सण - उत्सव - Adhunik Kesari

बा विठ्ठला... बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
आधुनिक केसरी न्यूज

पंढरपूर : पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले.

आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी
श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे.  इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या सोबत तर वारकरी आलेच परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असे त्यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्या सोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करतांना नवी ऊर्जा मिळते. वारीने  खऱ्या अर्थाने  भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे असे सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगला आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्याने कुठेही अस्वच्छता पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारी सोबत हरित, पर्यावरण पूरक वारीदेखील झाली.  खऱ्या अर्थाने आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे तो या वारीमध्ये  प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.  राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती  महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने   व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रस्तावित केले. यामध्ये यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये शासन व जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी वर्ग समाधानी असून वारकऱ्यांची संख्या वाढली आहे व त्यावर योग्य नियंत्रण ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी  मु.पो. जातेगांव ता. नांदगांव जि. नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते महापुजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा  'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक - श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक १३, जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा. द्वितीय क्रमांक - श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक १९, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. तृतीय क्रमांक - श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक २३, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.

मकरसंक्रांत निमित्त पैठणला नाथ महाराज समाधी व आपेगावी माऊली मंदिरात पतंग,फुलांची आरास
आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण  : नवीन वर्षाच्या प्रारंभाला येणारा पहिला सण म्हणजे महिलांचा मकर संक्रांतीचा सण. या सणाचे औचित्य साधून पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी व श्रीक्षेत्र आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज जन्मस्थान  (ता. पैठण ) येथे फुले,पतंगानी मंदिर सजवण्यात आले. ओवसाण्यासाठी व दर्शनासाठी  महीलांची मोठी गर्दी होती
मकरसंक्रांतीच्या सणामुळे पैठण येथील नाथांच्या वाड्यातील मंदिर,नाथ महाराज समाधी मंदिर,आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज जन्मस्थळ मंदिरात सकाळपासून  तालुक्यातील अन्य भागातील सुवासिनी दर्शन, ओवासणे व हळदी कुंकुवासाठी गर्दी केली होती. मकर संक्रांती निमित्ताने महिलांनी एकमेकांना चुडासह अन्य विविध वस्तू व तिळगूळ देत पारंपरिक पध्दतीने मकरसंक्रांतीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला.

संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी घेतले राजुरेश्वरचे दर्शन; आठवडी बाजार संकष्टी एकत्र आल्याने वाहनांची तोबा गर्दी
आधुनिक केसरी न्यूज

प्रा. बाळासाहेब बोराडे

श्रीक्षेत्र राजूर: जालना जिल्ह्याचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र राजूर येथे संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी मनोभावे पूजा करून राजुरेश्वराचे दर्शन घेतले.मंदिर परिसर व गाभाऱ्यात मोठे प्रमाणात  गर्दी झाल्याने भाविकांना रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागले.मागील दोन दिवसापासून पावसाची रिपरिप चालू होती.संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मात्र पावसाने उघडीक दिल्याने भाविकांना दर्शन घेणे सुकर झाले.श्री'च्या सेवेकरींनी श्रमदानातून मोठे योगदान दिले. 300 महिला व 100 पुरुष सेवेकरींनी या सेवा कार्यात सहभाग नोंदवून मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी परिश्रम घेतले.मंदिराच्या पायथ्याशी पानफुलं,मिठाई, खेळणी,शोभेच्या वस्तू,दिवाळी सामग्रीची दुकाने थाटली होती.संस्थांने भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनोकामना पूर्ण होण्यासाठी भाविकांनी भक्तिभावाने राजुरेश्वराचे दर्शन घेतले.

आठवडी बाजार,संकष्टी एकत्र आल्याने वाहनांची तोबा गर्दी

राजुर येथे रविवारी आठवडी बाजार असतो. परिसरातील अनेक गावातील लोक बाजारासाठी राजूरात येतात.यावेळी बाजार व संकष्टी चतुर्थी एकत्र आल्याने वाहनांची तोबा गर्दी झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागली.वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस  प्रयत्न करत होते.

रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला

छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतुक कोंडी झाल्याने  वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.त्यादरम्यान एक ॲम्बुलन्स सायरन वाजवत आली. वाहनांची गर्दी पाहून रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव काळजीत पडला होता.परंतु वाहनधारकांनी तत्परता दाखवत रुग्णवाहिकेस रस्ता मोकळा करून देताच नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला.

जळगाव जामोद येथे शांततेत बाप्पाला निरोप...
आधुनिक केसरी न्यूज

सागर झनके

जळगाव जा : जळगाव शहरात वायलीवेस येथे १७ सप्टेंबर  रोजी झालेल्या गणेश मिरणुकी दरम्यान दोन गटात वादावादी  होऊन  तुफान दगडफेक  करण्यात आली. त्यामुळे जळगाव शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.अखेर आज पोलिसांच्या कडक बंदोबस्तात जळगाव शहरातील संपूर्ण गणेश मंडळाच्या मिरवणुका अगदी शांततेत पार पडल्या.काल ढोल ताशाच्या गजरात जळगाव  शहरात गणपतीबाप्पाची मिरवणुक सुरू होती.दरम्यान दोन गटात वादावादी  झाली.त्याचे रूपांतर  दगडफेकित झाले.दोन्ही गटाकडील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली.त्यामुळे पोलीसांना मनुष्यबळाचा वापर करावा लागला.त्यात मोठ्या प्रमाणावर चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून  दुचाकी गाड्यांचे ही नुकसान झाले.

मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने जळगाव शहरातील संपूर्ण गणेश मंडळांनी मिरवणूक जागेवरच थांबवून जोपर्यंत आरोपीस अटक करत नाही तोपर्यंत मिरवणूक काढणार नाही असा पवित्रा घेतला. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार विद्यमान संजय कुटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन गणेश मंडळांना भेट दिली.जोप्रयंत या घटनेस जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मिरवणूक काढली जाणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. अखेर दुसऱ्या दिवशी गणेश मंडळांना विश्वासात घेऊन पोलीस  बंदोबस्तात जळगाव शहरातून शांततेत मिरवणूक काढण्यात आली.

चकला बोरगाव येथे रंगला माऊलीच्या अश्वाचा पहीला रिंगण सोहळा
आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण  : संत ज्ञानेश्वर महाराजांची : पालखी सोहळा शनिवारी आषाढी वारीसाठी पैठणहून पंढरपूरकडे  मार्गस्थ झाला . या पालखीचा पहिला रिंगण सोहळा मंगळवारी दुपारी १२ वाजता चकला बोरगाव  (  जि . बिड ) येथे उत्साहात पार पडला . हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठविताना हजारो वारकऱ्यांनी विठुनामाचा गजर केला . संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यात तीन  रिंगण पार पडतात . त्यापैकी पालखीतील पहिले रिंगण  मंगळवारी  चकलख बोरगाव या गावात पार पडले . वारकरी संप्रदायात शेकडो वर्षापासून पालखीला रिंगण सोहळ्याची परंपरा आहे . वारीत चालून थकलेल्या वारकर्यांना या माऊलीच्या अश्वाच्या रिंगण सोहळ्यामुळे उर्जा मिळते हे तितकेच खरे आहे.

वारकऱ्यांची सेवा करणारे पंढरीचे 'वारीवीर'
आधुनिक केसरी न्यूज

पुणे : "ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन टाळ-मृदूंगाच्या नादात, विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे. पायी वारीत चालून थकलेल्या, शीणलेल्या वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरविण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. अथक परिश्रम घेऊन निःस्वार्थ मनोभावे वारकऱ्यांची सेवा करणारे आपण सर्वजण पंढरीचे 'वारीवीर' आहात," अशी भावना राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी केली.

सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी झाला.

यंदा १० सुसज्ज मोठ्या अँब्युलंस, पाच दुचाकी अँब्युलंस व ३०० हुन अधिक डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवकांची टीम देहभान हरपून काम करते. वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्यसेवा व आपत्कालीन सेवा पुरवली जाते. पुण्यापासून जेजुरीपर्यंत हा फिरता दवाखाना कार्यरत असेल. कविता हर्बल्स यांच्या वतीने ५० हजार बाम देण्यात आले आहेत.

सेनापती बापट रस्त्यावरील 'सिंबायोसिस'च्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, 'सिंबायोसिस'चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, विश्वस्त संजीवनी मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी नगरसेवक ऍड. अविनाश साळवे, परिवहन अधिकारी अनिल वळीव, अॅड. नीलेश निकम, अक्षय साळवे, डॉ. विजय सागर, बिशप स्कूलचे प्राचार्य शाईने मॅकफरसन, कन्हैयालाल खंडेलवाल आदी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, "गेल्या २४ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे. वारकर्‍यांच्या सेवेत विठ्ठल-रुक्मिणीचा आशिर्वाद असतो. स्वयंशिस्त असलेल्या या वारी सोहळ्यात सेवेची संधी ईश्वरभक्ती असते. या उपक्रमात आपल्याला काही मदत लागली, तर पुणे महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल."

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, "राज्यभरातून वारकरी आळंदी व देहूमध्ये दाखल झाले आहेत. पंढरीच्या दिशेने चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. परदेशातून, परप्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांना हा अनुभव समृद्ध करणारा असतो."

"वारकऱ्यांच्या सेवेचा हा उपक्रम २००१ मध्ये एका अँब्युलंसपासून सुरु झाला. ही वारकरी आरोग्यसेवा अव्याहतपणे शेकडो वर्ष चालेल, असा विश्वास देतो," असे ऍड. अविनाश साळवे प्रास्ताविकात सांगितले. सुधीर दरोडे यांनी आभार मानले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले माऊलींच्या पालखी रथाचे सारथ्य
आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण : टाळ, मृदंगाचा गजर आणि संत ज्ञानेश्वर माउलीचा जयघोष व असंख्य वारकरी, भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने  शनिवारी  29 रोजी सकाळी ८ वाजता श्रीक्षेञ अापेगांवहुन निघुन आगरनांदर येथे पहीला विसावा घेवुन दुपारी २ वा कुरणपिंपरी मार्गे  पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पाई पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी
खासदार डॉ.कल्याण काळे, यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेवून पालखी रथात ठेवुन पाई जाण्यार्या सर्वच वारकरी भाविकांना शुभेच्छा दिल्या.प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूर यांनी संस्थानच्या वतीने खासदार डॉ.कल्याण काळे यांचे शाल श्रीफळ देवुन सत्कार केला.
माजी आमदार संजय वाघचौरे, दत्तात्रय गोर्डे,रवींद्र काळे,भाऊसाहेब औटे,व्हॉ.चेअरमन प्रल्हाद औटे,प्रा.युवराज औटे,रामकाका औटे,माजी सरपंच अशोक औटे यांनी माऊली तसेच मातापिता पादुकाकाचे दर्शन घेतले.
माऊली पालखीच्या पहिल्या विसावा माऊली पेट्रोल पंप आपेगाव येथे संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपत्नीक  दर्शन घेत ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात फुगडीचा आनंद घेवून विण्याची सेवा करत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे सारथ्य करुन आनंद साजरा करत वारकरी भाविकांना शुभेच्छा देवुन आपेगाव येथील पालखी सोहळ्यास पंढरपुर कडे मार्गस्थ होताना निरोप दिला.त्यांच्या सोबत
तहसीलदार सारंग चव्हाण,मुख्याधिकारी संतोष आगळे,सौ.करूना दिलीप स्वामी,दिलीप बावस्कर,मंडळ अधिकारी चित्रा धाडेकर,अश्विनी शेळके,सह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक सोहळ्याचा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर जल्लोष
आधुनिक केसरी न्यूज

रायगड :  शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५१ वर्षारंभानिमित्त आज (२० जून) स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आयोजित  विविध कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभाग घेतला. स्वराज्यसंस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे, विचारांचे, पराक्रमाचे स्मरण करून स्वराज्य निर्मितीसाठी रक्त सांडणाऱ्या, जिवाची बाजी लावणाऱ्या सह्याद्रीच्या मावळ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्ण वंदन केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देशभरातील तमाम शिवप्रेमींना, शिवभक्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रती पंढरपूर श्रीक्षेत्र लोणी बु येथे सखाराम महाराज श्रीराम जन्मोत्सव साजरा
आधुनिक केसरी न्यूज

विनोद पाटील बोडखे

रिसोड : विदर्भातील प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र म्हणजे रिसोड तालुक्यातील श्रीक्षेत्र लोणी श्री संत सखाराम महाराज तसेच अखंड हिंदुस्थानाचे  दैवत असलेल्या प्रभू श्रीराम  यांच्या जन्मोत्सवानिमित्त सखाराम महाराज संस्थान लोणी बू येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आजच्या दिवशी संत सखाराम महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्ताने सकाळी 6 वाजता सखाराम महाराजांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी नऊ वाजता श्री सखाराम लीलामृत या ग्रंथाचे वाचन करण्यात आले तर नंतर नऊ वाजून पंधरा मिनिटांनी श्री सखाराम महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंचक्रोशितील महिला तसेच पुरुष भक्तगण हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित महिलांनी संत सखाराम महाराज जन्मोत्सवा निमित्ताने पाळणे गाऊन जन्मोत्सव साजरा केला.
त्या नंतर दहा ते बारा वाजेपर्यंत काल्याचे किर्तन होऊन ठीक बारा वाजता प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सव साजरा महाआरती होऊन साजरा करण्यात आला. यावेळी बँड पथकाने सुरेल असे गायन करत आपली कला सादर केली.तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला.लगेचच सखाराम महाराज संस्थांनचे वतीने मिष्ठान्न भोजनाची महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
सायंकाळी पाच वाजता दरम्यान संपूर्ण गावांमधून प्रभू श्रीराम तसेच संत सखाराम महाराज यांच्या प्रतिमा रथामध्ये ठेऊन ग्राम प्रदक्षिणा घालण्यात आली.ग्राम प्रदक्षिणा मार्गावर गावातील महिलांनी सुंदर अशी रांगोळीची आरास केली होती. अशा पद्धतीने लोणी बू येथे मोठ्या  हर्षोल्लासात संत सखाराम महाराज तसेच प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

नाथषष्ठी सोहळ्यास पुरातन रांजणात पाणी टाकून सुरूवात
आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण : फाल्गुन कृष्ण द्वितीयेला तुकाराम महाराज बिजेपासून नाथांच्या षष्टी सोहळा उत्सव  सुरू होतो. मग या दिवशी नाथ वंशज राजंणाची पूजाकरून पैठणातील ब्रम्हवृंद,नाथवंशज, नाथांवर श्रद्धा असणारे देशातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व यात सामील होतात तुकाराम बीजेच्या दिवशी नाथ  वंशजातील सुवासिनी स्त्री पहिल्यांदा त्या रांजणात पाणी भरते आणि पुढे हा रांजण भरण्याचा कार्यक्रम चालू होतो. कधी पहिल्या दिवशी तर कधी चौथ्या  दिवशी हा श्रीखंड्या ने पाणी भरलेला राजंन भरतो. हा भरलेला ओळखायचा कसा तर तिथे उत्सवा दरम्यान एका व्यक्तीची खास नेमणूक याच कामासाठी केलेली असते जेव्हा रांजण भरतो तेव्हा पाण्याला प्रचंड उसळी येऊन पाणी बाहेर पर्यंत उडते तेव्हा तिथे खास नेमणूक असल्याने मोठ्यांदा गजर करायचा "देवाचा रांजण भरला हो.."तेव्हा हजारो माणसं दर्शन घेत असतात. बुधवार दि,२७ रोजी दुपारी
नाथ वंशज रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते नांथाच्या वाड्यातील राजंनाची विधीवत पुजा करुन  मानाची पहीली घागर उल्काताई रघुनाथ  पालखीवाले यांच्या हस्ते रांजनात गोदावरीचे शुध्द जल टाकण्यात आले.  या पुजेचे पौराहित्य वे.शा.सं चंदशेखर उपाध्ये, रवींद्रगुरु साळजोशी, उत्तमगुरु सेवनकर, पोपट गुरु, प्रकाश नाईक यांनी केले. यावेळी ज्ञानेश महाराज पालखीवाले, योगेश महाराज पालखीवाले, रविंद्र पांडव,एश्वर्या पालखीवाले, अपूर्वा पालखीवाले, माधुरीताई पांडव, अथर्व पांडव, रेखाताई कुलकर्णी, श्रीकृष्ण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात विधिवत होळीचे पुजन
आधुनिक केसरी न्यूज

शिर्डी : जगाला श्रंध्दा व सबुरी व सर्व धर्म समभावाची    शिकवण देणा-या  साईबाबाच्या साई मंदिरात  साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने   शिर्डीच्‍या श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर होळी पेटविण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ. ज्‍योती हुलवळे यांच्‍या हस्‍ते होळीची विधीवत पुजा करण्‍यात आली
होळी निमित्ताने साई मंदिर परीसरात  हि होळी पेटवण्यात आली धार्मिक कार्यक्रम बघण्यासाठी साईभक्त  भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी संस्‍थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी 'स्वराज्य सर्किट'ची निर्मिती करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आधुनिक केसरी न्यूज

आग्रा : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’; ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ज्या आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान डिवचला गेला त्याच आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटामाटात साजरी होणे हा रोमांचकारी क्षण असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी ‘ज्योतिर्लिंग सर्किट’च्या धर्तीवर ‘स्वराज्य सर्किट’ची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. स्वराज्य सर्किटची निर्मिती करावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी याच शिवजयंती सोहळ्यात बोलताना केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी लगेच प्रतिसाद देत, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्याची ग्वाही दिली.

आग्रा किल्ल्यात दरवर्षी उत्साहात शिवजयंती साजरी होईल

सलग दुसऱ्या वर्षी आग्रा येथे शिवजयंती साजरी होत असल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आणि आग्रा किल्ल्यात दरवर्षी अशीच उत्साहात शिवजयंती साजरी होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या शिवजयंतीचे आयोजन केल्याबद्दल  अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.

या शिवजयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस. पी. बघेल, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, दिग्दर्शक प्रवीण तरडे, मंगेश देसाई सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांनी  शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवावा

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर देशाचा इतिहास आणि भूगोल बदलला गेला असता. काही लोक जाती धर्मात तेढ निर्माण करत आहेत, त्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवावा असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात  पाऊल ठेवले ती ठिकाणे जोडणारी स्वराज्य रेल्वे सुरू करण्याचा मानसही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले की छत्रपती शिवराय म्हणजे हजारो सूर्यांची ताकद आहे. त्यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी दांडपट्टा या शस्त्राला 'राज्यशस्त्र' म्हणून मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. दांडपट्टा पूजनही यावेळी करण्यात आले.

अशा जयंती सोहळ्यांमधून शिवाजी महाराजांप्रमाणेच पराक्रम गाजवण्याची प्रेरणा आपल्याला मिळते असे सांगत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री बघेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

शिवजयंती सोहळ्यात बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले,
ज्योतिर्लिंग सर्किट तयार केले तसे स्वराज्य सर्किट करावे व गड किल्ले जोडावे. महाराज फक्त राज्यापुरते नव्हते तर देशासाठी होते म्हणून महाराजांचे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

आग्रा किल्ल्याबाहेरही हजारो शिवभक्तांनी हा सोहळा एलईडी स्क्रीनवर लाईव्ह पाहिला. अजिंक्य देवगिरी फाउंडेशन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

सर्व पाहुण्यांचे स्वागत, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले व आग्रा येथे शिवजयंती सोहळा आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आदर्श असून त्यांनी ज्या ठिकाणी आपला स्वाभिमान दाखवला, औरंगजेबाच्या समोर झुकले नाहीत त्याच आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करून मानवंदना देण्यासाठी शिवजयंतीचे आयोजन केले असल्याचे पाटील म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण भारतातून शिवभक्त या शिवजयंतीसाठी आग्र्यात दाखल झाले होते.

दीप प्रज्वलनाने शिवजयंती सोहळ्याला सुरुवात झाली. सरकटे बंधूंनी महाराष्ट्र गीत, छत्रपती शिवाजी महाराज गीत सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा पराक्रमावर लेझर शो, सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. 'महाराष्ट्र राज्याचे चलन' या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले.
या शिवजयंती सोहळ्याला शिवप्रेमींनी अतिशय उत्साही प्रतिसाद दिला. शिवछत्रपतींचा जयजयकार संपूर्ण आग्रा किल्ल्यात दुमदुमला.