लेख - Adhunik Kesari

लोकशिक्षणाचे विद्यापीठ: संत गाडगेबाबा
आधुनिक केसरी न्यूज

महाराष्ट्रात "गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला..." असे भजन कीर्तन करीत जनजागृतीचे महत्वपूर्ण कार्य करणारे आणि विज्ञाननिष्ठ समाजासाठी प्रबोधनाचा जागर करणारे संत गाडगेबाबा खऱ्या अर्थाने लोकशिक्षणाचे विद्यापीठ होते. जवळपास पन्नास वर्ष महाराष्ट्रात अंधश्रद्धेवर काम करणाऱ्या या संतांने समाजाला समजेल या भाषेत भजन कीर्तन करून महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत एक लोकशिक्षकाची खंबीर भूमिका निभावणारे ते प्रतिभावंत म्हणून नावारूपास आलेले होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील शेंडगाव (अमरावती) येथे दि. 23 फेब्रुवारी 1836 रोजी झाला.  त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांनी आपले जीवन स्वच्छतेचा प्रसार आणि सामाजिक न्याय यासाठी शेवटपर्यंत घालवले.

समाजप्रबोधनाचा ध्यास घेतलेल्या बाबांनी आपले संपूर्ण जीवन बहुजन समाजाच्या उध्दारासाठी व्यतीत करताना माणुसकीचा एक नवा विचार दिला.  गाडगेबाबा स्वतः अशिक्षित असतानाही शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ते सातत्याने सांगायचे. सोबतच समाजातील अंधश्रध्दा, बुवाबाजी आणि दांभिकतेवर कीर्तनातून सडेतोड बोलत जायचे.  म्हणूनच त्यांचे विचार समाजप्रबोधनासाठी प्ररेक राहिले. त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी एक साधा, सरळ विचार देताना एकप्रकारे लोकसेवकाची भूमिका बजावण्याचे कार्य केले ते अफलातून राहिले.  त्यासाठी स्वतःच्या संसाराकडे त्यांनी पाठ फिरवली.  ते कायम फकीर राहिले. आणि त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक अद्वितीय सामाजिक भान देणारे व्यक्तिमत्व मिळाले. एक अशिक्षित व्यक्ती आणि संत विज्ञानावादी विचारातून
समाजप्रबोधन करीत राहतो यातून समाजाला एक ऐतिहासिक दृष्टी लाभत जाते.  यातून मानवता धर्माची पताका सतत फडकत राहते.    स्वच्छतेचा मूलमंत्र मनामनांत रुजविण्यासाठी गाडगेबाबांनी जी साधना केली त्याचे मूल्यमापन करताच येत नाही. कारण ते समाजासाठी तावूनसुलाखून निघालेले एक विलक्षण संत होते.  लोकांच्या समस्यांचे निरीक्षण करण्याची एक अदूभूत शक्ती त्यांना लाभली.  माणसेच माणसांचे शोषण करतात हे त्यांना चांगलेच कळले होते. म्हणून या विषयावर ते कीर्तनातून प्रहार करायचे तेव्हा लोकांनाही ते विचार पटत असायचे. त्या काळात महाराष्ट्रात अवघड कर्मकांड, अघोरी अंधश्रध्दा यांचे पेव फूटले होते. यात समाज भरडला जात होता. तेव्हा ग्रंथ, पोथ्या, आणि  अघोरी अंधश्रध्दा यावर जोरकस प्रहार करत एक ज्ञानप्रसार करण्याचे कार्य केले महत ठरले.

जनमानसात भजन करताना ते नेहमी म्हणायचे,
" बाबांनो देव मंदिरात नाही आणि मूर्तीत नाही, तर माणसांत आहे.,भूक लागलेल्या जीवाला अन्न द्या, अडाणी माणसांना ज्ञान द्या, येथेच परमेश्वर आहे..." गाडगेबाबांचे हे आवाहन त्याकाळी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरले  होते. ते नवस या विषयावर देखील कडाडून विरोध करायचे. नवसासाठी मुक्या कोंबड्या बक-यांचा बळी दिल्याने माणूस कधीच सुखी होणार नाही हे आतून व्यक्त होत सांगायचे. ते जेथे जातील तेथे त्यांनी सहज सोप्या भाषेचा वापर आणि विविध संतांचे छोटे छोटे विचार देत आपल्या कीर्तनातून सामाजिक जनजागृती करायचे. समाजाला आपल्या कीर्तनातून संदेश देणाऱ्या गाडगेबाबांचे
एकूणच सामाजिक कार्य दखल घेण्यासारखेच राहिले. त्यांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले.

- बाळासाहेब जोगदंड
-  छ.संभाजीनगर
- मोबाईल-9423051246

महालक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ
आधुनिक केसरी न्यूज

ज्येष्ठा गौरी आवाहन हा गणपतीमध्येच अतिशय धूमधडाक्यात साजरा होणारा उत्सव आहे. या उत्सवामध्ये गौरीची पूजा केली जाते. तसे पाहिले तर स्कंदपुराण, मार्कंडेय पुराण, पद्मपुराण, देवीभागवत या सर्वच ग्रंथांमध्ये देवीची उपासना सांगितलेली आहे. कधी तिला आद्यशक्ती म्हटलेले आहे, कधी राक्षसांचा संहार करणारी म्हणून तिचे पूजन केलेले आहे, तर कधी धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती देणारी महालक्ष्मी म्हणून तिचे पूजन केलेले आहे.

आपल्या सनातन धर्मामध्ये पुरुष देवता आणि स्त्री देवता असा काही भेदभाव नाही. पूर्वी साधारणतः शंकर, विष्णू, देवी, सूर्य आणि गणपती या देवतांची सर्व पूजा केली जायची. वैष्णव हे विष्णूला प्रमुख देवता मानायचे आणि इतर सर्वांचीही पूजा करायचे. शैव शंकराला प्रमुख देवता मानायचे आणि इतर सर्वांचीही पूजा करायचे. त्याचप्रमाणे काही लोक देवीला प्रमुख देवता मानायचे, तर काही सूर्याला, तर काही गणपतीला. परंतु इतर सर्व देवतांची पूजा केली जायची.

ज्येष्ठा गौरी हे सुद्धा देवीचे स्वरूप आहे. देवीचीच ती पूजा आहे. ही धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती देणारी महालक्ष्मी आहे. आपला समाज प्रामुख्याने गृहस्थाश्रमी समाज आहे. गृहस्थाश्रमी माणसाला नेहमीच त्याच्या परिवाराची, मुलाबाळांच्या भविष्याची चिंता असते. त्यामुळे “आज माझ्याजवळ जी सुख-संपदा आहे ती भविष्यातही कायम राहील की नाही?” ही चिंता त्याला नेहमी सतावत असते.

त्याला वाटते की ही सुखसंपत्ती माझ्या आयुष्यापर्यंत तर राहिलीच पाहिजे, पण माझ्या मुलांनाही कशाची कमतरता पडू नये. ज्यांच्याजवळ आज धन-धान्य, ऐश्वर्य, संपत्तीची कमतरता आहे, त्यांना वाटते की आमच्या जीवनात जरी कमतरता आजपर्यंत राहिलेली असली तरी उद्या ती राहू नये, आणि मुलांच्या जीवनात तर अजिबातच राहू नये. त्यामुळे हा समाज विविध निमित्ताने महालक्ष्मीची पूजा करीत असतो. ज्येष्ठा गौरी आवाहन हे  महालक्ष्मीचेच आवाहन आहे.

आपल्या धर्मामध्ये लक्ष्मी आणि अलक्ष्मी अशी दोन रूपे सांगितलेली आहेत. परंतु सात्विक समाज हा फक्त लक्ष्मीची पूजा करतो. अलक्ष्मीला चांगले म्हटले गेलेले नाही. आज आपल्या समाजामध्ये काळा पैसा आहे, तो अलक्ष्मीचे स्वरूप आहे, असे मानले गेलेले आहे. या अलक्ष्मीमुळे कधीही सुखशांती येत नाही.
आज आपण समाजामध्ये रोज निरनिराळे घोटाळे उघडकीस येताना पाहतो. एखादा मोठा राजनेता त्याचे आयुष्य खूप मोठ्या ऐश्वर्यात गेलेले असते, पण त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याला तुरुंगात जावे लागते. हा अलक्ष्मीचा परिणाम आहे. मोठ्या प्रमाणावर अलक्ष्मीची साधना करून भरपूर काळा पैसा जमवणाऱ्या लोकांना सतत हा पैसा पांढरा कसा करता येईल याची चिंता लागलेली असते. ज्यावेळी नोटबंदी झाली, त्यावेळी बँकेत विचारले जायचे की “हे पैसे कुठून आणलेत? याचा उगम काय?” त्यावेळी तो स्रोत सांगावा लागायचा. त्यामुळे अनेकांनी घरी पोत्यांमध्ये भरून ठेवलेले पैसे शेवटी पेटवून दिले, तर काहींनी ते उकिरड्यावर फेकले. तात्पर्य काय? अशांच्या जीवनात चिंता ही लागूनच राहते. चिंता हे अनेक रोगांचे कारण असते. त्यामुळे आयुष्यभर असा पैसा सांभाळणाऱ्या लोकांना अनेक शारीरिक व्याधी चिकटतात. इतिहास आपल्याला सांगतो की, ज्यांनी लोकांकडून लुबाडलेला पैसा गोळा केला, त्यांचा अंत त्या पैशाच्या राशीकडे पाहता-पाहता झालेला आहे. मग तो महंमद गजनी असो, अल्लाउद्दीन खिलजी असो किंवा आजचे सत्ताधीश आणि अब्जाधीश असोत.
श्रीमंत असणे, वैभवसंपन्न असणे हे चांगलेच आहे. अनेक मोठे व्यापारी अगदी चिकाटीने आपला व्यवसाय करतात व हळूहळू मोठी संपत्ती तयार करतात. अशा लोकांबद्दल समाजालाही आदर असतो. आणि असे लोक समाजासाठी मुक्तहस्ते खर्च करण्यामध्येही मागेपुढे पाहत नाहीत.

मागे मी एक लेख वाचला होता. त्यामध्ये सारांश असा होता की बिल गेट्स जगातील इतका श्रीमंत माणूस आहे, तो तर महालक्ष्मीची पूजा करत नाही, मग त्याच्याकडे एवढी लक्ष्मी कशी आहे? अनेक वेळा मोठमोठे लोक खूप छोटे प्रश्न विचारतात.
अमेरिकेमध्ये राहणारा माणूस “अमेरिका माता” म्हणत नाही, जपानमध्ये राहणारा माणूस “जपान माता” म्हणत नाही. पण भारतामध्ये राहणारा माणूस मात्र भारताला भारत माता म्हणतो. भारतामध्ये राहणारा माणूस हा भारतमातेचे देवीस्वरूपात दर्शन घेतो, तिची पूजा करतो. मूळ वंदे मातरम् मध्येही दुर्गेचे वर्णन आहे “त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी ” असे म्हटलेले आहे. त्यामुळे हा पाश्चिमात्य आणि भारतीय दृष्टिकोनाचा फरक आहे.

आपण नेहमीच आपल्यापेक्षा उच्च आदर्शांकडे पाहिले पाहिजे. पोट तर पशू सुद्धा भरतात, परंतु पशू जसे खातात तसे आपण खात नाही. पशू जसे राहतात तसे आपण राहत नाही. ज्या गोष्टी बिल गेट्सला आपल्यापेक्षा चांगल्या येतात त्या त्याच्याकडून शिकाव्यात, आणि ज्या गोष्टी आपल्याकडे चांगल्या आहेत त्या त्यालाही दिल्या पाहिजेत. जो माणूस व्यवसाय करतो त्याच्याकडे पैसे हे येणारच आहेत. तो बिल गेट्स असेल, नाहीतर अंबानी असेल. परंतु मानवीय सभ्यतेचा उगम आपल्या देशात फार पूर्वी झाला आहे. आपल्या देशातील ऋषीमुनींनी, महापुरुषांनी सर्वसामान्य माणसाला जीवन कसे जगावे हे सांगितले आहे. जीवनामध्ये पैशाचे महत्त्व आहे, तो फार महत्त्वाचा आहे. परंतु तरीही जीवनामध्ये तो असेल किंवा नसेल, तरी माणसाने आपली सचोटी आणि प्रामाणिकता सोडू नये.

वाल्या कोळी नावाचा एक दरोडेखोर होता. तो दरोडे टाकून, लूटमार करून पैसे मिळवित असे. देवर्षी नारदांनी त्याला विचारले  “तू असे काम का करतोस? कामधंदा करून पैसे का मिळवत नाहीस?” त्यावर तो म्हणाला “हाच माझा व्यवसाय आहे.”
मग नारद म्हणाले  “लोकांना लुबाडणे हे पाप आहे. मग असे का करतोस?” त्यावर वाल्या म्हणाला – “माझे कुटुंब चालविण्यासाठी मला पैशांची आवश्यकता आहे म्हणून मी हे करतो.”
तेव्हा नारद म्हणाले – “ज्यांच्यासाठी हे पाप करतोस त्यांना विचारून पाहा की ते तुझ्या पापाचे वाटेकरी होतील का?”
वाल्या जाऊन पत्नीला आणि मुलांना विचारतो – “मी जे पैसे घरी आणतो त्यावर आपले घर चालते. ज्या वेळी मी पैसे आणतो, त्या वेळी तुम्हाला खूप आनंद होतो. पण मला आत्ताच एका साधूने सांगितले की अशा प्रकारे पैसे कमावले तर पाप लागते. त्यामुळे तुम्ही माझ्या पापाचे वाटेकरी आहात का?”
त्यावर पत्नी आणि मुलं म्हणाली  “आमच्यासाठी पैसे कमवून आणणे आणि आमचे पोट भरणे हे तुमचे कर्तव्य आहे. पण आम्ही तुमच्या पापाचे वाटेकरी होणार नाही, कारण आम्ही तुम्हाला या प्रकारे पैसे कमवून आणा असे सांगितलेले नाही.”
हे भारतीय दर्शन आहे. हा भारतीयांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. मिळेल ते खाऊन पोट तर जनावरं सुद्धा भरतात, पण पोट कसे भरले पाहिजे हे आपल्या ऋषीमुनींनी, साधुसंतांनी, महापुरुषांनी सांगितलेले आहे. मनुष्य कधीतरी पशू होता असे म्हणतात. पण पशुत्वाकडून त्याने मनुष्यत्वाकडे प्रवास सुरू केला. काही मनुष्य मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे गेले. आणि असे श्रेष्ठ पुरुष आपल्या समाजाला मार्गदर्शन करत गेले.

समाजमाध्यमावर एक व्हिडिओ पाहिला होता. त्यामध्ये म्हटले होते – “Your mind can control your money.” तुमचे मन तुमच्याकडे येणाऱ्या पैशाला नियंत्रित करू शकते. आपण जर सतत असा विचार करत राहिलो की “माझ्याकडे हे नाही, ते नाही, मी दरिद्री आहे”, तर जगातील दारिद्र्य आपल्याकडे खेचले जाईल.
आकर्षणाचा नियम सुद्धा हेच सांगतो. ज्येष्ठा गौरीचे आवाहन करणे म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी माझ्या घरी आलेली आहे. “मला आता यापुढे काही कमी पडणार नाही. महालक्ष्मीचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या परिवारावर सदैव आहे आणि राहील”अशा पद्धतीचा विचार जर आपण केला, तर आकर्षणाचा सिद्धांत आपल्या मदतीला नक्कीच येईल आणि आपल्या घरात समृद्धी येईलच.
ज्येष्ठा गौरीचे आवाहन हे लक्ष्मीचे आवाहन आहे. महालक्ष्मी आमच्या घरात नित्य वास करते. पण त्या लक्ष्मीचे आवाहन करून तिची पूजा करण्याचा हा दिवस आहे.

ज्याप्रमाणे माहेरी आलेल्या मुलीची आपण खूपच काळजी घेतो, तिला मनाप्रमाणे व प्रसन्न राहता येईल असे पाहतो, तिला जे आवडते ते सर्व काही करतो, त्याप्रमाणेच ज्येष्ठा गौरीचे आवाहन म्हणजे आमच्या जीवनाला लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता करणारी महालक्ष्मी. तिचे आवाहन व पूजन करण्याचा हा दिवस आहे.
या महालक्ष्मीचा वास आमच्या घरात नित्य राहावा, आमच्या देशातही ही महालक्ष्मी स्थिर राहावी यासाठी महालक्ष्मीची पूजा आणि तिच्यासाठी प्रत्येकाने वर्षभर चांगले प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी समाजाने स्वदेशीची कास धरणे पण आवश्यक आहे. असे झाल्यास भारत परमवैभवशाली होईल आणि ज्येष्ठा गौरीचे आवाहनही सफल होईल.

अमोल पुसदकर
सुप्रसिद्ध वक्ता व लेखक
955 25 35 813

पोकळी असलेल्या झाडांना संरक्षीत झाडांचा दर्जा द्यावा..!
आधुनिक केसरी न्यूज

पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ

भारतीय राखी धनेशच्या विणीसाठी झाडात पोकळी असलेली झाडे वाचवणे आपले कर्तव्य आहे.ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका यांनी पोकळी असलेली झाडांचा शोध घेऊन ती संरक्षीत केली पाहिजेत.

भारतीय राखी धनेश आणि त्यांच्या घरट्याचे रक्षण.

भारतीय राखी धनेश (Indian Grey Hornbill) हा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः जळगावसारख्या ठिकाणी आढळणारा एक सुंदर आणि महत्त्वाचा पक्षी आहे. या पक्षाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे घरटे बांधण्याची पद्धत. धनेश पक्षी आपली घरटी झाडांच्या नैसर्गिक पोकळीत बनवतो. ही पोकळी त्यांच्या प्रजनन आणि पिल्लांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. दुर्दैवाने, शहरीकरण, जंगलतोड आणि जुनी झाडे तोडल्यामुळे या पोकळी असलेल्या झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, ज्यामुळे भारतीय राखी धनेशच्या अस्तित्वावर मोठा धोका निर्माण झाला आहे.

धनेश पक्ष्यासाठी पोकळी असलेल्या झाडांचे महत्त्व

धनेश पक्षी (Hornbill) आपल्या लांब आणि मोठ्या चोचीमुळे घरटे बांधू शकत नाही, म्हणूनच तो विणीच्या हंगामात पोकळी असलेल्या झाडाची निवड करतो.या पोकळ जागी तो अंडी घालतो आणि पिल्लांना वाढवतो.

त्यामुळेच धनेश पक्ष्यांसाठी झाडातील पोकळी म्हणजे केवळ एक घरटे नाही, तर ते त्यांचे जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी एक अनिवार्य अधिवास आहे. मादी धनेश एकदा घरट्यात शिरली की,नर धनेश चिखल आणि विष्ठेचा वापर करून घरट्याचे दार बंद करतो. फक्त एक लहानशी फट ठेवतो, जिथून नर तिला आणि पिल्लांना अन्न पुरवतो. यामुळे घरट्यातील पिल्ले आणि मादी सुरक्षित राहतात. जर योग्य पोकळी असलेली झाडे उपलब्ध नसतील, तर धनेश पक्ष्यांचे प्रजनन थांबू शकते आणि त्यांची संख्या कमी होऊ शकते.

ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांची भूमिका.

भारतीय राखी धनेश आणि पर्यावरणातील त्यांच्या महत्त्वाचे संरक्षण करण्यासाठी, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी या दिशेने तातडीने काही पावले उचलणे आवश्यक आहे:

पोकळी असलेल्या झाडांचा शोध आणि संरक्षण: स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या हद्दीतील सर्व पोकळी असलेल्या झाडांचा सर्व्हे करून त्यांची नोंदणी करावी. ही झाडे कोणत्याही परिस्थितीत तोडली जाणार नाहीत याची खात्री करावी. अशा झाडांना 'संरक्षित वृक्ष' असा दर्जा देऊन त्यांच्याभोवती कुंपण घालणे किंवा माहिती फलक लावणे आवश्यक आहे.

जनजागृती अभियान : सामान्य नागरिक, विशेषत  लहान मुले आणि तरुण पिढीमध्ये धनेश पक्ष्याचे महत्त्व आणि त्यांना वाचवण्याची गरज याबद्दल जनजागृती करावी. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये याविषयी माहिती द्यावी. नवीन झाडे लावताना विचार: नवीन वृक्षारोपण करताना, भविष्यात पोकळी निर्माण होऊ शकतील अशा देशी वृक्षांच्या प्रजातींना प्राधान्य द्यावे. उदा. वड, पिंपळ, चिंच, आंबा यांसारखी जुनी आणि मोठी झाडे धनेश पक्ष्यांसाठी उपयुक्त ठरतात.

धोरणात्मक बदल : विकास प्रकल्पांना परवानगी देताना, पोकळी असलेल्या झाडांचे संरक्षण हे एक महत्त्वाचे निकष असावे. शक्य असल्यास, विकास प्रकल्पांचा आराखडा अशा प्रकारे तयार करावा की, या झाडांना कोणताही धोका पोहोचणार नाही.

संशोधन आणि देखरेख : स्थानिक पक्षी निरीक्षक गट आणि पर्यावरण संस्थांच्या मदतीने धनेश पक्ष्यांच्या संख्येवर आणि त्यांच्या घरट्यांवर नियमित देखरेख ठेवावी. यामुळे त्यांच्या गरजा आणि आव्हाने समजून घेण्यास मदत होईल.

आपले कर्तव्य : भारतीय राखी धनेश केवळ एक सुंदर पक्षी नाही, तर तो आपल्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांची वाढ आणि संख्या राखणे हे जैवविविधतेसाठी आवश्यक आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांनी या महत्त्वपूर्ण कार्याची जबाबदारी स्वीकारून पोकळी असलेल्या झाडांचे संरक्षण करणे आपले नैतिक आणि पर्यावरणीय कर्तव्य आहे. यामुळे आपण केवळ एका पक्ष्याला नव्हे, तर आपल्या परिसंस्थेचे संतुलन राखण्यास मदत करू.

शांत झोपेची कला आत्मसात करा..!
आधुनिक केसरी न्यूज

सौ.किशोरी शंकर पाटील

सध्या धावपळीच्या युगात आपण भौतिक सुखाच्या मागे लागलो आहोत. जीवनातील समाधान, शांतता हरवत चाललो असताना,अशावेळी आपण अनेक प्रकारच्या काळजीचे ओझे मनावर घेऊन झोपायला जातो आणि दिवसभरातील चिंता, दुःख, वेदना, नाना प्रकारचे ताणतणाव व आशा- निराशेचे क्षण झोपेत ही आपली पिच्छा सोडत नाहीत. याचा झोपेवर मोठा परिणाम होतो आणि शांत झोप मिळणे दुरापास्त होत आहे. आपण झोपेचं खोबरे होताना पाहतो. सध्या ही समस्या हल्ली  सगळ्यांना भेडसावत आहे. झोप शरीर आणि  मनाला  विश्रांती देते. पण झोपेत आपण स्वप्नही पाहतो. चांगल्या अथवा वाईट दृश्यांच्या स्वरूपात आपल्या मनात जे काही आहे, ते स्वप्नाच्या माध्यमातून बाहेर निघते. दडपलेल्या इच्छा, भिती स्वप्नात प्रकट होतात. बेडरूममध्ये चांगले चित्र, चांगली प्रार्थना, विचार लावले तर  झोपतांना ते बघून वाचून व त्यावर मनन - चिंतन केले असता, त्यामुळे शांत झोप मिळू शकते आणि  झोपेपुर्वीचा काळ हा सर्वात महत्वाचा असतो.

झोपण्यापूर्वी जर  चिंता तणाव अथवा भितीने ग्रस्त असेल तर तशा मनःस्थितीत झोपू नये. सर्वप्रथम दीर्घ श्वास प्रश्वास करावा. चांगल्या पुस्तकांचा अभ्यास आणि थोडावेळ, भ्रामरी,ओंकार  ध्यान, स्वतःला मनाला शांतता देणाऱ्या दृश्यांमध्ये गुंतवून ठेवावे. एखादी चांगली प्रार्थना करून झोपी जावे. तसेच चांगले संगीत  ऐकावे. परंतु ताणतणाव, भिती चिंता नैराश्यात झोपल्याने या भावनांचा मनावर नकारात्मक परिणाम होतो. गाढ झोपेच्या आधी पाच मिनिटे आपल्यासाठी मौल्यवान असतात हे लक्षात ठेवावे. यावेळी  नकारात्मक भावनांना दूर करण्याची कला शिकलो तर या भावनांना कायमचे दूर करू शकतो आणि आनंद, शांती, समाधान, प्रसन्नता, कृतज्ञता, दयाळूपणा इ. भावनेचा  समावेश आपल्या जीवनात होऊ शकेल. झोपण्यापूर्वी चार तासांचा विचार आपल्या अवचेतन मनांत रहातो. झोपण्यापूर्वी मनाला स्वयंसूचना देऊ शकतो. मनाला व्यथित करणाऱ्या समस्यांच्या समाधानाचा विचारही करू शकतो. तसे केल्याने चांगले परिणाम केव्हातरी नक्की मिळतात. बऱ्याच शास्त्रज्ञांना त्यांच्या प्रश्नांचे समाधान स्वप्नात मिळाले होते. झोपण्याच्या वेळेस आपल्या जवळ एक डायरी असावी ज्यावर आपल्या भावना लिहू शकू. आपल्या  इच्छा, स्वप्न, समस्या, प्रश्न इत्यादी गोष्टी आपल्या डायरीत लिहून काढल्या तर मनावर ओझं राहत नाही.  त्या लिहून काढल्याने मनही हलके होते. अशाप्रकारे शांत  झोप मिळवण्यासाठी साध्यासोप्या उपायांनी झोपेला कला बनवावे. शांत झोपेची कला आत्मसात करा.

नवरात्रोत्सव विशेष : केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकारी मिना जगताप यांचा यशस्वी प्रवास..!
आधुनिक केसरी न्यूज

लेखिका : किशोरी शंकर पाटील

केद्रीय उत्पादन शुल्क अधिकारी श्रीमती मिना जगताप माझी वहिनी असल्या तरी जास्त आम्ही  मैत्रीणी आहोत.सतत भेटणे होत नसले तरी मैत्रीचे सूर जुळल्या मुळे आमच्या  फोनवर छान गप्पात रंगतात अशा सुस्वभावी श्रीमती मिना जगताप यांचा जन्म २० जून १९५१ एका सुखवस्तू कुटुंबात झाला. शालेय शिक्षण अंबरनाथ येथे झाले. मॅट्रीक नंतर अर्थशास्त्राच्या पदवीधर झाल्या. नोकरीसाठी स्पर्धा परिक्षा देऊन उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. याचाच परिपाक म्हणून केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात नोकरीत रूजू झाल्यावर स्वतःच्या हुशारीवर डिपार्टमेंटल परिक्षा उत्तीर्ण होऊन त्यांना प्रमोशन मिळाले. विक्रोळी नंतर भांडूप ते चर्चगेट असा नोकरीचा प्रवास अशी ३६ वर्ष नोकरी दोन मुलगी एक मुलगा यांचे संगोपन, शाळा, अभ्यास,शिक्षण यात ओढाताण व्हायची त्यांच्या मिस्टरांची पण खूप मदत असायची. मुलंही समजूदार त्यांनीही उच्च शिक्षण घेतले.

नोकरीमध्ये वरीष्ठ पदावर प्रशासनिक अधिकारी म्हणून  १२वर्ष काम केले.आॅफीसमध्ये वरीष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करता सर्वांना मदतच केली. आॅफीसमधील सहकाऱ्यांचे दिल्लीपर्यंत नांव झाले. एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्ती नुसार प्रामाणिकपणे निष्ठेने काम केले.या कामाची पावती म्हणून वरीष्ठ  अधिकारी यांनी सन्मानपत्र देऊन उचीत सन्मान केला. जबाबदारीचे काम स्विकारून ते तडीस नेण्याचा स्वभाव असल्याने न घाबरता कोणत्याही परिस्थितीत पुढे जायचे हा शिरस्ता होता.रिटायर होताना निरोप समारंभाच्या वेळी कमिशनर साहेबांनी त्यांच्या  झोकून देऊन निष्ठेने प्रामाणिक  काम, सहकाऱ्यांना वेळोवेळी मदत या  स्वभाव विशेषाचे भरभरून कौतुक केले. "त्यांच्या ठिकाणी त्यांच्या सारखे काम करणारी दुसरी ऑफिससर मिळणे कठिण " असे गौरवोद्गार काढले.

नोकरीच्या काळात पती तुकाराम मुली सोनल मधुरा, मुलगा सिद्धेश यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. रिटायर झाल्यानंतर अनपेक्षितपणे हिप जाॅईन्टचे ऑपरेशन अयशस्वी झाले.पंधरा दिवसांत दुसरे ऑपरेशन करावे लागले. या परिस्थितीत न घाबरता प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ६ महिन्यात चालायला लागली. डाॅ. सुध्दा आश्चर्य चकीत झाले. ६० वर्ष दोन्ही पायावर चालले आता आधार घेऊन पुढचे आयुष्य चालायचे ही खूणगाठ मनाशी बांधली. पर्यटनाची आवड असल्याने मुलांसोबत दक्षिण भारत, राजस्थान, सिक्कीम, काश्मीर  तामिळनाडू ऑस्ट्रेलिया, बँकाॅक देश विदेशात भटकंती. दरवर्षी शेगाव आणि शिर्डी येथे आवर्जून जाते. यातूनच वेळ काढून दासबोध  परिक्षा दिली. आणि समीक्षकाचे  ६ वर्ष काम पाहिले. पतीच्या निधनानंतर मुलांच्या मुळे सावरले. भावंडाच्या मुलांच्या  प्रेमाने  जीवनाला उभारी मिळाली.आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करीत  आहे.

नवरात्रोत्सव विशेष : ६५० किल्ले सर करणारी भारतातील पहिली महिला गडरागिणी "हमिदा खान" यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास..!
आधुनिक केसरी न्यूज

लेखिका : सौ किशोरी पाटील

आज अष्टमीचा दिवस मोठा भाग्याचा आहे. माझी मैत्रीण शिवरायांची निस्सीम भक्त, गड किल्ल्यावर प्रेम करणारी  दुर्गकन्या  हमिदा अन्वर खान नालासोपारा वसई  विरार येथे वास्तव्यास आहे.नवरात्रोत्सवाच्या माळेत अशा धाडसी गडरागिणी गिर्यारोहक, मैत्रीणी विषयी लिहिण्याचा योग आला. २०१९ मध्ये मी आणि हमिदा खान दोघींनी मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. मैत्रीण हमिदा खान यांचा जन्म मुंबईत झाला.गडकिल्ले सर करतात म्हणून त्यांना गडरागिणी उपाधी  मिळाली. मराठमोळ्या हमिदा खान यांनी आपल्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ गड किल्ले, पुरातन वस्तू संशोधन व संवर्धन ह्या साठी देऊन आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. हमिदा खान यांनी एम.ए. इतिहास अरेबिक फारसी मोडी ब्राम्ही, नेवारी ग्रंथ,शारदा लिपीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

सुरुवातीपासून मैदानी खेळाची आवड असल्याने प्रशिक्षण घेतले. लाठी काठी, दांडपट्टा, तलवार,विटा आदींचा समावेश आहे. योगायोग असा की रायगडावर अष्टमीच्या दिवशी देवीची आणि  विरार जीवदानी देवीची हमिदा खान ओटी भरते याच दिवशी लेख प्रकाशित होत आहे. किल्ले रायगडावर त्यांचा राज्याभिषेक सोहळ्यात मोठा सहभाग असतो,यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे औक्षण, जलाभिषेक करण्याचा मान दिला जातो.यावेळी गडावरील शिरकाई देवी पूजनाची तयारी वस्त्र अलंकार पुजाअर्चा यात मोलाचं योगदान असतं. हे सातत्याने ३२ वर्षांपासून सुरू आहे. शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगडच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. भटकंती व गिर्यारोहणाचा ध्यास व आवड मनापासून जोपासताना. तहान भूक त्रास विसरून, अत्यंत चिकाटीने ३५ वर्षात महाराष्ट्र जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी, राजस्थान,कर्नाटक,आंध्रप्रदेश मिळून ६५० किल्ले सर करणारी भारतातील एकमेव महिला असल्याचा त्यांना अभिमान आहे. यामुळेच ज्येष्ठ गिर्यारोहक, थोर इतिहास तज्ञ श्री के. तुकाराम जाधव यांनी दुर्गकन्या उपाधी दिली. हिरकणी ही संबोधतात. शस्त्र संग्रहक श्री गिरीश जाधव यांनी गडरागिणी उपाधी दिली.

शिवसंत राजा शिवबा प्रसार मंडळ, सावित्रीबाई पुरस्कार ईशा टूर जिजाऊ पुरस्कार, किल्ले लळिंग, कोकण इतिहास परिषद. गिरीमित्र संमेलन, दुर्गपरीषद,प्राधिकरण, किल्ले रायगड या संस्थाकडून सन्मान व पुरस्कार तर जागतिक महिला दिनी वसई विरार नालासोपारा महानगरपालिका तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला.टिव्ही रेडिओ वर्तमानपत्रात अनेक मुलाखती तसेच झी टीव्ही वर " आम्ही सारे खवय्ये " कार्यक्रमात सहभाग.हल्लीच साजरा गोजरा अवघड  गड चढला तो तामिळनाडू वेल्लूर येथील किल्ला जो शिवाजी महाराजांनी बांधला. विशेष बाब म्हणजे तामिळनाडू येथे सह्याद्री भूषण पुरस्काराने सन्मानित केले.दक्षिण दिग्विजय किल्ले जिंजी स्वराज्याची ३ राजधानी  जिंजी येथे सह्याद्री भ्रमंती भूषण हा पुरस्कार हिंदवी परिवाराकडून असा अतिशय  प्रेरणादायी थक्क करणारा प्रवास जो आजच्या तरूण पिढीसाठी मार्गदर्शक आहे.

शिवराज्याभिषेक तिथीप्रमाणे व्हावा. रायगडावर सांजेला दिवबत्ती करावी या विनंतीस  मा. संभाजी राजे यानी मान्यता दिली.त्याचं एकच म्हणणं आहे निसर्ग भरभरून देतो तो भेदभाव करीत नाही. आपलंही कर्तव्य आहे की आपण त्याची जोपासना करावी. आपला इतिहास, संस्कृती परंपरा गडकोट किल्ले महाराष्ट्राचे वैभव सर्वांनी मिळून जोपासू आणि भावी पिढीला हे वैभव याची देही याची डोळा पहायला मिळेल असे आवर्जून सांगते. अशी ही गडकोट किल्यावर प्रेम करणारी अनोखी नवदुर्गा हमिदा खान यांना सलाम.

वयाच्या साठीत पारंपारिक लोकगितांचे समाजप्रबोधन करणाऱ्या नवदुर्गा..!
आधुनिक केसरी न्यूज

लेखिका : किशोरी शंकर पाटील

पालघर : जिल्हा सागरी, नागरी व डोंगरी अंगाने विस्तारला आहे. अनेक बोली भाषा बोलणारा बोलक समाज या जिल्हात पिढ्यानपिढ्या राहतो. वारली, कातकरी, आगरी, कोळी, वाढवळ, कुणबी, पाचकळशी यां समाजाच्या  बोली या मौखिक स्वरूपातील असून हे बोलक समाज याच भाषेतून आपले विधी, सणउत्सव, समारंभ साजरे करतात. शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी तसेच प्रसिद्ध वाडा कोलम तांदूळ पिकवणारा कुणबी समाज या पालघर जिल्हात बहुसंख्येने वास्तव्यास आहे. या समाजाच्या कुणबी बोलीतून प्रामुख्याने  व्यवहार चालतो. मौखिक असणारी ही भाषालहेजा,व्याकरण, लेखन उच्चारण यातून इतर बोली भाषांपेक्षा वेगळी व दखलघेण्यायोग्य ठरते. या समाजात लग्नसमारंभात गायली जाणारी लग्नगिते अर्थात धवला, गौरी - गणपतीची गिते, जात्यावरची गाणी, बाया घालवायची गाणी, अंगाईगीते, होळीची गाणी अशा साहीत्यीक अंगाने ही बोलीभाषा वंशपरंपरागत समृद्ध आहे.

सौ.नंदा तुकाराम गोतारणे या गातेस बु, ता. वाडा, जिल्हा पालघर येथिल खेडेगावात राहणाऱ्या महिला असून त्यांनी हा मौखिक परंपरेतून आलेला बोली भाषेतील ठेवा संवर्धन करण्यासाठी त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी  मागील दहा वर्षापासून ही लोककला, लोक साहीत्य टिकवण्यासाठी त्या अटोकाट प्रयत्न करत आहेत. प्रबोधन कार्यक्रमांच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वखर्चाने जावून विनामूल्य त्या लग्नसोहळयात ही लग्नगिते (धवला) गायन करतात. पूर्वी लग्नात तेला, बाशिंगा, उटणी, हालदी अश्या कार्यक्रमात धवला गायन केल्याशिवाय रंगत येत नसायची. मात्र आधुनिकतेच्या या प्रवाहात हे सर्व मागे पडले मात्र यातून बोलीभाषा, लोकसंस्कृतीची समृद्धता लोप पावते आहे. व तिच टिकवण्यासाठी मी हा वसा घेतला आहे. असे सौ. नंदा तुकाराम गोतारणे सांगतात. आज पर्यत त्यांनी शंभराहून अधिक लोकगितांचे कार्यक्रम केले असून  मराठी या अभिजात भाषेच्या या बोलीभाषेच्या संवर्धनात युवक, युवतींनी पुढे यावे व ही लोकगीते शिकावीत यासाठी शाळा महाविद्यालयात त्या याचे प्रबोधन करत असतात. लोकसंस्कृतीची समृद्ध परंपरा व वडिलोपार्जित हा वारसा जपणाऱ्या सौ. नंदा तुकाराम गोतारणे आज वयाच्या साठाव्या वर्षांत ही हे समाजप्रबोधन करणाऱ्या  खऱ्या नवदुर्गा आहेत.

नवरात्रोत्सव विशेष : कपड्यांच्या व्यवसायाने मला जगायला शिकवले..!
आधुनिक केसरी न्यूज

लेखिका : सौ.किशोरी शंकर पाटील

सौ.वंदना रमेश गवळी, सांगली मिरज माहेरी गुरे, दुध दुभत्याचा व्यवसाय, अर्थिक परिस्थिती बेताची तरीही दोन भाऊ, चार बहिणी शेणगोठा, गुरांना चारापाणी, घरकामात आईला मदत करून आम्ही भावंडांनी शिक्षण घेतले.चौघी मुली वडीलांना मुलींच्या लग्नाचे टेंशन मॅट्रीक झाल्यावर लग्न करून सांगलीत आली. मिस्टर वसंत दादा सहकारी बँकेत नोकरीला होते. एकत्र कुटुंब घर बांधण्यासाठी कर्ज काढले त्यामुळे हातात पगार कमी यायचा अर्थिक चणचण घरी सासूबाईंची चिडचिड व्हायची. पहिला मुलगा झाला खर्च वाढत गेला. दोन तीन वर्षानी कर्ज फिटले.

दुसरी मुलगी झाली. मुलगी थोडी मोठी झाल्यावर बँकेचे कलेक्शन (पिग्मी) गोळा करण्याचे काम सुरू केले. घरगुती अडचणी मुळे वेगळं रहायचा निर्णय घेतला. लहानशा फळ्यांच्या खोलीत राहीलो. काटकसर करून कर्ज काढून  पुन्हा दुसरं घर बांधलं. स्थीर स्थावर होई पर्यंत २०१४ साली मिस्टरांची बँक बंद पडली. काय करावे सुचत नव्हतं. पापड, लोणचे विकले, शिलाई काम केले. गोधड्या शिवल्या.मिस्टरांना कावीळ झाली. नेहमी टेन्शन मुळे पॅनीक व्हायचे. आजारपण सुरूच होते. अॅडमीट करावे लागले. भावाने खूप मदत केली. आधार दिला. त्यांचे ऋण आहेतच. आभाळ फाटलं होतं ढिगळं कुठे लावणार अशी परिस्थिती झाली होती. खूप कष्टप्रद  दिवस होते.

ऊन वारा पावसात  पायी नंतर  एक ३०० रूच्या जुनी  साईकलीवरून घरोघरी, दुकानात जाऊन  बँक कलेक्शन करायचे. पुन्हा बँकेत पैसे भरायचे. मुलं लहान असल्याने घरकाम,शाळेची तयारी कधी कधी दुपारी जेवायला ही मिळत नव्हते. शेजारचे मुलांकडे लक्ष द्यायचे. थोड्या दिवसांनी मोठ्या  बहिणीने मुंबई वरून ईमेटन ज्वेलरी पाठवली. बँक कलेक्शन करताना तेही विकत होते.हळूहळू लोकांच्या पसंतीस उतरले मागणी वाढली मगं होलसेल आणून ईमिटेशन ज्वेलरी विकली. खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यासोबत साड्यांचा बिझनेस सुरू केला. घरी एका छोट्या खोलीत ज्वेलरी व साड्या ठेवायची  बायका एकमेकींच्या ओळखीने  यायच्या मगं एक रोडवर छोट दुकान भाड्याने घेऊन कृष्णतारा सासू सासऱ्यांचे नांव दिले. चांगले चालत होते. मिस्टरांची खूप साथ मिळाली. दुकान सांगलीत पूर आला तेव्हा नुकसान झाले. पुन्हा घरी बिझनेस सुरू केला. मिस्टर बँक बंद पडल्याने तेही पिग्मी एजंटचे काम करायचे. त्यांना नंतर नंतर फिरणे जमेना म्हणून किराणा दुकान सुरू केले. आम्ही दोघेही चालवतो. घरी ज्वेलरी व साड्यां चा बिझनेस सुरू आहे. मुलगा अनिकेत मॅकनिकल ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी करतो. मुलगी अस्मिताने डिएड मेंदी कोर्स केला दोघांचेही  लग्न होऊन दोघांना कन्यारत्न आहेत. मागे वळून पहाताना आईवडीलांचे संस्कार प्रामाणिकपण लहान असल्याने मोठ्या भावंडांचे प्रेम आशीर्वादाने खूप श्रीमंती नाही पण सुख समाधानाने जीवन जगत आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात असतोच. मला जरा जास्तच करावा लागला.याप्रमाणे वागलं की ईश्वर सगळ्या अडचणीवर मात करण्याचे बळ देतो.

नवरात्रोत्सव विशेष : रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा परिचारिकेच आजच रूप..!
आधुनिक केसरी न्यूज

लेखिका : सौ किशोरी शंकर पाटील

परिचारिका मिना ठाकोर यांचे जन्मगाव भोर आहे.तिथेच मॅट्रीक पर्यंत शिक्षण झाले.गावात सरकारी दवाखाना होता, मात्र ओपीडी आणि डिलीव्हरी सिरियस पेशंटला पुण्यात न्यावे लागे. एसटीच्या प्रवासामुळे मॅट्रीक ला असतानाच ठरवले. पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये  नर्सिंगचा कोर्स करायचा. घरच्या विरोधाला न जुमानता जिद्दीने ३वर्षाचा नर्सिंग कोर्स पूर्ण केला, आणि परभणीला ३ वर्ष सरकारी दवाखान्यात नोकरी केली. लग्नानंतर मुबंईला हिंदूजा हाॅस्पीटलला प्रथम स्टाफ नंतर सिस्टर इनचार्ज म्हणून २२ वर्ष नोकरी केली. परिचारिका म्हटलं की चांगले वाईट अनुभव आले. त्यामुळे माणसं कळली. हाॅस्पीटल मधील एक मोठा अनुभव एकदा खेडेगावांतील बाई, रात्रीच्या वेळी बाळंतपणात वाॅर्ड मध्ये दाखल झाली. लघवी तुंबल्यामुळे वेदनेने कळवळत होती.  रात्रपाळी होती डाॅक्टरांनी तपासून कॅथेटराझेशन करायला सांगितले. कॅथेटर लावण्याचा प्रयत्न केला.एपोझाॅटॅमीचे वर पर्यंत असल्याने त्याबाईची लघवी तुंबली होती.

टाके असल्याने कॅथेटर लावण्यासाठी त्रासदायक होत होते. स्वतःच्या जबाबदारीवर टाके कापून पुढील उपचार केला, म्हणजे कॅथेटराझेशन केले. त्यामुळे त्याबाईला आराम वाटला.यासाठी त्यांना बक्षीस दिले पण ते घेतले नाही. मिनाताईंचा  तो एक कर्तव्याच्या भाग होता असे त्या नेहमी म्हणतात  "रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा" त्यांचे खूप खूप कौतुक झाले. डाॅक्टर नंतर परिचारिका पेशंटची काळजी घेते. कोवीड मध्ये लाॅकडाऊन मध्ये डाॅक्टर, नर्स कोवीड विरुद्ध योध्दा बनून काम करीत होत्या. रात्रंदिवस घरापासून दूर राहून मनोभावे रूग्णांची काळजी घेत होत्या.मिनाताईसारख्या अशा अनेक परिचारकांना मनाचा मुजरा.

नर्स असल्यामुळे मुलं लहान असतांना मुलांच्या आजारपणात डाॅक्टराकडे धावपळ करावी लागली नाही. तरीही नोकरी करताना रात्रपाळी, दिवसपाळी सिरीयस पेशंट आला का धावपळ, घरी येवून मुलांचा सांभाळ करणे, त्यांचा अभ्यास परंतु आता दोन्ही मुलं उच्च  शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करीत आहेत. सुना नातवंडांमध्ये रमल्या आहेत.मिनाताईंचा योगायोगाने साहित्य क्षेत्रात प्रवेश झाला.

सध्या आपल्या देशाच्या विविध भागांत नवरात्रोत्सव अगदी आनंदात आणि उल्हासात सुरू आहे. नवरात्र म्हणजे स्त्री म्हणजे शक्तीची उपासना, नवरात्र स्त्रीमध्ये अशा शक्तीचा जागर. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार वर्षभर महिला विविध सणवार आहेत. हरितालिका, गौरीपूजन, दुर्गापूजन, लक्ष्मीपूजन आणि इतर सणवारही आहेत. अशा उत्सव व सणामध्ये स्त्रीला देवी म्हणून पुजले जाते. त्यामध्ये सण म्हणून बोलावणे, हळदी-कुंकू समारंभ, कुमारिका पूजन केले जाते. हे सारे परंपरा म्हणून केले जाते. त्यामागील गर्भितार्थ खाली जात नाही. स्त्रीचा शक्तीजागर, ही संकल्पना आपणही घडवून आणली पाहिजे,आणि ती अभ्यासली पाहिजे. प्रागतिक समाजातील लोक परंपरागत विचारसरणीला किंमत देतात. शक्तीना स्त्री शक्तीचा जागर कळला आहे, ही गोष्ट आहे. आजही ग्रामीण परिस्थिती दयनीय आहे. सैनिक सुशिक्षित आजही आत्याचाराला जावेत महिला स्त्रीचा सन्मान म्हणजे नारी शक्तीचा सन्मान. मनमनात जागर आत्मसात होत आहे.

नवरात्रोत्सव विशेष : संघर्षमय जीवनातून वाटचाल करणाऱ्या आदर्श शिक्षिका..!
आधुनिक केसरी न्यूज

सौ.किशोरी शंकर पाटील

सौ.शुभांगी राजन मिसाळ यांच्या माहेरी दुधदुभत्याचा धंदा शेणगोटा, शेणी थापणे आईला घरकामात मदत हे सर्व करून जिद्दीने अभ्यास करून १०वी मॅट्रीक परीक्षा  चांगल्या मार्काने  उत्तीर्ण होऊन  डी.एड प्रवेश घेतला. १९८२ साली डी.एड पूर्ण झाले. १९८३ साली चिंचवड राजन  मिसाळ यांच्याशी  लग्न झालं. १९८४ साली पहिला मुलगा झाला. दरम्यान  चुलत सासऱ्यांचे तिच्या नोकरीसाठी  प्रयत्न करीत होते. दुसऱ्या  मुलीच्या वेळी  शाळेत नोकरीसाठी बोलावणं आले, शाळेत रूजू झाल्यावर आठ दिवसांनी डिलीव्हरी झाली. तीन महिन्याच्या रजेनंतर शाळेत जाताना  दोन्ही मुलांना शेजारील शिंदे काकू काळजी घ्यायच्या परंतु त्यांचेही कुटुंब होतं.

मुलगा अमित याला दोन वेळा  टायफाईड झाला अॅडमीट करावं लागले. तेव्हा खूपच ओढाताण झाली. मिस्टरांनी नोकरी सोड म्हणून सांगितलं. तेव्हाही शिंदे काकू मदतीला  धावून आल्या. सासू सासरे गांवी होते. मिस्टरांची नोकरी रात्र व दिवस पाळी असताना. मुलांची अबाळ होऊ नये म्हणून ते खूप काळजी घेत. त्यांचीही खूप मदत असे. पण शाळेच्या वारंवार बदल्या, जनगणना, मतदार याद्या सारखी कामे, शाळेतील इतर प्रोजेक्ट वगैरे यात अतिशय धावपळ व्हायची. शिकवण्याची आवड असल्याने  वर्गाचा नेहमी रिझल्ट चांगला असायचा. विद्यार्थ्यां कडून पर्यावरण जागृती आणि इतर सामाजिक उपक्रमात सहभाग प्रत्येक शाळेत उत्तम कार्य तसेच  स्काॅलरशीप परीक्षेत शाळेचा नेहमी १००टक्के  रिझल्ट असे.ज्यादा तासिकेवर भर,गणित आणि बुध्दीमत्ता या विषयावर व्ययक्तिक मार्गदर्शन, शालेय पट १००% सामाजिक वनीकरणाची  छोटी नाटुकलीचा स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि त्यावेळी बालचित्रवाणीत ही नाटुकली सादर झाली.पर्यावरण विषयक जागृतीचे नाट्यीकरण दूरदर्शनवर प्रशिक्षण प्रक्षेपित, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी उत्कृष्ट   श्रृतलेखनाची विद्यार्थ्यांना सवय लावली.

ज्ञानगंगा मासिकात मुलांना शिकवण्याच्या पध्दतीविषयी लेख प्रकाशित झाला. टाकाऊपासून टिकाऊ साहित्य बनवणे. विज्ञान प्रदर्शना सोबत सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांचा सहभाग कृतीतून शिक्षणावर भर आपल्या घरच्या अडचणी व संघर्षमय जीवनातून वाटचाल करीत असताना शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिकवण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. याचा परिपाक म्हणून २००८साली आदर्श शिक्षिका पुरस्कार चिंचवड महानगरपालिकेतून सत्कार करण्यात आला. मुलगा अमित आणि मुलगी अश्विनी उत्तम शिक्षण घेऊन लग्न झाली आहेत. नातवंडे पण शाळेत अतिशय हुशार आहेत.

साहित्य क्षेत्रात साथ देणारी माऊली...
आधुनिक केसरी न्यूज

सौ.किशोरी शंकर पाटील

बेलवंडी गावातील ता -श्रीगोंदा,जिल्हा -अहमदनगर रंजनाताई शर्मा आणि अशोक शर्मा  मायलेक आईने आपल्या मुलांसाठी केलेल्या समर्पणाचे इतिहासात अनेक दाखले आहेत आणि याला या काळात सुध्दा अपवाद नाही अशीच ही दोघांची  कहाणी आहे. नाशिक साहित्य संमेलनात अशोक शर्मा यांची भेट झाली. त्यांनी बेलवंडीला साहित्य संमेलनाला येण्याचे आमंत्रण दिले तेव्हा गेल्या वर्षी निमंत्रित कवी म्हणून  संमेलनासाठी हजेरी लावली. तेव्हा त्यांच्या विषयी सर्व माहिती कळली. रंजनाताईनी आपला संघर्षमय जीवन वृत्तांत सांगितला लहानशी पानटपरी चालवणाऱ्या अशोकचे गावात साहित्य संमेलन भरवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ही माऊली त्याच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली.प्रचंड कष्ट करत तिने पैसे उभारले.या बळावर अशोक शर्मा बेलवंडीमध्ये गेली १९वर्ष एक दिवसीय साहित्य संमेलन भरवत आहेत.स्वतःच्या मोडक्या घरासाठी एक पैसाही खर्च न करता सुरू असलेला त्यांचा हा एकप्रकारे  साहित्ययज्ञ होता.

अशोक शर्मा  कवितेच्या आवडीने  तरुण वयात विविध कवी संमेलनातून फिरले.तेव्हाच हा विचार मनात  रूंजी घालत होता. तो सत्यात उतरवण्यासाठी आईने घेतलेले अपार कष्ट त्यांनी सांगितले तेव्हा डोळ्यात पाणी तरळलं.घरात सुरू केलेल्या खाणावळीसाठी दिवसाला हजार पोळ्या लाटणं,उदबत्त्या वळणं,लोकरीचे रुमाल विणणं,स्त्रियांना शिवणकाम शिकवणं असे नाना उद्योग करून वर्षभरात पन्नास ते साठ हजार जमवून, त्या ते सर्व पैसे साहित्य संमेलनासाठी अशोकच्या स्वाधीन करत. गेल्या वर्षी कवी. प्रवीण दवणे, साहित्यिक लेखक भारत सासणे तर

या संमेलनाला या अगोदर डॉ श्रीराम लागू,निळू फुले,सदाशिव अमरापूरकर,आशा काळे,साहित्यिक आनंद यादव,सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार असे अनेक मान्यवर येऊन गेलेत.हे कसं जमवलं या प्रश्नाचे उत्तर देताना अशोकजींनी सांगितलं की सार्वजनिक बुथवरून एक रुपयाचे नाणे टाकून केलेला फोन व पाठोपाठ पाठवलेले २५ पैशांचे पोस्टकार्ड.. मनाचा प्रामाणिकपणा आणि कामाप्रती आस समोरच्यापर्यंत पोहचली तर अशक्य ते शक्य कसं घडू शकतं.

या १९ वर्षांच्या वाटचालीत परीक्षा पहाणारे अनेक क्षण आले पण आध्यात्मिक ग्रंथांच्या अभ्यासातून मिळालेल्या सामर्थ्याने रंजनाताईंनी त्यातून सहजी मार्ग काढल्याचे काही दाखले त्यांनी  सांगितले. या संमेलनामुळे त्या पंचक्रोशीतील गावांतून रुजू लागलेली साहित्यसंस्कृती आणि या अनोख्या साहित्य सेवेमुळे मिळालेले अनेक पुरस्कार व पत्रव्यवहार जागेअभावी गोणीत ठेवावे लागले आहेत हे प्रत्यक्ष पाहिले आहे.साहित्य सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या या मायलेकाच्या डोक्यावरील छप्पर नीट व्हावं,त्यांच्या या विलक्षण साहित्य सेवेवरील प्रेम पाहून अनेक साहित्यातील दानशूर व्यक्तींनी रंजनाताईंना घरबांधणीसाठी मदतीचा हात पुढे केला त्यात माझा सहभाग असल्याचे  समाधान मिळाले. साहित्य वेड्या मायलेकांच्या परिश्रमांची ही पावतीच म्हणावी लागेल.

शिक्षक दिन म्हणजे शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...
आधुनिक केसरी न्यूज

छत्रपती संभाजीनगर : आज शिक्षक दिन शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्याला शालेय जीवनात  ज्ञान मिळवले. आपल्या जीवनातील  पुढील वाटचालीचा पाया शिक्षकच रोवतात.ज्ञानरूपी प्रकाशाने शिक्षकच जीवन उजळवून  टाकतात. शिक्षक ज्ञानाचा अथांग सागरच.आद्यगुरु आपले आईवडील आणि बाहेरच्या जगातील गुरु आपले शाळेतील शिक्षक.

कच्च्या मडक्याला घडवण्याचे काम करतात. आम्ही शिक्षक दिनी आणि गुरु पौर्णिमेच्या अगोदर एक दिवस, छान टपोरे गुलाबाचे फूल आणून ठेवायचो.  आम्ही या दिवशी शिक्षकांना गुलाबाचे फूल देऊन विनम्रतेने नमस्कार करायचो. शिक्षक पण हसतमुखानं फुलांचा स्विकार करायचे व तोंड भरून आशीर्वाद द्यायचे. त्यावेळी सर्वच शिक्षकांकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांचे शिस्तबद्ध बोलणं,चालणं, वागणं यातून न बोलताही सर्वकाही शिकवून जायचे. भाग्यथोर असे शिक्षक मिळाले. वाचनाची आवड निर्माण झाली. आपण आयुष्य जगत असताना कोणाकडून काहीना काही शिकतच असतो. या सर्वांना शिक्षक दिना निमित्ताने आदरपूर्वक वंदन

शिक्षक...

दिन आज शिक्षकाचा

करू मनस्वी सन्मान

त्यांच्या प्रती ठेवू मनी

कृतज्ञता देवू मान

कच्चे मडके विद्यार्थी

देती शिक्षक आकार

घडवती भावी पिढी

खरे राष्ट्राचे आधार

प्रेम जिव्हाळा लावती

आई बनून संस्कार

कण पाजती ज्ञानाचे

आध्यापक शिल्पकार

खडतर मार्ग जरी

अडचणी वर मात

यश मिळावे शिष्याला

असे मदतीचा हात

अखंडीत ज्ञानदान

साक्षरता समाजात

ज्ञानदिप उजळून

ज्ञान किरणे मनात

सौ.किशोरी शंकर पाटील