Aadhunik Kesari - Adhunik Kesari

कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातून युवक सक्षम व आत्मनिर्भर बनणार : आमदार देवतळे
आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : वरोडा भद्रावती विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे युवा व तडफदार आमदार करण देवतळे यांनी आपल्या क्षेत्रात विकासात्मक कामाचा धडाका लावला असून आपल्या विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील विविध समस्या व विविध प्रश्न  सोडविण्याबरोबरच विकासात्मक कामांचा भूमिपूजनही ते सातत्याने करत आहेत. आमदार करण देवतळे यांनी वरोडा व भद्रावती येथे खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन व  तालुक्यातील वंधली येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता व नालीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले.

वरोडा येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा खनिज निधी अंतर्गत तब्बल एक कोटी रुपये खर्चून हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामुळे वरोडा तालुक्यातील युवक युवतींना हँड्स आॅन ट्रेनिंग आणि रोजगार, स्वयंरोजगाराचे पर्याय उपलब्ध होणार असून हा प्रकल्प स्थानिकांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

या कौशल्य विकास प्रशासन केंद्रातून युवक व युवतींना विविध कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधीचा चालना मिळणार आहे. त्यामुळे वरोडा व भद्रावती परिसरातील युवकांसाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करत  सर्वांगीण विकासासोबतच युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असा विश्वास यावेळी करण देवतळे यांनी व्यक्त केला. वरोडा येथील कार्यक्रमाला जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंचायत समितीचे उपविभागीय अभियंता मोहन खराटे व सहाय्यक अभियंता चंद्रशेखर गायकवाड भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा भागडे कृषी उत्तम बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजय देवतळे, शहर भाजपाध्यक्ष संतोष पवार,राजीव दोडके, नगरसेवक अक्षय भिवदरे, शंभुनाथ वरघणे,राहुल, अनिकेत नाकाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत वंधली येथील प्रस्तावित सिमेंट काँक्रेट रस्ता व नालीच्या बांधकामाचे भूमिपूजनही आमदार करण देवतळे यांच्या हस्ते यावेळी संपन्न झाले. वंधली येथील कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर विजय देवतळे, संचालक बाळासाहेब भोयर, सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष कवडूजी पिसाळकर, मधुकर चौधरी, उपसरपंच अनिल ठावरी, ग्रामपंचायत सदस्य सागर भोयर, सारंग चरडे, गोपाळ येडमे, बाबाराव वाघमारे,निलेश धोटे, ग्रामसेविका राजपूत ताई, शेखर चौधरी आदी मान्यवर  उपस्थित होते.

गावच्या चर्चेने पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर;सिडीआरने पत्नीचाही ‘मुखवटा’ उतरवला..!
आधुनिक केसरी न्यूज

अमोल शिंदे

भोकरदन : पतीचा मृत्यू... गावात उलटसुलट चर्चांना उधाण... संशयाची बोटे पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराकडे... त्यानंतर पतीच्या मृत्यूचे खापर प्रियकरावर फोडत पत्नीनेच पोलिसांत तक्रार दाखल केली.मात्र, तपासाची चक्रे फिरली आणि प्रकरणाचे चित्रच पालटले सीडीआर  तपास नातेवाईकांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयाची सुई तक्रारदार पत्नीपर्यंत पोहोचली.अखेर अनिता कैलास मिरकर हिलाच पोलिसांनी सहआरोपी करत अटक केली.अलापूर येथील कैलास विश्वनाथ मिरकर (४५) यांनी दि. ३० ते ३१ जुलैदरम्यान शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.घटनेनंतर अनिता मिरकर आणि साबेर शाह सादिक शाह यांच्याबाबत गावात चर्चा सुरू झाली.त्यानंतर अनिता हिने साबेर शाह याच्याविरुद्ध पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.मात्र, तपास पुढे सरकताच संशयाची दिशा बदलली आणि तक्रारदारच पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली.

सीडीआर  तपासला अन् तपासाची दिशाच बदलली...

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.मृत कैलास यांच्या आई वत्सलाबाई मिरकर यांच्यासह नातेवाईकांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर अनिता मिरकर आणि साबेर शाह यांच्या मोबाईलचा CDR तपासण्यात आला.तपासादरम्यान दोघांमध्ये जवळचे संबंध असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. कैलास यांना दोघांकडून मानसिक त्रास होत असल्याची बाबही तपासातून पुढे आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या मानसिक छळाला कंटाळूनच कैलास यांनी जीवन संपविल्याचा पोलिसांचा निष्कर्ष असल्याचे सांगण्यात आले.

‘फिर्यादी’च झाली सहआरोपी...

तपासातील पुरावे आणि नातेवाईकांच्या जबाबांनंतर प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली. दि. २० ऑगस्ट रोजी कैलास यांच्या मृत्यूप्रकरणी तक्रारदार अनिता मिरकर हिलाच पोलिसांनी सहआरोपी केले.तिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

मुख्य संशयित फरार; अटकेची मागणी...

या प्रकरणातील मुख्य संशयित साबेर शाह सादिक शाह अद्याप फरार असल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेऊन अटक करणे आता पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. त्याची चौकशी झाल्यानंतर या प्रकरणामागे नेमकी काय पार्श्वभूमी होती, आणखी कोणी सहभागी आहे का, याबाबत तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळून त्याची सखोल चौकशी करावी,अशी मागणी मृत कैलास यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे मुख्य संशयिताच्या अटकेनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

तक्रारीपासून अटकेपर्यंत...तपासाने बदलले संपूर्ण चित्र...

पतीच्या मृत्यूनंतर प्रियकराविरुद्ध तक्रार करणारी पत्नीच अखेर सहआरोपी ठरल्याने अलापूरसह भोकरदन तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता फरार मुख्य संशयित कधी पोलिसांच्या हाती लागतो आणि त्याच्या चौकशीतून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या प्रकरणातील आरोप व तपासातील निष्कर्ष हे पोलिसांच्या तपासावर आधारित असून,दोष सिद्ध होणे अथवा अंतिम जबाबदारी निश्चित होणे हे न्यायालयीन प्रक्रियेतच ठरेल.

खाकीला आधुनिक ‘बळ’आ.दानवेंच्या पाठपुराव्याला यश; भोकरदन-जाफ्राबादच्या चार ठाण्यांना १६.५३ कोटी मंजूर
आधुनिक केसरी न्यूज

भोकरदन : कायदा-सुव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलीस यंत्रणेला आता आधुनिक सुविधांचे बळ मिळणार आहे.भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातील भोकरदन,पारध बु., जाफ्राबाद आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्यांच्या नवीन अद्ययावत इमारतींसाठी तब्बल १६ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेऊन आमदार संतोष दानवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.या निधीतून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आधुनिक सुविधा मिळण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अधिक गतिमान होणार आहे.जनतेचे रक्षण आणि कायदा-सुव्यवस्था हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार दानवे यांनी आभार मानले.

‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला तेच लोक विरोध करत आहेत ज्यांनी सावित्रीमाई फुलेंवर दगड व शेणाचे गोळे फेकले : कन्हैयाकुमार
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई पुणे : दि. २१ ऑगस्ट २०२६. मुलींच्या शिक्षणासाठी देशातील सर्वात पहिली शाळा ज्या पुण्यात सावित्रीमाई फुले यांनी सुरु केली त्याच पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या २२ ऑगस्टला येत आहेत. राहुल गांधींचा भाजपाने एवढा धसका घेतला आहे की ते कार्यक्रमात आडकाठी आणत आहेत, हे तेच लोक आहेत ज्यांनी सावित्रीमाईंवर शेण व दगडगोटे फेकले. पण भाजपाने कितीही अडवणूक केली, अपप्रचार केला तरीही ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार, असे काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी म्हटले आहे.

पुण्यात ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी होत असून राहुल गांधी विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत, या पार्श्वभूमीवर पुण्यातील पत्रकार परिषदेत कन्हैयाकुमार बोलत होते. भाजपा सरकारच्या शैक्षणिक धोरणावर तोफ डागत ते पुढे म्हणाले की, मनुवादी विचाराने देशातील शिक्षण व्यवस्था बरबाद केली आहे. देशात दर एक तासाला दोन जवान आत्महत्या करत आहेत, २५ शाळा बंद होत आहेत, अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडत आहेत. ‘ना पढे है, ना पढने देंगे’, असे यांचे धोरण असून यांचे पदवी प्रमाणपत्रही नकली आहे. भाजपा नेत्यांची मुले परदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत म्हणून त्यांना फरक पडत नाही. आज शिक्षण महागडे झाले आहे, ते सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पदवीसाठी ३० लाख रुपये खर्च करावे लागत असतील आणि ८० कोटी जनता ५ किलो धान्यावर जगत असेल तर त्यांना हे महागडे शिक्षण कसे परवडणार? खाजगी शाळांना आमचा विरोध नाही पण सरकारी शाळा बंद होता कामा नये. महागडे शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वस्ती नाही. परिक्षांचे पेपर फुटत आहेत, या सरकारला दहावीची परिक्षासुद्धा घेता नाहीत. CBSE च्या परिक्षेतही घोटाळा झाला. शिक्षण आमचा अधिकार आहे तो विषेशाधिकार बनवला जात आहे, असे कन्हैयाकुमार म्हणाले..

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना कन्हैयाकुमार म्हणाले की, राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा भाजपाने धसका घेतला आहे. कोटापासून सुरु झालेला कार्यक्रम प्रत्येकवेळी अडवण्याचा, त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पण हे सर्व कार्यक्रम यशस्वी झाले. पुण्यातही परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत पण अशा प्रयत्नाने कार्यक्रम थांबणार नाही तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार यात शंका नाही. सोशल मीडियावर भाजपाने एक VDO अपलोड करून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाबद्दल अपप्रचार सुरु केला आहे पण या कार्यक्रमाला पैसे देऊन कोणाला आणण्याची गरज नाही, ते स्वतः येत आहेत. कितीही अडथळा आणला तरी राहुल गांधी येणार आणि कार्यक्रमही होणारच. राहुल गांधी अमित शाह यांच्यासमोर झुकले नाहीत तर फडणवीस यांच्यासमोर कशाला झुकतील? असेही कन्हैयाकुमार म्हणाले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

21ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर, दि. 20 : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने जलसंवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दि. 21ऑगस्ट 2026 रोजी ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विद्यार्थी, युवक, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंवर्धनाचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अशी आहे कार्यक्रमाची रूपरेषा : कार्यक्रमाची सुरुवात 21 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथून होणार असून सुमारे 3 किलोमीटरची ही वॉकेथॉन जुना वरोरा नाका - प्रियदर्शनी चौक - जटपुरा गेट - प्रियदर्शनी चौक आणि परत चांदा क्लब ग्राउंड येथे आल्यानंतर तेथे विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे या उपक्रमाचे घोषवाक्य आहे. महा वॉकेथॉनच्या माध्यमातून पाणी बचत, जलसंधारण आणि उपलब्ध जलस्रोतांच्या योग्य वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. कार्यक्रमातील सहभागींना टी-शर्ट, कॅप, बॅज तसेच ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

रील्स स्पर्धेचेही आयोजन : महा वॉकेथॉनच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभागामार्फत रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी रील अपलोड करण्याचा कालावधी 15 ते 21 ऑगस्ट 2026 असा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातूनही जलसंवर्धनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ मध्ये नागरिक, विद्यार्थी, युवक तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी QR कोड स्कॅन करून स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थिनीचा पाठलाग करून फोटो व्हायरल करण्याची धमकी; जामोद येथे तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा
आधुनिक केसरी न्यूज

जळगाव जा : जामोद येथील जनता विद्यालय परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा हात पकडत, बोलण्यास नकार दिल्यास तिचे फोटो फेसबुक व इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य जगन्नाथ ताडे (रा. जामोद) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 74, 75, 78, 351(3), 296 तसेच पॉक्सो कायद्यातील कलम 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 13 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजेपासून ते दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपीने संबंधित विद्यार्थिनीचा पाठलाग केला. तसेच कथितरित्या वाईट उद्देशाने तिचा हात पकडून, "माझ्यासोबत बोलली नाहीस तर तुझे फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करेल," अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून दि. 19 ऑगस्ट रोजी रात्री 10.29 वाजता जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून, तपासाअंती पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.

मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी किशोर सोनवणे यांचे आमरण उपोषण सुरू
आधुनिक केसरी न्यूज

सचिन सरतापे

म्हसवड : म्हसवड शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे यांनी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास विविध सामाजिक, राजकीय व नागरिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणस्थळी कविताताई म्हैत्रे, तेजसिंह राजेमाने, संजय माने-पाटील, सचिन लोखंडे, रोहित सोनवणे, संभाजी लोखंडे, शांतीलाल सरतापे, भैय्या टाकणे, कांता ढाले, कासलिंग रुपनवर, मोतीलाल खंदारे, दीपक खंदारे, संतोष सोनवणे, बापू सदाफुले, प्रकाश लोखंडे, उत्तम होटकर व रंजीत लोखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
उपोषणकर्ते किशोर सोनवणे यांनी वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. शहरातील अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली असून शासकीय निधीचा अपव्यय झाला असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध विकासकामांमध्ये त्रुटी असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या जलवाहिनी कामांची गुणवत्ता तपासून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी त्यांची भूमिका आहे.

दरम्यान, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी सर्व आरोप फेटाळून लावत वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. काही ठिकाणी जलवाहिन्यांची चाचणी (टेस्टिंग) सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. अपूर्ण कामांवरून गैरसमज निर्माण केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपोषणकर्त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसून कोणालाही प्रत्यक्ष स्थळ पाहणी करता येईल, असेही मुख्याधिकारी डॉ. माने यांनी सांगितले.
या आंदोलनामुळे वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाविषयी नव्याने चर्चा सुरू झाली असून प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यातील वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

धावरी येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज

लोहा : तालुक्यातील धावरी येथील बेचाळीस वर्षीय शेतकरी व मोटरसायकल मेकॅनिकचे सर्पदंशाने दि. १९ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा उपचारादरम्यान निधन झाले.धावरी येथील अल्पभूधारक शेतकरी मुंजाजी बालाजी गाडेकर (बाळू पाटील) (वय ४२) हे शेतीसह इतर वेळेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोटरसायकल दुरुस्तीचे काम करत होते. लोह्यात त्यांचे मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान आहे. दैनंदिन प्रमाणे दिवसभर लोह्यातील काम आटोपून बाळू पाटील सायंकाळी शेतात जाऊन जनावरांसाठी गवताचा भारा घेत असताना त्यांच्या पायाला विषारी सापाने दंश केला. मात्र त्यांना सापाने दंश केल्याचे लक्षात आले नाही. घरी जाऊन जेवण आटोपून ते झोपले असताना मध्य रात्री त्यांना चक्कर, मळमळ, पाय जड पडणे आदी लक्षणे जाणवू लागले त्यांनी सदरील बाब कुटुंबियांना दिली असता त्यांना तत्काळ लोहा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून पुढील उपचारासाठी नांदेडला जाण्याचा सल्ला दिला. नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दि. २० रोजी दुपारी धावरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाडस! सोनी PHC मध्ये अजगराला दिले जीवनदान
आधुनिक केसरी न्यूज

गोंदिया : रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूतांनी आता एका मूक प्राण्यालाही जीवनदान दिले आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) परिसरात १८ ऑगस्ट मंगळवार च्या रात्री ८ वाजताच्या सुमारास एक महाकाय अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रचंड धैर्यामुळे या अजगराचे प्राण सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय इमारतीजवळ वाहन तळात अचानक एक मोठा अजगर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना दिसून आला. अजगराची लांबी आणि त्याचा भयानक आकार पाहून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अजगराला इजा होण्याची किंवा अजगरामुळे मानवी जीवाला धोका निर्माण होण्याची भीती होती अशा आणीबाणीच्या परिस्थितीत घाबरून न जाता, सोनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका ए .पी. सोनवाने, एस. एम .पारधी, सी. बी .घासले, वाहन चालक वासुदेवजी टेंभरे, स्वच्छता कर्मचारी तुलसीदास चौहान व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यंकटेश गजघाटे, हेमेंद्र बिसेन , भरत घासले या सदस्यांनी तात्काळ पुढाकार घेतला. आणि अत्यंत काळजीपूर्वक व धैर्याने अजगराची हालचाल हाताळत  त्याला व स्वतःला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत  सुरक्षा साधनांचा वापर करून अत्यंत सुरक्षितपणे प्लास्टिकच्या बोरीत पकडले. या रेस्क्यू ऑपरेशननंतर  अजगराला त्याच्या हक्काच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सुरक्षितपणे मुक्त केले.आरोग्य कर्मचाऱ्यांनी केवळ मानवी आरोग्याचीच नव्हे, तर वन्यजीवांच्या रक्षणाचीही जबाबदारी तेवढ्याच तत्परतेने पार पाडल्यामुळे संपूर्ण गोरेगाव तालुक्यात सोनी PHC च्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या धाडसाला परिसरातील नागरिकांनी सलाम केला आहे.

दुर्गामाता मंदिरातील दोन लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मुकुटाची दिवसाढवळ्या चोरी..!
आधुनिक केसरी न्यूज

जळगाव जा : दि.१७ घरफोडी, दुकानफोडी , विहिरीवरील इलेक्ट्रिक पंप चोरी, मोटर सायकल चोरीचे प्रकार कधी नव्हे एवढे वाढले असून गुन्हा दाखल करण्यापलीकडे पोलिसांचे कर्तव्य शून्य आहे. पोलीस स्टेशन न्यायालय उपविभागीय अधिकारी कार्यालय पासून हाकेच्या अंतरावर असलेले शहरातील मध्यवर्ती परिसरातील राजा भर्तृहरीनाथ मंदिरालगत  असलेल्या दुर्गामाता मंदिरातील दुर्गा देवीच्या डोक्यावरील अंदाजे ९००ते१००० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. सदर चांदीच्या मुकुटाची किंमत आजच्या भावाने दोन लाख रुपया पेक्षा अधिक आहे.

या प्रकरणी अंबादास श्यामराव भाकरे यांचे फिर्यादीवरून  पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ह्या मंदिरात अंबादास श्यामराव भाकरे हे नियमितपणे पूजा-अर्चना व देवीची आरती करण्यासाठी जातात. मंदिरातील पूजा-अर्चना करण्यासाठी प्रकाश देशपांडे महाराज हे देखील मंदिराची देखभाल करतात.
१४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता अंबादास भाकरे हे दुर्गामाता मंदिरात गेले असता देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व्यवस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजता रोहित गजानन कल्याणकर यांनी फोन करून मंदिरातील देवीच्या अंगावरील फुलांचे हार उचकटलेले असून देवीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट दिसत नसल्याची माहिती दिली. यानंतर अंबादास भाकरे यांनी रोहित गजानन कल्याणकर तसेच अजय गजानन गवडे यांच्यासमवेत मंदिर परिसर व आजूबाजूच्या भागात मुकुटाचा शोध घेतला. मात्र मुकुट मिळून आला नाही. सदर चांदीचा मुकुट अंदाजे १५ ते २० वर्षे जुना असून त्याचे वजन सुमारे ९००ते१००० ग्रॅम असून आजच्या बाजारभावाने त्याची किंमत २,१६०००/_आहे.

सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने मंदिरातून चांदीचा मुकुट चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय वेरुळकर करीत आहेत.

पोलिसांचा खोडसाळपना: संबंधितांनी दिलेल्या तक्रारीमध्ये पंधरा ते वर्ष जुना असून त्याचे वजन ९०० ग्रॅम दाखवण्यात आले आहे. आजचे चांदीचे भाव हे २,४०,०००_ (दोन लाख चाळीस हजार रुपये प्रतिकिलो) प्रति किलो असून पोलिसांनी त्या मुगुटाची किंमत गुन्हा दाखल करताना केवळ ४८००/_ रुपये एवढी कमी दाखवली. हा पोलिसांचा लोगो खोळसाडपणा असल्याची चर्चा आहे.

आज मंदिर परिसरातील यात्रा:नागपंचमीदिनी १७ ऑगस्ट रोजी लगतच्या राजा मृतहरीनाथ मंदिरात मोठी यात्रा भरते. सर्व भाविक राजा भर्तरीनाथ मंदिरासह दुर्गा माता मंदिरात दर्शना येतात. त्यामुळे हजारो भाविकांमध्ये दुर्गा मातेच्या मुगूटाच्या चोरीचीच संपूर्ण दिवसभर चर्चा होती.

श्रींच्या स्वागतासाठी भाविकांच्या महासागर..!
आधुनिक केसरी न्यूज

दिपक सुरोसे

शेगांव : दि.१९  धन्य आजी दिन संत दर्शनाचा ।
आनंत जन्मी चा क्षीण गेला ॥१॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे।
कदा न सोडावे चरण त्यांचे ॥
त्रिविध तापाची झाली बोळवण ।२
देखिले चरण वैष्णवांचे ॥३॥
एका जनार्धानी घडो त्यांचा संग।
न व्हावा वियोग जन्मोजन्मी॥४॥
या अमृतवाणी प्रमाणेच श्री संत गजानन महाराजांची पालखी श्री क्षैत्र पंढरपूर पायदळ वारी पूर्ण करून आज दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या घरी आपले चे स्वागत. मोठ्या उत्साहात श्रींच्या पालखीचे, वारकऱ्यांच्या स्वागत करण्यात आले
ऊन, वारा,पाऊस अंगावर झेलत विठ्ठलनामाचा गजर करीत दि.२९ जुलै रोजी श्री क्षैत्र पंढरपुरहून संत नगरी शेगांवकडे निघालेल्या श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, गजानन अवलिया अवतरले जग ताराया, विठ्ठलाच्या नामाचा गजर , वीणा, टाळ-चिपळ्यांचा किणकिणाट, मृदंगांचा विशिष्ट ताल आणि घुमणारे भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात श्रींच्या पालखीचे दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी संत नगरीत आगमन झाले. या वेळी आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो भाविकांनी श्रध्दा भावनेने दर्शन घेतले.

खामगांव येथील  शेवटच्या मुक्काम आटपुन दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५ वाजता पासुन खामगाव ते शेगांव भाविकांची गर्दी कमी झाली नाही तर जवळपास अडीच लाखांहून अधिक  महिला, पुरुष, युवक,युवती,लहान बालके भाविकांनी खामगांव ते शेगांव पायदळ वारी केली. सकाळी  कामगार मंत्री अॅड आकाश फुंडकर यांनी श्रींच्या पालखीचे पुजा करुन श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले, सकाळी  ९ वाजता माऊली इंजिनिअरिंग काॅलेज येथे ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी श्रींच्या पालखीचे पूजा करुन दर्शन घेतले.सकाळी ११: वाजता श्रींच्या पालखीचे आगमन श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आगमन होताच या ठिकाणी  श्रींच्या पालखीचे विधिवत पूजा करुन मनोभावे स्वागत केले. १२ वाजता श्रींच्या पालखीचे  स्वागत श्री गजानन वाटिका येथे संस्थानचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्त याच्या हस्ते श्रींच्या पालखीचे पुजन करुन श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले त्यानंतर श्रींच्या पालखीची आरती करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी मनोभावे दर्शन घेतले. श्री गजानन महाराजांच्या शेगांव ते श्री क्षेत्र पंढरपुर पालखी सोहळ्याचे जाणे येणे  अंतर तब्बल १३०० किलोमीटर  इतके मोठे आहे.श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदा ५७ वर्ष असल्याने या सोहळ्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले. या पालखी सोहळ्यात शिस्तीचे भक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले पालखीत पांढऱ्याशिभ्र पोशाखातील ७०० भगव्या पताका धारी, टाळकरी वारकरी एका रांगेत चालत होते.यात तरुणांच्या सहभाग उल्लेखनीय होता. श्री गजानन महाराजाच्या नामाचा गजर ,वीणा,टाळ, चिपळ्यांचा किणकिणाट, मृदंगांंचा विशिष्ट ताल आणि घुमणारे  गजानन महाराज भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात भाविक तेवढेच तल्लीन होऊन श्रीं च्या दर्शनासाठी पुढे येत होते. अग्रभागी असलेळ्या एक अश्वाला स्पर्श करुन भाविक दर्शन घेत होते. पालखी सोहळ्याच्या पारंपरिक मार्गावर स्थानिक भाविकांनी रस्त्यावर सडासंमार्जन करुन सुरेख रांगोळी काढण्यात आले श्रींच्या पालखीचे स्वागत केले. तर रस्त्यावर अनेक ठिकाणी भाविक ,कार्यकर्ते ,सामाजीक संघटना, इत्यादिंनी वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता, फराळ, पाणी, अल्पोपाहाराची, महाप्रसादाची, सोय करुन मनोभावे सेवा रुजू केली होती. श्रीची पालखी श्री गजानन वाटीकेवर पोहचताच या ठिकाणी वारकऱ्यांना महाप्रसाद घेऊन श्रीची पालखी मंदिराकडे प्रस्थाना दरम्यान दुपारी १.३० वाजता श्री जगदंबा चौक, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाव विभाग, रेल्वे स्टेशन, पोस्ट आफीस, पोलीस स्टेशन, पेट्रोल पंप, स्टेट बॅंक, यांनी पालखीचे स्वागत केले. पालखी अग्रसेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, संत गाडगेबाबा चौक,  लहुजी वस्ताद चौका येथून श्रीची पालखी संध्याकाळी ६. वाजता मंदिरात पोहचताच या ठिकाणी ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल माझ्या माझ्या, गजानन अवलिया अवतरले जग ताराया, अभंग व गोल रिगण होऊन सायंकाळी श्री विठ्ठलाची व श्रीची महाआरती करुन.श्रीच्या ५७ पायदळवारी पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. निःशुल्क बससेवा. शेगांव ते खामगाव श्रीच्या पालखीसोबत पायदळ  वारी करणाऱ्या भाविकांसाठी शेगाव येथून खामगाव परत जाण्यासाठी खामगाव शेगाव स्कूल बस असोशिएयन, कॉलेज ऑफ मॅनेजमेंट खामगाव च्या वतीने निशुल्क बस उपलब्ध करून दिल्या गेल्या शहरातील  माऊली बस टर्मिनल,  छत्रपती संभाजी महाराज चौक गजानन सोसायटी शेगाव येथून व्यवस्था करण्यात आली याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. तुझी सेवा करीन मनोभावे भाविकांकडून सेवा.

श्रींच्या पालखीत सहभागी भाविकांच्या सेवसाठी खामगांव व शेगाव येथील भाविकांकडून सेवा दिले गेली आहे  यामध्ये महाराजा रेसिडेंसीसमोर भाविकांना  पोह्याचे वितरण, तिरुपती ग्रुपच्या वतीने करण्यात आले तर हनुमान मंदिराजवळ साबुदाणा उसळ आणि फराळाची व्यवस्था होती. लासुरा फाट्यावरील वसंत महाराज अन्नकूटी परिवाराच्या वतीने औषध, चहा, नाश्त्याची तर सामान्य रुग्णालय प्रशासनाकडूनही भाविकांसाठी औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे तर खामगाव ते शेगाव या मार्गावर ठिकठिकाणी पाणी ,चहा, नाश्ता, फराळ, महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे.

भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा.
खामगाव ते शेगाव पायी येणाऱ्या भक्तानां परत जाण्या  येण्या करीता दरम्यान भक्तांची गर्दी पाहता एस टी महामंडळाच्या वतीने जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली यामध्ये शेगाव आगाराच्या वतीने अतिरिक्त बसेस बुलडाणा, चिखली, खामगाव, मेहकर,जळगाव जामोद, शेगाव, मलकापूर,.इत्यादी.
शहरात भाविकांच्या महासागर...

खामगांव-शेगांव मार्ग श्रींच्या भक्तांच्या गर्दीने एक झाली गेल्या दहा वर्षांपासून खामगांव ते शेगांव १७ कि. मी. पायदळ वारीत भाविकांची संख्या कमी झाली नाही  अधिक अधिक वाढ होत आहे या वर्षी जवळपास अडीच लाखांहून अधिक भाविकांनी खामगांव शेगांव पायदल वारी करुन श्री गजानन महाराज मदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले.श्रींच्या महाप्रसाद, दर्शन  श्री गजानन वाटिका या ठिकाणी व श्रींच्या मंदिर परिसरातील महाप्रसाद या दोन्ही ठिकाणी एक लाखाहून अधिक  भाविकांनी महाप्रसाद लाभ घेतला.श्रींच्या समाधी दर्शनासाठी ३ तास तर श्रीमुख दर्शनासाठी १ तास वेळ लागत आहे.

खामगांव शेगांव पालखी मार्गवर  गर्दित कोणताही अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांच्या मार्गदर्शनाखाली खामगांव, शेगांव शहरात एकुण ५०० पोलीस कर्मचारी, अधिकारी ठिकठिकाणी चौखबंदोबस्त लावन्यात आला होता तर वाहनांमुळे भाविकांला त्रास होऊ नये या करीता वाहनांना शहरात बंदि करण्यात येऊन शहरा बाहेरुन वाहने पुढे पाठविण्यात आली.

खामगाव ते शेगाव पायदळ वारी मध्ये
भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे...
श्री संत गजानन महाराजांच्या पंढरपूरहून परतीच्या पालखी सोहळ्यादरम्यान, खामगाव ते शेगाव या अंतिम टप्प्यात अडीच लाखांहून अधिक भाविकांनी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पायदळ वारीत सहभाग घेतला. "गण गण गणात बोते" च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला होता.

देशातील हवा बदलली, भाजपाकडे मुद्दाच नाही म्हणून वंदे मातरम वरून हिंदू-मुस्लीम करण्याचा अघोरी डाव, पण ‘मोहब्बत की दुकान’ हाच काँग्रेसचा मार्ग : हर्षवर्धन सपकाळ
आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : दि. १९ ऑगस्ट २६ देशातील वातावण बदलले आहे, जनता आता भाजपा मोदी शाह सरकारला प्रश्न विचारत आहे आणि सरकार पूर्णपणे घाबरले आहे. भाजपा सरकारकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढण्याचे षडयंत्र रचले आहे. वंदे मातरम वरून भाजपाने सुरु केलेल्या षडयंत्राला बळी पडू नका. देशातील हवा बदलली असली तरी बदला घेण्याची संस्कृती काँग्रेसची नाही तर ‘मोहब्बत की दुकान’ हाच आपला मार्ग आहे, तो सोडू नका, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष आ. साजीद खान पठाण यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवन येथे संपन्न झाला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. अस्लम शेख, अमिन पटेल, आ. शिरीष नाईक, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार एम. एम शेख, वजाहत मिर्झा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, वंदे मातरम या गिताला राष्ट्रगिताचा दर्जा हा काँग्रेसने दिला, महात्मा गांधी, पंडित जहारलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाचंद्र बोस यांच्या प्रमुख नेतृत्वात वंदे मातरमची किती कडवी गायची हा निर्णय घेतला गेला. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ते गायिले जाते, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भागही घेतला नाही त्या भाजपाने काँग्रेस पक्षाला राष्ट्रभक्ती शिकवण्याची गरज नाही. समाजात वाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणे हा भाजपाचा डाव असून त्यासाठीच वंदे मातरम चा वाद उकरून काढला आहे पण त्यांचा हा कुटील डाव कदापी यशस्वी होणार नाही, असेही सपकाळ म्हणाले..

अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यावेळी म्हणाले की, मागील १२ वर्षापासून देश मोठ्या संकटातून जात आहे. पण आता हवा बदलली आहे, दिल्लीत जंतर मंतरवरून विद्यार्थ्यांनी सरकारला जाब विचारला, या विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आले, पाटण्यात एके ४७ चालवण्यात आली, गोळ्या घातल्या पण ते मागे हटले नाहीत शेवटी सरकारला मागे हटावे लागले. विद्यार्थ्यांनी संसदेकडे कूच केली त्यावेळी भाजपाचे मंत्री संसदेतून पळाले. जेन-झी च्या रेट्यामुळे पंतप्रधानांची झोप उडाली असल्याने रात्री अपरात्री ते व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी राहुल गांधी हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ‘छात्रों की गुंज’ अभियान हाती घेऊन ते देश ढवळून काढत आहेत. ‘कोटा’पासून सुरु झालेला हा एल्गार अडवण्याचा भाजपा सरकारने प्रत्येकवेळी प्रयत्न केला. आता २२ तारखेला पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमातही अडथळा आणण्यासाठी जमाव बंदीचा आदेश जारी केला आहे. परंतु भाजपा सरकारने राहुल गांधी यांना अडवण्याचा प्रयत्न करू नये, कोणतीही शक्ती राहुल गांधी यांना अडवू शकत नाही. पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी करून दाखवा, असेही इम्रान प्रतापगडी यांनी म्हटले आहे.

‘वंदे मातरम’ वरून भाजपा काँग्रेसला राष्ट्रभक्ती शिकवत आहे पण ज्यांनी इग्रजांना साथ दिली त्यांनी राष्ट्रभक्ती शिकवू नये असे टोला लगावत इम्रान प्रतापगडी म्हणाले की, पंडित नेहरू १२ वर्षे तुरुंगात गेले होते, काँग्रेसचे अनेक नेते जेलमध्ये गेले, इंग्रजांविरोधात लढा दिला, भाजपाचा कोण नेता स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होता हे सांगा. आपली लढाई फॅसिस्ट शक्ती विरोधात आहे आणि भाजपाला फक्त काँग्रेसच रोखू शकते असे सांगून आता भाजपा सरकारचे काऊंडडाऊन सुरु झाले आहे, असेही इम्रान प्रतापगडी म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, भाजपा सरकारने मागील १२ वर्षापासून देशाला लुटत आहे. लोकशाही व देशाचे संविधान बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण राहुल गांधी यांनी भाजपा आरएसएसचे मनसुबे यशस्वी होऊ दिले नाहीत. भाजपाचा खंबीरपणे मुकाबला फक्त राहुल गांधीच करू शकतात आणि देशाला वाचवण्यासाठी राहुल गांधी यांना २०२९ मध्ये पंतप्रधान बनवण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.