कला - Adhunik Kesari

छत्रपती संभाजीनगरवासीयांसाठी पुनःश्च 'वसंतोत्सवा'ची मेजवानी
आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : अनेक वर्षांच्या खंडानंतर नुकताच वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला असला तरी शहरातील रसिकप्रेमींच्या आनंदात भर टाकण्यासाठी 'वसंतोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ मार्चला या स्वर मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.

१२ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे वसंतोत्सव हा बहारदार कार्यक्रम रात्री ९ वाजता रंगणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक पुनीत बालन ग्रुप हे आहेत. ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे यांना समर्पित या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात लोकप्रिय गायक राहुल देशपांडे हे शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर प्रसाद पाध्ये आणि हार्मोनियमवर आदित्य ओक साथसंगत करणार आहेत.

दुसऱ्या सत्रात "द राहुल देशपांडे कलेक्टिव" हा कार्यक्रमात सादर करणार असून यामध्ये राहुल देशपांडे व त्यांच्या भगिनी दिप्ती माटे त्यांच्याबरोबर चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सदाबहार गीते सादर करणार आहेत. प्रसाद पाध्ये (तबला), आदित्य ओक (हार्मोनियम), रोहन वणगे (ऑक्टोपॅड), (कीबोर्ड) हे या कार्यक्रमातील सहकलाकार आहेत. लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांच्या या वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद रसिक श्रोत्यांना घेता येणार आहे. या कार्यक्रमाला एम. आय. टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी हे आयोजक असून, लोकमान्य मल्टिपर्पज, मगरपट्टा सिटी ग्रुप, सुहाना, एंड्रेस हॉसर यांचे  सहकार्य लाभले आहे. सदर कार्यक्रमाच्या प्रवेशिका बुक माय शोवर उपलब्ध आहेत.

आकाशवाणी कलावंतांमध्ये गजानन केचेंचा समावेश
आधुनिक केसरी न्यूज

औरंगाबाद : येथील सुप्रसिध्द गायक व संगीतकार प्रा.गजानन केचे यांचा आकाशवाणीच्या कलावंतांमध्ये समावेश झाला आहे. त्यांना ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) तर्फे सुगम संगीत गायन व हार्मोनियम वादनाबद्दल "बी हायग्रेड कलाकार" म्हणून मान्यता मिळाली आहे.
प्रा.गजानन केचे सर अतिशय मितभाषी व मनमिळाऊ स्वभावाचे असुन ते सध्या औरंगाबाद येथील सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयात संगीत विभागात कार्यरत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या सांगितीक जीवनाचा खडतर प्रवास केला आहे.
प्रा.केचे सरांना मिळालेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मकरंद पैठणकर संगीत विभाग प्रमुख डॉ.संजय मोहोड, गुरूवर्य सूरमयी श्री गिरीश गोसावी, पंडीता शुभदा पराडकर, पंडित विश्वनाथ दाशरथे, डॉ.करूणाताई देशपांडे, डॉ.श्रीरंग देशपांडे, श्री मंगेश कुलकर्णी गायक अतुल दिवे, गायक नागेश पींपळे सह शहरातील संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व तसेच प्रा.ज्ञानेश्वर कुलकर्णी, कवी सुनील उबाळे, गझलकार गीरिश जोशी, कवी रमेश ठोंबरे, माधुरी चौधरी आदींनी अभिनंदन केले.

ख्याल गायकी उत्स्फूर्त बांधणी, नवनिर्मितीला वाव देते
आधुनिक केसरी न्यूज

पुणे : "भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा लोकप्रिय प्रकार असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. विलंबित (मोठा ख्याल) व द्रुत (छोटा ख्याल) अशा दोन प्रकारातील ख्याल गायकी उत्स्फूर्त बांधणी व नवनिर्मितीला वाव देते. तालक्रियेतील दोन भाग आणि बारा स्वरांच्या पलीकडे जाऊन लागणाऱ्या श्रुती यामुळे गायकाला अभिव्यक्त होता येते," असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं. सत्यशील देशपांडे यांनी केले.

तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढावी यासाठी कार्यरत 'ऋत्विक फाउंडेशन'च्या वतीने आयोजित 'ख्याल विमर्श' या विशेष कार्यक्रमात पं. देशपांडे बोलत होते. कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विविध मुखड्यांचे सादरीकरण करत त्यातील बारकावे, तुकडे, आवर्तन, ताल, राग, बोल असे अनेक प्रकार समजावून सांगितले. 'आधा है चंद्रमा, रात है आधी', 'कजरा रे कजरा रे' अशा लोकप्रिय गाण्यांचे मुखडे अनुक्रमे एकताल व तीनताल या शास्त्रीय तालांमध्ये आणून नवनिर्मितीला व वैयक्तिक अभिव्यक्तिला कसा वाव मिळतो हे सप्रयोग दाखवले व याच मुखड्यांच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सृजन देशपांडे यांनी सहगायन, तर विभाव खंडोलकर यांनी तबल्यावर साथ संगत केली. फाउंडेशचे प्रवीण कडले, चेतना कडले उपस्थित होते.

पं. सत्यशील देशपांडे म्हणाले, "अभिजात शास्त्रीय संगीताची मोठी परंपरा आहे. आपल्याकडे त्याच गवयाचा तोच राग ऐकायला श्रोते पुन्हा येतात, हे आपल्या संगीताचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये आपली कला दाखवायला कसा वाव असतो, तो जगातील इतर संगीतापेक्षा कसा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे विषद करून सांगितले. विशेषतः पाश्चात्य कला-संगीत, कसे समूह संगीत आहे, आणि त्यात पूर्वनियोजितपणावर किती भर असतो ते सांगितले. बंदिशीबद्दलचे त्यांचे विचार, तिचे ३ घटक, आणि बंदिश कसे राग दर्शवतो, पण बंदिश म्हणजे पूर्ण राग कसा नाही हे सप्रयोग दाखवले.

Video : कडूबाई खरात यांच्या भीमगीतांनी आणली रंगत
आधुनिक केसरी न्यूज

लासुर स्टेशन : आपण खातो त्या भाकरीवर, होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर,माझ्या भिमानं भीमा ना माय सोन्यानं भरली ओटी, सांगा वो सांगा गाडीवाले दादा, असे एका पेक्षा एक आंबेडकरी सरस गीत गाऊन तसेच वामनदादा कर्डक यांच्या लेखनेतील गाण्याला उजाळा देत कडूबाई खरात यांनी रंगत आणली.

शाहीर,लोककवी आणि आंबेडकरी चळवळीच्या सुवर्ण कालखंडातील बिनीचे शिलेदार महाकवी वामनदादा कर्डक यांच्या 100 वी जयंती शताब्दी वर्ष निमित लासुर स्टेशन येथील संबोधी बौध्द विहार येथे वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतील भीम गीत गाऊन जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी कडूबाई खरात, सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीला वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमीचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमानिमित्त प्रदीप पठारे, विजय मोकळे, दिनेश धडे, रेखा भारती सिद्धार्थ कांबळे, आबा अडसूळ किरण आमराव, संजय मगर, कैलास सोनावणे यांनी गीत गायन केले. तसेच जिल्ह्यातील व तालुक्यातील मान्यवर वादक, कलावतांनी या कार्यक्रमात हजेरी लावली.

दरम्यान या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक वामनदादा साळवे, सुभाष थोरात, संजय कांबळे,  कपिल खंडागळे सुमित खंडागळे यांनी परिश्रम घेतले.

नोकरदार बायकांचा श्रावणोत्सव
आधुनिक केसरी

घरातली काम, ऑफिसच्या वेळा आणि सुट्ट्या ऍडजेस्ट करून घरातच मंगळागौर, हळदी कुंकू, सवाष्ण जेवू घालणं इत्यादी काम आपल्या घरातल्या घरात त्या करत असतात. यात परंपरा जपण्याएवढं समाधान असतं तितकंच काही क्षणांचा विरंगुळा मिळण्याचा अट्टाहासही असतो. पण सण साजरे करण्याची धावपळ आज फक्त नोकरदार बायकांचीच होते असं नाही तर शहरात राहणाऱ्या प्रत्येक बाईची आज हीच परिस्थिती आहे. मनाचा उत्साह कृतीतून दाखवण्यासाठी त्यांना पुरेसा वेळच नसतो. पण म्हणून रोजच्या दगदगीन श्रमणाऱ्या मनाला चैतन्याची उभारी देणाऱ्या या उत्सवांना त्यातील प्रथांना फाटा देण्याची मात्र या बायकांची इच्छा नसते.

श्रावण सरीच्या बरोबरीनंच श्रावणात येणारे सण या पाघोळयांसारखेच अनोळखी. घरातल्या आज्ज्या आयांचा अट्टाहास असतो म्हणून आत्ताच्या मुला-मुलींना नागपंचमी, मंगळागौर, जीवती पूजन हे किमान ऐकून तरी माहिती आहे. त्यांच्या कहाण्या आणि त्या दिवशी केले जाणारे पदार्थ हेही आत्ताच्या मुलांना नावानं ओळखीचं असलं तरी अनोळखीच आहेत. श्रावण आला की मनालाच नाही तर जणूकाही निसर्गालाही आनंद होतो.मनाला आनंद देणारा हा श्रावण आपल्याबरोबर सण, उत्सव व्रतवैकल्यांची शृंखला घेऊन येतो. बायका आणि श्रावणाचं नातं किती जिवाभावाचं असतं हे वेगळं सांगायला नको मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमा या सगळ्यांच सणांचं बायकांशी एक आपुलकीचं नातं असतं हे नातं पूर्वापार चालत आलेले आहे; मात्र आता हे नातं पूर्वीसारखाच आहे असं म्हणता येणार नाही आणि राहणार तरी कसं? कारण परिस्थिती ही तितकीच बदलली ना? पण म्हणून श्रावण आणि त्यानिमित्त येणाऱ्या सणावाराला कराव्या लागणाऱ्या प्रथा परंपरांना मुरड घालावी असं थोडीच आहे. सडा रांगोळी घालण्यासाठी आता अंगणच नाही; पण तरीही श्रावणात का होईना उंबरठ्यासमोर छापायची रांगोळी तर काढता येईलच ना.  दाराला लोकरीचं मण्यांचं बाजारात विकत मिळणार तोरण तर लावता येईल. आपली आई करायची त्याचप्रमाणे सण साजरा करता आले नाही तरी इन्स्टंटच्या जमान्यात जसं शक्य आहे तसे सण साजरा करायला हवेत हाच विचार मनात येतो. शहरात राहायला आलो शहराशी जुळवून घेतले तरीही आपल्या गावात केल्या जाणाऱ्या सणांची आठवण आजही मनात कोठे ना कोठे ताजी आहेच.  मग या श्रावणात पुन्हा पूर्वीसारखीच परंतु थोडी मॉडल टच असलेली मंगळागौर गजबजलेल्या शहराच्या सोसायटीमध्ये का साजरी होऊ नये? शहराच्या गजबजामध्ये आपण हरवून गेलो आहेत रोजच्या चक्राला जुंपून घेतल्याप्रमाणे बायका काम करत राहतात स्वतःसाठी उसंत काढायची असते पण तशी संधीच मिळत नाही पण ऋतूप्रमाणे बदलणारा निसर्ग त्यांच्याही मनाला साद घालतो श्रावणातला बहर, सणा उत्सवांच्या चाहूली, सुखावणार वातावरण त्यांच्याही मनात प्रसन्नता पेरण्याचं काम करतच असतं म्हणूनच मिळेल त्या वेळेत जमेल त्या पद्धतीने सण साजरी करण्याचा प्रयत्न या बायका करत असतात. घरातली काम, ऑफिसच्या वेळा आणि सुट्ट्या ऍडजेस्ट करून घरातच मंगळागौर, हळदी कुंकू, सवाष्ण जेवू घालणं इत्यादी काम आपल्या घरातल्या घरात त्या करत असतात. यात परंपरा जपण्याएवढं समाधान असतं तितकंच काही क्षणांचा विरंगुळा मिळण्याचा अट्टाहासही असतो. पण सण साजरे करण्याची धावपळ आज फक्त नोकरदार बायकांचीच होते असं नाही तर शहरात राहणाऱ्या प्रत्येक बाईची आज हीच परिस्थिती आहे. मनाचा उत्साह कृतीतून दाखवण्यासाठी त्यांना पुरेसा वेळच नसतो. पण म्हणून रोजच्या दगदगीन श्रमणाऱ्या मनाला चैतन्याची उभारी देणाऱ्या या उत्सवांना त्यातील प्रथांना फाटा देण्याची मात्र या बायकांची इच्छा नसते. पूर्वीच्या काळी मंगळागौर ही रात्रभर जागवली जायची नवविवाहित महिलेच्या सख्या, शेजारणी येऊन रात्रभर गाणी नृत्य करत मंगळागौर साजरी करायच्या पण आता सकाळीच ऑफिसला जावं लागतं. लवकर उठावं लागतं. त्यामुळे गजराचा आदेश पाळण स्त्रियांना बंधनकारक आहे. त्यामुळे आता मंगळागौर जागवली जात नाही; तर आत्ताची मंगळागौर तासा दोन तासाच्या खेळाच्या पॅकेजमध्ये बसवून खेळली जाते. मंगळागौर खेळणाऱ्या बायकांच्या ग्रुपला बोलवलं जातं. या बायका दोन-तीन तासाचा मंगळागौरीचा कार्यक्रम सादर करतात परंपरेप्रमाणेच मंगळागौर साजरी करायची असा अट्टाहास ठेवला. तर श्रावणामागून श्रावण सरीत पण त्या पद्धतीने मंगळागौर जागवायला वेळ मिळणार नाही मंगळागौरीच्या या आधुनिक आणि छोटे खाणी रूपामुळे बायकांना एकत्र येऊन खेळण्याचा किमान आनंद तरी मिळतो. श्रावणी शुक्रवारी घरात हळदीकुंकू करण्याची पध्दत आहे. मात्र नोकरदार बायकांना घरी जायचा उशीर होतो. मग त्यानंतर हळदीकुंकू करण शक्य नसतं. मग अशावेळी ऑफिसमध्येच हळदीकुंकू केलं जातं. दर श्रावणी शुक्रवारी ऑफिस मधील एक एक विभाग हळदीकुंकू करतो यावेळी प्रसाद म्हणून गुळ-फुटाणे दिले जातात. सर्व बायका एकत्र येऊन संध्याकाळी हळदीकुंकू करतात या दिवशी प्रत्येक बाईनं साडी नेसली पाहिजे असाही काही ऑफिसमध्ये रुल असतो. यानिमित्त साड्या नेसण्याची हौसही बायका पुरवून घेतात.

काही सोसायटीमध्ये श्रावण साजरा करण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं. त्यामध्ये सोसायटीमधील बायका आपल्या कला सादर करतात साधारणतः शनिवारी संध्याकाळी या कार्यक्रमाचे आयोजन केले जातं म्हणजे थोडा उशीर झाला तरी रविवार सुट्टीचाच असते. यामध्ये बायका गाणी म्हणतात, डान्स करतात, नकला करतात. अशा वेगवेगळ्या कला सादर करतात श्रावण सेलिब्रेट करतात. श्रावण हाच एक महिना असतो ज्यात सण, पूजा प्रथा खचाखच भरलेल्या असतात. या सणांना देवाला काही खास पदार्थांचा नैवेद्य केला जातो, तसेच श्रावण महिन्यात बाजारात निरनिराळ्या भाज्या मिळतात त्यापासून नानाविध पदार्थ होतात. श्रावणात खाण्याची खूप चंगळच असते ही चंगळ एक सेलिब्रेशन करता यावे म्हणून सोसायटीतील बायका एकत्र येऊन पाककृती स्पर्धेचा आयोजन करतात आणि खास श्रावणात बनवले जाणारे पदार्थ या स्पर्धेत सादर करतात आणि स्पर्धा संपल्यावर एकत्र जमून या पदार्थांचा आस्वाद घेतात. खरंतर मंगळागौर भोंडला यांसारखे आनंद देणारे सण उत्सव आजही या बायकांनी जपून ठेवलेले आहेत. किमान तेच त्यांच्या मनाला आनंद रूप देण्याचे कार्य करत असतात.

आठवणीतील..."श्रावण"
आधुनिक केसरी

श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, आईने मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण म्हणून आई वहीनीकडे झालेलं सौवाष्ण जेवण व मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर.. प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण !!

तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर.. 'दिव्याची आवस'म्हणून जाड कणिक केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप... म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल !!

डबा भर चिरलेला पिवळा धम्मक गूळ, हरभरा डाळ, भाजलेले दाणे, फुटाणे, दाण्याचं खमंग कूट, नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पुड, उपासाची भाजणी राजगिरा लाडू व खजूर यांनी भरलेले डबे, म्हणजेच श्रावणाच्या स्वागतासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर !!

जिवतीचा फोटो, कहाण्यांच पुस्तक, स्वच्छ घासून चमकणारं पळीपंचपात्र, दिव्यांनी सजलेलं देवघर, फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा आघाडा फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन!!

श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण, भाजणीचे वडे, नारळी भात, नारळाच्या वडया, वालाचं बिरडं, गव्हाची खीर, हारोळ्याचे लाडू, भोपळयाचे घारगे, गाकर, पुरणाची पोळी, पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य.. श्रावण म्हणजे वेगवेेगळ्या चवींतून घरांत दरवळणारा गंध !!

श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, आईने मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण म्हणून आई वहीनीकडे झालेलं सौवाष्ण जेवण व मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर.. प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण !!

श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार.. श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं धुप अगरबत्ती दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट, गोकर्ण जाई जुई तगर जास्वंद बेल दुर्वा पत्री तुळस यांनी सजलेली पूजेची परडी. श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सडयाने नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं माझं आंगण !!

श्रावण म्हणजे हिरवा ऋतु .. या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे दिवस.. कांकणांची किणकीण, काचेचा चुडा, हातावरची मेंदी, जरी काठाच्या साड्या, केसांत जुईचा गजरा, पायी जोडव्यांचा आवाज, गळ्यांत मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर, कानांत कुड्या आणि पायांत पैंजण.. म्हणजेच घरातही भेटणारा, सजवणारा श्रावण !!

श्रावण म्हणजे आठवणींची सर.. श्रावण म्हणजे डोळे मिटतां केवड्याच्या पानाचा पसरलेला गंध तर कधी तिच्या चाहुलीने दरवळणारा सभोवताल... श्रावण म्हणजे नेमाने देवळांत जाणाऱ्या तिची आठवण करून देणारा सण तर कधी मंगळागौर उजवताना तिला दिलेल्या वाणाची एक गोड आठवण.. श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता तिनं केलेलं औक्षण, माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि तिने आग्रहानं खावू घातलेली पुरणाची मऊसूत पोळी.. श्रावण म्हणजे देव्हाऱ्यांत समईच्या मंद प्रकाशात दिसणारं तिचं प्रसन्न रूप.. श्रावण म्हणजे आई तुझ्या आठवणींचा पाऊस !!!

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
आधुनिक केसरी

भारदस्त आवाज, पेटी, तबला, ढोलकी वाजवण्याची कला यामुळे अण्णाभाऊ साठे लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध झाले त्यांची चित्रा कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली त्यांनी पोवाड्यातून सांगितलेले शिवचरित्र रशियन भाषेत भाषांतरित झाले जवळपास ३५ कादंबऱ्या १३ च्यावर कथासंग्रह बरीच लोकनाट्य लिहणारा, पोवाडे, लावण्या, वग गवळणी अशा लोकगीतांमधून स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रभर जनजागृती करणारा हा बहुमुखी कलावंत वयाच्या ४९ व्या वर्षी १८ जुलै १९६९ रोजी जगतास सोडून गेला. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी नमन.

सांगली जिल्ह्यातील वाटेगावच्या गावकुसाबाहेर मातंग समाजात जन्मलेल्या वयाच्या पंधरा-सोळा वर्षापर्यंत अक्षरओळखही नसणाऱ्या, किरकोळ शरीरयष्टी असलेल्या तुकाराम भाऊराव साठे नावाच्या सामान्य मुलाने असामान्य प्रतिभेच्या जोरावर आपल्या साहित्याची दखल सर्व साहित्य जगतास घेण्यास भाग पाडले.

वेठबिगारीतील अमानुष पिळवणूक भोगत, गिरणी कामगारांच्या हाल-अपेष्टा, शोषण सहन करताना गरिबीचा मार सोसत स्वतःच्या प्रचंड कर्तृत्वाने हा मुलगा अण्णाभाऊ साठे बनला. मराठी भाषेशिवाय कोणतीही भाषा माहीत नसताना त्यांच्या साहित्यकृतीची भाषांतरे भारताबाहेरील भाषांमध्ये केली जावीत, आठ कादंबऱ्यांवर चित्रपट निघावेत, फकीरा सारख्या बावनकशी कादंबरीच्या सोळा आवृत्ती निघाव्यात यातूनच त्यांच्या असामान्य प्रतिभेचे दर्शन होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला.

गावात दुष्काळ पडला असताना ११ वर्षाच्या आपल्या मुलासह भाऊराव आणि वालुबाई साठे काहीतरी काम मिळेल व पोटाला आधार मिळेल या आशेने पायी प्रवास करत मुंबईला पोहोचले. भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत निवाऱ्याला आल्यावर वडिलांच्या आग्रहामुळे तुकाराम शाळेत गेला पण मागासवर्गीयांना शाळेच्या आत बसायची परवानगी नसल्याने तो शाळेत रमला नाही. मुंबईत राहताना विविध राजकीय संघटना व मुक चित्रपटांकडे तो आकर्षित झाला. यापासूनच त्या मुलाचा तुकाराम ते अण्णाभाऊ साठे प्रवास सुरु झाला.

हळूहळू शाहिरी व कलापथकाच्या माध्यमातून इंग्रज सरकारविरुद्ध जनमानसात विद्रोह जागवण्याचे काम अण्णाभाऊंनी केले. त्यांच्या कला पथकावर ब्रिटिश सरकारने बंदी आणली होती समाज प्रबोधनासाठी विदर्भात आले असता त्यांना अटक करुन अमरावती येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. याच तुरुंगात त्यांनी 'गजाआडच्या कथा' हा कथासंग्रह पूर्ण केला स्वातंत्र्योत्तर काळात वीस हजार लोकांसह शिवाजी पार्कवर भर पावसात भव्य मोर्चा काढून 'ये आझादी झुठी है..देश कि जनता भुकी है' असे म्हणत भटके, वंचित, शेतकरी व दलितांच्या हक्कासाठी लढा दिला.

महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्रामात अण्णाभाऊंनी शाहिरीतून दिलेलं योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. डी. एन गवाणकर व अमर शेख या शाहिरांबरोबर त्यांनी १९४४ साली लालबावटा कलापथक स्थापन केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात 'माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतेय काहिली' या त्यांच्या गाजलेल्या लावणीने आंदोलकांना ऊर्जा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते. ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीत खूप गाजले. त्यांची ‘मुंबईची लावणी’ अजोड आणि अविस्मरणीय आहेत.

अंतर्बाह्य कम्युनिस्ट असणारे अण्णा मोर्चे काढणे वॉलपेंटिंग करणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे लोकगीते यांच्या माध्यमातून जागृती करणे यामुळे कम्युनिस्ट वर्तुळात सर्वांना हवेहवेसे होते. याच काळात त्यांचा आवाका वाढत गेला. ते लोकशाहीर म्हणून नावारूपास आले तरी त्यांचे अनेक पैलू होते. त्या काळात तमाशा वर बंदी असताना अण्णाभाऊंनी तमाशा चे अंतरंग बदलून टाकले.

प्रथम गणात

प्रथम मायभूच्या चरणा। छत्रपती शिवबा चरणा। स्मरोनी गातो कवणा।

म्हणत त्यांनी राष्ट्रप्रेमालाही तमाशातून साद घातली व तमाशाकडे बघण्याची नवी दृष्टी देत त्याचे लोकनाट्य असे नामकरण केले. छत्रपती शिवरायांचे चरित्र पोवाड्यातून रशियन जनतेला त्यांनी सांगितले. या पोवाड्याचे रशियन भाषेत भाषांतरही झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे प्रथम श्रेय अण्णाभाऊंना जाते.

१९६१ ला त्यांच्या 'वैजयंता' कादंबरीवर रेखा फिल्मने दिग्गज कलाकारांना घेऊन  सिनेमा काढला. एका कलावंतिणीचा मुलीची उपेक्षित तितक्याच तडफदार स्त्रीची व्यक्तिरेखा अण्णांनी यात रेखाटली. या सिनेमाने चित्रपटसृष्टीला एक दमदार लेख मिळाला नंतर त्यांच्या 'आवळी' कादंबरीवर 'टिळा लावते मी रक्ताचा', 'माकडीचा माळ' कादंबरी वर 'डोंगराची मैना', 'चिखलातले कमळ' कादंबरीवर 'मुरळी मल्हारी रायाची' हे चित्रपट निघाले. तीनही चित्रपट तुफान चालले. त्यांची सर्वाधिक गाजलेल्या 'फकिरा' कादंबरीवरसुद्धा सिनेमा निघाला. 'वारणेचा वाघ', 'अलगुज' कादंबरीवरील 'अशी ही सातार्‍याची तर्‍हा', 'चित्रा' त्यांच्या अशा आठ कादंबऱ्यांवर चित्रपट आले. कोवळ्या वयात दारिद्र्य सहन करत झोपडपट्टीतील बकालपणा सोसत जिद्दीने उभे राहत, पोवाड्यातून जनजागृती करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पर्यंतचा प्रवास केला. ग्रामीण व्यवस्थेचे चटके सहन करता त्यातून तावून सुलाखून निघाल्याने त्यांच्या कथा कादंबर्‍या कल्पकतेची गरज पडली नाही त्यांच्या लिखाणात अगदी सहजता आढळते कारण अण्णा भाऊंनी भोगले, पाहिले, अनुभवले तेच त्यांनी साहित्यात लिहिले. "ही पृथ्वी श्रमिक आणि दलितांच्या तळतावर तरलेली आहे" असे अण्णाभाऊ नेहमी सांगत.

लढवय्या माणसांचे चित्रण करणारा साहित्यिक : अण्णाभाऊ साठे
आधुनिक केसरी

काळ कोणताही असो, कलावंत, साहित्यिक  समकालीन समाजवास्तव आपल्या लेखणी-वाणीद्वारे  प्रतिबिंबित करीत असतात. अण्णाभाऊ तर वाङ्मयाला तिसरा डोळा मानणारा, उपेक्षित वर्गाची कहाणी आधोरेखित करणारा बिनीचा लेखक.  रूढार्थाने औपचारिक शिक्षण नसताना अनुभवाचे मोठे शिक्षण घेऊन  त्यांनी  अत्यंत प्रतिकूल स्थितीत विशिष्ट भूमिका घेवून लेखन केले. त्यांची तात्त्विक आणि वैचारिक बैठक पक्की होती. काबाडकष्ट करणाऱ्या वंचित वर्गाशी नाळ जुळलेली असल्याचे त्यांच्या लेखनातून स्पष्ट होते. कॉ. नाना पाटलांची कर्मभूमी असलेल्या मुंबईसारख्या महानगरीत शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर आदींच्या सहवासात त्यांचे व्यक्तित्व घडत गेले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्वतः ला झोकून देत त्यांनी सतत आपली भूमिका मांडली. १४ कथासंग्रह, ३५ कादंबऱ्या, १५ पोवाडे, १६ वगनाट्ये, ७ चित्रपट कथा, तीन नाटके, एक प्रवासवर्णन, एक शाहिरी पुस्त असे विपुल लेखन आज त्यांच्या नावावर आहे. अण्णाभाऊंच्या लेखनातून मांग, महार, भिल्ल, रामोशी, कोळी, माळी, साळी, जमीनदार, अल्पभूधारक, विनाभूधारक, ब्राम्हण, गुरव, मराठा, बेलदार, कुंभार, हटकर, कोल्हाटी, फासेपारधी, माकडवाले, फकीर, अलुतेदार, बलुतेदार आदी नायक म्हणून वाचकांसमोर येतात. मराठी सारस्वतात ही फार मोठी  क्रांतीच म्हणावी लागेल. कार्ल मार्क्स, व्लादिमीर लेनिन, मॅक्झिम  गॉर्कि आदींच्या कार्याने प्रेरित होऊन अण्णाभाऊंनी आपल्या लेखनाचा वारू सुसाट दौडविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान अंगिकारले. सामान्य, अतिसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांनी जसे आपले नायक चित्रित केले तशा नायिकाही केंद्रस्थानी ठेवून लेखन केले. अतिसामान्य माणसास प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पुरुषप्रधान वर्णनाबरोबरच स्त्रीप्रधान वर्णनही त्यांच्या कथा कादंबऱ्यातून दिसून येते. आवडी, चित्रा, आबी, वैजयंता, मंगला, रत्ना, सीता आदींसारख्या आदर्श नायिका उभ्या करण्याचे कसब त्यांच्यात होते. 'आवडी' ही कादंबरी तर तत्कालीन समीक्षक म्हणविल्या जाणाऱ्या प्राण्यांनी कमालीची उपेक्षित ठेवली, असेच म्हणावे लागेल. तसे आण्णाभाऊंचे एकुणच साहित्य अलक्षित राहिले, हेही तितकेच सत्य आहे.

समाजात चालू असलेल्या अनिष्ठ रूढी, परंपरांच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या साहित्यातील नायक - नायिका प्रयत्नशील असतात. ही पात्र अन्यायाची जाणीव होत असल्याने पेटून उठतात. बंडाची भाषा करतात. उदाहरणच घ्यायचे झाल्यास-

'चिखलातील कमळ' मधील मुरळीचे जीवन जगत असणारी  सीता. जिची आईही मुरळीच असते. ती सीता उद्गारते,

"(आई) तुझं खंडोबाशी लगीन लागलं. मग माझंही त्याच्याशीच कसं काय? स्वतः च्या मुलीशी कोण लगीन करते काय?"

सबंध व्यवस्थेला हा प्रश्न आहे. ज्याचे उत्तर कुणाकडेही नाही. अशा प्रकारच्या धर्म चिकित्सा करणाऱ्या अण्णाभाऊंच्या नायिका अभ्यासल्या, की त्यांची साहित्यिक उंची गगनाचा वेध घेणारी होती, याचा आपणास प्रत्यय येतो. 'फकिरा'मधील दुष्काळी स्थितीत अन्नासाठी मौताद असलेल्या अतिसामान्य जनास उभारी देताना विष्णुपंत कुलकर्णी म्हणतात,

"उकिरड्याचाही पांग फिटतो म्हणतात, तुम्ही तर माणसं आहात." एकूण गावगाड्याची काळजी वाहणारा  भला माणूस या पात्रातून दिसून येतो. फकिरा कादंबरी  वि. स. खांडेकरांची प्रस्तावना असणारी कलाकृती असून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेली आहे तर आपल्या गीतातून -

जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव ।धृ।

गुलामगिरीच्या या चिखलात रुतून बसला का

ऐरावत अंग झाडूनी ये बाहेरी घे बिनीवरती घाव।१।

धनवंतांनी अखंड पिळले धर्मांधांनी तसेच छळले

मगरांनी जणू माणिक गिळले चोर जाहले साव।२।

ठरवून आम्हा हीन कलंकीत जन्मोजन्मी करूनी अंकित

जिणे लावूनी वर अवमानित निर्मून हा भेदभाव।३।

एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चल बा पुढती

नव महाराष्ट्र निर्मून जगती करी प्रकट निजनाव।४।

जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव

हा मोलाचा संदेश ते समस्त भारतीयास देतात.

जटा निर्मूलनाची प्रबोधनात्मक चळवळ चालविणारे अण्णाभाऊ म्हणजे 'ग्रास रूट'वरील साहित्यिक- कार्यकर्ते. जोतिबा, बहिरोबा, खंडोबा, म्हसोबा, मरीआई, अंबाबाई आदी कुलदैवतांच्या जोखडातून बाहेर पडण्याचे आवाहन ते आपल्या लेखणीतून करतात. "पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कामगारांच्या तळहातावर तरली" असल्याचे निक्षून सांगणारा हा तत्ववेत्ता साहित्यिक. त्यांच्या लेखनात काल्पनिकता नाही. पिढ्यानुपिढ्याचे दुःख, दैन्य, कष्टकऱ्यांच्या वेदनांसह ग्रामजीवनाचे वास्तव मांडले  आहे.

असे असले तरीही त्यांनी कधी व्यथांचे भांडवल केले नाही.  आपले रडगाणे ते कधीही ऐकवत बसले नाहीत. त्यांनी उभी केलेली माणसं उदा. फकिरा, माकडवाला, खुळवाडीतला पिलाजी, निळू मांग, पिराजी, भीमा, यंकू आदी माणसं गावासाठी जिवावर उदार होऊन लढणारी धाडसी, स्वाभिमानी, बंडखोर, प्रामाणिक आणि क्रांतिकारी विचारांची आहेत.

चालू वर्ष  प्रबोधनाच्या चळवळीचे कंकण बांधणाऱ्या अण्णाभाऊंचे  जन्मशताब्दीवर्ष असल्याने आता तरी शासकीय पातळीवर किमान त्यांच्या साहित्यावर चर्चा, परिसंवाद, शासनाच्या पुढाकाराने त्यांच्या साहित्याची पुनर्छपाई अशासारख्या बाबींना प्राधान्य मिळेल , असे वाटले होते. या निमित्ताने अण्णाभाऊ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाने पुरता अपेक्षाभंग केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हणा अथवा अन्य कारणाने म्हणा, म्हणावा तसा उत्साह दिसून येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. केवळ 'पोस्टाच्या तिकिटावर अण्णाभाऊंचे चित्र' एवढे कार्य सोडल्यास शासनाने फार आस्थापूर्वक या विषयाकडे पाहिले, असे म्हणता येत नाही. आता आपणच समाज स्तरावर विविध उपक्रम राबवून अण्णाभाऊंचे स्वप्न साकार करू या.

जीवनानुभवांच्या कुशीत ज्यांचा, चित्रपट गीतांचा प्रवास प्रसवला । त्या बाबासाहेब सौदागरांच्या मिठीत, मला मैत्रीचा झरा गवसला ।।
आधुनिक केसरी

७८ मराठी चित्रपट आणि किमान दोन डझन मराठी मालिकांसाठी गीत लेखन करणारे, गीतकार बाबासाहेब सौदागर, यांनी फक्त प्राथमिक शाळेपर्यंतच शिक्षण घेतलंय, हे कुणाला सांगुनही पटणार नाही. मात्र, हेच सत्य आहे. हालअपेष्टांचं बालपण आणि संघर्षमय जीवन, यात शब्दांशी खेळत, गीतांशी नाळ जुळवत, त्यांनी जगणं सुसह्य आणि अनुभवांनी समृध्द केलं. त्यांनी जीवनानुभवांचं गाणं केलं. "गाणं" आपल्या जीवनात आलं नसतं, तर.... या जीवनाचं "रडगाणं" झालं असतं, असं ते म्हणतात. चित्रपटांसाठी अभंग, लावणी, प्रेमगीत, विरहीत, भावगीत, देशभक्तीपर गीत आणि आयटम साँग, अशी सर्वप्रकारची गीतं लिहत सौदागर यांनी, गीतलेखनात स्वतःचं नाव उभं केलं आहे. चित्रपटात गीत लेखनाची संधी मिळावी, यासाठी त्यांनी प्रचंड पायपीट केली. घरातील भांडीकुंडी विकली. बायकोचं मंगळसूत्रही मोडलं. लोक त्यांना वेड्यात काढत. मात्र, त्यांनी गीत लेखनाचं वेड, डोक्यातून काढलं नाही. शेवटी त्यांना "सत्ताधीश" चित्रपटासाठी गीत लेखनाची संधी मिळाली. आणि त्यांनी इतिहास घडवला. ते जगदिश खेबुळकरांच्या पावलावर पाऊल ठेवत, गीत लेखनातील "सत्ताधीश" झाले. अश्या या शब्दप्रभूची, अमळनेर येथील माझे मित्र, रमेश पवार यांच्या "गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ" काव्यसंग्रह प्रकाशनात भेट झाली. या भेटीत हा शब्दांचा किमयागार अक्षरशः शब्दमिठीत गवसला. उलगडत गेला आणि हृदयात घर करुन बसला. त्यांचं भेटणं अक्षय झालं. चिरंजीव झालं. कारण ही भेट शब्दांच्या किमयागारांची होती. माझ्या काही कविता फेसबुकवर वाचून, ते माझ्या गेय कवितांच्या प्रेमात पडले होते. आम्ही भेटीचं निमित्त शोधत होतो. तो क्षण आला आणि, अतरक्षण होवून आम्हा दोघांना सुगंधीत करुन गेला. एकमेकांपासून दूर झालोत तरी, शब्द दरवळाच्या बंधाने एकमेकांना बांधून गेला. प्रचंड दुःख भोगणार हा माणूस, चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही उमटू देत नाही. शब्दात कटूता येवू देत नाही. वागण्यातली रुजूता ढळू देत नाही, हेच त्यांचं मोठेपण. अशी माणसं समाजात वाढायला हवी हीच अपेक्षा.

एके रात्री माझा भ्रमणध्वनी वाजला. एका अनोळखी नंबरवरुन काॅल होता. मी उत्सुकतेने फोन घेतला. "प्रा. बी.एन.चौधरी बोलताय कां.?" मी हो म्हणालो. पलिकडून एक भारदस्त आवाज येत होता. "सर, आपण प्रोफाईलवर ठेवलेलं आईचं छायाचित्र मला खूप भावलं. आपलं मातृप्रेम समजलं. अनेक दिवसांपासून, मी तुमच्या कविता आवर्जून वाचतो. त्या मला खूप भावतात. त्यात गेयता आहे. भावनाविष्कार आहे. त्यांना सुंदर चाल लागू शकते. अशी गेय कविता हल्ली दुर्मिळ झाली आहे." अशी माझी आणि माझ्या कवितेची स्तुती पलिकडून होत होती. मी भारावून ऐकत होतो. जुजबी उत्तरं देत होतो. बराच वेळ आमचं बोलणं सुरु होतं. मी उत्सुकतेने विचारलं. आपण कोण बोलतायत. तिकडून उत्तर आलं, "मी गीतकार बाबासाहेब सौदागर बोलतोय." आणि मी चक्क उडालोच. मराठी चित्रपट सृष्टीतील एक सुप्रसिद्ध गीतकार म्हणून ज्यांचा लौकिक आहे, ते बाबासाहेब सौदागर माझ्याशी बोलत होते. यशाच्या शिखरावर उभं असतांना, इतकं विनम्र असणं, ही साधना आहे. ती मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. छोट्या मोठ्या यशाने, हवेत जाणारे. आपली स्वतःचीच भलामण करणारे आणि इतरांना तुच्छ लेखणारे या जगात, पायलीला पंधरा सापडतात. मात्र,स्वतः गीत लेखनातील दिग्गज असणारा हा माणूस, इतरांच्या कवितेला स्वतःहून दाद देत होता. रसिकतेने कौतुक करत होता. हा खरा कलावंत. हा खरा शब्दप्रभू. मला त्यांचा अभिमान तर वाटलाच. पण त्यांनी माझ्या हृदयात घर केलं. माझी एक कविता वाचून बाबासाहेबांनी मेसेंजरवर माझ्याकडून फोन नं घेतला होता. त्याची आठवण करुन देत त्यांनी निरोप घेतला. मी त्यांचा नंबर सेव्ह केला आणि आम्ही अक्षरमित्र झालो.

पुढे आम्ही अनेकदा बोललो. एकमेकांच्या वाॅलवर लिहिते झालो. कवितेचं गीत होण्यासाठी ती साधी, सुलभ, सहज उकलणारी आणि मनाचा ठाव घेणारी असावी असं बाबासाहेब मानतात. कवितेला अंगभूत गेयता असेल तर तिचं आपसूक गीत होतं, असं ते सांगतात. मराठीच्या प्राध्यापकांनी कवितेला दुर्बोध आणि कठीण करुन ठेवलीय, अशी मार्मिक टिप्पणी ते जाहीरपणे करतात. हे त्याच्या गीतातून आपल्याला उमगत जातं. त्यांनी लिहलेली अनेक गीतं रसिकांच्या मनावर आणि ओठावर राज्य करीत आहेत, ते यामुळेच. शब्दांवर त्यांचं असलेलं प्रभुत्व आणि समयसूचकता त्यांच्यातील गीतकाराला सक्षम बनवून आहे. ते एकाच बैठकीत एका चित्रपटासाठी मागणी निहाय, विषयानुरुप गीत लिहून देवू शकतात. गीतकार जगदिश खेबुडकर यांनी त्यांना आपलं उत्तराधिकारी मानलं यातच सर्व आलं. परिस्थितीने नाडलं. ज्यांना शिकवून सावरुन मोठं केलं त्या भावांकडूनही हात कोरडाच निघाला. नशिबाने सत्वपरिक्षा घेतली, तेव्हा यशाचा मार्ग सापडला ही त्यांची यशाची वाटचाल. मात्र, मागील अनुभवांचं कटूपण विसरुन, ओठांवर शब्दांची साखर पेरणी करणारे बाबासाहेब निर्मळ मनाचा, पारदर्शक माणूस आहे. अनेक वर्षांपासून संपर्कात असलेलो आम्ही, मित्र रमेश पवारांमुळे प्रत्यक्षात भेटलो. आणि, या भेटीत एकमेकांना अधिक जाणून घेता आले.

छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात रमेश पवार यांच्या कविता संग्रहाचे बाबासाहेब सौदागर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला मी संग्रहावर भाष्य करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो. या निमित्ताने मित्रवर्य डॉ. मिलिंद बागुल, चित्रकार राजू बाविस्कर, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी, डॉ. रमेश माने, संदीप घोरपडे, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सोनवणे, गोकूळ बागूल, राजेंद्र पारे आणि अनेक साहित्यिकांशी संवाद झाला. सौदागर यांनी आपल्या भाषणातून आणि संवादातून कवितेचा गीताकडे होणारा प्रवास यावर चपखल मार्गदर्शन केले. त्यातली खूबी सांगीतली. भविष्यातील संधीची कवाडं दाखविली. एखाद्या व्यक्तिचा दिसणं आणि असणं यात बऱ्याचदा खूप तफावत आढळते. मात्र, बाबासाहेब हे शब्दातून, बोलण्यातून जसे वाटले होते, त्याहून अधिक निर्मळ, निर्मोही आणि पारदर्शी प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवले. समोरासमोर आम्ही भेटलो, तेव्हा त्यांनी चक्क प्रेमाचं आलिंगन दिलं. ही स्नेहाची मिठी लहान-मोठंपण विसरायला लावणारी होती. माणूसपणावर, शब्दांवर प्रेम करायला शिकवणारी होती. या मिठीत मला मैत्रीचा झराच गवसला.

बाबासाहेब सौदागर यांचा जन्म सहा जून १९६५ रोजी, संगमनेर तालुक्यातील झरेकाठी या गावी झाला. घरात अठरा विश्व दारिद्र्य. वडील शेती व्यवस्थापन सांभाळणारे शेतीमास्तर. सतत फिरस्तीमुळे बाबासाहेबांचे शिक्षण फक्त प्राथमिक शाळेपुरतंच. मात्र, जीवनातील अनुभवातून त्यांनी शिकार शिक्षण घेतलं. बालपणातच त्यांना कनातीचे चित्रपट आणि तमाशा बघण्याचा वेड लागलं. घरी आजीच्या ओव्या सतत कानावर पडत असल्याने, आपसूक त्यांच्या मनामध्ये शब्द जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यातूनच त्यांच्या कविता लेखनाची सुरुवात झाली. चित्रपट बघतांना त्यात येणाऱ्या श्रेय नामावलीत ग दि माडगूळकर, जगदीश खेबुडकर, गल ठोकळ यांची नावं बघून, यांच्यासोबत आपलंही नाव यावं, असं स्वप्न त्यांनी बालवयातच पाहिलं होतं. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता.

त्यांची एकशे पाच वर्षे वयाची आजी, घरात सदैव ओव्या गात असे. नही पडला पाऊस/ नही झाली आबादानी /टाके कोरडा पोहरा/ नही वाहील गं पाणी/ खिऱ्या काकड्यांच्या वाड्या/ गेल्या जळून उन्हात/ पोटी पिकण्या आधी गं/ गेलं भुईच गं न्हाणं. या ओवीतून त्यांना लय सापडली. भाची सून गेली / काम सांगायची चोरी / गाऱ्हाणं करू कशी / सून परक्याची बरी/यातून त्यांना जगण्याकडे मिश्किलपणे बघण्याचं सूत्र सापडलं. या ओव्या त्यांच्या कानावर पडत राहिल्या आणि त्यांच्या काव्य जाणीवा घरातूनच समृद्ध होत गेल्या. बाबासाहेब येथूनच काव्य लेखनात रमले. त्यांना पहिली संधी दिली ते आकाशवाणीने. दत्ता हलसगीकर, शांताबाई शेळके यांनी त्यांना आकाशवाणी, दूरदर्शनवर संधी दिली. पुढे "सत्ताधीश" या चित्रपटासाठी त्यांना, सर्वप्रथम गीत लेखनाचे संधी दिली ती यशवंत भालकर यांनी. चित्रपटासाठी त्यांनी एक अभंग लिहिला होता. नीतिमत्तेची गाथा /चंद्रभागेत बुडाली / तुझ्या वाचून आम्हाला /कोणी नाही वाली. हे गीत जगदीश खेबुडकर यांनी पाहिले आणि त्यांनी बाबासाहेब सौदागर यांना आपला उत्तर अधिकारी म्हणून गौरविले. यानंतर बाबासाहेब सौदागर यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आतापर्यंत ७८ मराठी चित्रपटात गीतलेखन केले आहे. त्यात सत्ताधीश, झुंजार, सवत, झुंज एकाकी, सासरची का माहेरची, जयहिंद, धरणीआईची माया, धाव मन्या धाव, नातं मामा भाचीचं, बहीण माझी भाग्यवान, लग्नाची वरात लंडनच्या घरात, चंद्रभागा, टोपी घाला रे, मी सिंधुताई सपकाळ, मुलगा, अंकुर, लयी भन्नाट, सासर माझं दैवत, हळद तुझी कुंकू माझं, चंद्रपूरची देवी महाकाली, उमंग, रुद्रा, राजमाता जिजाऊ, आनंदाचे डोही, महामार्ग रेणुकेच, अंतर्दाह, गण गवळण झाली सुरु, विठाबाई नारायणगावकर, मध्यमवर्ग, शिवा, भंपर लाटरी. तुझा दुरावा, घुंगरांच्या नादात, निर्भया, गुंतले हृदय माझे या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या या गीतांना आशा भोसले उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, देवकी पंडित, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, बेला शिंदे, कैलास खेर आणि शंकर महादेवन यासारख्या दिग्गज गायकांनी स्वर दिला आहे. त्यांनी काही लोकप्रिय मालिकांसाठी गीत लेखन देखील केले आहे. ज्यात, आशा अभिलाषा, ईनमिन साडेतीन, ऋणानुबंध, चिमणी पाखरं, बंदीशाळा, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, क्रांतिसिंह नाना पाटील, शिवार गप्पा, विज्ञानाचा कल्पतरु यांचा समावेश आहे. त्यांनी गण गवळण झाली सुरू, घुंगरांच्या नादात, मी सिंधुताई सपकाळ, तुझा दुरावा, शिवा, सत्ताधीश या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या ५००हुन जास्त गीतांच्या ध्वनीमुद्रीका प्रकाशित झाल्या आहेत.

बाबासाहेब सौदागर यांची सांजगंध, पिवळण हे कविता संग्रह, भंडारभुल  हा कथासंग्रह, चित्ररंग हा चित्रपट गीतांचा संग्रह आणि पायपोळ हे आत्मचरित्र लोकप्रिय झाले आहेत. अनेक पुरस्कार,

आकाशवाणी, दुरदर्शनसाठी अनेक कार्यक्रम करुनही हा शब्दांचा पुजारी जमिनीवर पाय रोवून उभा आहे. माय-मातीशी नाळ टिकवून आहे. माणुसकीचा बंध बनवून, माणूस माणूस जोडत आहे. त्यांच्या या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची दखल घेवून त्यांना मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची मान मिळाला. शब्दगंध साहित्य संमेलनाचे पहीले अध्यक्ष पद त्यांच्याकडे चालत आले. जेष्ठ चित्रपट अभिनेते विक्रम गोखलेंनी त्यांची "दुसरी बाजू" या मुंबई दुरदर्शन वरील लोकप्रिय कार्यक्रमात एक तासाची मुलाखत घेतली होती.

बाबासाहेबांच्या जीवनात सहप्रवासी म्हणून आलेल्या सौ. कविता सौदागर या देखील कविता, गीत आणि गाणं यात रमणाऱ्या आहेत. त्या उत्तम संगीतकार असून स्वतः गातात. त्यांचा स्वतःचा "चित्ररंग" नावाचा कार्यक्रम त्या सादर करतात. नवनवीन कलावंत घडवतात. आतापर्यंत त्यांच्या तालमीत ५० वर कलावंत घडले असून, ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. त्यांचं संगमनेरला स्वतःचं "हिरवा चाफा" हे पैठणीचं दुकानही आहे, जेथे विविध प्रकारच्या उत्तमोत्तम पैठण्या मिळू शकतात. बाबासाहेबांच्या दोन्ही मुली एम. बी. बी. एस. एम. डी. डाॅक्टर असून, परदेशात आहेत. तर मुलगा-सून  स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सांभाळतात. अत्यंत गरीबित बालपण घालवलेले बाबासाहेब, आज खऱ्या अर्थाने यशस्वी, सुखी आणि समृध्द जीवन जगत आहेत. संकटांना शरण न जाता, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तर यश पदरात पाडून घेता येतं, हे बाबासाहेबांकडे पाहून सांगता येतं. अभंग, लावणी, प्रेमगीत, भावगीत, देशभक्तीपर गीत आणि आयटम साँग असे गीताचे सर्व प्रकार हाताळणारा हा शब्दांचा किमयागार, स्वतः अनेकांसाठी दीपस्तंभ झाला आहे. अपयशाचे हजारो प्रहार पचवून, दुःखाला तळघरात कोंडून, यशाचे हार मिरवणारे बाबासाहेब सौदागर ( ९२२६१८००३९/९५२७१९२९२५) यांची भेट, म्हणजे निखळ आनंदाच्या झऱ्याल्या भेटण्यासारखी ठरली. आशा, उत्साह आणि सकारात्मकता पेरणारं हे व्यक्तिमत्व, मला एक चालतं बोलतं प्रेरणास्त्रोतच वाटलं. त्यांच्या सोबत घालवलेले क्षण, अत्तर क्षण झाले. ज्यांचा दरवळ मला सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो.

टोकदार व्याज संवेदनशीलता
आधुनिक केसरी

भविष्याच्या पोटात काय दडले आहे सांगू शकत नाही आणि आपल्या मानगुटीवरून भूतकाळाचा वेताळ उतरवू शकत नाही. या दोन्हीच्या झगड्यातून प्रचंड ताण निर्माण होतो, जो आपला वर्तमान बिघडून टाकण्यास कारण ठरतो. या द्विध्रुवात्मक ताणातून वर्तमानाची गळचेपी होते. आणि जेव्हा गळचेपी होते तेव्हा वस्तू टोकदार बनतात. आजची आपली संवेदनशीलता अशी टोकदार बनण्यामागे याशिवाय दुसरे काय कारण असू शकते? सभ्यता, संस्कृती, प्रेम, सौहार्द, सहानुभूती, अनुकंपा, अनुराग, दिल, दोस्ती दुनियादारीच्या गदारोळात कस्पटासमान कुठल्या कुठे उडून जातात हे कळतही नाही.

माणूस संवेदनशील असणे चांगले, पण अट एकच. आपली संवेदना सकारात्मक, परस्पर सहकार्याची आणि मानवतेला ऊर्ध्वगामी नेणारी असावी. मनुष्यता उत्क्रांत झाली पाहिजे. अलीकडे मात्र आपण याच संवेदनशीलतेमुळे पश्चादगामी ठरतो आहोत, याचे भान कोणाला नाही. धर्म नामक वस्तूने माणसाचे जेवढे चांगले केले तेवढेच अहितही केले आहे. आजकालची व्याज संवेदनशीलता ही धर्माचीच देण आहे. आपापसात वैर करण्यास धर्म शिकवत नाही, ही कवी कल्पना म्हणून ठीक. परंतु जिथे चौकटी लादल्या जातात, सीमा आखून दिली जाते, तेथे पलीकडच्याबद्दल चौकटीतल्यांच्या मनात द्वेष असणार नाही तर दुसरे काय असणार? कारण माझा तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट ही भावना आपणांस उद्युक्त करते. आपण धर्म कविकल्पनांतून समजून घेऊ लागलो की बोंबाबोंब होणारच. धर्म आस्थेचा विषय असला तरी त्याचा आशय मात्र शुद्ध तत्त्वज्ञानानेच समजून घेणे इष्ट ठरेल. परंतु त्यात अडचण अशी की जगात नेहमी विचारापेक्षा सामान्य माणसास भावना प्रिय असल्याचे दिसते. म्हणूनच धर्मग्रंथातील कवणे भावनेला आवाहन करतात. अध्यात्म म्हणून जे काही तत्त्वज्ञान आलेले असते ते अत्यंत तुटपुंजे, धर्मभावनांचा परिपोष करणारे आणि निषेधात्मक स्वरूपाचे असते. हा निषेध सांस्कृतिक विविधतेचा असतो, व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा असतो तसेच सर्व प्रकारच्या विविधतेचा हा निषेध असतो. जगात कोणताही धर्म अस्तित्वात येण्याच्यापूर्वी संस्कृती होत्या. याच काळात विविध देवतांची निर्मिती झाली. सामूहिक देवता वेगळी आणि प्रत्येकाचे आराध्य वेगळे असू शकत होते. अगदी माया, सिंधू, सुमेरियन, ईजिप्शियन, चीनी या कोणत्याही संस्कृतीत ह्या काही सामायिक गोष्टी पहावयास मिळतात; परंतु जेव्हा धर्म म्हणून विशिष्ट चौकट अस्तित्वात आली तेव्हा व्यक्तीच्या व्यक्तिगत दैवत कल्पनेचे अपहरण करून समूहाची देवता हीच सर्वांची देवता, जिला भजणे, पुजने आणि गोंजारणे अनिवार्य झाले. यात वावगे काही आहे का? वरकरणी यात वावगे काहीच वाटणार नाही, पण आपण जन्माला येतो ते व्यक्ती म्हणून, समाजरूपाने आपला जन्म हे समाज-सांस्कृतिक घटित होय. स्टाईल इज मॅन हिमसेल्फ किंवा व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हणत असताना त्या व्यक्तीच्या व्यक्तित्वावर समूह दैवत कल्पनेने एक प्रकारे घाला घातला जात नाही का? हा मूळ प्रश्न आहे. आजची संवेदनशीलता धर्माधारीत असल्यामुळे धर्म वगळून चर्चा करणे वांझपणाचे ठरेल.

धर्म प्रामुख्याने धारणेवर विसंबून असल्यामुळे नवनवीन वैज्ञानिक शोधामुळे, तुलनात्मक अध्ययनामुळे आपल्या धारणा तुटतात. आपणांस त्रास होतो तो धारणा तुटण्यामुळे नव्हे तर ती धारणा आपली असते म्हणून. मन द्विधास्थितीत अडकते. मान्य अमान्यांच्या ताणातून, द्वंद्वात्मकतेतून संवेदनशीलता टोकदार बनते. तुलनात्मक विचार, वैज्ञानिक विचार नवीन असल्याने त्यावर पारंपरिक मन स्वार होते आहे, हे आपणास कळते. तरीही आपण परंपरेच्या हातातील खेळणे बनून राहतो, ही व्याज संवेदनशीलता होय. तार्किक, वैज्ञानिक अशा स्वरूपाचे कुठलेच अधिष्ठान आपल्या धारणेस नसणे आणि तरीही हेतूत: त्याचा पुरस्कार करून इतरांच्या संवेदनांचे दमन करणे, मारून टाकणे हे व्याज संवेदनशीलतेचे लक्षण होय. प्राणी जगतात सहजप्रवृत्ती विषयक संवेदना टोकदार असतात. माणसाने त्या आपल्यात तशाच शाबूत ठेवून त्यात आणखी भर घातली. पण माणसाने व्यापक व्यवस्था निर्माण करताना इतरांच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप करू नये, आपल्या संवेदनांचे टोक इतरांच्यात घुसू नये आणि संवेदनांतून स्वातंत्र्य अबाधित रहावे हा विचार त्यात अनूस्यूत असतो. जे.एस. मिल यांचा ऑन लिबर्टी, रसेलचे स्वातंत्र्य विषयक विचार, ओशो, नरहर कुरुंदकर यांचे तीन लेख याविषयीचे विचार हेच सांगतात की, स्वातंत्र्यात नैसर्गिक संवेदनांचा संकोच होऊन ते इतरांच्या स्वातंत्र्यास बाधा पोहचवणार नाहीत याची तजवीज केली जाते. दुसरे म्हणजे कोणापासून तरी स्वातंत्र्य आणि कशासाठी तरी स्वातंत्र्य या दोन गोष्टींचा विचार महत्त्वाचा ठरतो. कुरुंदकरांनी याचे फार छान विश्लेषण केले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य वाचावे. निव्वळ स्वातंत्र्य या शब्दास काही अर्थ प्राप्त होत नाही. तो शब्दयोगी अव्ययाचे काम करतो. संवेदनांचे स्वातंत्र्य हे धार्मिक, राजकीय, आर्थिक किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचे असू शकते. त्यामुळे एकाच काळातील, एकाच परिस्थितीतील आणि एकाच भावनेशी संबंधित संवेदना कोणाच्याही उन्नीस बीस स्वरूपात सारख्याच असणार, यात शंकाच नाही. तेव्हा पारस्परिक संवेदना जाचक ठरणार नाहीत याची काळजी केवळ समाजाने घेऊन भागणार नाही, तर प्रत्येक व्यक्तीने आणि प्रवृत्तीने घेतली पाहिजे. कारण व्याज संवेदनशीलता ही भस्मासुरासारखी असते. सुरुवातीला ती आपणास इतरांचे चिताभस्म पुरवते तेव्हा बरे वाटते पण आपल्या डोक्यावर कधी हात ठेवेल याचा काही नियम नसतो. तेव्हा अशा संवेदनशीलता जोपासताना आपल्यातील तार्किकता जागृत ठेवता आली तर उत्तम. आपण म्हणतो हा काळ संक्रमणकाळ आहे, पण तसे नसते. प्रत्येक काळ कमी अधिक प्रमाणात संक्रमणकाळच असतो. म्हणून काल आपण दक्ष होतो, आज दक्षता बाळगण्याची आवश्यकता नाही, असे म्हणता येणार नाही. एकूण मानव्याच्या कल्याणासाठी आपणास सातत्याने दक्ष असलेच पाहिजे.

बोंबाबोंब कशासाठी?

कोणत्या भावनांचा परिपोष करावा आणि कोणत्या भावना त्याज्य मानाव्या ह्याचे प्रशिक्षण स्वतःच्या मनालाच स्वतः दिले पाहिजे. धार्मिक पुस्तके वाचून व्याज संवेदनशीलता वाढत असेल तर त्यातून आपण काय घेतले पाहिजे, याचा सारासार विचार विवेकाने करून घेतला पाहिजे. भय, भूक, निद्रा, मैथून हे सर्व प्राण्यांत सारखेच. परंतु यापेक्षा माणूस म्हणून आपल्यात विवेक वाढला तर काही वेगळेपण शिल्लक राहील. अन्यतः प्राणीपातळीवर आपण सारखेच. ज्या संवेदनेमुळे इतरांचे अहित होईल, इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जाईल, त्या व्याज संवेदना समजून त्याज्य ठरवाव्या.

(लेखक गोदावरी कला महाविद्यालय अंबड येथे मराठीचे प्राध्यापक आहेत)

उद्बोधक, मनोरंजनक : 'हास्यविवेक'
आधुनिक केसरी

या पुस्तकातील व्यंगचित्रातून मेहेत्रे यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून अनेक राजकीय, सामाजिक विषयांना हात घातला आहे. अनेक समस्यांना वाचा फोड़ली आहे. समाजातल्या विसंगतीवर नेमकपणाने भाष्य केले आहे. पती- पत्नीमधील प्रसंग विनोदाने फुलवले आहेत.एकंदरीत सामान्यांच्या मनातील भावना , संवेदना टिपून ही व्यंगचित्रे त्यांनी चितारली आहेत. ही व्यंगचित्रे आपल्याला हसवतात आणि विचारप्रवृत्तही करतात.

गतकालीन/ समकालीन व्यक्ती-घटना-प्रसंगात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या अर्थाचा म्हणजे सूचितार्थाचा हास्यजनक मार्मिक आविष्कार करणारे चित्र म्हणजे व्यंगचित्र.

व्यंग्यचित्र सभोवतालच्या जीवनातील घडामोडींतील विसंगती नेमकी टिपून त्यावर भाष्य करते. समाजातील रूढ अपप्रवृत्ती, नेत्यांच्या बोलण्यातील आणि वागण्यातील विसंगती, अनेक प्रकारचे भ्रष्टाचार, परिस्थितीमुळे सामान्य माणसाची होणारी कोंडी यांचे मार्मिक दर्शन व्यंग्यचित्र घडवते आणि कधी थट्टामस्करी, तर कधी उपरोध-उपहास यांचा यथोचित उपयोग करून चित्ररसिकाचे प्रबोधन करते. योग्य काय, अयोग्य काय याचे त्याला भान आणून देते. त्याची खिलाडू वृत्ती आणि संवेदनक्षमता वाढवते. काही व्यंग्यचित्रे निखळ, निर्मळ हास्य निर्माण करतात; तर काही हसवताहसवता अंतर्मुख बनवतात. काही उघड संदेश देणारी असतात. व्यंग्यचित्र हे चित्र व शब्द यांचे संयुक्त माध्यम आहे.

मराठीमधील व्यंग्यचित्रकारांची नावे  या संदर्भात घ्यायची झाल्यास श्रीकांत ठाकरे, राज ठाकरे, मंगेश तेंडुलकर, मनोहर सप्रे, ज्ञानेश सोनार, विजय पराडकर, यशवंत सरदेसाई, प्रभाकर वाईरकर, विवेक म्हेत्रे, अभिमन्यू कुलकर्णी, रंगा, प्रभाकर झळके, प्रशांत कुलकर्णी आदींचा उल्लेख करावा लागेल. प्रारंभी दै. सकाळमधून व नंतर दै. लोकसत्तामधून’  प्रसिद्ध होणारी ‘चिंटू’ (चारुहास पंडित/प्रभाकर वाडेकर) ही चित्रपट्टी आणि राम वाईरकर, प्रताप मुळीक यांच्या ऐतिहासिक-पौराणिक कथांवरील व्यंग्यपुस्तिका लक्षणीय आहेत. आर. के. लक्ष्मण यांची मूळ इंग्रजीतून काढलेली व महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध होणारी व्यंग्यचित्रे दर्जेदार व लोकप्रिय ठरली आहेत.

लेखक , प्रकाशक, संपादक ,हास्य,  व्यंग्यचित्रकार , उत्तम वक्ते, मोटिवेशनल कोच विवेक मेहेत्रे यांनी विविध क्षेत्रे पादाक्रांत केलेली आहेत. विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. गेली ३९ वर्षे ते  व्यंगचित्र रेखाटत आहेत आणि त्यांचं हे सातत्य कमालीचे आहे. आतापर्यंत आपण व्यंगचित्र हे वर्तमानपत्राच्या पुरवणीमधून पाहत आलोय.  या व्यंगचित्रांचा संग्रह वाचायला मिळाला तर ?  हो मंडळी , विवेक मेहेत्रे यांचा 'हास्यविवेक' हा व्यंगचित्रसंग्रह म्हणजे एक वेगळेच आकर्षण आहे. चित्र  आणि शब्द यांच्या योग्य संयोजनातून त्यांनी व्यंगचित्राद्वारे सर्वसामान्यांच्या भावभावनांना व्यक्त केले आहे.

व्यंगचित्रातील रेखाटलेली पात्ररचना, पात्रांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि चित्राला समर्पक अशी वाक्यरचना त्यामुळे त्या एका वाक्यातून त्या विषयाची व्यापकता लक्षात येते. मेहेत्रे यांची कल्पनाशक्ती, आजुबाजुला घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, चौफेर वाचन, विनोदबुद्धी आणि सामाजिक भान, हजरजबाबीपणा या गुणवैशिष्टयांमुळे या पुस्तकातील व्यंगचित्रे अधिक प्रभावी ठरली आहेत.

या पुस्तकातील व्यंगचित्रातून मेहेत्रे यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून अनेक राजकीय, सामाजिक विषयांना हात घातला आहे. अनेक समस्यांना वाचा फोड़ली आहे. समाजातल्या विसंगतीवर नेमकपणाने भाष्य केले आहे. पती- पत्नीमधील प्रसंग विनोदाने फुलवले आहेत.एकंदरीत सामान्यांच्या मनातील भावना , संवेदना टिपून ही व्यंगचित्रे त्यांनी चितारली आहेत. ही व्यंगचित्रे आपल्याला हसवतात आणि विचारप्रवृत्तही करतात. नेमक्या शब्दांतून अचूक अर्थबोध करुन देण्याचं मेहेत्रे यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे.२०१८  साली त्यांनी अखिल भारतीय मराठी हास्य - व्यंगचित्र संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवलेले आहे.असे  हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून  रसिकांना  खळखळून हसवत राहतील , हे नक्की !

कविता , कथा ,कादंबरी या प्रकाराव्यतिरिक्त हा व्यंगचित्रांचा संग्रह नक्की वाचा म्हणजेच अनुभवा. आजुबाजुला दिसणाऱ्या छोट्या - छोट्या गोष्टींकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी या संग्रहातून मिळते.पुस्तकाचं शीर्षकही यथोचित आहे. या पुस्तकाला लेखक प्रा. भा. ल. महाबळ यांनी मार्मिक प्रस्तावना लिहिली आहे. खुशखुशीत शब्दरचना , विनोदी शैली आणि हास्यचित्रे यांचं सुरेख संगम म्हणजे 'हास्यविवेक' व्यंगचित्रसंग्रह होय.

आधुनिकतेच्या नावाखाली धर्म-संस्कार पायदळी तुडवणे योग्य नाही
आधुनिक केसरी

कुठल्याही नाते संबंधाला नैतिकतेचा आधार आणि धर्म  संस्काराचा पाया असला पाहिजे. तेंव्हा ते नाते संबंध टिकतील किंवा वृध्दींगत होतील. अन्यथा जेवढ्या लवकर नातेसंबंध निर्माण झाले तेवढ्याच लवकर ते  संपुष्टात देखिल येतिल. म्हणुन आधुनिकतेच्या नावाखाली धर्म-संस्काराला पायदळी तुडवून पुढे जाता कामा नये. धर्म, कुल, मर्यादा पालन करण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. आणि कुठल्याही मुल्यावर अमिषाला बळी न पडता भौतिक संसाधनांच्या आहारी न जाता आपले धर्म-संस्कार उल्लंघन होणार नाही याची दक्षता सध्याच्या तरूण पिढी सोबत समाजातील प्रत्येक घटकाने घेणे आवश्यक आहे.

आधुनिकतेच्या नावाखाली सध्याची तरूण पिढी खुप झपाट्याने बदलत आहे. हे सत्य नाकारता येणार नाही. याला सोशल नेटवर्क  बऱ्यापैकी जबाबदार आहे. आणि याचा पहिला आघात हा समाजव्यवस्थेचा पाया आधारस्तंभ असणाऱ्या धर्म-संस्कारावर होत आहे. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये फलनिष्पत्ती काय तर सरते शेवटी येणारे परिणाम हे संबंधीतांना व शेवटी समाजाला आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. आधुनिकता नक्कीच स्वीकारा यामध्ये काळानुरूप काही वावगं नाही. परंतु कुठपर्यंत स्वीकारावी याला एक मर्यादा आहे आणि ती  मर्यादा म्हणजे जिथं पर्यंत धर्म संस्काराचे उल्लंघन होणार नाही, पायमल्ली होणार नाही किंवा धर्म-संस्कार पायदळी तुडवले जाणार नाहीत. तिथपर्यंत आधुनिकतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी कुटुंब किंवा समाज यापैकी कोणालाही अडचण नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीत अनेक आधुनिकतेच्या नावाखाली धर्म संस्कार पायदळी तुडवून उल्लंघन करून झालेले प्रकार आपण सामाजिक वातावरणात पाहतोय. आणि त्याची फलनिष्पत्ती पण आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. हे पाहिल्यावर मग मात्र प्रश्न पडतो की, आपण कुठे चाललो आहेत. यावर मंथन-चिंतन करण्याची वेळ ही नक्कीच आली आहे.

आपल्या आजूबाजूला अनेक अप्रिय घटना घडामोडी घडत आहेत. ह्या घटना घडामोडी सर्वसाधारण नाहीत. ज्या घटना मधुन व्यक्तिगत नुकसान तर होतंच पण कुटुबांच आणि समाजाचे खुप मोठे नुकसान होते.या घटनांना आपण सध्या जरी अपवाद असलो तरी भविष्यात याचे लोन आपल्या दारापर्यंत येणार नाही याची शाश्वती कोणीही अधिकृतपणे देऊ शकत नाही. कारण आज जो सुपात आहे तो उद्या जात्यात असतो. म्हणून इतरांकडे पाहताना आपल्या वर अशी परिस्थिती ओढावु शकते. म्हणून प्रत्येकाने सजग आणि सावध होण्याची आवश्यकता आहे. आपण नेमकं कुठं कमी पडलो आहोत की आजकाल आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली मुलं-मुली रातोरात नवीन विश्व निर्माण करत आहेत. आणि निर्माण झालेलं हे विश्व अल्पावधीतच नाहिस पण होत आहे. आणि मग उरतो तो पश्चात्ताप पण या सगळ्यामध्ये महत्वाची बाब ही आहे की, धर्म-संस्कार आणि जीवनमूल्ये यांची जपणूक एवढी पोकळ झाली आहे का की, त्याच एवढ्या सहज उल्लंघन व्हावं..?  आपल्या आजुबाजूला किंवा आपल्या ओळखीच्या कोणी चुकीचे आचरण केले तर आपण पुर्वलक्षी प्रभावाने त्याच अनुकरण करतो. संस्कारहीन कार्याचे जणुकाही आपल्याला वंशपरंपरागत अधिकार प्राप्त आहेत. असंच काहीसं आपल्याला वाटत असतं आणि त्याने केले मी पण केले पाहिजे. हा न्युनगंड तिथपर्यंत कधी आपल्याला घेऊन जातो हे कळत पण नाही. मग मी कुठे कमी आहे या पोकळ भावनेतून आपण सुद्धा तसंच कार्य करतो. परंतु जेव्हा विषय संस्कारक्षम आचरणाचा असतो. तेंव्हा मात्र आपण दुरवरूनच फाटा मारतो. म्हणजे चांगली गोष्ट चांगली सवय सहजासहजी आपण स्वीकारत नाही.आणि वाईट किती लवकर झटपट स्वीकारतो. एकंदरीत काय तर कुठल्याही नाते संबंधाला नैतिकतेचा आधार आणि धर्म  संस्काराचा पाया असला पाहिजे. तेंव्हा ते नाते संबंध टिकतील किंवा वृध्दींगत होतील. अन्यथा जेवढ्या लवकर नातेसंबंध निर्माण झाले तेवढ्याच लवकर ते संपुष्टात देखिल येतिल. म्हणुन आधुनिकतेच्या नावाखाली धर्म-संस्काराला पायदळी तुडवून पुढे जाता कामा नये. धर्म, कुल, मर्यादा पालन करण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. आणि कुठल्याही मुल्यावर अमिषाला बळी न पडता भौतिक संसाधनांच्या आहारी न जाता आपले धर्म-संस्कार उल्लंघन होणार नाही याची दक्षता सध्याच्या तरूण पिढी सोबत समाजातील प्रत्येक घटकाने घेणे आवश्यक आहे.  तसेच या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन धर्म-संस्काराचे  महत्व तरूण पिढीला समजावलं पाहिजे. जेणेकरून भविष्यात असे अनर्थ होणार नाहीत.आणि यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची आवश्यकता आहे......!!