‘फूल’ (१९४५) या चित्रपटासाठी सुरैय्याला साईन केलं होतं. ‘फूल’ हा त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता. ‘सम्राट चंद्रगुप्त’ चित्रपटातील गाण्याच्या रिहर्सलवेळी सैगल सुद्धा सुरैय्याच्या स्वरांनी जबरदस्त प्रभावित झाले होते. पुढे ‘उमर ख़य्याम’ (१९४६) आणि ‘परवाना’ (१९४७) चित्रपटात ती सैगलची नायिका होती हे विशेष!

नौशादजींच्या मार्गदर्शनाखाली सुरवातीच्या कारकिर्दीत सुंदर सुंदर तिने दिली. ती दिसायला जेवढी हसीन होती; तेवढाच तिचा आवाजही मधाळ होता. तिचे चाहते आजही विचारात पडतात की, तिचं सौंदर्य जास्त दिलकश आहे की तिचे रसभरे सुरिले स्वर? सुरवातीला सुरेंद्र आणि रेहमान हे अभिनेते तिच्या चित्रपटाचे नायक होते. १९४८ला रेहमानसोबतचा तिचा ‘प्यार की जीत’ प्रदर्शित झाला तेव्हा तिच्या चाहत्यांनी तिच्या घराबाहेर एवढी गर्दी केली होती की, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक इन्स्पेक्टर आणि चार हवालदार उभे करावे लागलेले. ‘बडी बहन’च्या प्रिमियरच्या वेळी तर सुरैय्या हॉलकडे जात असताना चाहत्यांच्या जमावातील एका चाहत्याने गर्दीत तिचे कपडेच खेचले होते. शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला. तेव्हा पासून चित्रपटांच्या प्रिमियरला जाणं तिने बंदच केलं.

ज्या देव आनंदवर तिने जीवापाड प्रेम केलं त्या देवच्या भेटीचा योग एकोणीसशे चाळीसच्या दशकाच्या उत्तरार्धात ‘विद्या’ (१९४८) या चित्रपटाने दोघांना दिला. सुरैय्या तेव्हा यश शिखराच्या बुलंदीवर होती. शूटिंग दरम्यान सुरैय्या-देव एकमेकांच्या प्रेमात पडले. हा हंसाचा जोड पुढे ही ‘जीत’, शायर’, ‘अफसर’, ‘निली’, ‘दो सितारे’, आणि ‘सनम’ या चित्रपटांमध्ये सोबतीनं विहरला.

पन्नासच्या दशकात एका चित्रपटासाठी सर्वाधिक, रुपये एक लाख एवढं मानधन घेणारी सुरैय्या ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री होती. देव-दिलीप-राज या त्रिमूर्तीच्याही ती एक पाऊल पुढे होती. १९५३ला आलेल्या ‘माशूका’मध्ये तिचा नायक मुकेश (गायक) होता. तर १९५४च्या ‘वारिस’ मध्ये गायक तलत मेहमूदने तिच्यासोबत काम केलं होतं. १९५४चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या ‘मिर्ज़ा ग़ालिब’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातील सुरैय्याच्या, मोती बेगमच्या भूमिकेविषयी - ‘तुमने मिर्ज़ा ग़ालिब की रूह को फिर से जिंदा कर दिया’ अशी प्रतिक्रिया भारताचे पहिले पंतप्रधान मा. पंडित नेहरूंनी सुद्धा दिली होती. ‘मिर्ज़ा ग़ालिब’ नंतरही तिचे बरेचसे चित्रपट आले, ‘शमा परवाना’मधे तिचे नायक शम्मी कपूर होता, तर १९६३चा पृथ्वीराज कपूरसोबतचा ‘रुस्तम सोहराब’ हा गाजलेला चित्रपट सुरैय्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

एकोणीसशे पन्नासच्या दशकातला दिलीप कुमार सोबतचा तिचा ‘जानवर’ हा चित्रपट मात्र कधी पूर्ण होऊ शकला नाही. असं म्हणतात की, ‘जानवर’च्या शूटिंग दरम्यान दिलीप कुमार ने तिच्याशी छेड-छाड़ केली होती. बावीस वर्षाच्या आपल्या सिने नायिकेच्या कारकिर्दीत सुरैय्याने बरेचसे हिट चित्रपट दिले. नौशादच्या संगीतामुळे तिचा ‘दिल्लगी’ हा रौप्य महोत्सवी ठरला होता. सुरैय्याची गाणी म्हणजे आपल्याच मस्तीत, आपल्याच तालात वाहणाऱ्या झऱ्याची नीरव-निखळताच जशी काही! ‘मन लेता है अंगड़ाई...’ अनमोल घड़ी १९४६ / तू मेरा चाँद मैं तेरी चाँदनी...’, ‘मुरलीवाले मुरली बजा...’, दिल्लगी १९४९ / ‘मनमोर हुआ मतवाला...’ अफ़सर १९५० / ‘ऐ शम्मा तू बता...’ दास्तान १९५० / ‘मस्त आँखों में शरारत...’ शमा १९६१ / ‘तेरे नैनों ने चोरी किया...’, ‘ओ दूर जानेवाले...’ प्यार की जीत १९४८.  ही सगळी तिची लोकप्रिय गाणी, जी चाहत्यांच्या ओठांवर आजही विराजमान आहेत.

बेमिसाल शैलीच्या तरल अशा या अदाकाराला, देव ‘नॉसी’ म्हणायचा, आणि सुरैय्या देवला ‘स्टीव्ह’ म्हणून हाक मारायची. देवबद्दलची तिच्या प्रेमाची उत्कटता सगळ्याच गोष्टींच्या परे होती. देवसोबत जास्त वेळ मिळावा म्हणून, आपल्याच चित्रपटातील काही गाणी ती लताजींना गायला द्यायची. देवसाठी आपल्या गायकीच्या कारकिर्दीवर सुद्धा ती पाणी सोडायला तयार होती. त्या दोघांना लग्न करायचं होतं, पण भिन्न धर्मामुळे सुरैय्याच्या नानीने त्या काळी अतिशय कडवा विरोध केला होता. मात्र देववरच्या आपल्या प्रेमनिष्ठेला बांधील राहून पुढे सुरैय्या आजन्म अविवाहित राहिली. देव-सुरैय्याचं हे गहिरं नातं कदाचित माझ्या शब्दांच्या परे असेन... नाही आहेच! सुरैय्या, आणखी दहा-बारा वर्षं सिनेसृष्टीत राहिली असती तर, ‘अभी ना जाओ छोड़कर...’ हे गाणं कदाचित देव-सुरैय्यावर चित्रित झालं असतं, आणि हिंदी सिनेसृष्टीत आणखी काही वेगळ्या, खास अशा चित्रपटांची भर पडली असती.

एकोणीसशे त्रेसष्टच्या दरम्यान सुरैय्याच्या वडिलांचं निधन झालं आणि दुसरीकडे कमी रक्तदाबाच्या समस्येनं तिला ग्रासलं. असं म्हणतात की, या कारणामुळे तिने सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतली. पण मला वाटतं, देवच्या दुराव्यामुळे ती मनातून पार खचली होती... तुटली होती.

चित्रपटसृष्टीतील निवृत्तीनंतर जयराज, निरुपारॉय, निम्मी आणि तब्बसूम या आपल्या जवळच्या मित्रांकडे तिचं येणं-जाणं होतं. १९८७ला आपल्या आईच्या निधनानंतर मात्र, पुढे बराच काळ आपल्या कृष्णा-महलमध्ये एकटीनेच जगणं तिच्या नशिबी आलं. सुरैय्याबद्दल बोलताना अभिनेत्री तबस्सूम एका मुलाखतीत म्हटलेली - ‘आपल्या घराचे दरवाजे सुरैय्याने या निष्ठूर जगासाठी कधीच बंद करुन टाकले होते. कधी कधी मी तिला भेटायला जायचे तेव्हा, बऱ्याचदा तिच्या दरवाजाजवळ दुधाचे पॅकेट्स आणि टपालने आलेली काही कागदपत्रं तशीच पडलेली असायची. तिच्याशी झालेलं माझं शेवटचं बोलणं मला अजूनही आठवतंय - ‘आपा, कैसी है आप? कैसी गुज़र रही है?’ या माझ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल तिने मला एक शेर ऐकवलेला - ‘कैसी गुज़र रही है, सभी पुछते है मुझसे, कैसे गुजारती हूं कोई पुछता नहीं!’ ...यशाचं उंच शिखर पदाक्रांत केलेल्या अदाकाराचं केवढं हे असहाय्य एकाकीपण!

आयुष्याच्या शेवटच्या काही महिन्यात धीमंत ठक्कर या आपल्या कौटुंबिक संबंध असलेल्या आप्तेष्टाकडे सुरैय्या राहिली होती. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ३१ जानेवारी २००४ ला मुंबईच्या हरकिसनदास रुग्णालयात सुरैय्याने अखेरचा श्वास घेतला.

दादासाहेब फाळके अकॅडमीने स्मृतिचिन्ह देवून केलेला सन्मान आणि स्क्रीन साप्ताहिकाच्या लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कारासोबत लाखों चाहत्यांचं उदंड प्रेम हाच त्या ‘मालिका-ए-तरन्नुम’चा खरा गौरव होता, आणि आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुरैय्याचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जाणार आहे. ती... जिने आपल्या मनातल्या देवच्या छबीला कधी तडा जावू दिला नाही. या धर्मांध दुनियेने त्या वेड्या जीवांना भेटू नाही दिलं, पण त्या दुसऱ्या दुनियेत कुठला धर्म, कुठला मजहब त्या दोघांना भेटण्यापासून रोखू शकला असेल? ... अगदी निर्धास्त होवून त्या दुनियेत आपल्या देवसाठी ती आता मनापासून गातच असेल की,

‘मस्त आँखों में शरारत

कभी ऐसी तो ना थी...’

संदर्भ: विकिपिडीया, यु-ट्युब, तबस्सूम टॉकीज, मुव्ही बफ.

अभिनेत्री केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात
धुळे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या विरोधात बदनामीकारक आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे व एडवोकेट नितीन भावे यांच्याविरोधात धुळ्यातील तालुका पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी चे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदरील दोघांनी संत तुकाराम महाराज यांचा देखील एकेरी शब्दात उल्लेख केल्याने दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील ते म्हणाले. चितळे व भावे यांच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे कलम 153 A, 500, 501, 505, व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी सातारा येथील एका कार्यक्रमात विद्रोही कवी राठोड यांनी लिहिलेली कवितेचा अक्षय शरद पवार यांनी बोलून दाखविला होता. मात्र त्यांच्या या आशयाचा एडिट करून शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्या बद्दल अभिनेत्री केतकी चितळे व एडवोकेट नितीन भावे यांच्या विरोधात धुळ्यातील तालुका पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार हे आमचे बाप असून तिची बदनामी आम्ही कदापि सहन करणार नसल्याचा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे.

गंगूबाई काठियावाडी : कथा ऐकल्यावर पळून गेली होती आलिया
मुंबई: आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची प्रेक्षकांना मागच्या बऱ्याच काळापासून प्रतीक्षा आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या आलिया भट्ट आणि चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशात नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आलियाचा एक किस्सा शेअर केला आहे. चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर आलियाची प्रतिक्रिया काय होती हे त्यांनी यावेळी सांगितलं.
संजय लीला भन्साळी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटातबाबत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘जेव्हा मी आलियाला या चित्रपटाची कथा ऐकवली होती. तेव्हा ती स्वतःची बॅग घेऊन माझ्या ऑफिसमधून पळून गेली होती. मी भन्साळी प्रोडक्शनच्या सीइओ प्रेरणा सिंहला सांगितलं होतं की आपल्याला नवी अभिनेत्री शोधावी लागेल. पण मला या भूमिकेसाठी मला आलिया परफेक्ट वाटत होती.
भन्साळी पुढे म्हणाले, ‘दुसऱ्या दिवशी आलियानं मला कॉल केला आणि मला म्हणाली की मला तुम्हाला भेटायचं आहे. त्यावर मी तिला, ‘नकार देण्यासाठी पर्सनली भेटण्याची गरज नाही’ असं सांगितलं होतं. पण त्यावर ती हसू लागली आणि मला म्हणाली, ‘तुम्ही माझ्याकडून जी भूमिका करून घेऊ इच्छिता ती भूमिका साकारण्यासाठी मी तयार आहे.’
मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील अनेक टप्पे ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.