मायभाषा - Adhunik Kesari

राजकीय कविता : कुणी फुकावी तुतारी...
आधुनिक केसरी

संजय जेवरीकर ,पत्रकार

कुणी फुंकावी तुतारी
कुणी घड्याळ बघावे..
कुणी घ्यावे मशाल हाती
कुणी धनुष्य बाण ताणावे..

कुणी मुतावे धरणात
कुणी धरण गिळावे..
कुणी सत्तेसाठी आपले
इमान गिरवी ठेवावे...

कुणी काकासाठी झुरले
कुणी पुतण्याला बाजू केले..
सत्तेसाठी ज्यांनी त्यांनी
आपले प्यादे सरकावले..

कुणी पोरीला पुढे केले
कुणी पोरगा डावी लावला..
कुणी घराणेशाहीसाठी
पक्ष डावावर लावला..

कुणी कमळ फुलवावे
कुणी हाती कमळ घ्यावे..
कुणी ईडीच्या भीतीने
स्वतःला गिरवी टाकावे..

महाराष्ट्री देशा आता
मतदार मूर्खात निघाले..
सत्तेसाठी सगळ्यांनी आपले
कमरेचे डोक्याला गुंडाळले...

कुणी तुतारी मिळताच
दर्शना रायगडी पोचले..
हाती घड्याळ असता
कुणी कमळ कुरवाळले..

बस करा आता तुम्ही
महाराष्ट्र डावावर लावणे..
हाकलून लाव सत्तेवरूनी
आता हे सगळे शहाणे..

ताठ मानेने उभी राहू दे
पुन्हा शान महाराष्ट्राची...
दाखव जागा महाभागांना
अन् ताकद मतदारांची....!

काय आहे आधुनिक केसरीची रविवार मेजवानी !
बोंबाबोंब

एवढ्या पैशात असाच पुरस्कार दिला जातो

आपल्या प्रेरणा अंतरंगात शोधण्याचे सोडूनत्या बाह्य जगतातआपण शोधू लागलो की बोंबाबोंब सुरू होते. कारण बाह्य जगतातील प्रेरणा या कुबड्यासारख्या असतात. जोपर्यंत आधाराला आहेत तोपर्यंत आपण चालतो आणित्याकाढूनघेतल्याकी आपले पाय थबकतात आपण जागीच थांबतो. अशा बाह्य स्वरूपाच्या प्रेरणा अत्यंत तकलादू, अल्पजीवी आणि कुचकामी स्वरूपाच्या असतात. त्यामुळेच आजपर्यंतचे कित्येक सुवर्णपदक विजेते, अनेक प्रतिष्ठित, अप्रतिष्ठित पुरस्कार विजेते आपल्या आयुष्यात भरीव स्वरूपाचे काही कार्य करू शकलेले नाहीत.

स्वप्नपूर्तीचा संघर्षमय प्रवास

मराठी साहित्य विविध साहित्यप्रकारांनी समृद्ध आहे. त्यातील आत्मचरित्र हा साहित्यप्रकार आत्मचिंतनात्मक आहे. आणि मराठी साहित्यात इतकी प्रेरणादायी आत्मचरित्रे लिहिली गेली, ज्यामुळे निराशेने व्यापलेल्या मनाला एक नवी उभारी मिळाली आहे आणि अजूनही मिळते आहे. ‘प्रकाशवाटा’ (डॉ. प्रकाश आमटे), ‘अग्निपंख‘ (ए.पी.जे. अब्दुल कलाम), ‘मुसाफिर’ (अच्युत गोडबोले), ‘इडली, आर्किड आणि मी’ (विठ्ठल कामत), ‘मन में है विश्वास’ (विश्वास नांगरे पाटील) इत्यादी आत्मचरित्रे मनात आत्मविश्वास जागृत करणारी आहेत. याच आत्मचरित्रांच्या नावांमध्ये आणखी एक आत्मचरित्र समाविष्ट झाले आहे.

“तुम मुझे यूँ भुला ना पाओगे…”

‘वो पास बैठे तो आती है दिलरूबा खुशबू
वो अपने होठों पे खिलतें गुलाब रखते है…’
ज्यांच्या लेखणीतून बहारदार शब्दांचे असे दरीचे बाहेर पडत असतील तो शायर, तो कवी किती ताकदीचा असेल हे मला वेगळं सांगायची वेगळी गरजच नाही. इक़बाल हुसैन! पडलात ना संभ्रमात? मात्र, ‘दिल के झरोखें में…’ हे गाणं कुणी लिहिलंय असं विचारलं तर तुम्ही पटकन सांगाल: हसरत जयपुरी! हो, हिंदी आणि उर्दू भाषांमध्ये कविता, शेरो-शायरी आणि हटके अशी गाणी लिहिणाऱ्या हसरत जयपुरींच्या या मस्तवाल ओळी आहेत. ‘हसरत’ हे त्यांचं तखल्लुस!

सैनिकांमुळेच आपला प्रत्येक श्वास सुरक्षित

आजचा दिवस खूप सुंदर वाटतोय, खरच त्याय रहस्य नक्कीच आहे. फक्त माझ्यासाठीच नाहीतर भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मनात एक उत्साह, आनंद, गर्व या सगळ्या गोष्टी दाटी करतायेत, याचे कारण असे आहे की, माझे दीर दिलीप फुलचंद बैनाडे हे सैन्यदलात गेल्या १८ वर्षापासून सेवा करत होते. आणि आता ते सेवानिवृत्त होऊन घरी आलेत. ह्याच गोष्टीचा खूप गर्व वाटला. फक्त माझे दिरच नव्हे तर भारत देशातील प्रत्येक तरूण जेव्हा देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती होतो, तेव्हा तो पूर्णपणे सर्व मोहाचा त्याग करून त्याठिकाणी रुजू होत असतो. आपल्यासारख्या व्यक्तिंना फारसे वेगळे असे काही वाटत नाही.

विचार प्रवाह : नेता

नेता म्हटलं की समोर प्रतिमा निर्माण होते, पांढरी टोपी, पांढरी कपडे लोकांच्या साठी काम करणारा किंवा राजकारण करणारा… नेता आणि नेतृत्व त्याकडे पाहिलं तर त्याचा आवाका खूप मोठा आहे. आपण खालील प्रमाणे थोडेशे विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

लसणाच्या पातीची चटणी

लसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !!!
समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात त्याच्या प्राप्तीसाठी भांडण झाले… अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला… तो थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला…

संविधान वाचताना
संविधान वाचताना, फुलते ही छाती
काय जादू होती अशी, बाबांच्या त्या हाती !! धृ !!

होवो सुखी बहुजन, हाच एक ध्यास
बॅरिस्टर होण्या केला, अफाट अभ्यास
दोन वेळच्या खाण्याची, होती जेथे भ्रांत
संविधानामुळे तेथे, सुखावला प्रांत

जादूगार लेखणीने, जोडलेली नाती !! १ !!

साधंसुधं काम नव्हे, होती दिव्यदृष्टी
पंचशील, करुणेची, धम्ममय सृष्टी
हळूवार सांभाळत, साऱ्यांच्या भावना
दिन सोनियाचा केला, साहून यातना

आनंदाने उजळल्या, दिस आणि राती !! २ !!

समता, बंधुता आणि, एकतेचा नारा
देत नाही संविधान, अन्यायाला थारा
लोकराज्याची आमुच्या, आहे न्यारी शान
राष्ट्रास सांधणारी ही, घटना महान

गुण्यागोविंदाने नांदो, विविधांगी जाती !! ३ !!

बंदी उठवून केली, सोय संचाराची
अभिव्यक्ती, मतदान, संधी भाषणाची
अन्न, वस्त्रासवे दिला, हक्क शिक्षणाचा
मनोभावे ठेऊ सारे, मान कायद्याचा

सुखावला बळीराजा, सुखावली माती !! ४ !!

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो – ८८ ७९८९ ७७९७

संदेश बा भिमाचा
वाघापरी जगावे संदेश बा भिमाचा…
नाही कधी झुकावे संदेश बा भिमाचा…

ज्ञानाशिवाय नाही सौंदर्य जीवनाला,
आयुष्यभर शिकावे संदेश बा भिमाचा…

ठेवावयास तेवत अग्नी प्रबोधनाचा,
जळती मशाल व्हावे संदेश बा भिमाचा…

वाटेत लाख काटे टपले जरी रुताया,
ध्येयाकडे निघावे संदेश बा भिमाचा…

ओठात एक त्यांच्या पोटात वेगळे रे,
शत्रूस ओळखावे संदेश बा भिमाचा…

आपापल्या परीने द्या योगदान नक्की,
बळ चळवळीस द्यावे संदेश बा भिमाचा…

उद्धार जीवनाचा आहे करायचा जर,
बुद्धास शरण जावे संदेश बा भिमाचा…

@संदीप वाकोडे
मुर्तिजापूर जि.अकोला
फोन नं.९५२७४४७५२९

बाबासाहेब
बाबासाहेब आज ही तुम्ही जिवंत
आहात आमच्या मनात
तुमच विशाल कार्य आम्हाला प्रोत्साहन देत
जिवन जगण्यासाठी या जगात

प्रत्येक नागरिकाचा आहे आत्मा
आज भारतीय संविधान
हक्क, अधिकार मिळाले म्हणून
प्रत्येक नागरिक बाळगतो अभिमान

बाबासाहेब तुम्ही शोषित, पिढीत
लाचारांना अधिकार दिला
मानसन्मानान जिवन जगण्यासाठी
महिलांना कानमंत्र दिला

तुम्ही संविधानाच्या माध्यमातून
मागसलेल्यांना आरक्षण मिळवून दिल
महिलांना ही आरक्षणाच्या माध्यमातून
सुदृढ आणि सक्षम बनवल

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तुम्ही
संसदेत लढा दिला
सावकारी पद्धतीला पुर्ण विराम देऊन
शेतकऱ्यांचा सन्मान केला

– विजय सुर्यवंशी,
जळगाव,
मो – 9168314090

हे त लय झाली हो
घरी संडास न बांधल्यानं सारी गोठ वाया गेली हो ।
माही बायको राज्या तिच्या माहेरी चाल्ली गेली हो ।
हे त लय झाली हो …. ॥ १ ॥

तिचा रोजचा नांदा म्हणे घरी संडास बांधा ।
नाहीतन आपल्या संसारात म्हणे पळुन जाईन वांधा ।
तिची गोठ म्या कधी मनी नाई धरली हो …
हे त लय झाली हो … ॥ 2 ॥

संडासचा पयला हप्ता पत्ता दारु मटनामधी गेला ।
संडास बांध्यासाठी त्यातला उरला नाई एकवी ढेला ।
शासनाची कारवाई व्हयाची येळ माह्यावर आली हो ..
हे त लय झाली हो …. ॥ 3 ॥

माह्या बायकोच नाई मावच सारं चुकलं |
या रिकाम्या शौकापाई माया संसाराचं सारं गणीतच हुकलं ।
हातानं सयपाक कऱ्याची पाई माह्यावर आली हो …
हे त लय झाली हो … I l ४ ॥

तिच्या माहेरी जाउन तिनं नोटीस मले देलं |
संडास बांध्यासाठी दादा तीनं मले कोर्टात नेलं | .
फारकतीची धमकी राज्या तिनं मले देली हो …
हे त लय झाली हो … ॥ ५ ॥

माही नशा दादा एका झटक्यातच उतरून गेली ।
घरी संडास बांध्याची म्या मग तयारीच सुरु केली ।
संडास बांधला घरी याची बातमी तीले गेली हो …
हे त लय झाली हो . . . ॥ ६ ॥

हे आयकून बायको माही चटकन घरी आली ।
कमाल केली म्हणे माया नवऱ्यान सांग्याले सुरु झाली ।
इज्जतीची लाज म्हणे नवऱ्यान माया राखली हो ..
हे त लय झाली हो …. ॥७ ॥

सांगे ते साऱ्या बायाईले आता उघड्यावर संडासले जानं बंद करा |
संडास बांध्यासाठी आपआपल्या नवऱ्यायले चांगलच कैचीत धरा |
माह्या बायकोची गोठ राज्या साऱ्या बायाईले पटली हो …
हे त लय झाली हो … ॥ ८ ॥

– कवि अनिल हेलोडे, जळगांव (जामोद )               संपर्क :9561677878

शब्द काय सांगतात?भाग (२०):याम
याम म्हणजे दाब, निग्रह, सोशिकपणा.
आ उपसर्ग लागून याचा ‘आयाम’ होतो. आयाम म्हणजे लांबी, विस्तार आणि निग्रह.
विषयाचे विविध पैलू म्हणजे आयाम. एखाद्या व्यक्तीला अनेक पैलू असतील तर तिला आपण ‘बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ म्हणतो.
योगशास्त्रानुसार श्वासाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण. त्या प्राणाचा निग्रह म्हणजे ‘प्राणायाम.
‘आयाम’ला वि उपसर्ग लागून ‘व्यायाम’ होतो. (ज्याचा आपल्याला फार कंटाळा असतो.) हातपाय लांब करून, ताणून शरीराचा योग्य आकारात विस्तार करणे म्हणजे ‘व्यायाम’. व्यायाम म्हणजे उद्योग, श्रम असेही अर्थ आहेत.
याम या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे प्रहर. प्रहर म्हणजे तीन तासांचा काळ. चोवीस तासात आठ प्रहर असतात म्हणजेच आठ याम असतात.
संत गोरा कुंभार चोवीस तास विठ्ठलनामात दंग असत. म्हणून ते एका अभंगात लिहितात,
“नाम तुझे घेतो गोरा म्हणुनी आठ याम।
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम।।”
यामिनी, यामवती, यामिका म्हणजे रात्र. म्हणून पहारेकर्‍यासाठी ‘यामिक’ असाही शब्द आहे.
यम् हा धातू यामागे आहे. संयम, नियम, विनियमन अशा अनेक शब्दांचेही मूळ यम् हा धातू आहे.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

शब्द काय सांगतात? भाग (१९)चारू
चारु म्हणजे प्रिय, अनुकूल, सुंदर, देखणा, केशर आणि कुंकू.
जेथे जेथे सौंदर्य आहे तेथे तेथे ‘चारु’ शब्दाचा वापर केलेला दिसतो.
शीला म्हणजे दगड. पण चारुशीला म्हणजे रत्न. रत्न हा दगडच असतो, पण सुंदर दगड.
हरणाचे डोळे सुंदर असतात म्हणून त्याला चारुनेत्र, चारुलोचन असे म्हणतात. मृच्छकटिक नाटकाचा नायक ‘चारुदत्त’ म्हणजे देखणा दत्त. ज्याचे अवयव सुंदर आहे तो ‘चारुगात्र’. याचे स्त्रीलिंगी रूप ‘चारुगात्री’. जिचे केस सुंदर आहे ती चारुकेशी. याच नावाचा संगीतात एक रागही आहे. द्राक्षाच्या वेलीला चारुफला म्हणतात.
अमृतानुभवात ‘जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी’ अशी ओळ सापडते. ‘जो घनश्याम चारुगात्र’ असे वर्णन श्रीरामविजय ग्रंथात आहे. कृष्णाने नंदाच्या देव्हार्‍यातला शालिग्राम गिळला तेव्हा ‘नंद म्हणे राजीवनेत्रा, शालिग्राम देई चारुगात्रा।’ असा संवाद हरिविजय ग्रंथात आहे.
‘चारुचंद्र की चंचल किरणे खेल रही थी जल थल में।’ अशी मैथिलीशरण गुप्त यांची एक कविता आहे. ‘चारुचंद्र की चंचल चितवन’ असे एक गाणे ‘मनपसंद’ या चित्रपटात आहे. (अनिल अंबानी यांची पत्नी) टीना मुनीम यांनी ते पडद्यावर सादर केले आहे.
एखादे काम नीट चालत असेल तर ‘सुचारु रूप से कार्य चल रहा है।’ असे हिंदीत म्हणतात.
याशिवाय चारुअंगी, चारुवर्णा, चारुवर्धना, चारुहास, चारुता असे असंख्य शब्द आजही आपण तयार करू शकतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

फुलेबाबा…!
आसूड उगारायला शिकवलंत तुम्ही
व्यवस्थेच्या चिंधड्या करण्याची ताकद
आहात तुम्ही…
शेटजी भटजी ह्या शत्रूची
ओळख करून दिलित तुम्ही…
शिवाजी राजाचा पराक्रम
अन मातीतल्या मावळ्यांचा
इतिहास अख्ख्या जगाला
सांगितलात तुम्ही…
खरंतर फुलेबाबा
शाहीर म्हणून मला भावतात
तुम्ही…
तुमचे सत्यशोधक जलसे आज
व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत
मैलाचा दगड ठरलेत…
‘तृतीय रत्न’ नाटक ब्राम्हणशाहीची
फसवेगिरी उघड करतं…
‘गुलामगिरी’ लढण्यासाठीचं
बळ मनगटात देतं…
फुलेबाबा तुम्ही अन सावित्री
मायेनं शिक्षणाची
क्रांतीज्योत माझ्यात पेटवलीत
ती क्रांतीज्योत मुक्ता, फातिमा
ह्यांनी जशी पेटती ठेवली.
आजही तशीच धगधगत राहील…

अशोक बनकर

शब्द काय सांगतात? भाग (१९): चारू
चारु म्हणजे प्रिय, अनुकूल, सुंदर, देखणा, केशर आणि कुंकू.
जेथे जेथे सौंदर्य आहे तेथे तेथे ‘चारु’ शब्दाचा वापर केलेला दिसतो.
शीला म्हणजे दगड. पण चारुशीला म्हणजे रत्न. रत्न हा दगडच असतो, पण सुंदर दगड.
हरणाचे डोळे सुंदर असतात म्हणून त्याला चारुनेत्र, चारुलोचन असे म्हणतात. मृच्छकटिक नाटकाचा नायक ‘चारुदत्त’ म्हणजे देखणा दत्त. ज्याचे अवयव सुंदर आहे तो ‘चारुगात्र’. याचे स्त्रीलिंगी रूप ‘चारुगात्री’. जिचे केस सुंदर आहे ती चारुकेशी. याच नावाचा संगीतात एक रागही आहे. द्राक्षाच्या वेलीला चारुफला म्हणतात.
अमृतानुभवात ‘जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी’ अशी ओळ सापडते. ‘जो घनश्याम चारुगात्र’ असे वर्णन श्रीरामविजय ग्रंथात आहे. कृष्णाने नंदाच्या देव्हार्‍यातला शालिग्राम गिळला तेव्हा ‘नंद म्हणे राजीवनेत्रा, शालिग्राम देई चारुगात्रा।’ असा संवाद हरिविजय ग्रंथात आहे.
‘चारुचंद्र की चंचल किरणे खेल रही थी जल थल में।’ अशी मैथिलीशरण गुप्त यांची एक कविता आहे. ‘चारुचंद्र की चंचल चितवन’ असे एक गाणे ‘मनपसंद’ या चित्रपटात आहे. (अनिल अंबानी यांची पत्नी) टीना मुनीम यांनी ते पडद्यावर सादर केले आहे.
एखादे काम नीट चालत असेल तर ‘सुचारु रूप से कार्य चल रहा है।’ असे हिंदीत म्हणतात.
याशिवाय चारुअंगी, चारुवर्णा, चारुवर्धना, चारुहास, चारुता असे असंख्य शब्द आजही आपण तयार करू शकतो. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

शब्द काय सांगतात?भाग (१८) : आशु
आशु म्हणजे त्वरित, वेगवान, जलद. वकील किंवा मोठ्या अधिकार्‍यांकडे वेगाने लिहिणारे स्टेनोग्राफर असतात. ते ज्या लिपीत लिहितात ती ‘आशुलिपी’ असते. आशुलिपी म्हणजे शाॅर्टहँड. या लिपीत लिहिणार्‍याला आशुलिपिक म्हणतात. लवकर प्रसन्न होणार्‍याला ‘आशुतोष’ म्हणतात. हे भोळ्या शंकराचे एक नाव आहे. महाशिवरात्रीला रेडिओचे निवेदक शंकराचा उल्लेख ‘भगवान आशुतोष’ असा करतात.
आशुग किंवा आशुगामी म्हणजे वेगाने जाणारा. हा शब्द बाण, वारा किंवा सूर्य यांच्यासाठी वापरला जातो. गुग्गुळाच्या झाडाला आयुर्वेदात आशुपत्री असे नाव आहे. वेगाने धावतो म्हणून घोड्याला अश्व म्हणतात. अश्वावर जो स्वार होतो तो अश्विन असतो आणि घोडेस्वारी करणारी महिला असेल तर ती अश्विनी असते. कालिदासाच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ नाटकात राजा दुष्यंत हरणावर बाण रोखतो तेव्हा आश्रमातला साधू त्याला आज्ञा देतो, “आशु प्रतिसंहर सायकम्।” म्हणजे पटकन बाण परत घे.
एखाद्या औषधाचा परिणाम तत्काळ होत असेल तर त्यास आशुक्रिया म्हणतात. आशु असलेले असे अनेक शब्द आपल्याला साहित्यात दिसतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

शब्द काय सांगतात?भाग (१७):ताप
ताप म्हणजे उष्णता, दुःख, ज्वर, आपत्ती, संकट. आयुष्यात चुकीचा निर्णय घेतला की, त्याचे परिणाम भोगताना पश्चात् + ताप म्हणजे पश्चात्ताप होतो.
(पश्चात् म्हणजेच ‘नंतर’. त्यामुळे ‘नंतर पश्चात्ताप झाला’ असे म्हणणे चूक आहे.) पश्चात्ताप आणि अनुताप सारखेच. क्रोधाला ‘संताप’ म्हणतात. तो योग्य कारणासाठी असेल तर ‘सात्विक संताप’ म्हणतात.
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तीन ताप सहन करावे लागतात. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. यांना त्रिविधताप म्हणतात.
अज्ञान, मूर्खपणा, राग, द्वेष, रोग यामुळे स्वतःला होतो तो आध्यात्मिक ताप.
शत्रु, प्राणी किंवा इतरांमुळे होतो तो आधिभौतिक ताप.
आणि दुष्काळ, भूकम्प, पूर वगैरेमुळे होतो तो आधिदैविक ताप.
पराक्रम गाजवला की त्याला ‘प्रताप’ म्हणतात. (काही उलटेसुलटे काम करून ठेवले की मराठीत उपरोधाने ‘प्रताप करून ठेवले’ असे म्हणतात.)
तापस म्हणजे तप करणारा तपस्वी. तप करणारी स्त्री असेल तर तिला ‘तापसी’ म्हणतात. हे एका अभिनेत्रीचेही नाव आहे. तापन किंवा तपन म्हणजे सूर्य. (तपन सिन्हा हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत.)
तापात ताप एखादे काम करताना कधी कधी डोक्याला ताप होतो ती गोष्ट वेगळी.
तापमान वाढलेले असे अनेक शब्द आपण वापरतो.
संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो.
म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.