देश-विदेश - Adhunik Kesari

देगलूर तालुक्यातील तमलूरचा सचिन वनंजे शूर पुत्र देशासाठी शहीद
आधुनिक केसरी

मनोज बिरादार

देगलूर : काश्मीरच्या तुफानी थंडीमध्ये देशसेवेचे व्रत जोपासणारे तमलूर (ता. देगलूर) गावचे सुपुत्र जवान सचिन यादव वनंजे (वय ३०) यांनी आज देशासाठी आपले प्राण अर्पण केले. दुपारी १२ ते १ च्या सुमारास ड्युटीवर असताना त्यांचे वीरमरण झाले. या दु:खद घटनेने संपूर्ण देगलूर तालुका शोकमग्न झाला आहे.

शहीद सचिन वनंजे हे लहानपणापासूनच राष्ट्रसेवेसाठी प्रेरित होते. देशभक्तीची ठिणगी त्यांच्या मनात लहान वयातच चेतली होती. त्यांनी भारतीय सैन्यदलात भरती होऊन अनेक वर्षे देशसेवा केली. कर्तव्यपरायणता आणि शिस्त हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्य गुण होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, आठ महिन्यांची चिमुकली मुलगी, दोन भाऊ आणि आई-वडील असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्याग आणि बलिदान हेच खरे शौर्याचे प्रतीक असते.
सचिन वनंजे यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशासाठी अजरामर इतिहास लिहिला. त्यांचे नाव आणि त्यांचे शौर्य कधीही विसरले जाणार नाही. तमलूर गावाचा हा वीरपुत्र कायमच्या स्मृतीत राहील.

मोठी बातमी : शरद पवारांचा अमित शाहांवर 'वार'.... देशात अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार....
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई  : देशाच्या गृहमंत्रीपदी सरदार वल्लभभाई पटेल होते, तसंच एके काळी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होतं. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. जी नावं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी सर्वांचे एक वैशिष्ट्य होतं की त्यापैकी कोणालाही कधी त्यांच्या राज्यातून तडीपार केले गेले नव्हतं. तो प्रसंग कधी या राज्यकर्त्यांवर आला नाही. त्यामुळे गृह खातं आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रशासकांची आज मला आठवण होत आहे. असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमधून केला आहे.

शरद पवार साहेब बोलताना म्हणाले की, आजचा दिवस संक्रातीचा आहे. तुम्हाला संक्रातीच्या शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या हातात लेखणी असते. त्यामुळे रोज तुम्हाला सांगायची गरज नाही. फक्त तुमची लेखणी आमच्यासाठी ठेवा एवढंच सांगायचं आहे, असे शरद पवार साहेब म्हणाले.

या देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, स्वातंत्र्यानंतर अत्यंत प्रभावी आणि सर्व देशाचं राज्यांना एकत्रित करण्याचं काम सरदार पटेल यांनी केलं. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी देशाचं गृहमंत्री म्हणून सर्वांनी अनुभवलं. महाराष्ट्राचं योगदान होतं. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचं गृहमंत्री होते. या पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली. आपलं शेजारचं गुजरात हे महाराष्ट्र हे एक राज्य होतं. गुजरातनेही अत्यंत उत्तम प्रकारची ओळख देशाला करून दिली. बाबूभाई म्हणून गुजरातचे कर्तबगार प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते. त्यानंतर माधवराव सोलंकी आणि चिमणभाई पटेल आदी उत्तम प्रशासक होते. ही नावं सांगितली यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आलं नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषण केलं. भाषण करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण थोडीफार माहिती घेऊन भाषण केली तर लोकांच्या मनात शंकेची स्थिती निर्माण होत नाही. असे शरद पवार साहेबांनी म्हटले आहे.

शरद पवार साहेब बोलताना म्हणाले की, १९७८ सालापासून त्यांना माझी माहिती झाली. १९५८ सालापासून मी राजकारणात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांना माहीत नसेल ७८ साली हे व्यक्ती कुठे होते राजकारणात मला माहीत नाही. पण ७८ साली मी मुख्यमंत्री होतो. त्यात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, प्रमिलाताई आदी कर्तृत्वान लोक, जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. पुलोद सरकारची माहिती घेतली तर यातील सगळ्यांनी राज्यासाठी चांगलं योगदान दिलं. म्हणून मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील गृहमंत्री उपमुख्यमंत्री होते. आणि आडवाणी नगरविकास खात्याचे होते. जनसंघाची पार्श्वभूमी असलेल्यांनी माझ्यासोबत काम केलं. संघात राहून आम्हाला सहकार्य केलं त्यापैकी वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन होते. ही सर्व नेतृत्वाची फळी भाजपने ७८नंतर दिली. नंतरच्या काळात देशात पक्ष वेगवेगळी सत्तेत होती. पण राजकीय पक्षातील नेत्यात सुसंवाद होता. उदाहरणच द्यायचं तर वाजपेयी आणि आडवाणी यांचं नाव घेतलं पाहिजे. हे कर्तृत्ववान लोक होते. ते अतिरेकी भूमिका घेऊन समाजकारण किंवा राजकारण केलं नाही, असेही शरद पवार साहेबांनी सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, उदाहरण सांगायचं म्हणजे भूजला भूकंप झाला. मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधानांनी बोलावली. त्यात एक प्रश्न निर्माण झाला. ही संकटे येत आहेत. अतिवृष्टी आणि महापूर, भूकंपाचं धोरण ठरवलं पाहिजे. त्यासाठी वाजपेयी यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केलं. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याकडे आहे. पण हल्लीच्या गृहमंत्र्यांनी जे भाषण केलं. मी आणि उद्धव ठाकरेंवर जे भाष्य केलं त्यावर न बोललं बरं. मराठीत एक म्हण आहे कुठे कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी अशी म्हण आहे, असे शरद पवार साहेब म्हणाले.

उद्धव ठाकरेंबाबत जी भूमिका घेतली ती लोकांनी पाहिली. उद्धव ठाकरे सुद्धा त्यावर कधी तरी त्यांचं मत सांगतील. मला हे माहीत आहे, जेव्हा हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्याला मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील. पण दुर्देवाने पातळी घसरली किती हे सांगायला ही पुरेशी विधानं आहेत. अशा व्यक्तीने जी विधाने केली त्याची नोंद पक्षात किती घेतली हे न सांगितलेलं बरं असेही शरद पवार साहेब यांनी बोलताना म्हटले आहे.

सैनिक प्रदीप घुगे यांचे त्रिपुरा सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण
आधुनिक केसरी न्यूज

बाळासाहेब भोसले

.सिदखेडराजा : तालुक्यातील दुसर बीड येथील प्रदीप उर्फ बाळू पंढरीनाथ घुगे या सैनिकाची 25 नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजेच्या दरम्यान सीमा सुरक्षा बलाच्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा येथे बांगलादेश सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्यांनी निधन होऊन निर्मल आल्याची दुर्दैवी घटना घडली सन 2006 मध्ये बीएसएफ १२२ बटालियन भरतीत प्रदीप जनरल ड्युटी जी डी मध्ये शिपाई पदावर भरती झाला होतात्याची आतापर्यंतची हवालदार पदावर सेवेत 18 वर्षे पूर्ण केली होती व दोन वर्षानंतर तो सेवानिवृत्त होणार होता जुलै 2024 च्या 31 तारखेला तो सुट्टीवर घरी दुसरबीड  येथे आला  होता त्याला45 दिवसाच्या सुट्टीमध्ये कुटुंब नातेवाईक सके सोयरे मित्रमंडळी आधीच्या भेटी घेऊन 19 सप्टेंबरला आगडतळा येथे कर्तव्यावर हजर झाला होता सध्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा येथील बांगलादेशच्या सीमेवर कार्यरत होता काल कर्तव्य बजावत असताना रात्री बारा वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्याला वीर मरण आले त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगी एक मुलगा आई वडील दोन भाऊ एक बहीण बराच मोठा आप्तपरिवार आहे प्रदीप पंढरीनाथ घुगे यांचा मृतदेह आगरताळा येथून कोलकत्ता इंदोर मार्गे 28 नोव्हेंबर गुरुवारी रोजी दुसरबीड येथे पोहोचणार असल्याची माहिती मृतक वीर जवान प्रदीप चे मामा माजी सैनिक अशोक वाघ यांनी दिली.

नव्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसचा खोचक टोला.... मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रावर डोळे झाकून सही करणारा ...
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची गरज नाही. भाजपा युतीला महाराष्ट्राच्या जनतेची चिंता नाही, महाराष्ट्र विकणारा व्यक्ती त्यांना हवा आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा व्यक्तीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर नेमला जाईल, त्यामुळे उशीर होत आहे,  असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे खासदारही उपस्थित होते.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आमच्या भेटीत पक्षश्रेष्ठींना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची माहिती देण्यात आली आहे. हा निकाल अनपेक्षित आहेच पण तो जनतेलाही मान्य नाही. जनभावना वेगळ्या आहेत, त्या भावनांचा काँग्रेस पक्षाने नेहमीच आदर केला आहे. ईव्हीएममध्ये गडबड असल्याची चर्चा सुरु आहे, मत एकाला टाकले तर ते दुसऱ्याला जाते असे मतदार सांगत आहेत तर सुप्रीम कोर्ट सिद्ध करून दाखवा असे म्हणत आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधात एखादे जनआंदोलन उभारले पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

विधानसभेच्या जागावाटपावर प्रफुल पटेल यांचे मोठे भाष्य.... महायुतीमध्ये जवळपास....
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : इंडिया आघाडीने माध्यमातून हरियाणामध्ये कॉंग्रेस येणार अशी अफवा पसरवली होती. जम्मू-कश्मीरमध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार असे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले परंतु जमीनीवरील परिस्थिती काय होती ती आज लोकांसमोर आली आहे. हरियाणामध्ये जिलेबी खायची कुणावर वेळ आली आहे हे सिद्ध झाले आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना केला.

काश्मीर खोऱ्यातील विचार करता तिथे नॅशनल कॉन्फरन्स पार्टी अनेक वर्षे काम करत आहे. तिथे भाजप इतर पक्षांचे कमी अस्तित्व आहे आणि दुसर्‍या बाजूला जम्मूमध्ये भाजप एक नंबरवर आहे. कॉंग्रेसला ज्या काही जागा मिळाल्या आहेत त्या नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या जीवावर मिळाल्या आहेत. स्वतःच्या जीवावर जागा मिळवता आलेल्या नाहीत. हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आले आहे. अनेक घटक नाराज आहेत हा जो प्रचार इंडिया आघाडीने केला होता हे फक्त माध्यमांना हाताशी धरून लोकांची दिशाभूल करत होते हे सिद्ध झाले आहे असा जोरदार प्रतिहल्ला प्रफुल पटेल यांनी केला आहे.

मागील दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि महायुतीच्या सरकारने देशात आणि राज्यात प्रगती करण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यात शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजना अशा अनेक क्रांतीकारी योजनांमध्ये आतापर्यंत साडेसात हजार रुपये आमच्या बहिणींना त्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत. हे कुणाला नाकारता येणार नाही असेही प्रफुल पटेल म्हणाले.

महायुतीमध्ये समन्वय आहे. विधानसभेसाठी जवळपास २३५ जागांवर आमचे एकमत झाले आहे. उरलेल्या ज्या जागा आहेत. त्यावर एक-दोन दिवसात बसून योग्य मार्ग काढणार आहोत. महायुतीमध्ये मतभेद आहेत असे विरोधकांकडून चित्र उभे करण्यात येत आहे. हे अतिशय चुकीचे आहे. आऊटगोईंग आणि इनकमिंगचा जो विषय आहे. त्यामध्ये काही माणसे इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होत नाही. आणि प्रत्येक निवडणुकीत काही लोकं इकडेतिकडे म्हणजे या पक्षातून त्या पक्षात जात असतात. त्याचा अर्थ जनसामान्यांच्या मनात नाराजी आहे असा नाही. स्थानिक स्तरावर काही गणितं बिघडवण्यासाठी इकडेतिकडे जात असतात. पण आज हरियाणाचा निकाल आल्यानंतर आऊटगोईंग आणि इनकमिंग करणारे विचार करतील अशी खात्री प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.

लोकसभेच्यावेळी ईव्हीएम चांगली होती. मोदीसाहेबांचे मताधिक्य कमी झाले त्यावेळी ईव्हीएम चांगली होती आणि आता ईव्हीएम खराब आहे असे दिसू लागले आहे. काश्मीरमध्ये ईव्हीएम बिघाड होऊ शकला असता ना? परंतु असे काही नाही झाले. कधी कधी आपल्याला ही व्यवस्था बरोबर आहे असा विश्वास ठेवायला पाहिजे. जेव्हा विरोधक पराभूत होतात तेव्हा 'अंगूर खट्टे है' ही म्हण त्यांना लागू होते असा टोलाही प्रफुल पटेल यांनी लगावला.

आपल्या भल्यासाठी कोण काम करत आहे हे लोकांना आता समजले आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली मागील एक वर्षात महायुतीने क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे नक्कीच प्रत्येक वर्गाला हे आमचं सरकार परत आले पाहिजे असे वाटत आहे असा विश्वासही प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्यांच्या मनात काहीच संभ्रम नाही. फक्त काही स्थानिक प्रश्न होते त्यावरून काही प्रश्न निर्माण झाले होते परंतु ते आता अजितदादा व आम्ही सगळे बोलणार आहोत तेव्हा हे प्रश्न सुटतील. निवडणूक कालावधीत प्रत्येक पक्षामध्ये काही ना काही घडामोडी घडत असतात. आता फक्त आऊटगोईंग दिसतेय पण काही दिवसात इनकमिंग सुरू होणार आहे असेही प्रफुल पटेल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.

अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत अशी अधिकृत घोषणा पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना केली.

वादग्रस्त रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना बेकायदेशीरपणे मुदतवाढ दिली असून शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. उच्च पदावर असलेल्या अधिकारी रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करतात. अशा पक्षपाती अधिकाऱ्यांमुळे विधानसभा निवडणूक पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडतील याबाबत शंका असल्याने त्यांची तातडीने हकालपट्टी करावी, या मागणीचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुनरुच्चार केला आहे.

२४ सप्टेंबर रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्यात मागणी केली होती. मुख्य निवडणूक आयुक्त राज्याच्या दौऱ्यावर असताना रश्मी शुक्लांच्या हकालपट्टीबाबत काँग्रेस शिष्टमंडळाने मागणी करून निवेदन दिले होते. परंतु अद्याप त्यावर कारवाई झाली नसल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले आहे. या स्मरणपत्रात नाना पटोले पुढे म्हणतात की, रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून अलीकडील नियुक्ती आणि त्यानंतर त्यांना दिलेली मुदतवाढ ही कायदेशीर नियम आणि प्रक्रियांचे उल्लंघन करणारी आहे. रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनंतरही मुदतवाढ देऊन राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस कायद्याचे स्पष्ट उल्लंघन केले आहे. रश्मी शुक्ला यांना दिलेल्या मुदतवाढीचे समर्थन करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा प्रकाश सिंह यांचा हवाला दिला आहे मात्र, सुप्रीम कोर्टाचा तो निकाल हा पोलीस प्रमुखांचा कार्यकाळ निश्चित करण्यासाठीचा असून राज्य सरकारने या निकालाचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय हे देशात एक धोकादायक उदाहरण होऊ शकते. उच्च पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) घालून दिलेल्या मानदंडांना बगल देऊन अशा पद्धतीने मुदतवाढ दिल्यामुळे चुकीचा पायंडा पडू शकतो. भविष्यात इतर राज्यातही अशाच पद्धतीने नियुक्त्या केल्या जाण्याची भिती आहे.
रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचे दिसून येते तसेच यात पारदर्शकता नसल्यामुळे सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वादग्रस्त पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ दिल्याने संशय निर्माण झाला आहे. राज्य सरकारचा निर्णय हा राजकीय दृष्ट्या प्रेरित असून  निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकणारा आहे. अशा पद्धतीने एका कलंकित अधिकाऱ्याला मुदतवाढ दिल्याने सरकारच्या निष्पक्षता आणि निष्पक्षतेवरील विश्वास आणखी कमी होतो. रश्मी शुक्ला यांना दिलेल्या मुदतवाढीचा तात्काळ आढावा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नावारूपास येत आहे : डॉ. समीर कामत
आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : या शहरात खूप सामर्थ्य असून, देशाच्या इंजिनियरिंग उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून छत्रपती संभाजीनगर नावारूपास येत आहे, येथील औद्योगिक ईकोसिस्टिम अतिशय व्हायब्रंट असून, येथील उद्योग संघटना, स्टार्टअप इंक्युबेटर यांचे मोठे योगदान आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारीमधून साकारलेल्या प्रकल्पांचा पॅटर्न संपूर्ण देशात राबविला पाहिजे असे मत देशाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) संरक्षण रिसर्च आणि डेव्हलोपमेंट विभागाचे सचिव (DDR&D) आणि डीआरडीओ अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी व्यक्त केले ते मॅजिकतर्फे आयोजित छत्रपती शाहू इंजिनियरिंग कॉलेज येथे डिफेंस इनोव्हेशन चॅलेंज फॉर एक्सलंस 2024’ या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत सध्या उत्पादन क्षेत्रात १६% हिस्सा आहे. हा हिस्सा २४-२५% वर नेणे आवश्यक आहे. डीआरडीओ, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांनी एकत्र येऊन आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. संरक्षण क्षेत्रामध्ये २०१४ नंतर काही अमुलाग्र बदल झाले, आपण आत्मनिर्भरतेकडे लक्ष दिले. सुरक्षित देश असेल तर तेथील अर्थव्यवस्था वेगाने वाढेल. भारतात संशोधन आणि विकासावर आपल्या एकूण अर्थव्यवस्थेच्या 0.68% इतका खर्च केला जातो आणि आणि हे पण बहुसंख्य सरकारच्या पुढाकारतून आहे, हे प्रमाण 1 टक्क्याच्या वर गेला पाहिजे, यासाठी खाजगी क्षेत्राने देखील पुढे आले पाहिजे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकासावर 5.6% खर्च केले जाते हे प्रमाणही वाढवता येऊ शकते, असे ये म्हणाले

डॉ. कामत म्हणाले की, जग एका ध्रुवीय ते बहु-ध्रुवीय जागतिक व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण परिवर्तनावर प्रकाश टाकून केली, ज्यामध्ये तांत्रिक बदलांचा वेग वाढतो आणि युद्धाचे स्वरूप बदलत असलेल्या विघटनकारी तंत्रज्ञानाचा उदय होतो. डॉ. कामत यांनी भर दिला की, भारत विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या लँडस्केपवर प्रभाव टाकण्यासाठी धोरणात्मक स्थितीत आहे, त्यामुळे उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रचलित उत्पादन निर्मितीसाठी मोठ्या संस्था कार्यान्वित असल्या तरी, संरक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पना विकसित करण्यासाठी स्टार्टअप ईकोसिस्टिम पुढे आली पाहिजे. येथे मॅजिक सारखी इंक्युबेशन संस्था महत्वाची भूमिका निभावत असल्याचे त्यांनी नमूद केले. युद्ध करण्याचा विस्तार आता पारंपारिक जमीन, समुद्र आणि हवा पासून आता सायबर, अंतराळ तसेच माहिती समाविष्ट करणार्‍या नेटवर्किंग मध्ये झाला आहे. तंत्राद्यानात झालेले हे बदल आत्मसात करून नाविन्यपूर्ण उदयोन्मुख तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.

: 2047 पर्यन्त भारत डिफेंस निर्यातीत जगात एक नंबरवर राहील*
आत्मनिर्भर भारत संकलपणेला चालना देतांना संरक्षण क्षेत्रात देखील भारतीय बनवतीचे उत्पादन होत आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश आयतीवर अवलंबून असणारे हे क्षेत्र यावर्षी 90% निर्माण होणारे उत्पादन भारतीय आहे, आणि केवळ 10% बाहेरील देशातून आयात होत असल्याचे त्यांनी संगितले. यावर्षी भारतातून संरक्षण क्षेत्रातिल निर्यात 20000 कोटी रुपये होती, जी 2037 पर्यन्त 1 लाख कोटी पर्यन्त जाईल. 2047 पर्यन्त भारत संरक्षण क्षेत्रात जगातील सर्वाधिक निर्यात करणारा देश म्हणून नावारूपास येईल, असे त्यांनी संगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मॅजिकचे संचालक आशीष गर्दे यांनी मॅजिक च्या माध्यमातून घेण्यात येणार्‍या इनोव्हेशन चॅलेंज बद्दल माहिती. मॅजिक संचालक रितेश मिश्रा यांनी मॅजिकच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या प्रकल्पांची माहिती सांगणारे सादरीकरण केले.

डिफेंस इनोव्हेशन चॅलेंज फॉर एक्सलंस 2024’ ही स्पर्धा  संरक्षण क्षेत्रातील समस्यांवर उपाय देणार्‍या या विषयाला घेऊन काम करणाऱ्या विकासाभिमुख, रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि राष्ट्रासाठी बौद्धिक संपदा निर्मितीमध्ये योगदान देण्याची क्षमता असलेल्या नाविन्यपूर्ण विद्यार्थी, इनोव्हेटर्स,  स्टार्टअप्संना प्रोत्साहन देणार आहे, अशी माहिती या वर्षीची ‘डिफेंस इनोव्हेशन चॅलेंज फॉर एक्सलंस 2024’ स्पर्धेचे निमंत्रक आणि संस्थेचे संचालक प्रसाद कोकीळ यांनी दिली. संरक्षण क्षेत्रातील प्रामुख्याने भेडसावणार्‍या पण कधी निराकरण न झालेल्या समस्यांची उकल करण्याच्या दृष्टीने यावर्षीच्या चॅलेंज आयोजित करण्यात आले आहे.

याप्रसंगी सीआयआय पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आणि बागला ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी कुमार बागला, डीआरडीओ अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार मनीष भारद्वाज, आणि सीएमआयए अध्यक्ष अर्पित सावे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. मिलिंद कंक, मॅजिक संचालक आणि अध्यक्ष मराठवाडा ऑटो क्लस्टर, आशीष गर्दे, संचालक मॅजिक, प्रसाद कोकिळ, संचालक मॅजिक, रितेश मिश्रा, संचालक मॅजिक, डॉ. श्रीकांत देशमुख, प्रशासकीय अधिकारी, सीएसएमएसएस, डॉ. उल्हास शिंदे, प्राचार्य छत्रपती शाहू इंजिनियरिंग महाविद्यालय यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅजिकच्या प्रीती कामठे यांनी केले. . मिलिंद कंक यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शशिकांत तिवारी, राघवेंद्र कुलकर्णी, कृष्ण टेकाळे, गौरव बाठिया, मकरंद भालेराव, मोहम्मद अरखम मोहिउद्दीन, छत्रपती शाहू इंजिनियरिंग महाविद्यालयाचे एस. बी. कुलकर्णी आणि डॉ. मनोज माटे यांनी कष्ट घेतले.

*डिफेंस इनोव्हेशन चॅलेंज फॉर एक्सलंस 2024*
या स्पर्धेमध्ये आयडिया स्टेज, प्रोटोटाईप आणि महसूल टप्प्यांवरील स्टार्टअपसाठी स्वतंत्र मूल्यमापन आणि पुरस्कार आहेत. या स्पर्धेकरिता एकत्रित पुरस्काराचे मूल्य ~6.5 लाख रुपये असून या सोबत मॅजिक संस्थेमध्ये इनक्युबेशन सपोर्ट देण्यात येणार आहे. मॅजिकच्या डाईस2024 (DICE2024) उपक्रमाकरिता 3D इंजिनिअरिंग या सर्वात वेगाने वाढणाऱ्या अभियांत्रिकी उत्पादन कंपनी असलेल्या संस्थेचे सहकार्य लाभले आहे तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, आयडेक्स, स्टार्टअप इंडिया आणि पंतप्रधान कार्यालयाच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार या विभागाचे पाठबळ मिळाले असल्याची माहिती मॅजिकच्या वतीने देण्यात आली आहे.

अखिल भारतीय स्तरावर आयोजित या स्पर्धकरिता कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीची अट नाही तसेच सर्व वयोगट आणि क्षेत्रांतील नवोदितांसाठी ही स्पर्धा खुली आहे. या स्पर्धेत अर्ज सादर करण्यासाठी, bit.ly/MAGIC_DICE या संकेतस्थळाला भेट द्यावी; ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख गुरुवार, 31 ऑक्टोबर 2024 असून या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी contact@magicincubation.com वर संपर्क साधू शकतात, अशी माहिती मॅजिकच्या वतीने देण्यात आली आहे.

Braking News : मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य ; आपण सरकारच्या....
आधुनिक केसरी न्यूज

सांगली : मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकमध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. 50 टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे, दुरुस्ती करायला काय हरकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकमध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. 50 टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे,दुरुस्ती करायला काय हरकत नाही, 50 टक्केच 75 टक्क्यांवर जायला पाहिजे, तमिळनाडूमध्ये 78% वर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात 75% वर का होऊ शकत नाही. 75 टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल कोणताही वाद उरणार नाही असे शरद पवार साहेब म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून गेली अनेक वर्षे केंद्र सरकारकडे मागणी होती. महाराष्ट्र सरकार, साहित्य क्षेत्रातील संस्था व ज्यांना त्याबद्दल आस्था आहे, असे माझ्यासारखे अनेक सहकाऱ्यांनी ती मागणी केली. केंद्र सरकारला त्यासाठी व्यक्तीगत पातळीवर पत्र लिहून त्याचा आग्रह केला. हा निर्णय जरी उशिरा झाला असला तरी त्याचा आनंद आहे, केंद्र सरकारचे अभिनंदन करू,  पण मराठी शाळांची संख्या कमी होतेय आणि मराठी विषय घेणाऱ्यांची संख्याही घटतेय, याकडे शरद पवार साहेब यांनी लक्ष वेधले.

पुढे शरद पवार साहेब म्हणाले, राज्यात मराठी शाळांची संख्या कमी होत आहे व त्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. हे जर असंच सुरू राहिलं तर मराठी भाषेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे, राज्य सरकारला यावर लक्ष द्यावे लागेल व त्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल.

सरकारने लाडकी बहीण योजना काढली त्याचे सर्वांना स्वागत करावे लागले, पण तेवढ्यात भागात नाही. एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका आहे. मुलींवर वाढलेले अत्याचार हे गंभीर आहे. लाडक्या लेकीला अर्थसहाय्य करायचं दुसरीकडे तिच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करायचे सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे अर्थसहाय्य थांबले आहे. कॅन्सर हॉस्पिटलमधील शासकीय अर्थसहाय्य थांबले आहे. हे वैद्यकीय क्षेत्राचे उदाहरण आहे. अशा अनेक योजनांचे पैसे थांबले आहेत, असे शरद पवार साहेब यांनी म्हटलं आहे.

आज जे महाराष्ट्रात घडत आहे ते अत्यंत चुकीचे आहे. सामाजिक सलोखा राखून सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखला पाहिजे. अमित शहा सध्या काहीही बोलत असतात. देशाचा गृहमंत्री भाषण काय करतो? शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा, पक्ष फोडा. ते कायदा व सुव्यवस्था कोठे नेऊन ठेवतात? देशाची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे, ते नेते अशी भाषा करतात. येत्या दीड महिन्यात याबाबत निकाल लावू, असेही शरद पवार साहेब म्हणाले.

भाजपाने लढण्याआधीच हार मानली
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार व गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता भाईचारा जपावा. इराण व इस्राईलमध्ये आज जे सुरु आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गाधींजींनी घालून दिलेला आदर्श व अहिंसेचा मार्गच महत्वाचा ठरतो, जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गांधींजींनी घालून दिलेल्या मागार्चा अवलंब करावा, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केले. तसेच चरक्यावर सुत कातले व भजन गायनही करण्यात आले. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, आ. अमिन पटेल माजी मंत्री सुरेश शेट्टी, प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे, चरणजित सप्रा, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांचे नाव सातत्याने घेत असतात पण ते गांधीजींचा आदर्श तसेच गांधीजींनी घालून दिलेला अहिंसेच्या मार्गाचे पालन करताना दिसत नाहीत. जातीच्या धर्माच्या नावावर लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम ते करत आहेत, हे देशाच्या हिताचे नाही. देशाच्या विकास व प्रगतीसाठी गांधी विचारच महत्वाचा आहे त्याचा अवलंब त्यांनी करावा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याआधीच महाराष्ट्रात पराभव मान्य केला आहे. भाजपाची निती ही वापरा आणि फेकून द्या अशी आहे तेच महाराष्ट्रातही भाजपा मित्रपक्षांसोबत करत आहे असेही चेन्नीथला म्हणाले. भाजपा सरकारचे शेवटचे दिवस उरले असल्याने सरकार धडाधड निर्णय घेत आहे पण सरकारकडे पैसा नाही व निवडणूक होणार असल्याने त्याची अमंलबजावणी होणे कठीण आहे. मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारची शेवटची धडपड सुरु आहे पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांना सर्व समजते असेही चेन्नीथला म्हणाले.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकारणात प्रत्येक पक्ष आपल्याला जागा मिळावी याचा विचार करत असतो. पण महायुतीमध्ये जागा वाटपावरून महाभारत सुरु आहे ते पहा, त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार हे त्यांना विचारा. भाजपा सरकारने १० वर्षात महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारात भाजपा सरकारने विक्रम केला आहे, कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत, महागाई प्रचंड वाढली आहे, अशी अवस्था असून या महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा मानस जनतेने केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

जयंत पाटील यांनी सिन्नरमध्ये डागली तोफ ; अफगानिस्तान कांदा आयात प्रकरण : शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा सरकारने आखला डाव
आधुनिक केसरी न्यूज

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नरमध्ये पोहोचली असून येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. अफगानिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

याबाबत सविस्तर बोलताना ते म्हणाले की अहमदशहा अबदाली अफगाणिस्तानहून आला आणि पानीपतची लढाई झाली. आता त्याच अफगाणिस्तानतून अमित शाह आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळत आहे. मराठी सैन्याचे पानीपत झाले तिथून शाह आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आणि मराठी शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव आखला आहे असा आरोप करत असतानाच देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळू नये अशी भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी घेतली आहे असेही ते म्हणाले.

हे लोक म्हणतात महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा. निवडणुका जम्मू काश्मीरमध्ये, हरियाणामध्ये लागल्या आहेत आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आढावा घेत आहेत. औरंगजेब २६ वर्षे महाराष्ट्रात राहिला पण मराठी माणसाचे राज्य त्याला मोडता आले नाही. शाहांनाही आम्ही हे मराठी राज्य मोडून देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपा दुतोंडी साप; महाराष्ट्रात ‘बहिण लाडकी’ मात्र झारखंडमध्ये ‘लाडक्या बहिणीला’ विरोध
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई.: भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही आणि सरकार काहीच पावले उचलत नाही. समस्यांच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त आहे पण भाजपा सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. टेंडर काढणे, भ्रष्टाचार आणि पैसा वसुली एवढेच सरकारचे काम सुरु आहे, असा घणाघाती हल्ला प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.

प्रदेश काँग्रेसची विभागीय आढावा बैठक चंद्रपूरात संपन्न झाली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. प्रतिभा धनोरकर, खा. नामदेव किरसान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. अभिजित वंजारी, आ. विकास ठाकरे, माजी मंत्री अनिस अहमद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, रामकिशन ओझा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान झालो तर पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करेन, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करेन असे नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली विदर्भाच्या भूमितूनच सांगितले होते. शेतकऱ्यांच्या आशिर्वादाने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण त्यानंतर मात्र मोदींनी, हे तर चुनावी जुमले होते, असे म्हणत पलटी मारली. शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे आणून शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करायचे धोरण मोदी व भाजपाने आणले होते. शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, खलिस्तानी, नक्षलवादी, अतिरेकी म्हणून त्यांचा अपमान केला. आता निवडणुका आल्या म्हणून मोदींना शेतकऱ्यांची आठवण आली. वर्ध्याच्या सभेत मोदी म्हणाले की, शेतकरीच पोशिंदा आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, सोयाबिनला १० हजाराचा भाव देऊ असे सांगितले. विरोधी पक्षात असताना भाजपाने सोयाबिनला ६ हजार रुपये भाव मिळावा म्हणून मोर्चा काढला होता आणि सत्तेत आहेत तर ४ हजार रुपये भाव देत आहेत. खतांचे भाव वाढले, डिझेलचा भाव वाढला, बि, बियाणांचा भाव वाढला पण शेतमालाचा भाव काही वाढला नाही. भाजपा शेतकरी विरोधी आहे.
राज्याच्या ७६ टक्के भागात दुष्काळ आहे, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे पण भाजपा सरकारने तेलंगणाला ४ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु महाराष्ट्राला मात्र फुटकी कवडीही दिली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जाणिवपूर्वक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. भाजपा युती सरकार सर्व आघाड्यांवर फेल आहे पण भ्रष्टाचारात मात्र अग्रेसर आहे,असेही पटोले म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी जनतेने मतदान केले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर जनतेमध्ये जो रोष होता तो त्यातून व्यक्त करण्यात आला. महायुती सरकारची जडण घडणच भ्रष्टाचारातून झाली आहे. त्यासाठी ज्या साधनांचा त्यांनी वापर केला ते जनता ओळखून आहे. सत्तेवर जाण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची तोडफोड केली. राज्यात शांतता सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, महिला अत्याचार वाढले आहेत, अंमली पदार्थांचा काळा धंदा वाढला आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. जमीन व्यवहारातून सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. सरकारी पैशाची उधळपट्टी सुरु आहे असे हे भ्रष्ट सरकार घालवण्याची जनतेची इच्छा आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगला प्रतिसाद मिळेल व मविआ सत्तेवर नक्की येईल याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सरकारवर तोफ डागत म्हणले की, महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण ठेवली असून २९ प्रकल्प गुजरातला पळवले आहेत. प्रकल्प गेला नाही असे देवेंद्र फडणवीस छाती फोडून सांगत असले तरी १८ हजार कोटी रुपयांचा सोलर पॅनलचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात गुंतवणूक होणारे ३ लाख २८ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचे काम केले आणि गुजरातचे ड्रग महाराष्ट्र आणून तरूणांना बरबाद केले आहे. ५ लाख कोटी रुपयांच्या जमिनी गुजराती उद्योगपतींच्या खिशात घातल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील त्यांच्या भाषणातून लाडकी बहीण योजनेवर टीका केली आणि महाराष्ट्रात मात्र तीच योजना मोठ्या जोशात सुरु आहे. महाराष्ट्रात एक बोलायचे व झारखंडमध्ये दुसरे बोलायचे हा दुटप्पीपणा आहे. भारतीय जनता पक्ष दुतोंडी साप असल्याचे यातून उघड झाले आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
आढावा बैठकीवेळी विदर्भातून मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला तसेच भाजपाच्या भ्रष्ट सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

मोठी बातमी : काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले ; राज्यपालांनी दिले 'हे' आश्वासन
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये, शेतकरी वर्गात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे. या सर्व प्रश्नांवर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, खा. विशाल पाटील, माजी मंत्री अस्लम शेख, डॉ. विश्वजीत कदम, आ. भाई जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रविंद्र दळवी, आ. अमिन पटेल, आ. विक्रम सावंत, चरणसिंह सप्रा, सचिन सावंत उपस्थित होते.
सिंधुदुर्गातील मालवण येथे महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणा-यांवर अद्याप कारवाई केली नाही. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेला काळीला फासला जात आहे. आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यास बक्षीस देण्याची तर खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची विधाने केली आहेत. लोकशाहीत विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण विरोध करताना जीवाला धोका निर्माण करणे, हिंसेला प्रवृत्त करण्याची भाषा लोकप्रतिनिधींनी वापरणे हे कायद्याला धरून नाही. या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आणि पोलिसांनी खेदाने बघ्याची भूमिका घेतली. गुन्हा दाखल करण्यासाठी देखील काँग्रेस नेत्यांना आंदोलन करावी लागली त्यानंतर गुन्हे दाखल झाले, पण आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. प्रक्षोभक विधाने करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या आमदारांवर पोलिस कारवाई करत नाही याचा अर्थ राज्यात दंगली घडवण्याचा सत्ताधारी पक्षांचा कट आहे का?
मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचे सहा लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. अजूनही याचे पंचनामे झालेले नाहीत. केंद्रीय कृषी मंत्री यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा दौरे करून मदत जाहीर केली पण महाराष्ट्रात मात्र अजूनही केंद्रीय कृषी मंत्री किंवा केंद्रीय पथक पाहणी करण्यास आले नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबत इतका दूजाभाव का ? या राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा दिसत नाही का त्यांना मदत करण्याची केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका नाही.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. विधानसभा निवडणूक निर्भय वातावरणात होईल याबाबत शंका आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारात मोठयाप्रमाणात वाढ झाली असून अल्पवयीन, शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या बदलापूर व नागपूर येथे घडलेल्या गुन्ह्यात आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. स्पर्धा परीक्षा रखडल्या आहेत. उमेदवारांना सरकारकडून नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. युवा पिढी बेरोजगारीमुळे नैराश्याच्या गर्तेत जात आहे.  ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सरकारला निर्देश द्यावेत, अशी राज्यातील जनतेची आपणाकडून अपेक्षा आहे, असे काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्वासन काँग्रेस शिष्टमंडळाला दिले आहे. त्याचबरोबर वादग्रस्त विधानबाबत गृह खात्याकडून माहिती घेऊन कडक कारवाई करण्याचे आश्वासनही राज्यपाल यांनी दिले.