बंद पडलेल्या एसटी बसवर दुचाकी धडकली ; तीन जण ठार ; वर्दडा फाट्याजवळील घटना…

बंद पडलेल्या एसटी बसवर दुचाकी धडकली ; तीन जण ठार ; वर्दडा फाट्याजवळील घटना…

आधुनिक केसरी न्यूज 

 ज़ैनुल आबेद्दीन

मेहकर  : भरधाव दुचाकीची रोडच्या साईटला बंद पडलेल्या एसटी बसवर आदळल्याने तीनजण जागीच ठार झाले ही घटना चिखली ते मेहकर रोडवर वर्दडा फाट्याजवळ मंगळवारी रात्री घडली. यामध्ये गोपाल पंढरी सुरडकर (वय २१)रा. बेराळा धनंजय परमेश्वर ढंग (वय२५) रा. वाघापूर आणि सुनील सुभाष सोनुने रा. चिखली अशी मृतांची नावे आहेत.लव्हाळा फाट्यापासून एक किमी अंतरावर वर्दडा फाटा आहे. तेथे चिखली आगाराची बस एमएच ०६ एस ८८१६ ही मंगळवारी, दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी बंद पडली होती. त्या बसचे दुरुस्तीचे काम कर्मचारी करीत होते. रात्री ७:३० वाजता लव्हाळा येथून गोपाल पंढरी सुरडकर, धनंजय परमेश्वर ढंग आणि सुनील सुभाष सोनुने हे दुचाकीने चिखलीकडे चालले होते. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट बसवर आदळली. दुचाकीचा वेग एवढा होता की, तिघांचाही
जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेतली. तसेच तिन्ही मृतदेह चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर काँग्रेस कमिटीच्या सेनगाव तालुकाध्यक्ष पदाची धुरा डॉ निळकंठ गडदे यांच्या खांद्यावर
आधुनिक केसरी न्यूज हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर करण्यात...
पुणे जिल्ह्यात राजकीय भुंकप काँग्रेसला धक्का, आमदार संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
पत्रकार अविनाश तराळ यांचा प्रामाणिकपणा : सापडलेले २० हजार रुपये केले परत
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भांगडीयांचाच भांगडा तर जोरगेवारांचाच जोर 
१३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व.
वकील संघाच्या अध्यक्ष पदी अशोक मुळे यांचा विजय
उजनी धरण ९४ टक्के भरलं, धरणातून भिमा नदीत १६ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग