खा.संजय राऊत खरंच पिसाळले?

खा.संजय राऊत खरंच पिसाळले?

आधुनिक केसरी न्यूज 


लेख/  "वाचा नसणारे प्राणी जेव्हा चवताळुन वेड्या पिशासारखं वागतात त्यांना पिसाळलं असं ग्रामीण भागात म्हटल्या जाते. मग तो कुत्रा असेल किंवा जनावर, लांडगा देखील पिसाळु शकतो. कुत्रा जर पिसाळला तर सर्रास हमरस्त्यावर चावा घेत फिरतो. त्यात त्याच्या दृष्टीला दुसरं काही दिसत नाही. राजकिय क्षेत्रात तसे काही नेते पिसाळल्यासारखेच वागतात. ज्यांच्या दृष्टीला संविधान पदावर बसलेला व्यक्तीचं महत्व कळत नाही. विरोधकांवर काय बोलावं?कुठं बोलावं? हे सुचत नाही. केवळ बदनामी करायची म्हणून अगदी चावा घेतत्याप्रमाणे नको त्या गोष्टी पुढे आणायच्या. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की पिसाळलेल्या प्राण्यावर कुणाचा विश्र्वास बसत नाही. तसंच काही फालतु बडबड करणाऱ्यांवर सामान्य जनतेचा विश्र्वास बसत नाही. काल माध्यमांसमोर बोलताना राऊतांनी चक्क हातात ग्लास घेवुन तोंडात घोट टाकल्याची ऍक्शन्ा केली अन् थेट पंतप्रधानाचा ब्रॅंड काढला. बरं झालं आदित्य ठाकरे दारू पितो हे मान्य त्यांनी केले. पण कुठलंही भान नाही. जाईल तसा तोल जावु देणं आणि बोलणं हे खऱ्या अर्थाने राजकिय संस्कृतीला शोभुन दिसत नाही. बिथरलेल्या मानसिकतेत राजकारण करताना काल त्यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कौटुंबिक सहलीचा फोटो ट्विट करत राळ उठवुन दिली. त्यावरूनच खऱ्या अर्थाने राऊतांची वैद्यकिय चाचणी उद्धवजींनी करून घेणे भाग वाटते.
    विश्र्व चषक सामन्यात अहमदाबादेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताची लढत झाली त्यात आपला पराभव झाला. खेळ हा शेवटी खेळच असतो. कुणीतरी हारणार? तर कुणीतरी विजयी होणार? मात्र ज्या भारतीय खेळाडूंनी सक्षम कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विश्र्वचषकात सलग दहा सामने जिंकले ही कामगिरी अंतिम सामना जिंकण्यापलीकडची म्हणावी लागेल. खरं तर खेळात राजकारण घुसवायला नाही पाहिजे. मात्र या महाशयांनी अहमदाबादला शेवटचा सामना झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सामना पाहण्यासाठी आले. त्याला चार दिवसापासुन राजकिय रंग दिला. खरं पाहिलं तर राऊतांच्या बडबडीमुळे भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य खचले असं म्हटलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण मैदानात खेळाडूंनी पाय ठेवण्या अगोदरच या माणसाने राजकिय रंग लावला. दुसरी गोष्ट म्हणजे मोदीजींनी मागच्या आठ-नऊ वष्र्ाात देशाच्या क्रीडा क्षेत्रात कमालीचे बदल केले. नवनविन खेळाडूंना प्रोत्साहित करताना प्रसंगी जातीने उपस्थित राहुन कौतुकही केले. त्याचाच भाग म्हणून जगाच्या पाठीवर भारतातल्या विविध क्षेत्रात खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय घडताना दिसते. पण ज्यांना केवळ राजकारण करायचं अशा लोकांना चांगलं दृष्टीत पडेल तरी कसं? अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे कशातही राजकारण करू पाहणारे संजय राऊत यांची मानसिकता अलीकडे पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखीच झाली की काय? असे लक्षात येते आणि ते साहजिकच आहे. कारण केंद्रात सत्ता नाही. राज्यात सत्ता नाही. भाजपाला धोका देवुन मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडी तयार करून केलेला खटाटोप पाण्यात गेला. कारण ओरिजनल शिवसेना एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून बाहेर पडली. दुसरं असं की, महाविकास आघाडीमध्ये एकमत राहिलं नाही. खा.संजय राऊत यांना उद्धवजीनं सामनामध्ये संपादक पदावरही ठेवलं नाही. मग अशा वेळी खरंच मानसिकता पिसाळलेल्या प्राण्यासारखी होवु शकते. ज्यांना जळीस्थळी केवळ विरोधक दिसतात. मग त्यांच्या नावाने शिमगा करीत बसल्याशिवाय दुसरं कामच नाही. राऊत म्हणजे रोज सकाळी नऊ वाजता घराघरात वाजणारा भोंगा. सुरूवातीला जनतेला बरं वाटलं. पण रोजची किटकिट पाहिल्यानंतर टिव्हीवर त्यांचा चेहरा दिसला की लोक आता टिव्ही बंद करू लागले हे तितकंच खरं. अगोदर म्हटल्याप्रमाणे पिसाळलेल्या प्राण्यासारखं त्यांचं राजकिय वर्तन सद्या अशोभनीय वाटतं. पत्रकार परिषदेत कुठल्या भाषेत काय बोलतील? ज्यांना सामाजिक संस्कृतीचं भान रहातच नाही. मध्यंतरी किरीट सोमय्याच्या विरोधात अश्लिल भाषा पत्रकार परिषदेतच तोंडुन बाहेर पडली होती. काल तर या माणसाने कहरच केला. उद्धवजीचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा नशा करतानाचा एक फोटो ट्विट झाला होता. तो धागा पकडून एका पत्रकाराने राऊतांना विचारले त्यावर या माणसाने दिलेले उत्तर अगदी झिंगाट नशेत तरलेल्या नव्हे तर गांजा मारलेल्या व्यक्तीने बोलावं तसंच होतं. उजवा हात तोंडापाशी घेवुन ऍक्शन करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी जो ब्रॅंड पितात तोच आदित्य ठाकरे पितात असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे दारूडे असल्याचं कबुल केलं. खरं तर अशा राजकिय नेत्याची किव येते की ज्यांना पत्रकारांच्या समोर काय आणि कसं बोलावं? याचं भान रहात नाही. संविधानाच्या आधारे सर्वोच्च पदावर बसणारा व्यक्ती आणि त्याच्यावर आरोप करताना किमान आपली लायकी आणि पात्रता ओळखायलाच हवी. राऊत स्वत:चं आत्मपरिक्षण करतच नाहीत आणि केलं तर आपली लायकी त्यांना कळुन चुकेल. पण ज्यांचं भान जागेवर नसतं,मानसिकता बिथरलेली असते नव्हे तर पिसाळलेल्या प्राण्यासारखी असेल तर मग जनतासुद्धा त्यांच्याकडून चांगलं वर्तन अपेक्षित करणं शक्य नाही. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कौटुंबिक सहलीसाठी मकाऊ येथे गेले. आपल्या लेकराबाळासह एका हॉटेलमध्ये थांबले असताना कशिनो रेस्टॉरंट जिथे एकत्रित होतं. तिथला एक फोटो या माणसाने ट्विट केला. आपण जणुकाही वेगळा इतिहास घडवणार भीमदेवी थाटात त्यांनी पत्रकार परिषद घेवुन आरोप केला. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विरोधकांवर आरोप करताना त्याची सत्यता जनतेला पटली तरच त्या आरोपात तथ्य असु शकतं. अन्यथा असे शंभर आरोप फुसक्या बॉंबसारखे निघतात. एका मोठ्या सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्ष पदावर बसलेल्या व्यक्तीची बदनामी आपण कशी करू शकतो? एवढाच अहंम भाव मनात ठेवुन या माणसाने केलेली कृती विकृत स्वरूपाची म्हणावी लागेल. खरं तर अशा माणसाकडून राज्यात व्यक्तीगत चारित्र्यहनन करण्याची मोहिम जेव्हा समोर येते तेव्हा खरंच राजकारण कुठे नेवुन ठेवणार? असा प्रश्न पडतो. या निमित्ताने ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धवजींना एक सांगणे आहे की त्यांनी संजय राऊतांना काही दिवस मानसोपचार तज्ञाकडे घेवुन जाण्याची गरज वाटते. हे जरं केलं नाही तर शिल्लक राहिलेल्या पक्षाची अवस्था यापेक्षाही पनौतीकडे गेल्याशिवाय रहाणार नाही. भारत-ऑस्ट्रेलिया लढतीत आपला पराभव होण्यामागचं खरं कारण अशी माणसच ज्याला कारणीभुत असं म्हटलं तर वावगं नाही. त्यांची जीभ काळी असावी. कारण दोन दिवस अगोदर राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मॅच पहायला येणार म्हणत नकाराची घंटा वाजवली होती. कदाचित तो शाप भारतीय खेळाडूला लागला असावा. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. विजयाने उन्मत्त झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जेव्हा विश्र्वचषक कप पायदळी तुडवला यावर हा माणुस एक शब्द बोलला नाही हे विशेष.
    - राम कुलकर्णी,
  भाजपा प्रदेश प्रवक्ता

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सिडीसीसी बँकेवर सायबर हल्ला, ३ कोटी ७० लाखांवर मारला डल्ला सिडीसीसी बँकेवर सायबर हल्ला, ३ कोटी ७० लाखांवर मारला डल्ला
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि. 13 रोजी नौकर भरती च्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या चंद्रपूर जिल्हा...
आनंदवन हे ख-या अर्थाने मानवतेचे मंदीर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्रीयांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क अभियान डॉ.शशिकांत खेडेकर यांचा स्तुत्य उपक्रम 
लोकार्पित झालेली अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवीन दालन ठरेल : आ.किशोर जोरगेवार
केंद्रीय अर्थसंकल्पावर बी.एन.एन. महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न
चंद्रपूरच्या विधी क्षेत्राने मानले आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार
साईबाबा संस्थानच्या दोन कामगाराचा खुन करणारे दोन आरोपी जेरबंद