व्यापार - Adhunik Kesari

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी;' जाणून घ्या आजचे दर
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याने 58 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. रविवारपासून भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. अशा परिस्थितीत अनेक जण या काळात सोन्या-चांदीची भरपूर खरेदी करतात. मात्र, त्यापूर्वीच सोन्या चांदीचे दर वाढले आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये गुरुवारी सोन्याने 58 हजाराचा स्तर ओलांडला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सोने 58,045 रुपयांवर होते. त्यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ नोंदवण्यात आली आहे. 11 वाजेपर्यंत कालच्या तुलनेत आज सोने 154 रुपये म्हणजे 0.27 टक्क्यांनी वाढले आहे. सध्या सोन्याचा दर हा 58 हजार 94 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. काल काल वायदा बाजारात सोन्याचे दर हे 57 हजार 940 रुपये होते.

सोन्याव्यतिरिक्त, चांदीच्या किंमतीतही आज वाढ झाली आहे. वायदा बाजारात चांदीचा दर आज 69,734 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होते. यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ दिसून आली आहे. कालच्या तुलनेत चांदी 409 रुपयांनी म्हणजेच 0.59 टक्क्यांनी महाग झाली आहे. आज चांदीचे दर हे 69 हजार 835 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. काल चांदी 69,325 रुपयांवर बंद झाली.

या 10 मोठ्या शहरांमधील सोन्या-चांदीचे नवे दर
मुंबई -  24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, चेन्नई -  24 कॅरेट सोने 59,070 रुपये, चांदी 75,500 रुपये प्रति किलो, कोलकाता -  24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, दिल्ली - 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, नोएडा -  24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 7,600 रुपये प्रति किलो, गाझियाबाद -  24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
जयपूर -  24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 70,600 रुपये प्रति किलो, लखनौ -  24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, पाटणा -  24 कॅरेट सोने 58,960 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो,
गुरुग्राम - 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, पुणे -  24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो, गोवा -  24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 71,000 रुपये प्रति किलो.

सणासुदीच्या काळात बँक ग्राहकांना मिळणार गिप्ट
आधुनिक केसरी न्यूज

सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात अधिक नफा कमविण्याची संधी दिली आहे. बँकेने त्यांच्या विविध मुदत ठेवींच्या कालावधीवरील व्याजदरात वाढ केली आहे. यापूर्वी बँक ऑफ बडोदाने मे २०२३ आणि मार्च २०२३ मध्ये किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली होती.

बँक ऑफ बडोदाने ३ वर्षांपर्यंतच्या विविध कालावधीसाठी  मुदत ठेवी वरील  व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्स पर्यंत वाढ केली आहे. बँकेने सांगितले की, हे नवे दर ९ ऑक्टोबर २०२३ पासून २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू करण्यात आले आहेत.

असे असणार सामान्य नागरिकांसाठी नवे व्याजदर
७ दिवस ते १४ दिवस            - ३.५०
१५ दिवस ते ४५ दिवस        -  ३.५०
४६ दिवस ते ९० दिवस        -  ५
९१ दिवस ते १८० दिवस      -     ५
१८१ दिवस ते २१० दिवस    - ५.५०
२११ दिवस ते २७० दिवस    - ६
२७१ दिवस ते १ वर्ष            -  ६.२५
२ वर्ष ते ३ वर्ष                 - ७.२५
बडोदा तिरंगा प्लॅन ३९९ दिवस -  ७.१५

आता तुम्हाला  मिळणार एवढे व्याज
नवे दर लागू झाल्यानंतर बँक आता आपल्या ग्राहकांना २ ते ३ वर्षांच्या एफडी वर जास्तीत जास्त ७.२५ टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी ७.७५ टक्के व्याज मिळत आहे. सध्याच्या ग्राहकांनाही वाढलेल्या व्याजदराचा फायदा होणार आहे. याशिवाय बँकेने आपल्या तिरंगा प्लस ठेव योजनेवर ३९९ दिवसांसाठी व्याजदरदेखील बदलले आहेत.

१८ हजार कोटींचा मालक एका ट्विटने झाला कंगाल, कंपनीचे मूल्य झाले अवघे ७४ रुपये
आधुनिक केसरी न्यूज

दिल्ली : भारतीय वंशाचे उद्योगपती बीआर शेट्टी यांचे नाव एकेकाळी करोडपती उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट होते, ते एकूण १८ हजार कोटी रुपयांचे म्हणजेच सुमारे ३.१५ अब्ज डॉलर्सचे मालक होते. त्यांच्याकडे दुबईत व्हिला, रोल्स रॉयस आणि मेबॅक यांसारख्या आलिशान कार आणि खासगी जेट होते. पण बदलत्या काळानुसार बीआर शेट्टींच्या १८ हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मूल्य केवळ ७४ रुपये झाले.

बावगुथू रघुराम शेट्टी कामाच्या नवीन संधी शोधण्यासाठी केवळ ८ डॉलर्स घेऊन आखाती देशात पोहोचले होते. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी युऐई मध्ये एनएमसी हेल्थ नावाची सर्वात मोठी आरोग्य कंपनी स्थापन केली होती. काही वर्षांतच त्यांचे नाव दुबईसह जगातील श्रीमंतांच्या यादीत आले. बीआर शेट्टी यांनी बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीत दोन मजले २५ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले होते.

२०१९ मध्ये यूके स्थित कंपनी मडी वॉटर्सच्या एका ट्विटने बीआर शेट्टीची कंपनी दिवाळखोरीत निघाली. मड्डी वॉटर हे कार्सन ब्लॉक नावाच्या शॉर्ट सेलरद्वारे चालवले जात होते. या ट्विटनंतर या शॉर्ट सेलर कंपनीने बीआर शेट्टी यांच्या कंपनीचा अहवाल प्रसिद्ध केला. कंपनीवर १ अब्ज डॉलर्सचे कर्ज लपवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. हा अहवाल आल्यानंतर एनएमसी आरोग्याची स्थिती इतकी वाईट झाली की १८ हजार कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली कंपनी इस्रायल आणि यूएईस्थित कंपनीला अवघ्या १ डॉलरला विकली गेली. यानंतर त्याच्या मूल्यांकनात सतत घट होत गेली आणि शेवटी ही कंपनी केवळ १ डॉलरच्या किमतीला विकली गेली.

Video : आ. प्रशांत बंब यांनी लासूर बाजार समितीत कांदा व भुसार मार्केटमध्ये पुकारला स्वतः लिलाव
आधुनिक केसरी न्यूज

गुलाब वाघ

गंगापूर : तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मार्केट व भुसार मार्केटमध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत लीलावाला सुरुवात करण्यात आली. भुसार मार्केटमध्ये सोयाबीनच्या लिलावची बोली आमदार बंब यानी पुकारली व कांदा मार्केटमधेही आमदार बंब यांनीच कांद्याची बोली पुकारली. सोयाबीनला प्रतीक्विंटल पाच हजार तर कांद्याला एकविसशे रुपये प्रतिक्विंटल बोली लगावली. त्यानंतर लीलावला धान्य आणलेल्या शेतकऱ्याचा सत्कार आ. बंब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसने केला जीएसटी,भाजपासह केंद्र सरकारचा निषेध
आधुनिक केसरी न्यूज

आकाश सोनवणे

धुळे : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन अन्नधान्य , दुग्धजन्य पदार्थ , जीवनावश्यक वस्तू , किराणा साहित्य यावरील जीएसटी मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

केंद्रतील भाजप सरकारने आजपासून देशातील सर्व अन्नधान्य , जीवनाश्यक वस्तू , दुग्धजन्य पदार्थ यावर जवळपास 12 ते 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे . यामुळे मोठ्या प्रमाणात आजपासून महागाईचा भडका देशांमध्ये उडणार आहे . विविध अन्नधान्य पदार्थ , दुग्धजन्य पदार्थ जीवनाश्यक वस्तू , किराणा साहित्य याच्यावर जीएसटीचा आकारणी खूप मोठ्या प्रमाणात होणार असून यामध्ये पीठ , दही , पनीर , लस्सी , मखाना , सोयाबीन , वाटाणा , गहू , तांदूळ , मुरमुरे , चहा , कॉफी ब्रेड गूळ , पाव या सर्व विविध प्रकारच्या पदार्थावर 12 ते 18 टक्के जीएसटी आजपासून आकारण्यात येणार आहे . यामुळे गरीब व सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले जात जाणार आहे . नागरिकांना महागाईचा फटका बसणार आहे . यासंदर्भात जीएसटीचा विरोध करण्यासाठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये शिष्टमंडळाने आज माननीय जिल्हाधिकारी यांची यांची भेट घेऊन या संदर्भाचा केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करून सदर जीएसटी मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे ही मागणी मान्य करण्यात आली नाही , तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तीव्र स्वरूपाचे रस्त्यावर आंदोलन करेल असा इशारा या निमित्ताने देण्यात आला . या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित राजे भोसले, रईस काजी, भूषण पाटील,  उमेश महाजन, राजेंद्र सोळुंके, दीपक देसले, मयूर देवरे, एजाज शेख, संतोष गायकवाड, गोलू नागमल, स्वामिनी पारखे, दीपक देवरे, तरुणा पाटील,   राजू डोमाळे,  निलेश चौधरी, संजय माळी, असलम खाटीक, नजीर शेख, भीकन नेरकर, निखिल पाटील, हरिचंद्र वाघ, फिरोज पठाण, कैलास चौधरी, जोसेफ मलबारी, अन्सारी अब्दुल कादिर, वाल्मीक मराठे, महेंद्र बागुल  व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

नानांची ग्वाही ! केंद्र सरकार विरोधातील संघर्षात काँग्रेस पक्ष छोटे व्यापारी व दुकानदारांसोबत
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने महागाई गगनाला भिडली असताना केंद्रातील मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर ५% जीएसटी लावल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील होणार आहे. या जुलमी निर्णयाविरोधात राज्यातील व्यापारी, दुकानदार रस्त्यावर ऊतरले असून, संघर्ष करीत आहेत. त्यांच्या या संघर्षात काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत असून, ‘जीएसटी विरोधाताल व्यापारी आंदोलनास’ आमचा पूर्ण पाठिंबा आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, आठ वर्षापूर्वी १०० दिवसांत महागाई कमी करू असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या आठ वर्षाच्या कार्यकाळात महागाई कमी होण्याऐवजी बुलेट ट्रेनच्या स्पीडने वाढत आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ४५० रुपये होता तो आज १ हजार ५० रूपयांहून महाग झाला आहे. युपीए सरकारच्या काळात पेट्रोल ६५ रुपये लिटर होते ते आज ११० रुपये लिटर झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भावही दुप्पट झाले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे स्वप्न सुद्धा स्वप्नच राहिले. देशातील बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील ऐतिहासीक उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. १.२५ कोटी महिलांनी रोजगार गमावले तर जवळपास ४ कोटी परुषांचे रोजगारही गेले आहेत.

केंद्र सरकारने चुकीच्या, मनमानी पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी केल्यामुळे महागाई तर वाढली आहेच पण छोटे व्यापारी आणि दुकानदार उद्धवस्त झाले आहेत. देशाच्या इतिहासात कधी नव्हे ते शेतीसाठी लागेणा-या यंत्रांवर आणि खतांवर कर लावण्यात आला. आता तर रुग्णालयाच्या बेडवर ५ टक्के, हॉटेलच्या खोलीवर १२ टक्के, तर पनीर, दूध, दही, लस्सी, ताक, आटा तांदूळ, गहू, बाजरी यावरही ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. अगोदरच महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे महाग झाले असताना जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्यामुळे गरीबांनी खायचे काय? असा प्रश्न पडला आहे. जीएसटीमुळे छोटे व्यापारी आणि दुकानदारांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. केंद्र सरकारने अन्यायी पद्धतीने लावलेला ही जीएसटी तात्काळ मागे घ्यावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

100 टक्के बंद पाळून जालन्यात किराणा व्यापाऱ्यांचा जीएसटीला विरोध
आधुनिक केसरी न्यूज

जालना : जीवनाशक वस्तूंवर पाच टक्के जीएसटी कर लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शनिवार दि. 16 जुलै रोजी नवीन मोंढ्यातील होलसेल व रिटेल किराणा मार्केट, जुना मोंढ्यातील किराणा व्यापाऱ्यांनी 100 टक्के बंद पाळून जीएसटीला विरोध दर्शविला. गुळ मार्केट, दाल मिल, आडत व्यापाऱ्यांचाही बंदमध्ये 100% सहभाग होता, अशी माहिती जालना किराणा होलसेल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पंच यांनी दिली.

सतीश पंच म्हणाले की, जीएसटीच्या नवीन धोरणानुसार जीवनाश्यक वस्तु, अन्नधान्य, गहु, पीठ, रवा, मैदा, दाळी, दुध, दुग्धजन्य पदार्थ, नॉन ब्रॅण्डेड वस्तुवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याचा अधिभार सामान्य नागरीक व ग्राहकांना बसणार असुन याचा त्रास व्यापा-यांना सुध्दा होणार आहे. यासंदर्भात दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री यांना निवेदन देण्यात येऊन जीएसटी कार्यालयातही निवेदन सादर करून आपल्या व्यथा कळविण्यात आल्या होत्या  शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात आज मार्केटयार्डमधील संपुर्ण होलसेल व रिटेल किराणा मार्केट बंद ठेवण्यात आली तसेच या बंदमध्ये आडत, मार्केट, जुना मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवून जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटीला विरोध दर्शविला. जीवनावश्यक वस्तूंवरील पाच टक्के जीएसटी विरोधात देशव्यापी संप करण्यात आला होता, त्यास देशभर शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे सतीश पंच यांनी सांगितले. कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे वृत्त हाती आल्याचे त्यांनी सांगितले.

होलसेल किराणा मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी करून जीवनावश्यक वस्तूवरील पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पंच, पुरुषोत्तम अग्रवाल, दीपक अग्रवाल, अनिल पंच, किशन भक्कड , सुरेश भक्कड, अजय लोहिया, सुनील रुणवाल, यश जैन, बंटी अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

दाल,रोटी खावो प्रभू के गुण गावो...!

दाल- रोटी खावो प्रभू के गुण गावो असे केंद्र सरकार सांगत होते. मात्र याच जीवनावश्यक वस्तूवर सरकार दि. 18 जुलैपासून जीएसटी लावणार आहे. जनतेचा पोटाचा तसेच व्यापाऱ्यांच्या विरोधाचा विचार करून सरकार तसा निर्णय घेणार नाही असा आपणास विश्वास असल्याचे सतीश पंच यांनी म्हटले आहे.

पॅकींग अन्नधान्यावर छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटी मारक ! धुळे व्यापारी महासंघाची निदर्शने
आधुनिक केसरी न्यूज

धुळे : पॅकींग अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटी आकारणी केली जाणार असून केंद्राचा हा निर्णय छोटया व्यापाऱ्यांना मारक ठरणार आहे, त्यामुळे हा जीएसटी रद्द करावा,अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात धुळे व्यापारी महासंघाने म्हटले आहे की, सतत वाढत असलेल्या महागाईच्या वाढत्या आलेखात आता अजून भर पडणार आहे . सर्वसाधारण नागरीकांच्या दैनंदिन वापराच्या धान्यावर केंद्र शासन आता ५ टक्के जीएसटीची आकारणी करणार आहे , असे नुकतेच जाहीर झाले आहे . पूर्वी ब्रॅण्डेड पॅकींगच्या अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटीची आकारणी केली जात होती . पण आता सर्वच पॅकींगच्या अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटीची आकारणी केली जाणार आहे केंद्राचा हा निर्णय छोटया व्यापाऱ्यांना मारक ठरणार आहे . व्यापारी वर्गाला अजून नवीन कराचा भार सहन करावा लागणार आहे . यासाठी नव्याने कर सल्लागार , अकाउंटंट व संगणकाचा खर्च वाढणार आहे . त्याबरोबरच सर्वसामान्य नागरीकांनाही ज्यादा पैसे मोजावे लागणार आहे यावाढीव करामुळे सामान्यांचे बजेट चुकणार आहे . अन्नवस्त्र निवारा या मुलभुत गरजांना किमान व्यापारी वर्गाच्यावतीने महासंघाचे करकक्षातून दुर ठेवावे अशी मागणी अध्यक्ष नितीन बंग , अजय बरडीया , अनिल रुणवाल , झुल्फीखार अब्बास बोहरी , नंदु सोनार यांनी केले.

'जीआयबीएफ'मुळे व्यापारी संबंध होतील मजबूत : खा. मीनाक्षी लेखी
आधुनिक केसरी न्यूज

पुणे : 'भारत, त्रिनिनाद आणि टोबॅगो देशात परस्परांना व्यापाराच्या मोठ्या संधी आहेत. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने (जीआयबीएफ) या तिन्ही देशांतील राजदूत, उद्योजक एकत्र आणून, बिझनेस कल्चरल कौन्सिल सुरु केले आहे. 'जीआयबीएफ'च्या या उपक्रमामुळे या तिन्ही देशांतील व्यापारी संबंध आणखी मजबूत होतील," असे मत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी व्यक्त केले.

'जीआयबीएफ'च्या वतीने नवी दिल्ली येथे भारत-त्रिनिदाद आणि टोबॅगो बिजनेस कल्चरल काउंसिलचे उद्घाटन, तसेच 'नॅशनल एमएसएमई अवॉर्ड्स फॉर बिजनेस एक्सलेंस'चे वितरण झाले. विविध देशांचे राजदूत, पुरस्कारार्थी उद्योजक उपस्थित होते. त्यामध्ये ग्लोबल इंडिया बिजनेस फोरमचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, त्रिनिदाद व टोबॅगोचे आयुक्त डॉ. रॉजर गोपाल, अमेरिकेचे वरिष्ठ राजदूत डॉ. प्रिथा राजाराम, झिम्बाब्वेचे राजदूत डॉ. जी. एम. चिपारे, बेलारुसचे महामहिम आंद्रेई रिज्युस्की, गुयानाचे महामहिम चरणदास पर्सोद, नायजेरियाच्या उच्चायुक्त तिजानी एल्ड्रिस, फिजीचे उच्चायुक्त एलीया सेवूतीया, 'जीआयबीएफ'च्या संचालिका दीपाली गडकरी यांच्यासह भारतीय लोकसभेचे सचिव व अन्य मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते भारतीय उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. रॉजर गोपाल भारताचे कौतुक करत म्हणाले की, "भारताचे लोक फार चांगले आहेत. आम्ही त्यांच्याशी व्यावसायिक नाते मजबूत बनवू इच्छितो. आमच्या देशात भारतासाठी व्यापाराच्या संधी खुल्या आहेत." पुरस्कारप्राप्त उद्योजकांनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. हा पुरस्कार अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, "मोदी सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेला साकार करण्याचे काम 'जीआयबीएफ'च्या माध्यमातून सुरु आहे. विशेषतः नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्याचा उपयोग त्यांना व्यापार जगतात त्यांच्या ओळखी वाढण्यात होत आहे. व्यापार आणि रोजगाराच्याही संधी यामुळे वाढत आहेत." दीपाली गडकरी यांनीही 'जीआयबीएफ'च्या माध्यमातून उद्योजकता विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

Ambani: अंबानी,अदानीमध्ये रस्सीखेच सुरूच, आता 'हे' बनले सर्वात श्रीमंत व्यक्ती
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई: रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यात नेहमी श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पुढे राहण्यासाठी चढाओढ चालु असते. आता अंबानी यांच्या शेअर्समध्ये ३ जूनला झालेल्या विक्रमी तेजीनंतर अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्स नुसार, मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अंबानी यांची सध्याची एकूण संपत्ती ९९.७ अब्ज डॉलर इतकी आहे. तर २०२२ मध्ये अंबानी यांच्या संपत्तीत ९.६९ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी आठव्या स्थानी आहेत. काही दिवसांपूर्वी ते टॉप-५ मध्ये होते. परंतु आता तेे ९८.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह थेट नवव्या स्थानावर पोहचले आहे.

व्यापाराचे विद्यापीठ या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन
आधुनिक केसरी न्यूज

पुणे : वानवडी, पुणे येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवनात 'व्यापाराचे विद्यापीठ' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक तयार झाले आहे.

यावेळी पवारांनी व्यापारी संघाला व राजेंद्र बाठीया यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले व्यापारी समाज हा कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशाच्या विविध प्रांतांतून कित्येक पिढ्या आधी पुणे भागामध्ये येऊन स्थिरावला. महाराष्ट्र भूमी हीच आपली भूमी मानून उद्योग व्यवसायांमध्ये लौकिक कमावला. त्यामुळे पुण्यातील अर्थकारणाला चालना मिळाली. पुण्याचा शिक्षण क्षेत्रात लौकिक आहेच. व्यापाराचे विद्यापीठ या ग्रंथाच्या प्रकाशनाने व्यापारी क्षेत्राच्या ज्ञानात मोलाची भर घालणारे म्हणून देखील पुणे शहराचा नावलौकिक होईल. या पुस्तकातील प्रत्येकाची जीवनगाथा जिद्द, प्रामाणिकपणा, कष्ट, सकारात्मकता, शिस्त, चिकाटी हे गुण दर्शवते.सदर पुस्तकातील बऱ्याच व्यापाऱ्यांशी माझा जवळून संबंध आला आहे. त्यांची कारकीर्द मी जवळून पाहिली आहे. गुलटेकडी मार्केटयार्डाला विद्यापीठात रूपांतरीत करण्यात मोलाचा वाटा असलेल्या 'मास्टर ॲाफ बिझनेस'च्या मानकऱ्यांचे अभिनंदन!

सोयगाव येथे पन्नास दुकानांचे भव्य व्यापार संकुल उभारणार
आधुनिक केसरी न्यूज
सोयगाव : नगर पंचायतीचे उत्पन्न वाढावे व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी सोयगाव येथे पन्नास दुकानांचे भव्य व्यापार संकुल उभारणार असल्याची घोषणा महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.
या व्यापार संकुलामध्ये शहरातील दिव्यांग तसेच महिलांसाठी काही दुकाने आरक्षित असतील असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
सोयगाव नगर पंचायतीच्या माध्यमातून शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना 5 टक्के प्रमाणे प्रतिव्यक्ती 1 हजार 214 प्रमाणे 70 लाभार्त्यांना धनादेश तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत टप्पा 1 ते 4 मधील एकूण 68 लाभार्त्यांना घरकुल अनुदान धनादेशाचे वाटप राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी डीपीआर 3 साठी नवीन घरकुल लाभार्त्यांच्या नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. सोमवार रोजी शहरातील जुना बाजार चौकात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर आबा काळे, नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, उपनगराध्यक्ष सुरेखाताई प्रभाकर काळे, शिवसेना तालुका संघटक दिलीप मचे, शिवसेना गटनेता अक्षय काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव,मा.सभापती धरमसिंग चव्हाण नादातांडा, सुरेश चव्हाण(सामाजिक कार्यकर्ते)घाणेगांव तांडा,सिल्लोड पं. स.सदस्य निजाम पठाण, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, एपीआय सुदाम सिरसाट, मुख्याधिकारी सय्यद रफिक, सिल्लोड चे नगरसेवक मनोज झंवर, सिल्लोड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, नॅशनल सुत गिरणीचे संचालक मारुती वराडे, विशाल जाधव, सिल्लोड खरेदी – विक्री संघाचे चेअरमन साळवे, सुदाम सुडके यांच्यासह नगरसेवक हर्षल काळे, शाहिस्ताबी रउफ बागवान, दीपक पगारे, वर्षा राजेंद्र घणगाव, संध्याताई किशोर मापारी, कुसुम राजेंद्र दुतोंडे, संतोष बोडखे, संदीप सुरडकर, भगवान जोहरे, ममताबाई विष्णू इंगळे, आशियाना कदिर शहा, लतीफ शहा , अशोक खेडकर, गजानन माळी तसेच मोतीराम पंडित, भगवान वारांगने, रमेश गावंडे, शरीफ शहा, विवेक महाजन, योगेश कळवत्रे आदींची उपस्थिती होती.सोयगाव शहरात प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई आवास , शबरी आवास व अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या घरकुल योजना प्राधान्याने राबवून शहरातील प्रत्येक बे घरांना घरकुल योजनेतून घरे देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. सोयगाव शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी लागणाऱ्या 10 टक्के सहभाग निधीची उपलब्धता करून देवू, सोयगाव येथील जागेचा प्रश्न मार्गी लागताच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या कामाला सुरूवात करण्यात येईल असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. शहराला नियमित वीज पुरवठा व्हावा, शेंदूरणी रस्त्याचा कामाला सुरुवात करून गुगडी धरणात ईतर ठिकाणाहून पाणी सोडण्याच्या प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ कामाला सुरुवात करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.अशी माहिती जि.प.सदस्य गोपीचंद जाधव यांनी दिली.