हे त लय झाली हो

हे त लय झाली हो

घरी संडास न बांधल्यानं सारी गोठ वाया गेली हो ।माही बायको राज्या तिच्या माहेरी चाल्ली गेली हो ।हे त लय झाली हो …. ॥ १ ॥ तिचा रोजचा नांदा म्हणे घरी संडास बांधा ।नाहीतन आपल्या संसारात म्हणे पळुन जाईन वांधा ।तिची गोठ म्या कधी मनी नाई धरली हो …हे त लय झाली हो … ॥… Continue reading हे त लय झाली हो

घरी संडास न बांधल्यानं सारी गोठ वाया गेली हो ।
माही बायको राज्या तिच्या माहेरी चाल्ली गेली हो ।
हे त लय झाली हो …. ॥ १ ॥

तिचा रोजचा नांदा म्हणे घरी संडास बांधा ।
नाहीतन आपल्या संसारात म्हणे पळुन जाईन वांधा ।
तिची गोठ म्या कधी मनी नाई धरली हो …
हे त लय झाली हो … ॥ 2 ॥

संडासचा पयला हप्ता पत्ता दारु मटनामधी गेला ।
संडास बांध्यासाठी त्यातला उरला नाई एकवी ढेला ।
शासनाची कारवाई व्हयाची येळ माह्यावर आली हो ..
हे त लय झाली हो …. ॥ 3 ॥

माह्या बायकोच नाई मावच सारं चुकलं |
या रिकाम्या शौकापाई माया संसाराचं सारं गणीतच हुकलं ।
हातानं सयपाक कऱ्याची पाई माह्यावर आली हो …
हे त लय झाली हो … I l ४ ॥

तिच्या माहेरी जाउन तिनं नोटीस मले देलं |
संडास बांध्यासाठी दादा तीनं मले कोर्टात नेलं | .
फारकतीची धमकी राज्या तिनं मले देली हो …
हे त लय झाली हो … ॥ ५ ॥

माही नशा दादा एका झटक्यातच उतरून गेली ।
घरी संडास बांध्याची म्या मग तयारीच सुरु केली ।
संडास बांधला घरी याची बातमी तीले गेली हो …
हे त लय झाली हो . . . ॥ ६ ॥

हे आयकून बायको माही चटकन घरी आली ।
कमाल केली म्हणे माया नवऱ्यान सांग्याले सुरु झाली ।
इज्जतीची लाज म्हणे नवऱ्यान माया राखली हो ..
हे त लय झाली हो …. ॥७ ॥

सांगे ते साऱ्या बायाईले आता उघड्यावर संडासले जानं बंद करा |
संडास बांध्यासाठी आपआपल्या नवऱ्यायले चांगलच कैचीत धरा |
माह्या बायकोची गोठ राज्या साऱ्या बायाईले पटली हो …
हे त लय झाली हो … ॥ ८ ॥

कवि अनिल हेलोडे, जळगांव (जामोद ) संपर्क :9561677878

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर  : ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि...
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार
बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका